Taddy - 2 books and stories free download online pdf in Marathi

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग २

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग २

गायत्री आपली घरी येऊन बंगल्या मधील पार्किंग मध्ये गाडी नीट पार्किंग करते. बंगला अगदी तिचा मॉर्डन टाईप होता. पुढे बाग होती. मेन गेट पासून ते बंगल्या पर्यंत अरुंद रस्ता. मधोमध एक फाऊंटन होत. ते रात्रीचं खूपच आकर्षक वाटत असायचे. त्यात असलेल्या लाईट मुळे. रस्त्याच्या बाजूला झाड होती. पूर्ण गार्डन एरिया सारखं होत. झाड अशी वेगवेगळी होती. पार्किंग एरिया बबंगल्याच्या मागे अंडर ग्राउंड तयार केलेला होता. मोठा असा होता. गायत्री आपली गाडी तिथं आणून पार्क करत असायची आणि मग तिथच असलेल्या लिफ्टचा वापर करून ती आपल्या घरात जात असायची. आजही तिने तसेच केले. आपले सामान , टेडी हातात घेऊन ती गाडी लॉक करून लिफ्टच्या दिशेला जात होती. टेडीला तिने खूपच घट्ट पकडले होते आणि बाकीचे सामान नीट पकडले होते. तेवढ्यात तो टेडी आपोआप हलतो आणि तिच्या हातात राहून श्वास घ्यायचा प्रयत्न करत असतो.

"अबे छोडऽऽऽ छोडऽऽऽ। जान लेगी का मेरी?",पुन्हा आवाज तिच्या कानी पडतो. आता टेडी हलत होता म्हणून ती पटकन त्या टेडीला स्वतः पासून दूर करते. तसा टेडी जमिनीवर पडतो आणि स्वतःला सावरत हात झाडत उभा राहतो तिच्यासमोर. ती तर या दृश्याने खूपच घाबरते. टेडी पाठमोरा तिला उभा असतो. पण इकडे त्याला स्वतः हून उभ राहिलेलं पाहून हिचे हात पाय थरथर कापू लागतात.

"बोलणारा टे.....डी......",कसेबसे भीतीने तोंडातून शब्द पडतात बाहेर. आता तिचा तो घाबरलेला आवाज ऐकून टेडी मागे वळतो. तो आपल्या काळया डोळ्यांनी तिला पाहतो. हात अगदी कंबरेवर ठेवून तो तिला पाहत असतो.

"तुमको बोला था चूप बैठ! लेकीन नहीं! बकबक बकबक करके मेरा दिमाग खा लिया।‌ वो कम था की, तुमने अब मेरे पेठ को ऐसें पकडा था की, उल्टी हो रही थी।",टेडी बिअर काहीसा चिडत तिला पाहून बोलत असतो. ती तर त्याला अस बोलताना पाहून खूपच घाबरते. थोडी हिंमत करत ती मागे वळते.


"आज से मैं तुम्हारे साथ रह ले रहा हुं। मैं जो कहुंगा वो तुम सूनोगी चॅट बॉक्स।",टेडी एटीट्युड दाखवत म्हणाला. तो हळूच तिच्या जवळ चालत जातो.


"पहेले मुझे तुम जैसा प्यार कर रही थी वैसा कर अब। मेरी मंगेतर फिलहाल यहाँ नहीं है।‌ तो आज से तुम ही मेरा सबकुच हो।", टेडी तिला पाहून म्हणाला. त्याचा एक एक शब्द ऐकून तिचे डोळे मोठे होतात.


"याची फॅमिली याच्या सारखीच आहे? एवढे टेडी घरात आले तर?नाही नको.....मला हाच नको आहे....पुन्हा नाही घेणार टेडी.....",ती मनातच विचार करत म्हणाली.


"नाही. मला नको तू.",गायत्री थोडीशी हिंमत करत म्हणाली.


"तू मेरा अभी ऑपरेशन कर रही थी।",टेडी थोडा गुस्यात म्हणाला. पण गायत्रीला नेमके तो काय बोलत होता? हे कळत नव्हते. ती त्याला तिथच टाकून नजर चुकवून लिफ्टच्या दिशेने पळून जाते. टेडीला तेवढं पटकन धावता येत नसल्याने, तो तिच्या पर्यंत पोहचत नाही. ती लिफ्ट मधील बटन दाबून वर निघून येते. बंगल्याच्या आत येताच ती मोठ्या मोठ्याने आपले श्वास घेत असते. जे आता पाहिले ते तिच्या डोक्याच्या बाहेरील होत. बोलणारा टेडी बिअर पाहून तर तिला खूपच भीती वाटली होती. एवढी होती ती भीती की, अजूनही ती कापत होती. टेडी काहीसा नाराज होऊन तिथच बसतो.


"सुशीला मेरी सुशीला अब तू ही मेरा सहारा है। ही पोरगी तर घाबरली मला....वाट पाहत असेल सुशीला माझी....",टेडी दुःखी होऊन स्वतःशी बडबडत असतो. तो स्वतःला सावरत चालत एक एक पाऊल पुढे टाकत असतो. कोणी पाहिले तर पुन्हा घाबरेल या विचाराने, तो स्वतःला लपवत असतो. कसा बसा सगळ्यांची नजर चुकवून तो गायत्रीच्या बंगल्याच्या बाहेर येतो आणि रस्त्याने चालत जात असतो. रात्रीची वेळ असल्याने, कोणी लोक नव्हते रस्त्यावर. कोणी गाडी वाला दिसला की तो टेडी एका जागेवर जाऊन गप्प पडुन राहत असायचा. असेच करत असताना एक गाडी त्याला दिसते. मनात काही तरी विचार करून तो टेडी बरोबर गाडीच्या समोर येऊन पडतो. तसा गाडीत बसलेला ड्रायव्हर पटकन ब्रेक दाबून गाडी थांबवतो.


"काय झालं काका?",गाडीत बसलेली मुलगी विचारते.


"टेडी बिअर आहे मोठा. मी जाऊन बाजूला करतो रस्त्यातील.", ड्रायव्हर अस बोलून बाहेर जात असतो. तशी मागे बसलेली मुलगी त्याला अडवते.


"काका, तुम्ही थांबा. मी जाते पाहायला.",ती मुलगी अस बोलून गाडीचा दरवाजा ओपन करून बाहेर येते. ती चालत त्या टेडी बिअर जवळ जाते आणि त्याला पाहते.


"किती सुंदर आहे हा टेडी. याला तर मी दिदीला गिफ्ट करेन. तिची इच्छा होती. आता मी पूर्ण करेन.",ती मुलगी अस बोलून त्या टेडीला हातात घेते आणि नीट सांभाळून आपल्या गाडीत आणते. हळूच त्याला मागच्या सीटवर ठेवून ती त्याच्या बाजूला बसते. आता टेडी अजिबात आवाज करत नाही. ती मुलगी मात्र त्याला जास्तच कुरवाळत असते. काही वेळाने त्यांची गाडी आपल्या घरी येते. तशी ती मुलगी टेडीला हातात घेऊन बाहेर पडते आणि आपल्या घरात घेऊन जाते. टेडी मात्र घर पाहून भयंकर खुश होतो. त्याला सोफ्यावर एक मुलगी बसलेली दिसते. तिला पाहून तो गालात हसतो. पण यावेळी नॉर्मल टेडी सारखा तो वागतो.


"दीदी तुझ्यासाठी मी काय आणले आहे. ते बघ!",ती हसून सोफ्यावर बसलेल्या मुलीकडे पाहत म्हणाली.


"अंतराऽऽऽ",तिचा आवाज ऐकून ती स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. हळूच ती नजर वर करते आणि आणखीन शॉक होते.


"तू???",ती अंतराच्या हातात असलेल्या टेडी कडे पाहत म्हणाली. टेडी अगदी शांतच असतो.


"दीदी, अशी काय तू त्याला विचारते? निर्जीव वस्तू आहे ती. तुला टेडी आवडतो ना? म्हणून मी आणले आहे. मला रस्त्यावर पडलेला दिसला. खूप सुंदर आहे म्हणून आपल्या घरी आणले. एवढ्या सुंदर टेडीला कोणी फेकून देते का? लोक पण विचित्र असतात."अंतरा टेडीला हात लावत बडबडत असते. तिचे बोलणे ऐकून तर गायत्री थोडी नजर चोरते. टेडी मात्र हिला हसून पाहत असतो. अंतरा त्याच्या आणखीन कुठे कुठे हात लावणार म्हणून ती पटकन तिच्या हातून टेडी आपल्या हातात ओढून घेते.


"अंतरा तू जा फ्रेश व्हायला. मी पाहते टेडीच या! ", गायत्री खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. तसा टेडी हळूच गायत्रीच्या डोळ्यात पाहतो. अंतरा "ओके", असे बोलून तिथून निघून जाते. ती गेल्यावर गायत्री त्या टेडीला उचलून घेऊन आपल्या रूम मध्ये थोडी धावत जाते. पटकन रूम मध्ये येऊन ती रूम लॉक करते आणि सुटकेचा निःश्वास सोडते.


"तू कोण आहेस? माहीत नाही मला. पण तू जर अस वागत राहिला तर घाबरतील लोक.",ती त्याला बेडवर टाकत म्हणाली. काळजी, भीती सगळ काही होत सध्या तिच्या बोलण्यात.


"आ गयी पॉइंट पे?",तो विचारतो.


"हो. कारण लोकांनी तुला फेकून नाही दिले पाहिजे म्हणून मी तुला स्वीकारत आहे. मला टेडी बिअर कचराकुंडीत पाहायला आवडत नाही. मी पळत वर आले खरी. पण नंतर विचार करून तुझ्याजवळ आले, तर तू तिथे नव्हता. मला वाईट वाटले. त्यामुळे तू रहा इथेच.", गायत्री डोळे पुसत म्हणाली. तिला अस रडताना पाहून टेडी शांत होतो.


"मी युवराज पाटील. युवी पाटील म्हणतात मला. मगाशी तू ऑपरेशन केलं माझं. पण मी कोमात गेलो आहे. माहीत नाही काय झालं . माझी आत्मा टेडीत आली आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे. खूप काम पेडींग राहिली असेल? त्यामुळे डॉक्टर तू मला मदत कर. प्लिज, आय रिक्वेस्ट यू...माझी होणारी बायको सुशीला तर तुटून गेली असेल.",टेडी तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याचं बोलणे ऐकुन ती शांत होते. एकदा त्याला पाहून ती आपले डोळे पुसते.

"तुझ्या बायकोला हे सगळ सांगू आपण. तू जा बायकोकडे.", गायत्री विचार करत म्हणाली. पण तिचे बोलणे ऐकून टेडी नाराज होतो.

"ती मला स्वीकारेल? अस आता नाही वाटत. मी हँडसम आहे यार पण आता या अवतारात नाही कोणी मला स्वीकारणार.", टेडी दुःखी होत म्हणाला. त्याचं बोलणे ऐकून ती त्याच्या जवळ येते.

"प्रेम असेल? तर रंग, अवतार नाही पाहत कोणी. हे तुम्हाला कळले नाही का? आपण उद्या जाऊ तुमच्या बायकोकडे. तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपते.",ती त्याला समजावत म्हणाली. थोड्या वेळापूर्वी घाबरणारी ती आता थोडी फ्री होऊन बोलत होती. टेडी तर तिला पाहत राहतो.


गायत्री हसून फ्रेश व्हायला निघून जाते आणि नंतर काहीवेळात दोन प्लेट मागवून त्याला जेवायला लावते. टेडीला चमचा हाताने धरता येत नव्हता. त्यामुळे तिचं मदत करून त्याला भरवते. त्याची कहाणी ऐकून थोड वाईट वाटले होते तिला. त्यासाठी ती मदत करत असते.

"तू बहोत क्यूट है....लाईक डॉल....",टेडी बेडवर पडत म्हणाला. त्याच्या अश्या बोलण्याने ती हसते. नंतर आपल खाली जाऊन अंतराला भेटून येऊन सोफ्यावर जाऊन झोपते.

क्रमशः
***************