Aaropi - 18 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

आरोपी - प्रकरण १८ शेवटचे प्रकरण

अर्ध्या तासाने न्या.मंगरुळकर आपल्या आसनावर येऊन बसले.
“ विखारे यांची सर तपासणी पूर्ण झाल्ये का तुमची?” त्यांनी पाणिनी ला विचारलं.
“ पूर्ण नाही झाली खरं तर, पण तो कोर्टात हजर नाहीये. पण तारकर इथे आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो.” &
इन्स्प.तारकर पिंजऱ्यात हजर झाला.
“ तुझो ठशांची तुलना पूर्ण झाली का? काय निष्कर्ष आहेत तुझे?”
“स्टील च्या पॅड वरचे विखारेचे ठसे हे कुलर आणि बॅटरी वरच्या ठशांशी तंतोतंत जुळले.” तारकर उत्तरला.
“ अत्ता विखारे कुठे आहे तुला माहिती आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ अगदी अद्ययावत ठाव ठिकाण माहिती आहे त्याचा.” –तारकर.
“ सांग.”
“ कोर्टातून अर्ध्या तासापूर्वी बाहेर पडल्यावर तो गाडीत वसला आणि विमान तळावर जायला निघाला.मला अंदाज होताच म्हणून मी सध्या वेषातील पोलीस त्याच्या मागावर ठेवले होते.त्याला मुद्दामच विमानाचं तिकीट काढू दिलं मी. तो पळून जातोय हे सिद्ध व्हावं म्हणून. ते विमान जिथे पोचणार आहे तिथल्या पोलिसांना लगेच मी सूचना दिल्या आहेत त्याला अटक करण्याच्या.” तारकर म्हणाला.
“ मी कोर्टाला काही सांगू इच्छितो.” खांडेकर म्हणाले. न्यायाधीशांनी मानेनेच संमती दिली.
“ गेल्या वेळी कोर्टाने आपलं कामकाज थांबवलं त्या दरम्यान मधुरा महाजन नावाने हॉस्पिटल मधे दाखल असलेल्या चैत्राली चिटणीस वरची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तिला शुद्ध आली आणि जेव्हा चंद्रवदन विखारे चा फोटो तिला दाखवण्यात आला तेव्हा तिच्यावर हल्ला करणाऱ्याचा फोटो म्हणून तिने तो ओळखलाय.”
“ खूप छान.” न्यायाधीश म्हणाले. “मिस्टर पटवर्धन, गुन्हेगाराचा हेतू काय असावा, तिला ठार करण्यामागे?”
“ सकृत दर्शनी असं दिसतंय की त्या घरात पैसे लपवण्याची छुपी जागा असावी याची कल्पना विखारेला देण्यात आली होती.त्याला संशय होता की ग्लोसी कंपनीचे मोठया रकमेचे शेअर्स मधुरा महाजन च्या नावाने केले गेले असावेत आणि तिने ते तिचा नवरा ग्रीष्म ला मदत म्हणून वर्ग केले असावेत.जर का या शेअर्स चा ताबा तो मिळवू शकला असता तर त्याला हे सिध्द करता आलं असतं की ग्रीष्म आणि मधुरा महाजन चा विवाह झालाच नाही किंवा झाला असेल तर तो कायदेशीर नाही कारण त्यांची आई शेफाली ही ग्रीष्म ची पाहिली पत्नी आहे आणि तिने कधीच ग्रीष्म शी घटस्फोट घेतलेला नव्हता.त्यामुळे ग्रीष्म ची जी जी संपत्ती आहे ती सर्व त्याच्या आईची म्हणजे शेफालीची आहे.त्या मधुरावर हल्ला करून ते शेअर्स ताब्यात घ्यायचा त्याचा प्रयत्न होता. मधुरावर हल्ला केल्यावर तो रात्री त्या घरी आला.पैसे आणि शेअर्स लपवण्याची जागा त्याला नेमके पणाने माहीत नव्हती ती शोधायच्या विविध प्रयत्नात त्याने कुलर हलवला आणि मधेच ठेवला, त्यालाच मिसेस मणिरत्नम अडखळून धडपडली. पण विखारेला कुलर खालच्या कार्पेट खालचा चोर कप्पा सापडला नाही. तो सापडला असता तर तिथली रोख रक्कम घेऊन त्याने पुन्हा कुलर होता तिथे ठेवला असता, कुणाला कळलेही नसते.”
“ म्हणजे पाणिनी, ज्यावेळी तुम्ही त्या घरात होता.....” न्यायाधीश विचारात पडून म्हणाले.
“” बरोबर , ज्यावेळी मी आणि कनक त्या घरात होतो, त्याच वेळी साहिर तिथे होता, विखारे तिथे पैसे आणि शेअर्स शोधायला आला होता आणि त्याच वेळी मिसेस मणिरत्नम तिथे होत्या, त्यांचाच धक्का कुलर ला लागला आणि त्यांना ही पण जाणीव झाली की आपल्या शिवाय इथे आणखी दोन तीन माणसं आहेत.त्या तिथून पसार झाल्या. आणि विखारे ही पसार झाला.साहिर आमच्या ताब्यात सापडला.”
“ जय मणिरत्नम ने त्याच्या कंपनीचे शेअर्स त्याच्या बायकोच्या नावाने म्हणजे मधुर मणिरत्नम च्या नावाने वर्ग केले होते ना , मग मिसेस मणिरत्नम च्या मागे लागायचे सोडून विखारेने मधुर महाजन वर का हल्ला केला? तो तिच्या म्हणजे चैत्राली चिटणीस च्या मागे का लागला? ” न्या. मंगरुल्कारांनी विचारलं.
“ याच कारण मिसेस मणिरत्नम यांनी चित्रा ला स्वतःची तोतया म्हणून स्वतःच्या घरात रहायला जायला सांगितलं होतं आणि त्या मात्र मीनल गोखले च्या शेजारी रहायला गेल्या. जेव्हा चित्रा चिटणीस ग्रीष्म च्या प्रेमात पडली आणि तिने ग्रीष्म शी लग्न केलं तेव्हा समाजाच्या दृष्टीने खऱ्या मिसेस मणिरत्नम यांनीच ग्रीष्म शी लग्न केलं.त्यांनी त्यांच्या भावाला तसं पत्राने कळवल्याची साक्ष मिसेस मणिरत्नम ने नुकतीच दिल्ये, युवर ऑनर. त्यामुळे चित्र चिटणीस उर्फ मधुर महाजन हीच जय मणिरत्नम ची पत्नी आहे असं जय चा मुलगा स्वकुल ला वाटत होतं आणि तेच त्याने विखारे ला सांगितलं होतं. स्वकुल कडे मोठया रकमेचे शेअर्स यावेत आणि ग्लोसी कंपनीमधे स्वकुल ची सत्ता यावी यासाठी विखारे त्याला मदत करत होता.” पाणिनी म्हणाला. “ विखारे वर कारवाई होण्यासाठी हा हेतू पुरेसा आहे ”
“ ज्या पद्धतीने मिस्टर पटवर्धन यांनी विखारे च्या हाताचे ठसे मिळवले त्या बद्दल हे कोर्ट त्यांचे कौतुक करत आहे.क्षिती अलूरकर विरुद्धचा हा खटला कोर्ट निकाली काढत आहे.तिची निर्दोष मुक्तता करत आहे.”
खांडेकरांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने पाणिनीच्या हातात हात मिळवून अभिनंदन केलं.
प्रकरण १८ आणि कादंबरी समाप्त