MANAGERSHIP PART 7 books and stories free download online pdf in Marathi

मॅनेजरशीप - भाग ७

मॅनेजरशीप  भाग ७

भाग ६ वरून  पुढे वाचा.

 

“ठीक तर मग.” मधुकरनी फायनल सांगितलं. “शक्यतो आजच गेल्या वर्षभरातले आकडे तयार करून या म्हणजे आपल्याला काही महत्वाचे निर्णय घेता येतील. आणि हो तुम्ही कसल्या कामात गुंतले आहात हे कोणालाही कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात घ्या.”

“ठीक आहे साहेब.”  आणि मीटिंग संपली.

संध्याकाळी पुन्हा मीटिंग भरली. सातपुते साहेबांनीच बोलायला सुरवात केली.

“साहेब, तुमचा संशय खरा ठरला. स्क्रॅप आणि वापस आलेलं मटेरियल यांचं composition जुळतं आहे.” – सातपुते. 

“मग याचा काय अर्थ काढला तुम्ही ?” – मधुकर.

“आपलं मटेरियल आपण लक्ष्मी मेटल मध्ये जॉब वर्क ला पाठवतो आणि तेथूनच पार्टी ला पाठवतो. आणि स्क्रॅप आपण लोहाणा कडे पाठवतो. निष्कर्ष असा निघतो की लोहाणा आणि लक्ष्मी मेटल यांचं कनेक्शन आहे आणि स्क्रॅप लक्ष्मीला जात असलं पाहिजे आणि पार्टीला पाठवतांना हे मटेरियल त्यात मिसळून पाठवल्या जात असलं पाहिजे. - सातपुते.

“करेक्ट.” – मधुकर. 

“मग साहेब आता काय अॅक्शन घ्यायची ?” – सातपुते.

“लक्ष्मी मेटल मध्ये असलेलं सर्व मटेरियल जसं असेल तश्याच स्थितीत वापस बोलवा. त्यांचं जे काही पेमेंट असेल ते देऊन टाका. त्यांना सांगा की आता यापुढे सर्व मटेरियल आंमच्याकडूनच पार्टीला जात जाईल.” – मधुकर म्हणाला.

“साहेब फक्त फिनिश मटेरियलच मागवु. बाकीच जॉबवर्क कंप्लीट झाल्यावर आणू. म्हणजे त्यांना फारसा संशय येणार नाही. आपण त्यांना सांगू की हा नवीन साहेबांचा निर्णय आहे. मग सुशील साहेब काय स्टेप्स घेतात बघता येईल.” – स्वामी. 

“वा स्वामिनाथन साहेब एकदम बरोबर बोललात. सातपुते, असच करा. पण उद्याच्या उद्याच करा.” – मधुकर. 

“होय साहेब. उद्याच सर्व फिनिश मटेरियल मागवून घेतो आणि लवकरात लवकर जॉबवर्क कंप्लीट करायला सांगतो.” सातपुते. 

“ओके चला let us call it a day. Don’t forget to keep this confidential.” मधुकरनी मीटिंग संपवली.

 

त्याच संध्याकाळी विक्रमसिंग, चक्रवर्ती आणि बर्डे सुशील बाबूंच्या बंगल्यावर.

सुशील बाबू बऱ्याच उशिरा घरी आलेत. फाटका पाशी या लोकांना बघून म्हणाले

“आता काय नवीन लचांड उभ केलं तुम्ही लोकांनी ?” – सुशील बाबू.

“बाबू, लचांड नाही पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणून हा विकी आलेला आहे.” चक्रवर्ती म्हणाला. “त्याला एकट्याला यायची भीती वाटत होती म्हणून आम्ही पण आलो.”

“हं काय रे विकी काय बातमी घेऊन आला आहेस ? चांगली की वाईट ?”

“ते माहीत नाही पण आज सकाळ पासून मधुकर साहेब, सातपुते साहेब, फिरके साहेब आणि स्वामिनाथन साहेब मीटिंग करत होते. मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. मी दारा पाशी गेल्यावर मला लोकांनी हटकलं आणि दम भरला. आजकाल साहेब आमच कोणी ऐकत नाही.” – विक्रम सिंग.

“अरे हा स्वामी काय करत होता तिथे ? त्याचं काय काम ?” – सुशील बाबू.

“नाही माहीत साहेब, पण सकाळची मीटिंग झाल्यावर फिरके साहेब आणि सातपुते साहेब दिवसभर काहीतरी काम करत होते. मग पुन्हा संध्याकाळी मीटिंग झाली. माझी वेळ झाली म्हणून मला निघाव लागलं पण मी बाहेरच उभा होतो. रात्री आठ वाजे पर्यन्त मीटिंग चालली साहेब.” विक्रम सिंग. 

“ठीक आहे. बघतो मी. हा नवीन मॅनेजर आल्या पासून सगळं काम बिघडायला लागलं आहे. तुम्ही जरा नजर ठेवा  आणि मला सांगत चला.  या तुम्ही.” – सुशील बाबू.

सुशील बाबूंचा चेहरा चिंताक्रांत होता. एकही काम त्यांच्या मनाप्रमाणे होत नव्हतं. धवन ला फोन करून उपयोग नव्हता. सगळे फायद्याचे साथीदार. कठीण समय येत कोण कामास येतो अशी अवस्था झाली होती. आता उशीर झाला होता त्यामुळे सकाळी पहिलं काम म्हणजे वकील ला फोन करायचं अस ठरवून त्यांनी बेड रूम चा रास्ता पकडला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी वकिल् ला फोन लावला.

“हॅलो, वकील साहेब, सुशील बोलतोय.”

“बोला साहेब.” – वकील. 

“मी तुम्हाला एक काम दिलं होतं. माधुकरची दिनचर्या शोधून काढण्याचं. त्याचं काय झालं. मला कुठलाच फीड बॅक मिळाला नाहीये.” – सुशील बाबू. 

“काय देणार साहेब, फीडबॅक ? साधा सरळ माणूस आहे. सकाळी आठ साडे आठ वाजता फॅक्टरीत जातो. रात्री आठच्या सुमारास वापस येतो. दारापाशी डबा ठेवलेला असतो. तो खातो आणि झोपी जातो. गुरवारची सुटी पण हा माणूस घेत नाही. सिनेमा नाही, संध्याकाळच फिरणं नाही. घर ते फॅक्टरी आणि फॅक्टरी ते घर. या पलीकडे काही नाही. नॉनवेज खात नाही. हॉटेल मधून काही बोलावत नाही. सकाळी दूध आणि संध्याकाळचा डबा एवढीच माणसं येतात. बस्स.” वकीलनी सांगितलं.

“ठीक आहे. बघतो काय करता येतं ते.” – सुशील बाबूंनी सांगितलं. 

सुशील बाबुना काय करांव ते सुचत नव्हत. त्यांचं डोकच चालत नव्हत. अशातच धवन चा फोन आला.

“अरे सुशील कहाँ हैं तू ? मेरे फैक्ट्री मे आ सकता हैं क्या अभी ?”

“मैं तो घर मे हूँ, आ सकता हूँ पर हुआ क्या ? बहुत डिस्टर्ब्ड लग रहे हो.” – सुशील बाबू.  

“बात ही ऐसी हैं, तू जलदीसे आ जा, आने के बाद सब पता चल जाएगा.” – धवन

“ठीक हैं.  अभी तुरंत निकलता हूँ आधे घंटे मे पहुंचता हूँ.” – सुशील बाबू.  

सुशील बाबू अर्ध्या तासात धवन कडे पोचले. समोरच त्यांना सचिन दिसला. त्यांना कळेना की सचिन इथे काय करतो आहे ते. असं आजवर कधीच झालं नव्हतं. सचिनला धवन कडे फक्त पार्टीला मटेरियल पाठवायच्या वेळेसच जायची जरूर असते आणि आज तर काहीच माल पाठवायचा नाहीये तेंव्हा हा इथे काय करतोय ?

“काय रे सचिन तू इथे काय करतो आहेस ?” सुशील बाबू म्हणाले.

“साहेब, सर्व फिनिश झालेलं मटेरियल फॅक्टरीत न्यायचं आहे.” – सचिन.

“का ?” – सुशील बाबू.

सचिननी उत्तर दिलं “मधुकर साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे सर्व माल फॅक्टरीतूनच dispatch होत जाईल म्हणून.”

“का ? काय कारण आहे ?” – सुशील बाबू.

“मला कस माहीत असणार साहेब ? मधुकर साहेबांनाच विचारा.” – सचिन. 

“ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी. तू तो पर्यन्त थांब.” – सुशील बाबू. 

“ठीक आहे साहेब.” – सचिन. 

सुशील बाबू आत धवन च्या केबिन मध्ये गेले.

“अरे धवन हा काय प्रकार आहे ? मटेरियल वापस चाललंय ?” – सुशील बाबू

“म्हणून तर तुला अर्जंटली बोलावलं. तूच पहा आता.” – धवन म्हणाला. 

“तू  असं कर मधुकरला फोन लाव आणि त्याला सांग की तुझं सुशील शी बोलणं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की प्रोसीजर मध्ये बदल करण्याची आवश्यकता नाहीये म्हणून.” हा मधुकर स्वत:ला मालक समजतो का काय ? आता सुशील बाबू चिडले होते.

धवनने फोन लावला थोडा वेळ बोलणं झालं मग त्यांनी फोन ठेवला.

“काय झालं, प्रॉब्लेम सुटला ना ?” सुशील बाबूंनी अधीर होऊन विचारलं. 

“माहीत नाही. तो म्हणतो की डायरेक्टर साहेबच, असं जर म्हणत असतील, तर काहीच हरकत नाहीये. फक्त सुशील बाबूंनी माझा निर्णय फिरवला आहे असं पत्र द्या. म्हणजे माझ्या वर ठपका येणार नाही.” धवननी गंभीर स्वरात सांगितलं.

“मग काय अडचण आहे ?” सुशील बाबू म्हणाले. “देऊन टाक तसं पत्र. मी आहेच इथे सपोर्ट करायला.”

“तू समज़ नहीं रहा हैं सुशील. मुझे नहीं लगता की ये सब मधुकरने अपने दम पर किया होगा. ये लेटर मधुकर तुरंत किरीट के पास लेके जाएगा, ये संभावना नकार नहीं सकते किरीट को ये इन्सल्टिंग भी लग सकता हैं, और फिर उसके बाद सब कुछ चौपट हो जाएगा, जरा सोच. थोडा समय ले. वांधा नही.” धवननी सुशील बाबूंना समजावलं. थोड़ा वेळ  तसाच गेला. प्रकरण किरीट पर्यंत पोचतेय म्हंटल्यावर सुशील बाबू पण विचारात पडले. त्यांना किरीटशी पंगा घेण्याची इच्छा नव्हती. शेवटी म्हणाले की

“मग काय करायचं आता ? मेरे तो धवन कुछ समजमे नहीं आ रहा हैं, अब तुझे जो ठीक लगता हैं वो कर. मधुकरने लिखितमे मटीरीअल की डिमांड की हैं क्या ?”

“हां” असं म्हणून, धवननी सचिनला आणि आपल्या माणसाला बोलावलं आणि सांगितलं की “यांचं सार मटेरियल वापस करून टाक.”  

सचिन, हुशारी करून फिनिश्ड आणि अनफिनिश्ड असं सर्वच मटेरियल चार ट्रक मध्ये लोड करून घेऊन गेला.

फॅक्टरीत मटेरियल पोचल्यावर पुन्हा एकदा चेकिंग करून व्यवस्थित लाऊन ठेवलं. सगळेच आता थोडे रीलॅक्स झाले होते. पण आता मालाला फिनिश करण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती. पण मधुकर शांत होता. त्याचं या बाबतीतलं प्लॅनिंग तयार होतं.

 

मधुकरने  किरीट साहेबांना फोन करून प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. किरीट साहेब म्हणाले की मॅटर इतकं अर्जंट असेल तर ताबडतोब या. मधुकर जेंव्हा त्यांच्या दुसऱ्या ऑफिस मध्ये पोचला तेंव्हा संध्याकाळचे पांच वाजले होते. जयंत साहेबांना पण किरीट ने बोलावून घेतलं होतं.

“साहेब,” मधुकरने बोलायला सुरवात केली. “आपल्या कंपनीची गेली तीन चार वर्षापासून जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला सुरवात पण केली आहे.”

“मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?” – किरीटने काही न समजून म्हंटलं.

“हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.” – मधुकर. 

 

 

क्रमश:....

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com