MANAGERSHIP PART 9 books and stories free download online pdf in Marathi

मॅनेजरशीप - भाग ९

 

मॅनेजरशीप  भाग  ९

भाग ८  वरून पुढे वाचा.....

 

“तुमचे सगळे शेअर आम्हाला वापस विका. आम्ही त्यांची योग्य किंमत देऊ. आणि पुन्हा आमच्या आसपास पण फिरकू नका.” – जयंत साहेब.

“पण हे केल्यावर तुम्ही केस करणार नाही यांची काय गॅरंटी ?” – सुशील बाबू.

“तेवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हे तुम्हालाही माहीत आहे. We are not crooks. And you also know that.” – जयंत साहेबांनी सरळ शब्दांत सांगितलं.

सुशील जवळ दूसरा ऑप्शन नव्हता. त्यांनी होकार दिला.

सर्व शेअर जयंत चे सासरे डॉक्टर अरुण मोघे यांना सुशील ने विकून टाकले. आणि तो चालता झाला. त्यांच्या जवळ दूसरा option नव्हता.

त्यांची जी जी माणसे होती त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. कंपनीच फिनिशिंग शॉप पण सुरू झालं. ते वेळेत पूर्ण व्हायला हव होतं, त्यासाठी संगळ्यांनीच जिवापाड मेहनत घेतली.

 

एवढं सगळं झाल्यावर, आता मधुकर ला श्वास घ्यायला पण फुरसत नव्हती. त्यानी सातपुते, फिरके, वेणुगोपाल आणि स्वामी यांना बोलावलं. मीटिंग सुरू झाली.

 

“तुम्हा सर्वांना मी एका कारणांसाठी बोलावलं आहे.” मधुकरनी बोलायला सुरवात केली. “ते म्हणजे आपण रोज साडे बारा वाजता इथे जमायचं. जेवण करायचं आणि लगेच मीटिंग करायची. जे काही निर्णय कंपनी च्या भविष्यावर परिणाम करणार असतील ते आपण सर्वांनी मिळून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व मिळून कंपनी ला पूर्वीची उर्जितावस्था आणायची आहे.. त्या करता मी आपणा चौघांची कमिटी बनवतो आहे. या कामिटीतच सर्व निर्णय होतील. त्यात तुम्हा सर्वांना आपलं मत मांडायची मुभा असणार आहे. कंपनी ची प्रगती होण्यासाठी हे आवश्यक आहे असं मला वाटत. तुमचं काय वेगळं मत असेल तर सांगा.”

स्वामी प्रथम बोलला.

“साहेब, मला आणि फिरके साहेबांना प्रॉडक्शन मधलं काही कळत नाही. आणि ह्या दोघांना अकाऊंटस मधलं काही समजत नाही. मग आपण एकत्र मीटिंग करून काय होणार ? काय साधणार ?”

“करेक्ट आहे.” सातपुते बोलले. “त्या पेक्षा अस करू. तुम्हाला संगळ्या विषया मध्ये गती आहे. तेंव्हा अकाऊंटस ची मीटिंग असेल तेंव्हा तुम्ही आणि हे दोघ करा, आणि प्रॉडक्शन शी संबंधित मीटिंग असेल तेंव्हा मी आणि वेणुगोपाल तुमच्या बरोबर बसू. नाही तर पन्नास टक्के वेळ वाया जाईल.”

 

“काय सातपुते ! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.” मधुकर म्हणाला. “अहो तुम्ही सगळे उच्च विद्या विभूषित आहा. कुठलाही विषय तुमच्यासाठी कठीण असण्याचा प्रश्नच येत नाही. थोडंसं लक्ष घातलं की सगळं समजायला लागेल. आणि मला एक गोष्ट साधायची आहे, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल साधक बाधक विचार सगळ्यांना करता यायला पाहिजे. म्हणजे लूप होल कुठेच राहणार नाहीत. आपली कंपनी फार छोटी आहे. कोणाच्या Ego मुळे कंपनी च नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. एकटयांनीच निर्णय घ्यायची सवय लागली तर हा इगो निर्माण होऊ शकतो. आणि याचा सर्वात जास्त धोका मलाच संभवतो. तोच मला नको आहे. माझ्यामुळे मला आता कंपनी च कोणतंही नुकसान व्हायला नको आहे. I hope I have made myself clear.”

 

“साहेब,” पुन्हा स्वामीच बोलला “फिरके साहेबांना costing मुळे  बरीच माहिती झाली आहे. मला आता करून घ्यावी लागेल. पण तुम्ही जे बोललात ते पटलं मला.” मग बाकीच्या दोघांनी पण सांमतिदर्शक माना डोलावल्या. “ठीक आहे मग. अर्थात आपल्या विभागाच्या अडचणी ज्यांनी त्यांनीच सोडवायच्या आहेत. आता माझ्या मनात काय आहे ते सांगतो.” आता मधुकरनी काय नियोजन करायचं ते

सांगायला सुरवात केली.  

“फिरके आणि स्वामी या दोघांनी पूर्ण स्टडी करून कंपनी ची सध्याची खरी आर्थिक स्थिति काय आहे याच स्पष्ट चित्र जर समोर ठेवलं  तर खर्चाच प्लॅनिंग

करता येईल. कंपनी ची स्थिति सुधारायची असेल तर बरेच बदल करावे लागणार आहेत. पण कोणते लगेच आणि कोणते टप्प्यां टप्प्याने हे ठरवता येईल. तुम्हाला काय वाटत ?”

“म्हणजे नेमक काय करायचं तुमच्या मनात आहे सर ?” - स्वामी

माझा त्यावरच विचार चालू आहे आणि मनात काही आरखडे पण बनवले आहेत. पण माझ्या कल्पने नुसार ते पूर्ण झाल्यावरच तुम्हाला सांगेन कारण मग तुम्हाला नीट समजावता येईल. आता सांगितलं तर थोडा तुमच्या मनाचा गोंधळ उडेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी म्हणाले होते की रिजेक्शन मुळे  दोन तीन क्लायंटनी  आपला माल घेणं बंद केलं आहे. त्या सर्व लोकांना  आपल्याला वापस आणाव लागेल. आणि हे जरा कठीण काम आहे. वेणु तुमचा यात कस लागणार आहे.”

 

थोडं थांबून, मधुकर पुढे म्हणाला. “अजून एक गोष्ट मला कळली नाही. ती म्हणजे आपल्या कंपनी मध्ये प्रॉडक्शन मॅनेजर कसा नाही ? आपल्याला एक मटेरियल मॅनेजर पण पाहिजे. जो परचेस आणि स्टोअर बघेल. तो पण नाहीये. हे कसं ? गोष्टी जर स्ट्रीम लाइन करायच्या असतील तर हे दोघं जण आवश्यक आहेत. पण ते नाही आहेत. कोणाला काही माहीत आहे का ?”

“साहेब,” सातपुते म्हणाले की “एक तरुण सरदार होते प्रॉडक्शन मॅनेजर, दर्शनसिंग नाव होतं त्यांचं. हुशार आणि तडफदार व्यक्तिमत्व होतं. मोठ्या देसाई साहेबांनीच त्यांना आणलं होतं. पात्रीकर साहेब आणि त्यांचं चांगलं जुळायचं. सॉलिड वचक होता त्यांचा. चक्रवर्ती सकट सगळे त्यांना टरकून असायचे. त्या वेळेस चक्रवर्ती खरंच चांगला माणूस होता. कुठलंही मशीन हा हा म्हणता दुरुस्त करायचा.  त्या वेळेला करकरे नावाचे मटेरियल मॅनेजर होते. सगळी चांगली माणसं होती साहेब त्या वेळेला.”

 

“मग अचानक काय झालं ?” – मधुकर.

“साहेब दोन्ही मोठ्या साहेबांचा अपघातात मृत्यू झाला, त्या वेळेला किरीट आणि जयंत दोघेही फायनल इयर ला होते. त्या वेळी सुशील बाबूंनी सर्व कारभार आपल्या हातात घेतला. करकरे साहेबांचा ते फार अपमान करायचे. काय वाट्टेल ते बोलायचे. तो स्वाभिमानी माणूस दुसरी नोकरी मिळाल्यावर लगेच सोडून गेला. पात्रीकरांनी त्यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मग सुशील बाबूंनी  बर्डेला  आणलं. तो त्यांचा खास माणूस होता.”

“अच्छा, पण मग दर्शनसिंग ? ते का गेलेत ?” – मधुकरनी विचारलं.

“त्यांचा पण ते फार अपमान करायचे. त्यांना वाटलं की करकरे गेले तसे दर्शनसिंग पण जातील. पण झालं उलटच.” – सातपुते.  

“काय झालं ?” – मधुकर.

“ते तर खूप रामायणच झालं साहेब,” सातपुते सांगत होते. “तो माणूस सुशील बाबुंच मुळीच ऐकायचा  नाही. जशी ऑर्डर असेल त्या प्रमाणेच माल बनेल असं म्हणाला, सुशील बाबूंनी त्यांना थोडी अॅडजस्टमेंट करायला सांगितली. पण त्यांनी ऐकलं नाही. मग सुशील बाबू त्यांना चिडून गधा म्हणाले. दर्शन सिंग सरदार माणूस, तो कशाला ऐकून घेतो ? त्यांनी बाबूंच्या कानशीलात भडकावली. बरीच बोलाचाली झाली आणि त्यांनी पुन्हा सर्वांसमोर मारलं. सुशील बाबूंनी ताबडतोब पोलिसांत तक्रार केली. पण दर्शनसिंगच्या विरोधात कोणीच बोललं नाही. बर्डे बोलणार होता पण बाकी लोकांनी त्याला धमकावलं. मग तो पण चूप बसला. पण हा सगळा प्रकार दर्शनसिंग साहेबांना मानवला नाही आणि त्यांनी तिथल्या तिथे  पात्रीकरांच्या जवळ राजीनामा दिला आणि निघून गेलेत. पण ते गेल्या वर सुशील बाबूंना जे अपेक्षित होतं तेच झालं. त्यांना  रानच मोकळं मिळालं, ते थेट तुम्ही येई पर्यन्त. तुम्ही मात्र त्यांना पुरून उरलात साहेब. म्हणूनच आज सर्वांना तुमच्या बद्दल आदर आणि विश्वास वाटतो.”

 

“हूं. म्हणजे आता किरीट साहेबांशी बोलावं लागणार. दोन्ही पोस्ट भराव्या लागतील. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांचा पगार देऊ शकू का ? स्वामी साहेब तुम्ही चार्टर्ड अकाऊंटंट आहात, कंपनी चे financial कंट्रोलर आहात, बघा जरा आणि सांगा. मला कोणालाही पैसे मागण्याची इच्छा नाहीये. आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे.” मधुकरनी आपला स्टँड क्लियर केला.

“साहेब,” स्वामी म्हणाला की “उद्या दुपार पर्यन्त वेळ द्या. सर्व डिटेल्स तुमच्या समोर ठेवतो. काय फिरके ?”

“यस.” फिरके साहेबांनी होकार भरला.

“ठीक तर मग. अजून एक गोष्ट आपण विक्रमसिंग ला काढून टाकलं आहे त्यांची पण जागा भरणं आवश्यक झालं आहे. मी आधीच इंटरव्ह्यु घेऊन दोन नाव फिक्स केलीच आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्या पगाराचं पण बघाव लागणार आहे.” – मधुकर.

“हो साहेब, आपण उद्याच मीटिंग मध्ये सर्व फायनल करून टाकू.” स्वामी म्हणाला आणि मग  मीटिंग संपली.

 

क्रमश:........

 

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com