Savaj - 2 books and stories free download online pdf in Marathi

सावज - 2 - झडप

गाडीत विशाल ने पुन्हा तिला विचारल काय झालं होत ते. मीनल ने जे घडल ते त्याला सांगितलं.

"तिला तुझ्या मध्ये तिची लेक दिसली असेल" म्हणत तो हसला

"जाऊदे आता जे झालं ते. काही नाही आता दोन दिवस मस्त एन्जॉय कर"

"हां. तेच करायचं  आहे  " मीनल

थोड्या वेळाने मीनलने विलास कॉम्प्लेक्स समोर गाडी थांबवली. विशाल तिथे उतरला. त्याच एरिया मध्ये मीनल थोडं पुढं राहते. अगदी चालत गेलं तर पाचच मिनिटावर तीच अपार्टमेंट  होत गेट जवळ येताच संपत वॉचमेनने गेट काढले. व ती खाली अंडर ग्राउंड असलेल्या पार्किंग लॉट मध्ये गेली. संपतने गेट न लावताच आधी पळत जाऊन पार्किंग लॉटची लाईट लावली. मीनल परत गाडी लावून येताना उजेड असावा म्हणून तो पळतच गेट तसच उघड ठेऊन खोलीत लाईट लावायला गेला. मीनल ने गाडी पार्क केली व ती बाहेर आली. संपत अजून खोलीतच होता. मीनल बाहेर येताच गाडीची चावी ठेवत म्हणाली

"संपत वरती जात आहे मी गेट लावून...." ती तिथंच थांबली. समोरच दृश्य बघून तिची बोलतीच बंद झाली. तिच्या तोंडांतून शब्द निघत नव्हता.

लाइट बंद करून संपत बाहेर आला. मीनलला तस घाबरून गेट कढे स्तब्ध बघतं असलेलं बघून त्याने गेट कढे बघीतले. समोर गेट मध्ये एक म्हातारी उभी होती काठी घेऊन. ती मीनलकढे बघून हसत होती.

मीनलला घाबरलेल बघून तो म्हणाला " आव तिला कशाला भीता ताई?"

"ये म्हतारे .. हो बाहेर" म्हणत तो तिला हाकलू लागला.

मीनल संपतला त्या म्हतारीला हाकलताना बघत होती. तिला काहीच सुचत नव्हत. म्हतारी वळून जाता जाता पडलेल्याला दातांतून हसून मीनलकडे बघत होती. आणि त्या हसण्यामुळे तिच्या तोंडातून जरा लाळ पण गळत होती. मीनलला ते बघून विचित्र वाटलं. कि ती एवढ्या लवकर येथे कशी आली, आपण तर गाडी ने आलो,हि इथे कशी आली. संपत ने तिला हाकलून गेट लावले.

"जा तुम्ही मीनाल ताई, उगाच घाबरला तिला " संपत

"हां " म्हणत मीनल पुढे बिल्डिंग मध्ये गेली.

मिनल दोन वर्ष झाली या वीस मजली अपार्टमेंट मध्ये एकटी टूबीएचके फ्लॅट मध्ये अकराव्या मजल्यावर राहत आहे.

 लिफ्ट ने वर आल्यावर मीनल ने फ्लॅट चे कुलूप काढले. लगेच सवयीप्रमाणे लोखंडाचे व लाकडाचे दोन्ही दार लॉक केले. ती एकटी असते म्हणू सुरक्षित मुळे हि सवय लावून घेतली होती. आत येताच कपडे न बदलतच अर्धा तास तिने फोन वर टाइमपास केला. नंतर उठून तिने फोन वर "किती दा नव्याने तुला आठ्वावे.. " हे मंदार आपटे च गाणं लावेल. व फोन टेबलवर ठेवून गाणं ऐकत ऐकत थोडस म्हणत म्हणत ति बेड रूम मध्ये कपडे बदलायला आली. टॉप काढता काढताच. दरवाजा लावला का नाही याची शंका तिला आली. खात्री करून घेण्यासाठी पुन्हा येऊन तिने दाराची कडी चेक केली. परत येऊन तिने कपडे बदलले. तिच्या डोक्यात आता म्हतारी नव्हतीच. आता हात पाय धुवून तिने दिवस भर बांधून ठेवले केस मोकळे केले.

हॉल मधून बेडरूम मध्ये समान ठेवत ठेवत फ्रेश होत होत तिने गाण्याच्या दोन ओळी सोबत म्हण्टल्याच

"किती हाक द्यावी तुझ्या मनाला

किती थांबवावे मी माझ्या दिलाला"

तिने बेडरूम मधून लॅपटॉप काढला व टेबले वर ठेवला.

गाणं परत परत लूप वर चार वेळेस वाजल होत.

किचन मध्ये जाऊन तिने कॉफी ठेवली. व हॉल मध्ये येऊन तिने लॅपटॉप चालू केला. लॅपटॉप वर 'चानी' हा रंजनाजीचा चित्रपट लावून ति परत किचन मध्ये गेली. व गॅस जवळ कॉफी तयार होण्याची वाट बघत थांबली. मागे चित्रपटाचा आवाज तिला ऐकू येत होता.

चित्रपटात चानी व दिनकरच संभाषण चालू होत

"अग पण त्या नदीत करवतीच्या दाताच्या सुसरी आहेत नव्ह .. "

मधेच ते चानीच हसणं. हे सर्व मीनल किचन मधून ऐकत हसत होती

कॉफी तिने कपात ओतून घेतली. व ती थेट बाल्कनीत आली. थंड हवेत गरम गरम कॉफीची मजा घ्याला. कॉफी पीत पीत तिने बाहेर हवेत पूर्ण श्वास घेतला व ती लांब बघू लागली. सहज म्हणून तिने बघितले संपत खाली हातातील काठी ने फरश्या मोजत होता. तिने हसत बाजूच्या रस्त्यावर नजर टाकली. ती हबकलीच गेटच्या समोरच्या रस्त्यावर ती म्हातारी तिच्या कडेच वर बघत होती ती पटकन आत आली. आता मात्र तीच डोकं पूर्ण विचारिणी भरलं होत.

ते सर्व प्रश्न मघा नकळत तिने मनात टाळले होते आता ते पट पट वर येत होते.

काय चाललंय काय? एक तर तिने तस विचित्र पणे हात धरला, उगाच घुरु घुरु बघत होती. ती तिच्या पाठी मागे अपार्टमेंट पर्यंत आली होती, महत्वाचं म्हणजे ती एवढ्या लवकर एवढ्या लांब कशी आली होती? तीच ते गेट जवळ थांबून हसणं आणि आता खाली थांबणं ? हे सगळं विचित्र नक्की होत.

तिला काहीच सुधरत नव्हतं. तिने संपलेला कॉफी चा कप टेबले वर ठेवला. व विचार करू लागली. तिने बाल्कनीला जोडून असलेल्या खिडकीतुन पडद्याआडून हळूच खाली बघितले. ती अजून पण बाल्कनी कडे बघतच होती. पुन्हा तिने खिडकी बंद केली. तिने विशाल ला फोन करायचे ठरवले. म्हणून तिने फोन उचलला इतक्यात तिच्या डोक्यात एक आयडिया आली. तिने खाली थांबलेल्या म्हातारीचा विडिओ तयार करायचं ठरवले . तिने कप उचलला तिने फोन मध्ये विडिओ रेकॉर्डिंग सुरु केले व बालकनीत जाऊन कॉफी पित असल्याचे भासवत तिने तिचा विडिओ नकळत रेकॉर्ड केला. ती अजून पण वर बघत होती. परत आत आल्यावर तिने बाल्कनीचे दार लॉक केले. व तिने विशाल ला फोन केला. पण त्याने फोन उचलला नाही. इकडे तो त्याच्या रूममेट सोबत दारू पित पित गप्पा मारत बसला होता. मघापासुन त्याचा फोन वाजत होता. पण त्याचा लक्ष च नव्हतं. विशाल फोन उचलत नाही म्हणटल्यावर तिने इच्छा नसताना हि खाली संपतला फोन केला.

खाली संपत इकडे तिकडे फिरत होता. लगेच त्याचा फोन वाजला. जरा चिंतीत नजरेनी त्याने फोन उचला

"हॅलो ताई, काय झालं काही गडबड आहे का?'

"संपत ,आरे ती मगाची म्हतारी अजून बाहेरच आहे.. " तिचा आवाज कापरा कापरा होता

“आहो ताई, तिच एवढ काय घेऊन बसला जाईल ती भिकारीण, थोडावेळ बसेल आणि जाईल,.. " संपत

त्याला मध्ये थांबवत मीनल बोलू लागली.

"हो पण मी येऊन तीन तास झालेत तू हक्कालास तिला तेव्हा पासून ती माझ्या बाल्कनीकढे बघत थांबली आहे.मघा मी बाल्कनीत गेले तर बघून हसत होती ती"

"ताई.."

"ते काही नि संपत तिला हाकलून लाव ..'

"बर बर "

म्हणत संपतने फोन ठेवला

“च्या आयला ताई पण ना"

"त्याने काठी उचलली. गेट मधून बाहेर बघितले. ती म्हतारी अजून दिव्या खाली थांबून बोटाने बिल्डिंग कढे बघत काही तरी मोजत होती.

"चार पाच सहा सात ... " तीची ती मोजणी संपत ने मधेच मोडली

"ये म्हातारे " तिने वळून संपतकडे बघितले. व दुर्लक्ष करून परत बिल्डिंग कडे बघून बोटाने मोजू लागली. " ये म्हातारे कळत नाही का एकदा सांगितलेले. निघ हितनं .." म्हणत त्याने छडी जमिनीवर आपटली.

तस म्हातारिची मोजणी पुन्हा चुकली. तिने रागाने संपत कडे बघितले. तिचा तो रागीट चेहरा बघून संपत तिथ च टरकला. त्याचे हावभाव बघायला तिथं कुणी नसताना हि त्याने आवंढा गिळून भीतीचे हावभाव बदलले.

ती ऐकत नाही म्हण्टल्यावर त्याने दुसरा वॉचमेन महादू ला बोलवायला आत गेला गेट लावून त्याने त्याला फोन लावून बोलवले.

"ये तर तू.. " तो फोने वर महादू ला येण्याची विनंती करत होता.   

फोन ठेऊन काय झालं र.. " म्हणत महादू तिथं आला. दोघे गेट मधून बाहेर गेले. ती अजून पण बिल्डिंग कडे बघून बोटाने काही तरी मोजत होती

 जवळ येताच महादूने आवाज वाढवला

" ये म्हातारडे निघ हितून. नाही तर असा रपाटा भेटलं ना ... "

"अकरा" तिने त्याच्या कढे बघून म्हण्टले.

त्या दोघांना कळलच नाही "अकरा काय म्हणाली र ती.."महादू ने संपत कडे बघून विचारले. 

"काय माहित ?" संपत

"अकरा" म्हातारी पुन्हा म्हणाली

"ये निघ .." महादू

थरथरत्या पायानी एक एक पाय टाकत ती वळून जाऊ लागली.

"अकरा अकरा अकरा अकरा" असं म्हणत स्वःत ला लक्षात ठेवत जाऊ लागली.

ती दोघे परत आत आली.

"आयाला अकरा अकरा काय म्हणत होती र ती ... "

"सोड. तुला काय ताप व्हयला होता र तिचा. .."

"आर त्या मीनल ताई चा फोन आलाता.."

"तुझं तर काही पण असत् "म्हणत महादू निघून गेला. 

वरून मीनल ने त्या म्हातारी ला जाताना पहिले व ती आत आली.

तिला संपतचा फोन आला. " हां ताई गेली ती म्हातारी ... "

असं मीनल ला सांगून त्याने फोन ठेवला

“आयला कोणाच काय नि कोणाच काय.हित मला झोप येत असून झोपायला जमेना. ती काय अकराव्या मजल्यावर जाऊन खाणार आहे का ह्यांना "

"अकरा .." संपत ला काही तरी डोक्यात आले.

"आयला ताई खरंच अकराव्या मजल्यावर राहतात . आणि हि पण अकरा अकरा करत होती..म्हणजी हि काय खरच त्यांच्या बाल्कनीकडे बघत होती कि काय " एकदा त्याने जरा अलीकडे येऊन मजले मोजले मीनल खरंच अकराव्या मजल्यावर राहत होती हे त्याच्या लक्षात आले

इकडे मीनलने घड्याळा काडे बघितले. ११:२५ झाले होते. तिने लॅपटॉप बंद केला. व झोपायला जायचे ठरवले. बाल्कनीच्या दाराची कडी तिने लावली का नाही हे तिने तीन वेळा परत परत फिरून फिरून बघितले तेव्हाच तिची खात्री झाली. तसेच तिने ३ वेळा मुख्य दरवाजा लावला का नाही चेक केले. व बेड रूम चे दार लावून ती बेड वर पडली पडली तोच तिच्या मनात नळ बंद केला का नाही याची खात्री तिला कराविशी वाटली. तिला लक्षात होत कि तिने नळ बंद केला आहे. पण सवयी प्रमाणे शेवटी ती उठलीच व तिने बंद नळीची तोटी फिरवून पुन्हा नळ चेक केला. शेवटी दोन वाजता ती झोपी गेली. मीनल ला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. ज्यात तिला नळ चेक करण दरवाजा लावला आहे का नाही. अशा काही गोष्टी एक ठराविक वेळा चेक करायची सवय आहे. आई वडीला सोबत भांडण करून ६ वर्षांपूर्वी तिने घर सोडून त्याच्या सोबत चे सर्व संबंध तिने तोडले होते. पण एकटं राहण्यामुळे कि काय तिला ओसाडी हा आजार झाला आहे.

आता रात्रीचे ३:३० वाजेल असतील. ती म्हातारी बाजूच्या गल्लीत रस्त्याच्या कडेला दिव्या खाली काठीचा आधार घेऊन बसली आहे. इकडे संपतचा आता डोळा लागत आहे. तो तसाच फिरून फिरून जागा राहण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी तो खुर्ची वर बसला व बसताच त्याचा डोळा लागला व इकडे म्हतारीने डोळे उघडले.. ती अंदाज घेत हळू हळू चालत चालत पुन्हा गेट जवळील कंपाउंड जवळ येऊन थांबली व तिने व मीनलच्या बाल्कनी कडे बघितले. हळू हळू नजरेने ती वरून खाली मजल्याचा अंदाज घेत होती.  शेवटी तिने पहिल्या मजल्यावरील बाल्कनी वर नजर थांबवली. व नंतर जे तिने केले ते पूर्ण पणें अनपेक्षित होते. तिने हातातील छडी खाली सोडून दिली. तिने कंपाउंडच्या बाहेरून एक जोरात उडी मारली व एकाच ढांगेत पहिल्या मजल्यावरील बालकनीतील रेलिंगला पकडले व एकाद्या कोळ्या प्रमाणे तिने तो बाल्कनीचा गज हातानी व पायानी पकडला होता. अंगावर असलेल्या लुगड्याचा तिला जराही अडथळा होत नव्हता. खाली संपत झोपीत होता. त्याने झोपीतच गालावर बसलेला एक मच्छर मारला. तिने परत वर पहिले. दुसऱ्या उडीत तिने तिसऱ्या मजल्याची बालकनीची रेलिंग धरली. पुन्हा सातवा मजला नंतर तिने नववा मजला नंतर तिने थेट अकरावा मजला म्हणजे मीनलच्या बालकनीची रेलिंग धरली. तिला आता धाप लागली होती तस ती बालकनीत येऊन खाली एका कडेला बसली. ती आता कमजोर झाली होती. पण साधारण मनुष्या पेक्षा जास्त ताकद तिच्या अंगात अजून होती.

तिने पडद्याआडून  आत काही दिसते का ते बघितले. पण आतले काहीच दिसत नव्हते. म्हतारीने दरवाजानेच आता जायचे ठरवेल. दरवाजाकडे वळताना तिचा धक्का तिथे ठेवलेल्या एक कुंडीला लागला. आणि 'धड्ड ' असा कुंडी खाली पडल्याचा आवाज झाला.

त्या आवाजा सरशी इकडे मीनल ने खाडकन डोळे उघडले. तिला अंदाज नव्हता कि आवाज कशाचा होता. पण तिला खात्री होती कि काही तरी वाजले आहे. ती हळूच बेड वरून उतरली बेड रूम च्या दरवाज्या जवळ थांबून अंदाज घेऊ लागली. बालकनीत म्हतारी शांत थांबली होती ती पण दरवाजा जवळ थांबून अंदाज घेत होती. मीनल ने हळूच बेड रूमच्या दरवाज्यातून पहिले. तिला हॉल मध्ये कसलीच हालचाल दिसली नाही. पण बालकनीतील  दरवाज्यामागे मात्र तिला सावली दिसली. साफ साफ होता कि तिथं कोणी तरी थांबलं आहे . काही कळायच्या आताच मीनल पळत मुख्य दरवाज्या दिशेने धावली .व मुख्य दरवाजा काढू लागली. म्हातारीला तिच्या पावलाचा आवाज आला व तीने सुरुकुतल्या हाताने बाल्कनीची कडी मोडून दरवाजा उघडला. मीनल लाकडी दरवाज काढे पर्यंत बालकनीचा दरवाज उघडला गेला मिनलने लोखंडी दरवाजा काढला व पाय बाहेर ठेवणार इतक्यातच ती सर्रकन हवेत मागे जोरात ओढली गेली व हवेतच बेडरूमच्या दरवाजावर जाऊन आदळली तीला लक्षात आलं कि ती हवेत अधांतरीच दरवाज्याला चिटकली आहे. तीला काहीच करता येत नव्हते. तिची नजर फक्त दरवाज्या कडे होती. दोन्ही दरवाजे उघडे होते पण तिला बाहेर जाता येत नव्हतं. तीच पूर्ण शरीर तिला हलवताच येत नवहत. तिने बघितलं ती मघाची म्हतारी बाल्कनीच्या दारातुन पुढे चालत आली व तिने मुख्य दरवाज पुन्हा बंद केला. व तिने मीनल कडे बघितले. तिला मिनलच्या चेहऱ्यावर भिती दिसली नाही पण काहीतरी अनापेक्षित घडत आहे याचे भाव फक्त होते.  म्हतारीने एक हात हवेत अधांतरी फिरवला तस भर्रकन टेबलावरची फुलदाणी हवेतच मिनलच्या डोकयात आदळली . मीनल त्याच क्षणी बेशुद् झाली व खाली जामिनीवर पडली. इकडे ती म्हातारी पण जमिनीवर थकून पडली. ती जोर जोरात श्वास घेत होती. ती थकली होती. स्वतःला सावरत ती भिंतीला टेकून बसली व मीनल कडे बघून ती जोर जोरात श्वास घेत ती हलकच हसली. तिला मीनलच न भिण्याचं कौतुक वाटले. आणि खूप वर्षांपासून काही तरी शोधतोय ते गावल्याचे भाव म्हातारीच्या चेहऱ्यावर होते.