Mission love... books and stories free download online pdf in Marathi

Mission love...

" good morning everyone..", कॉलेजचे प्रिंसिपल थर्ड यर च्या क्लास मध्ये आले... पण सानवीचे मात्र लक्ष नव्हतं.. ती तर तिच्या पुस्तकात रमली होती..मराठी साहित्य म्हणजे तिचा जीव की प्राण!! सर आले म्हणून त्यांचा आवाज ऐकून तिने समोर नजर टाकली तर एक रुबाबदार मुलगा तिच्या नजरेस पडला जो प्रिंसिपल सरांसोबत आला होता कदाचित.. त्यांनी त्याची ओळख करून दिली.

" students meet Raaj desai.. he is your new classmate for this semester .. so take care of him.. ok??", प्रिन्सिपल म्हणाले आणि सर्वांनी होकार दर्शवला..

" राज.. you can choose any seat for yourself...", ते त्या राजला म्हणाले तसा त्याने संपुर्ण वर्गावर नजर फिरवली. सगळे मुलं मुली सोबत बसले होते..

सान्वी मात्र परत तिच्या पुस्तकात बूडाली होती...

त्याने होकार दिला तसे तो पुढे सरकला.. सगळ्या मुली त्याला निहाळत होत्या कारण तो दिसतच एवढा जबरदस्त होता की मुली तल्लीन होऊन त्याला पाहत होत्या... त्याला मात्र त्यांच्या नजरेत काडीचा रस नव्हता.. त्यांच्या त्या नजरा त्याला नकोश्या वाटत होत्या.. तो तसाच पुढे गेला आणि नेमका सान्वीच्या बाजूला बसला.. तश्या मुलींनी त्यांची तोंड वाकडी केली कारण त्यांना सान्वी नेहमी बोरिंग वाटायची.. ती नेहमीच पुस्तकांत रमलेली असायची म्हणून बाकीच्यांना हेच वाटायचे की ती फार अरिसक आहे..

राज तिच्या बाजूला बसला तरिही तिचे लक्ष नव्हते. राजनेही तिच्याशी बोलण्याची तसदी घेतली नाही.तोही तसाच बसून राहिला.. वयाने तो जरा मोठा वाटत होता.. त्याच्या पिळदार शरीराने वर्गातील मुलींना चांगलीच भुरळ घातली होती.

प्रिंसिपलही निघुन जातात.. सगळे क्लास नॉर्मल चालू असतात... राज आणि सान्वी दोघेही आपले आपले नोट्स काढत होते.. लेक्चर संपले तसे दोघेही एकमेकांच्या वाटेने निघुन गेले..

असेच दिवस जात होते.. आता जवळ जवळ 3 आठवडे झाले होते.. दोघेही सोबतच बसत होते.. पण बोलत मात्र कोणीच नव्हते. राजला बर्याच मूलींंनी त्यांच्या सोबत बसायला जागा ऑफ़र केली पण त्याने नकार दिला..

एके दिवशी सान्वी कॉलेजला आलिच नाही.. त्या दिवशी राज एकटाच बसला होता.. त्याची नजर सारखी सान्वीच्या जागेवर जात होती जिथे ती नेहमी पुस्तकांत बुडून असायची. एवढ्या आठवडयात त्यालाही कळले होते तिला कथा कादंबरी वाचायला फार आवडतात..

त्या दिवशी त्याचे मन नकळत रमलेच नाही.. दुसर्या दिवशी ती आली ... तोही आला आणि नेहमीप्रमाणे तिच्या बाजूला बसला.. आज मात्र तिची चलबीचल चालू होती.. लेक्चर ऑफ़ होता.. म्हणून संपुर्ण वर्गाने एकच कल्ला केला होता.. त्यात हे दोघेच होते जे शांत होते.. तिचे मन पुस्तकात लागत नव्हते.. तिची अवस्था त्यालाही कळली पण तिने बोलायला सुरुवात करावी म्हणून तो शांतच राहिला..

शेवटी तिने हिम्मत केलीच..

" एक्सक्युझ मी..", ही हळूच म्हणाली..

" येस..", त्याने तिच्याकडे पाहिले.. आज पहिल्यांदा तो तिला असं समोरसमोर पाहत होता.. गोल चेहरा त्यात तिचे गोबरे गोरे गाल अतिशय मोहक वाटले त्याला... क्यूट हेयर स्टाइल केली होती तिने.. तिच्या टपोर्या डोळ्यांनी ती त्यालाच पाहत होती..

" मी काल आली नव्हती म्हणून मला कालचे नोट्स पाहिजे होते.. तुम्ही लिहले असेल तर द्याल का मला??", तिने निरागसपणे विचारले आणि तिची भाबडी निरागसता पाहून त्याला हसू आले तिचे.. तो हलकाच गालात हसला... आणि होकार देत तिला त्याचे नोट्स दिले..

" थँक यू ",ती खुशीतच नोट्स लिहायला लागली..

तिचे लक्षच नव्हते त्याच्याकडे की तो एकटक तिला पाहत आहे..

" क्लास मध्ये एवढ्या मुली आहेत.. कोणी तिच्या मित्र मैत्रिणी मध्ये गुंग आहे.. तर कोणी तिच्या बॉयफ्रेंड् सोबत मश्गुल आहे.. आणि एक ही आहे.. जी या मॉडर्न जमान्यात सगळ्या धार्मिक पौराणिक कथा वाचते आहे.. अजिब आहे..", राज तिच्या डेस्क वर असलेल्या काही पुस्तकांवर नजर टाकत मनात म्हणाला..

" कँटीनमध्ये जायचे का?? ", राजने पुढाकार घेतला.. ती काही तिच्या पुस्तकांमधून बाहेर येणार नाही त्याला कळले होते.

" का??", ती नोट्स लिहता लिहता विचारते.

" मला भूक लागली आहे..",

" पण मी बाहेरचं खात नाही.. मी टिफिन आणलाय.. तुम्हाला पाहिजे?? ", तिने त्याच्यावर लक्ष केंद्रित करत निरागस स्माइल देत म्हणाली.

त्याच्याही नकळत त्याने होकार दिला.. तसा तिने पटकन तिच्या बॅगमधुन तिचा टिफिन काढला आणि त्याच्या समोर धरला...

" तू पण घे.. नंतर लिह ते नोट्स.. हवं तर माझी बुक घरी घेउन गेलीस तरी चालेल... उद्या आणून दे.. ", तो शांतपणे म्हणाला.

तसं तिने पण गुड गर्ल प्रमाणे त्याचे ऐकले.. दोघेही एकाच टिफिन मध्ये खाऊ लागले.. दोघेही पहिल्यांदाच बोलत होते तरिही जराही अवघडलेपणा जाणवत नव्हता त्यांना..

आज दोघेही बोलत होते..

" तू इतर मुलींशी का नाही बोलत?? जेव्हा बघावं तेव्हा तू या पुस्तकांत बुडून असतेस..", तो जराही म बिचकता म्हणाला. तशी ती खुद्कन हसली.. आणि त्याला ते हसू जगातील सगळ्यात जास्त मोहक हसू वाटलं.

" मी इंट्रोवर्ट पर्सन आहे.. मला पटकन स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही... मलाही मित्र मैत्रीणी बनवायचे आहेत.. पण माझा स्वभाव पाहता मला जमतच नाही.. मग नाईलाजाने पुस्तकात बुडून राहते.. ", तीही बोलुन जाते..

" अच्छा!! मग माझ्याशी बोलताना काही नाही वाटले??", त्याने भुवई उंचावून विचारले.

" माहित नाही.. पण एवढा अवघडलेपणा नाही जाणवला..", ती खुश होऊन म्हणाली..कारण आता तिला मित्र मिळणार होता..

तिचा आनंद पाहून तोही हसला..

" माझ्याशी मैत्री कराल??", तिने आशेने विचारले.

" आपली मैत्री अगोदरच झाली आहे.. आता फक्त ऑफ़िशीयल करु...", तो तिने दिलेल्या टिफिन कडे नजर टाकत म्हणाला.

तशी ती खुद्कन हसली..

त्यांनी एकमेकांशी हँडशेक केला..

त्या दिवसापासून दोघांच्या गप्पा चालू झाल्या होत्या.. इतरांशी बोलताना अडखळणारी ती त्याच्याशी मात्र बिनधास्त बोलत होती.. अभ्यासू तर होती ती.. पण इतर पुस्तकांचे ज्ञानही बर्यापैकी होते..

अभ्यसात तसा तोही हुशारच होता.. दोघेही मन लावून लेक्चर ऐकायचे.. काही कळले नसेल तर एकमेकांना बिनधास्त विचारायचे.. कमी लेखण्याची तर गोष्ट्च नव्हती.. ती नेहमी डब्बा घेऊन यायची.. सोबत त्याच्या भागाचे पण आणायची.. कँटीनमध्ये तर क्वचितच जाणं व्हायचं.. फक्त जर चहा कॉफी प्यायची असेल तरच.. नाहीतर दोघेही ब्रेक मध्ये टिफिन खाऊन तिथेच बोलत बसायचे.. आता एकमेकांचे फोन नंबरही एक्सचेंज झाले होते.. ती नेहमीच निरागस वाटायची.. त्यात ती त्याच्यापेक्षा लहान म्हणून तो नकळत तिला जपायचा..

आता दोघांच्याही मैत्रीला 3 महिने उलटले होते.. या महिन्यात दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखू लागले... एकमेकांच्या आवडी निवडी कळू लागली..

एके दिवशी कॉलेज मध्ये सान्वीला एका मुलाने प्रपोज केलं... तेही भर वर्गात ... लेक्चर ऑफ़ होता.. सगळ्या मुलांचा एकच कल्ला झाला होता.. जिकडुन तिकडून एकच नारा चालू होता..

" से येस... से येस..",

सान्वी खुपच घाबरली होती.. एक तर तिला नीट व्यक्त होता येत नव्हते.. त्यात एवढ्या सगळ्यांचा जल्लोष ... घाबरली होती.. राज मात्र त्याच्या सीट वर बसून होता.. चेहरा भावना शुन्य होता.. पण हातांच्या मुठी मात्र रागात आवळल्या गेल्या होत्या.. पण सध्या सेंटर मध्ये सान्वी होती ..म्हणून कोणाचेच त्याच्याकडे लक्ष नव्हते... तो एकटक घाबरलेल्या सान्वीला पाहत होता.. पण तो काहीही करु शकत नव्हता.. त्याच्या मनाची चिलबीचल का होतेय हे समजण्यासाठी तो लहान नक्कीच नव्हता.. त्याची नजर सान्वी वरच खिळली होती.. जी स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न करत होती..

तिने एक मोठा श्वास घेतला आणि स्वत:ला शांत केले.. तिने भीत भीत बोलायला सुरुवात केली..

" आय ऍम सॉरी... आय कांट रीटर्न यौर फीलिंग्स.. यू डिसर्व बेटर..", तेवढंच काय ती म्हणू शकली आणि त्याची मनापासून माफी मागत गपचुप राजच्या बाजूला येऊन बसली..

सगळा क्लास हिरमुसला होता त्या मुलासाठी.. तोही नाराज झाला होता.. पण तिची कणसेंट नाही म्हंटल्यावर त्याला काहिच करता येत नव्हते.. तो तसाच क्लास मधून निघुन गेला... कदाचित सिरियस होता तो..

पण इकडे राजला त्या मुलाबद्द्ल जराही दया माया वाटली नाही.. तो तर सान्वीकडे पाहत होता .. जी एखाद्या सश्यासारखी घाबरुन एके ठिकाणी बसली होती.. टपोरे डोळे भिरभिर फिरत होते.. अगदी घाबरलेल्या लहान मुलीप्रमाणे बसली होती.. त्याला तर हसूच आलं तिला असं पाहून.. राग तर क्षणात पळाला होता त्याचा..

" हे सान्वी... रिलॅक्स... किती घाबरतेस??", तो तिला शांत करत म्हणाला.

" मला भिती वाटली.. ", तिने निरागस चेहरा करत म्हंटले..

" आय क्नो.. पण घाबरायची गरज नाही... तुला नव्हता त्याच्यात रस तर तू त्याला नकार दिलास.. त्यात एवढे काही नाही.. तू नको काळजी करू..", तो तिला शांत करत म्हणाला.

" त्याला वाईट वाटलं असेल ना..", तिने लहान चेहरा करून विचारले..

" तुला काळजी वाटतेय त्याची??", त्याने शांतपणे विचारले.

" थोडुशी..", ती हाताने बोटाचा इशारा करत म्हणाली.

" तुला होकार द्यायचा आहे त्याला..",

" नाही.. मला नाही आवडत तो.. ", ती बारीक चेहरा करून जरा वैतागून म्हणाली.

" मग नको काळजी करुस त्याची.. ही विल बी नॉर्मल आफ्टर सम टाईम..",

" ओके..",

जेव्हा पासून राजला सान्वीसाठीच्या आपल्या भावना समजल्या होत्या तेव्हा पासून तो जरा शांत शांत राहू लागला.. आता तिला त्याचे हे वागणे खटकू लागले. एक तर तिला त्याच्याशी रोज बोलायचे असते. तो बोलायचा तिच्याशी पण प्रमाणात.. तसा अंतरही द्यायचा नाही तो तिला..

काहीक दिवस तो आलाच नाही कॉलेजला.. सान्वी खूप काळजीत पडली होती.. कारण तो तिचे कॉलही रिसिव करायचा नाही.. आता जवळ जवळ महिना उलटला होता.. ती नेहमी राजला मिस करायची... आता ती उदास झाली होती..

एके दिवशी ती अशीच लेक्चरसाठी एकटीच बसली होती.. त्याच्या सीटवर लक्ष दिले तर ती आजही खाली होती.. तिचे मन खट्टू झाले.. नकळत आसवे आली डोळ्यात.. रागही येत होता त्याचा.. मैत्रीण म्हणतो तिला.. मग साधं कळवायचेही नाही का तिला त्याच्या कॉलेजला न येण्याबद्दल...
तो तिच्या आयुष्यात आल्या पासून तिच्या पुस्तकांत जरा दुरावा आला होता.. पण आता तो नाही म्हंटल्यावर तिला पुन्हा पुस्तकासोबत पॅचअप करावे लागणार होते..

ती पुस्तकांत रमणार इतक्यात प्रिन्सिपल सर येतात.. आणि तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती येतो.. जिच्या चेहर्यावर खतरनाक रुबाब असतो.. त्या व्यक्तीला पाहून सान्वीचे डोळे विस्फारतात.. फक्त तिचेच नाही तर क्लास मध्ये असलेल्या इतर मुलांचेही डोळे बाहेर येण्याची वेळ आली होती.. कारण समोर राज होता!! तेही पोलिसाच्या वर्दीत.. किती उठून दिसत होता.. सान्वी तर शॉक होऊन त्यालाच पाहत होती.. त्याचे तिच्याकडे लक्ष गेले तशी ती चपापली.. आणि लगेच मान खाली घालून बसली.. तो मात्र फक्त गालात हसला.

सान्वी पुर्ण वेळ मान खाली घालून बसली होती.. फक्त ती प्रिंसिपलचे शब्द ऐकत होती.. तिच्या एवढे लक्षात आले की.. राज हा एक पोलिस अधिकारी आहे आणि एका केसच्या संदर्भात तो तपास करण्यासाठी वेश बदलून आला होता.. त्याने त्याची खरी ओळख लपवली होती..

तिच्या तर डोक्याचा भुगा झाला होता.. ज्याच्याशी एवढे महिने बिनधास्त बोलले तो एक पोलिस अधिकारी आहे.. हे कळल्यावर तिच्या मनाची चांगलीच धडधड वाढली होती..

प्रिन्सिपलचे बोलणे झाले तसे राजने ही संपुर्ण वर्गाचे आभार मानले त्याला त्यांच्या मध्ये शामिल करुन घेण्यासाठी.. तो सगळं काही सान्वीकडे बघुन बोलत होता पण ती मात्र अजुनही त्याच्याकडे पाहत नव्हती.

शेवटी तो जायला निघाला... तरिही ती पाहत नहै म्हणून त्याने जाताना तिच्यावर एक नजर टाकुन तो बाहेर गेला..

तो गेला तसे रेग्यूलर क्लास चालू झाले.. पण सगळीकडे राजचा विषयच चालू होता.. त्याचे कौतुक केले जात होते.. सगळ्यांना कुतुहल वाटले होते त्याच्याबद्दल..

एकाही लेक्चरमध्ये तिचे मन लागले नाही.. खूप बेचैन झाली होती ती..

क्लास संपला तशी ती पटकन तिची बैग खांद्यांवर अडकवून घरी जायला निघते...

ती गेटच्या बाहेर पडली तसं कोणीतरी अचानक समोर आलं.. तशी ती दचकून मागे सरकली.

पाहते तर समोर राज उभा होता... तेही गालात हसत... जबरदस्त आकर्षक भासला तो तिला..

तिने पटकन नजर खाली केली... ज्याच्या सोबत आपण एवढे बिनधास्त वागत होतो तो एक रेप्यूटेड ऑफिसर आहे म्हंटल्यावर तिच्या मनात जरा भिती निर्माण झाली..

" कुठं चालली??", त्याने तिच्या जवळ येत विचारले.

" घरी... ", तिने मोजकेच उत्तर दिले.

" चल कॉफी घ्यायला जायचं??",

" ते मला काम आहे...", तिने बिचकत उत्तर दिलं.

त्याच्या भुवया उंचावल्या...

" तू मला टाळण्याचा प्रयत्न करत आहेस??", त्याने शांतपणे विचारले.

तशी ती गडबडली...

" राक्षस नाहिये मी.. ", तो किंचित हसत म्हणाला.

ती शांतच राहिली..

" जायचं??", त्याने पुन्हा विचारले.

तिने फक्त हुंकार भरला.

तो बाइक घेऊन आला होता.. तिथूनच त्याच्या पोलिस स्टेशनला जाणार होता. तो बाईकवर बसला आणि तिलाही बसायचा इशारा केला.
ती जरा बिचकत होती बसायला..

" काय झालं??", त्याने विचारले.

" आपण रिक्षात जायचं का??", तिने हिम्मत एकवटून विचारले. आता पर्यंत कधी तिला विचार करावा लागला नव्हता त्याच्याशी बोलायला.. पण आता मात्र ती विचार करूनच बोलत होती.. उगाच काही प्रॉब्लेम नको..

तिच्या मनाची अवस्था समजूत त्याने होकार दिला..

दोघेही रिक्षात एका कॅफ़े मध्ये गेले.. दोघेही शांतच होते.. त्याने कॉफीची ऑर्डर दिली..

" आता बोलणार पण नाही का माझ्याशी??", त्याने पुढाकार घेत विचारले.. कारण ती काहिच बोलत नव्हती.

" नाही ते.. ", गोंधळ उडाला होता तिचा.

" शांत हो.. मी अजुनही तुझा मित्र राज आहे.. माझ्यावर वर्दी असली म्हणजे आपले नाते संपले असे नाही.. ", तो तिला प्रेमाने समजावत म्हणाला.

आता जरा तिला बरं वाटलं... मनावरील दडपण फक्त त्याच्या काही शब्दांनी कमी झाले होते..

तसं तिने नेहमीप्रमाणे त्याला एक गोड स्माइल दिली जी त्याला फार आवडायची.. तिच्या चेहर्यावर हसू पाहून त्यालाही छान वाटलं..

थोड्यावेळ दोघांनीही छान गप्पा मारल्या.. एवढे दिवस आला नाही म्हणून गोड तक्रारही केली.. त्याने सांगितले नाही की तो एक पोलिस अधिकारी आहे तरिही तिने त्याला तो प्रश्न विचारला नाही.. का नाही सांगितले म्हणून..

आता अवघडलेपणा नव्हता त्यांच्यात..

त्यांचे रोज बोलणे व्हायचे ते फक्त फोनवर.. आता तो कॉलेजला यायचा नाही.. म्हणून भेटही होत नसे.. पण त्या एका फोनवरही दोघांचे नाते अजुनही तसेच होते..

एके दिवशी तिला त्याने सांगितले की त्याची बदली होते आहे म्हणून.. आता बाहेर जाणार होता तो.. म्हणजे तसंही भेट व्हायची नाही त्यांची तरिही तिला वाइट वाटलं..

तिचे लास्ट सेमिस्टरही संपले.. ग्राज्यूएशन कम्प्लीट झाले होते.. आणि एके दिवशी त्याचा मेसेज आला की तो एका मिशनवर जात आहे आणि परत कधी येइल हेही माहित नाही म्हणून तिला कॉन्टॅक्ट करता येणार नाही.. तिने मेसेज वाचुन लगेच त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण अॅस एक्सपेकटेड त्याचा फोन लागला नाही..

त्या दिवशी खूप रडू आलं तिला.. फक्त मैत्रीच तर होती त्यांची.. आणि तेही काही महिन्यांची.. कमालीची अस्वस्थ झाली होती ती..

खूप रड्ली त्या दिवशी.. काही महिने त्याच्याशी काहिच बोलणं झालं नाही.. आता तिला तिच्या भावना समजायला लागल्या होत्या.. आधी तर खूप भिती वाटली तिला आपल्या भावनांची.. स्टेटस बघीतले तर आपण त्यांना मॅच होत नाही.. आणि कशावरून तो तिच्या भावना स्विकारेल.. पण आता तर त्या भावना व्यक्त करायला तो होताच कुठं जवळ?? काहिच अत्ता पत्ता नव्हता त्याचा.. कधी त्याने सांगितलेही नाही की तो कुठं जात आहे म्हणून..

यातच 2 वर्षे उलटून जातात.. या दोन वर्षात तिच्यात छान बदल झाला होता.. नेहमी एकांतात राहणारी ती आता बर्यापैकी स्वत:ला प्रेजेंट करु शकत होती.. आता तर ती एका कॉलेजमध्ये लाइब्रेरीरीयन म्हणून लागली..अर्थातच वाचण्याचा छंदच तिला तिकडे घेउन आला होता.. आता तिचा दिवस नेहमी पुस्तकं वाचण्यात जात होता... या दोन वर्षात एकही दिवस असा गेला नाही की तिला राजची आठवण आली नाही... त्याच्या साठी असणारया भावना दिवसेंदिवस वाढतच होत्या.. मिराच झाली होती ती या दोन वर्षांत..

असंच सहज एक संध्याकाळी ती घरी आली.. तर तिला तिच्या घरी पाहुण्यांची चाहुल लागली.. माहित नाही का पण जरा भिती वाटली तिला.. कारण तिच्या घरी आता तिच्या लग्नाचा विषय निघाला ज्याची तिला भिती वाटत होती... तिचे कोणावर प्रेम आहे हेही तिने सांगितले नव्हते कोणाला.. सांगणारही कशी.. ज्याच्यावर प्रेम करते त्यालाही सांगितले नव्हते.. मग इतरांना सांगण्याचा तर प्रश्नच येत नव्हता..

आताच तिथून निघून जावू की काय असं तिला वाटलं... तिने पाऊलही उचलले.. ती आल्या पावली परत जाणार तोच तिच्या आईने तिला आवाज दिला आणि तिच्या काळजात धडकीच भरली..

आईने तिला सांगितले की तिला पाहायला पाहुणे आले आहेत.. ती नाही नाही म्हणताना तिला आई तिला आत घेऊन येते.. तिचा चेहरा रड्वेला झाला होता.. राजला सोडून कोणा ईतराचा विचारही करायचा नव्हता तिला.. पण इथे तर डायरेक्ट तिच्या लग्न करुन देण्याचा विचार केला जात होता..

ती आत आली तरी तिची नजर खाली जमिनीवर खिळून होती.. ती आत आली तशी तिच्या आईने तिची ओळख तिथे आलेल्या पाहुणे मंडळीशी करुन दिली..

त्यातली एक बाई म्हणाली.." आम्हाला मुलगी पसंत आहे.. फक्त एकदा आमच्या मुलाला पसंत पडली म्हणजे आम्ही लगेच तिला सून करुन घ्यायला मोकळे..", त्या बाई गालात हसत म्हणाली.. कदाचीत आई होती ती त्या मुलाची.. म्हणजे मुलगा पण आला असेल.. त्यावर एका मोठ्या पुरुषाचा आवाज आला.. कदाचीत ते वडील होते त्या मुलाचे..

सान्वी मनातच देवाचा धावा करत होती की मुलाने नकार द्यायला हवा.. ती जीव मुठीत धरून होती.. तितक्यात त्या मुलाचा होकार आला..

" मला मुलगी पसंत आहे.. ", बस्स आणि तिला रडूच फुटले.. पण अचानक तिला तो आवाज ओळखीचा आवाज वाटला.. तिने लगेच मान वर करुन बघीतले.. आणि तिचे डोळे विस्फारले. कारण समोर राज होता.. त्याच्या कुटुंबासोबत.. गालात हसत होता.. नेहमीप्रमाणे.. त्याला पाहून ती फारच शॉक झाली होती.. इतर सगळे गालात हसत होते.. जणु त्यांना राजने अगोदरच सगळं काही सांगितले होते.. सान्वीच्या आईवडीलांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.. एवढा चांगला मुलगा आपल्या मुलीसाठी मागणी घालतोय म्हंटल्यावर त्यांना आनंदच झाला होता..

□□□

" एवढ्या कोणत्या मिशनवर होतात तुम्ही की एकदाही माझी आठवण आली नाही..", तिने तक्रार केली.. डोळे पाणावले होते.. पण त्यात त्याला भेटण्याचा आनंदच दिसत होता.. त्याला तिच्या शब्दांची गरज भासली नाही.. तिचे अश्रु सगळं काही सांगत होते..

त्याने तिचे डोळे पुसत.. अलगद तिला मिठित घेतले.. तोही जरा हळवा झाला होता तिला दोन वर्षांनी पाहून.. पण सावरले स्वत:ला.. आणि तिलाही..

" मिशन लव्ह वर होतो..", तो हलकेच हसुन म्हणाला... तिलाही हसू आलं...

" लग्न करनार ना..", त्याने तिला मिठीतून बाहेर काढत तिच्या डोळ्यांत पाहत विचारले..

त्यावर तिने लाजून होकार दिला.. तो हसला.. आंनद झाला होता.. दोघांनाही..

पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठित विसावले..

लग्न केले त्यांनी पण दोघांनाही एडजस्ट करावे लागले.. कारण एकमेकांवर प्रेम जरी असले तरी दोघेही भिन्न होते.. सवयी.. स्वभाव.. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन.. सगळंच.. पण प्रेमाने तेही शिकवले.. त्यांचे मिशन लव्ह अजुनही चालुच होते..


समाप्त...

©️®️सावी♥️