Sath tujhi majhi - 2 books and stories free download online pdf in Marathi

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 2

निशीचा चेहरा उतरला.. ती स्वतःशीच पुटपुटली.. "इतके छान प्रेझेंटेशन देऊन ही याला काहीच नाहीये.. पण तिला आतून एक प्रश्न पडला.. मी इतकी उशिरा येऊन ही रूद्र काहीच का बोलला नाही..? मला रूद्रचा इतका राग येतो असे मी सर्वांना दाखवते पण प्रत्यक्षात का मी रूद्रवर रागऊ शकत नाही..?? कितीही ठरवले तरी त्याला दुखावू शकत नाही..?? का माझ्या मनामधून त्याचा विचार जात नाही..? असे का वाटते रूद्र आणि माझे आधीपासूनच काही तरी नाते आहे..?? का..? का..?"


निशी विचार करतच तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तेव्हा तुक्स तिच्याजवळ येत म्हणाली, "वा... काय प्रेझेंटेशन दिली तू. सिरयस्ली इट वॉज ॲसोम. मी तर फक्त पाहतच राहिले तुझे प्रेझेंटेशन आणि तुझी प्रेझेंटेशन स्किल. अप्रतिम.. आणखीन एक सांगू का..??" असे म्हणून मिश्किल हसत ती निशीकडे पाहू लागली.


निशी पी सी स्टार्ट करत तिच्याकडे पाहून म्हणाली, "एक काय दहा सांग. पण आता नको नंतर." असे म्हणून ती एक फाईल डेस्कवर शोधू लागली. आणि तिला हवी असलेली फाईल भेटली तशी ती पि सी वर काम करू लागली.


यावर तूक्स तोंड वाकडे करत म्हणाली, "तुला न कधी कोणत्या गोष्टीबदल एक्साईटमेंटच नसती." असे म्हणून ती पुढे बोलणार तोपर्यंतच निशी तिला अडवत म्हणाली, "बीकज आय नो... तू कुणाबद्दल सांगणार आहे. आणि ज्याबद्दल तुला सांगायचे आहे त्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये. सो नाऊ यु कॅन गो." असे म्हणून ती पुन्हा पी. सी मध्ये पाहू लागली.


पण तरीही तूक्स जागची हलली नाही. आणि दिपकडे पाहत म्हणाली, "तू जे समजत आहे त्याबद्दल मी बोलत नाहीये निश. मी ज्याबद्दल बोलणार आहे ते ऐकून तू ठार वेडी होणार." असे म्हणून ती पुन्हा एकदा निशीकडे आणि पुन्हा दिपकडे पाहू लागली.


तेव्हाच दिप तिथे आला. आणि तूक्स आणि निशीकडे पाहत म्हणाला, "वेल, निशी युर प्रेझेंटेशन वॉज माईंड ब्लोविंग. सिरियली.... म्हणजे रुद्र सर ही खूपच इंप्रेस झाले." असे म्हणून तो निशीच्या मनाचा ठाव घेऊ लागला.


आता मात्र निशी पी सी मधून चेहरा वर काढत एकदम दिपकडे नजर वळवत म्हणाली, "खरेच का...? रुद्र सरांना माझे प्रेझेंटेशन आवडले..?" इतके बोलून ती ओशाळली आणि बोलायची थांबली.


ती स्वतःसोबतच मनामध्ये बोलू लागली, "मला का इतकी एक्साईटमेंट. आणि मी घाई घाईमध्ये माझी ही एक्साईटमेंट या दोघांसमोर एक्स्प्रेस केले. शिटटट.." ती विचार करत होतीच.


पण दिपला समजायचे ते समजले. तो मुद्दाम सब्जेक्ट वाढवण्यासाठी म्हणाला, "अरे हा.. त्यांना तुझे प्रेझेंटेशन इतके आवडले की ते फक्त तुलाच पाहत होते." इतके बोलून तो निशीच्या बॉडी लँग्वेज नोट करू लागला.


आणि झाले ही तसेच. निशी लपवून लाजून हसली. पण चेहऱ्यावर काहीच भाव न दाखवता म्हणाली, "असेल असेल, त्यांना माझे प्रेझेंटेशन आवडले असेल. आणि त्याचबरोबर मी त्या प्रेझेंटेशनवर बरेच येफर्टस घेतले आहे. आणि त्यांना माझी चूक काढायची असेल म्हणून ते माझ्याकडे एकटक पाहत असणार." इतके बोलून ती पुन्हा काम करत असल्याचे नाटक करू लागली.


खरे तर तिला तूक्स आणि दिप आता रुद्रबदल काय बोलतात हे ऐकण्यामध्ये रस होता.


तूक्स, निशीकडे पाहत म्हणाली, "अग निश," ती इतकीच बोलली आणि रुद्र सर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यामुळे तिचे बोलणे अर्धेच राहिले. ती रूद्र सरांना पाहून एकदम खुश झाली. आणि मनोमन सुखावली.


पण दिपचे सर्व लक्ष निशीकडे होते. आणि रोशाचे लक्ष दिपकडे. निशी नेहमीप्रमाणे आपले काम करत होती. तिने रूद्रकडे पाहणे मुद्दाम टाळले. पण दिप तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होता.


रोशाने दिपकडे पाहिले. आणि ती मनामधून हिरमुसली. आणि स्वतःच्या खुर्चीवरून उठत मुद्दाम दिपचे लक्ष जाईल असे कॉलवर बोलू लागली. पण तरीही दिपचे पूर्ण लक्ष निशीकडेच होती.


रोशने दिपचे स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जे नाटक केले तरीही त्याचे आपल्याकडे लक्ष नाहीये. म्हणून ती निशीवर मनामधून चिडली आणि पुन्हा आपल्या जागी जाऊन बसली.


रुद्र मोठ्या अटीटुयडमध्ये कॅरिडोरमध्ये कॉलवर बोलत फिरत होता. पण त्याचे जास्ती जास्त लक्ष निशीकडे होते. पण निशी मात्र स्वतःच्या कामामध्येच बिझी दिसत होती.


पण निशीचेही लक्ष रुद्रकडेच होते. पण ती सरळ सरळ तसे त्याला दाखवत नव्हती. त्याला पाहून आतून ती खुश झाली होती. तिला एकदम फ्रेश फ्रेश वाटू लागले. अचानकच वारेची मंद झुळूक चेहऱ्यावरून गेल्यासारखी तिला भासू लागले. कुठेतर संगीत वाजू लागले आणि त्यावर तिचे पाय आपोआप ठेका धरत आहेत असा भास तिला होऊ लागला.






दिप, निशीच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून का आहे? रोशा कोण आहे जी दिपवर लक्ष ठेवून आहे? हे जे काही आहे. पण रुद्र आणि निशीमध्ये नेमके काय आहे? हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढचा भाग वाचावा लागेल. त्यासाठी नक्कीच "साथ तुझी माझी... कथा पुर्णजन्माची.." याचा पुढील भाग वाचायला विसरू नका.


कथेचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही तुमच्या समिक्षा देऊन मला नक्की सांगा. कथेचा पुढचा भाग मी लवकरच प्रकाशित करेन. आणि सर्वात महत्वाचे कथा आवडत असेल तर like.. comments.. share plus मला Follow करायला विसरू नका.. खुश राहा.. आणि नेहमी वाचत रहा..


धन्यवाद..