Sath tujhi majhi - 3 in Marathi Love Stories by Kadambari books and stories PDF | साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 3

Featured Books
Categories
Share

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 3

पण निशीचेही लक्ष रुद्रकडेच होते. पण ती सरळ सरळ तसे त्याला दाखवत नव्हती. त्याला पाहून आतून ती खुश झाली होती. तिला एकदम फ्रेश फ्रेश वाटू लागले.


अचानकच वारेची मंद झुळूक चेहऱ्यावरून गेल्यासारखी तिला भासू लागले. कुठेतर संगीत वाजू लागले आणि त्यावर तिचे पाय आपोआप थिरकत आहेत असा भास तिला होऊ लागला.


पण तिला जसे जाणवले की ती कोणत्यातरी सुप्त स्वप्नामध्ये हरवली आहे तेव्हा तिने पुन्हा स्वतःला सावरले आणि कामावर लक्ष केंद्रित करू लागली.


रुद्रने एकदा निशीकडे पाहिले पण ती तिचे काम करत आहे हे पाहून तो मनामधून चिडला आणि तिथून निघून गेला.


रुद्रची कस्टमरसोबत मीटिंग होती म्हणून तो बाहेर जाणार होता. त्यामुळे तो स्वतःच्या केबिनकडे जाता जाता एका प्यूनकडून "निशीला बोलवलं आहे" असा मॅसेज पाठवला.


प्यून, निशीकडे गेला. तेव्हा निशी तिच्या डेस्कवर नव्हती.
त्याने इकडे तिकडे पाहिले पण ती जवळपास कुठेच त्याला दिसली नाही. म्हणून तो पाच दहा मिनिट तिथेच उभा राहिला.


तो वाट पाहत तिथेच उभा होता तोपर्यंत पुन्हा रुद्रने त्याला बोलवले. आणि थोडा त्रासून म्हणाला, "मिस्टर कावे, काय झाले. मिस निशीला मेसेज दिला का..? अजून निशी का भेटल्या नाहीयेत मला..?" इतके बोलून आता प्युन काय बोलतो याकडे त्याचे लक्ष लागून होते.


(रुद्र स्वतःच्या कंपनीचा बॉस होता. तरीही तो कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्याना आदर देऊन बोलवत असे. भले ही कर्मचारी हा प्युन असला तरी. त्यामुळे कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर होता.)


प्युन हळू आवाजात म्हणाला, "सर, मी जाऊन पहिलो पण निशी मॅम डेस्कवर नाहीयेत."


रुद्र थोडा भुवई उंचावत म्हणाला, "नाहीयेत म्हणजे..? ऑफिसमध्येच आहेत न त्या..?"


प्युन थोडा घाबरत म्हणाला, "हा.. हा.. ऑफिसमध्येच असणार पण सध्या त्या त्यांच्या डेस्कवर नाहीयेत. मी वाट पाहत उभा होतो. पण तेव्हा त्या तिथे आल्या नाही आणि तोपर्यंत तुम्हीच बोलवून घेतले मला."


रुद्र घड्याळ पाहत म्हणाला, "म्हणजे तुम्ही अजून तिला सांगितलेच नाही मी बोलवलो आहे म्हणून..?"


प्युन चाचरत म्हणाला, "हा.. पण...." पुढे बोलणारच तोपर्यंत रुद्र त्याला थांबवत म्हणाला, "तुम्ही पुन्हा जाऊन पाहा. त्या आल्या असतील तर त्यांना पटकन सांगा. मी बोलवले आहे म्हणून."


रुद्रचे बोलणे ऐकून प्युन फक्त मान हलवत म्हणाला, "ओके सर." असे म्हणून तो तिथून पटकन निशीकडे निघाला.


इकडे निशी, वॉशरूममध्ये होती. ती फ्रेश होऊन आरश्यासमोर उभे राहून स्वतःला न्याहळत होती. पण तिला जाणवले कोणी तरी तिला पाहत आहे. पण कोण आहे हे जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला तिथे कोणीच दिसले नाही. पण तिला खूप स्ट्राँगली वाटत होते. तिला कोणी तरी पाहत आहे म्हणून.


थोड्या वेळानंतर ती पुन्हा तिच्या डेस्कवर आली. तेव्हा प्युन पुन्हा तिथे आला. आणि म्हणाला, "निशी मॅम, तुम्हाला सरांनी अर्जंट बोलवले आहे."


प्युनचा निरोप ऐकून निशी स्वतःची नोट पॅड डेस्कवर शोधू लागली. पण तिला नोट पॅडच भेटत नव्हते. तिला काय करावे समजेना.


निशी काहीतरी शोधत आहे. पण, तिला ती वस्तू मिळत नाहीये. म्हणून प्युन, तिला म्हणाला, "मॅम, पटकन सरांना जाऊन भेटा आधी. त्यांना अर्जंट काम आहे. नाहीतर ते पुन्हा माझ्यावर तर चिडतीलच पण तुमच्यावरही ब्लास्ट होईल. बर तुम्ही जाऊन भेटा लवकर त्यांना." इतके बोलून तो तिथून निघून गेला.


प्युनचे बोलणे ऐकून ती घाईघाईमध्ये नोट पॅड शोधू लागली. पण तिला ते मिळालेच नाही. म्हणून ती घाईमध्ये तशीच निघून रुद्रकडे गेली.


जाताना ती विचार करू लागली, "रुद्रचे असे कोणते अर्जंट काम आहे. खरेच अर्जंट काम आहे की आणखीन काही..?" ती विचार करता करताच रुद्रच्या केबिनच्या दरवाजावर जाऊन पोहचली.

















खरेच रूद्रचे निशीकडे अर्जंट काम असेल का? निशी रुद्र कडे गेली तो आता तिच्यासोबत कसा वागेल?
रुद्र आणि निशीमध्ये नक्कीच काही आहे का? पुढे जाऊन दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात का? की ही कथा आणखीन काही वेगळे वळण घेईल? हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढचा भाग वाचावा लागेल. त्यासाठी नक्कीच "साथ तुझी माझी... कथा पुर्णजन्माची.." याचा पुढील भाग वाचायला विसरू नका.


कथेचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही तुमच्या समिक्षा देऊन मला नक्की सांगा. कथेचा पुढचा भाग मी लवकरच प्रकाशित करेन.


सर्वात महत्वाचे कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट्स, शेअर आणि मला फॉलो करायला विसरू नका खुश राहा.. मस्त रहा आणि नेहमी वाचत रहा..


धन्यवाद..