Shrram Satsang - 6 in Marathi Philosophy by Chandrakant Pawar books and stories PDF | श्रमसंत्सग - 6

Featured Books
Share

श्रमसंत्सग - 6

काही वेळा श्रमाचे स्मरण होते .अनेक वेळा श्रमाचे विस्मरण सुद्धा होते .आठवण होते आणि मग जुन्या केलेल्या श्रमाचे गोडवे गात जीवन जगले जाते...
अनेक वेळा असे म्हटले जाते की माझी ही गोष्ट करायची राहून गेली. माझी ती गोष्ट करायची राहून गेली. मला हे मिळालं नाही .मला ते मिळालं नाही. मी असं केलं असतं तर तसं झालं असतं. अमुक तमुक याव आणि त्याव अथवा ही गोष्ट आणि ती गोष्ट या कपोल कल्पित गोष्टित श्रम रमत नाही. वेळ फुकट घालत नाही.परंतु याच्यामध्ये अजिबात अर्थ नाही...

कारण वेळ म्हणजेच श्रमक्षण हे लक्षात घ्यावे. एकदा वेळ निघून गेली की श्रम सुद्धा निघून गेले. श्रमाची जी लहर आहे त्यावेळीची. त्या स्थळाची. त्या काळची. त्या गोष्टीची. त्या वास्तूची किंवा त्या वस्तूची .त्या पदार्थाची किंवा त्या कामाची .ती लहर महत्त्वाची आहे .लहरचा अर्थ लाट असा आहे.... कामाची सुद्धा एक लाट येते आणि त्या लाटेमध्ये अनेक गोष्टी होऊन जातात ज्या सुटतात राहून जातात.. लाटेच दुसरा अर्थ उर्मी आहे आणि तिसरा अर्थ स्फूर्ती आहे
चौथार्थ जो मोठा आहे त्याचं नाव महासंधी आहे.


श्रमामध्ये ऐतखाऊपणा नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यायोग्य आहे. मात्र याला अपवाद आहे... ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आधीच श्रमाचा महापराक्रम करून ठेवला आहे किंवा श्रमोतिहास रचला आहे. अशांना श्रम त्यातून सवलत देतो ते घरी बसून खाऊपणा करून त्यांचं पुढील आयुष्य जगतात याचे कारण त्यांना श्रमाने वरदान दिले असते...

श्रमाचा महत्त्वाचा घटक हा पैसा आहे .दाम आहे. जीवन मजुरी आहे . पगार आहे वेतन आहे पेमेंट आहे.संपत्ती आहे. मालमत्ता आहे .ऐश्वर्य आहे. ती जर कोणत्याही श्रमात मिळत नसेल तर ते श्रम काहीच कामाचे नाहीत .ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी... कारण काम,दाम आणि घाम ही शरीराची श्रमसूत्री आहे.
अय्याशीपणा उधळपट्टीपणा श्रमाला वर्ज्य आहे.

श्रम सेवा या बाबतीत मात्र श्रमाचे महत्त्व खूपच अबाधित आहे महत्त्वाचे आहे. कारण जिथे सेवा आहे. तिथे सेवा ही मोफत दिली जाते .त्यामुळे सेवेमध्ये पैसा मिळवणे चूक आहे. मग ती सेवा आई-वडिलांची असेल. राष्ट्राची असेल. घराची असेल. मंदिराची असेल .गावाची असेल . प्राणी पक्षी जलचर निसर्ग यांची असेल. आजारी माणसांची असेल किंवा प्रेमळ व्यक्तींची सुद्धा असू शकेल. यामध्ये लाभ मिळवणे हे अजिबात चुकीचे आहे. एकदम असभ्य आहे. यामध्ये तुम्हाला श्रमपुण्य मिळते. सेवेमधील नेहमी दर्शन घडते. जे दर्शन ज्याला झालं तो पुण्य मानतो. तूच महान श्रमात्मा ठरतो.

आताच्या काळात पुण्य मिळवण्याचं सर्वात सोपं, सुलभ साधन म्हणजे श्रम...
ही गोष्ट सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवायला हवी.

परोपकार,मदत ही सुद्धा श्रमाचीच महारुपे आहेत... ही गोष्ट नाकारून चालणार नाही.
गाणं गाणे आणि गाणं किंवा गाणं कंपोज करणं ही सुद्धा श्रमाचीच रूपे आहेत... गाणं एकच आहे क्रिया आणि काय म्हणजे एका श्रमा मध्ये अनेक क्रिया, उपक्रिया असे कंगोरे असतात. त्यामध्ये अनेकांचे हात लागलेले असतात अनेकांची बुद्धी वापरलेली असते. अनेकांचे शरीर त्यासाठी झटलेले असतात. मात्र त्याचं श्रेय एकाला दिले जाते. त्याचे कारण श्रम हा एकटा आहे आणि एकटा श्रम जेव्हा अनेकांना मार्गदर्शन करतो. तेव्हा तो एकटा राहत नाही तर तो सार्वजनिक होतो. सामूहिक बनतो आणि त्यातून जी श्रमकला बाहेर पडते. ती मात्र आश्चर्यचकित करणारी ठरते. ऐतिहासिक असते. हेही नसे थोडके...

श्रमाची ओंजळ किंवा श्रमाचा वाटा हडपणारे...त्याचे श्रेय घेणारे अनेक श्रमकंटक समाजात आहे. पुढच्याला मागे खेचून आपलं पुढे पुढे घोडे दामटवणे व स्वतःला त्या स्थानी आणणे म्हणजे स्वार्थ आहे. असं अनेक जण करतात नोकरीमध्ये करतात उद्योग धंदा मध्ये करतात सार्वजनिक कार्यामध्ये करतात किंवा अध्यात्मिक गोष्टींमध्ये सुद्धा ही गोष्ट अधोरेखित आहे... जो कोणी गुरु आहे किंवा जो कोणी केंद्रस्थानी आहे तो नेहमी पुढे राहण्याचा प्रयत्न करतो राजकारणामध्ये तर या गोष्टीला अपवादच नाही. राज करणे मध्ये स्वतःचे प्रेझेंटेशन करणं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि जे लोक ती गोष्ट छोटी समजतात ते कार्यकर्ते होऊन मागे मागे राहतात... ते अजिबात नेते बनत नाहीत..

श्रम स्वतःला महत्त्व द्यायला सांगतो. जर स्वतःला महत्त्व दिलं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही .जर स्वतःला अर्थ नाही तरी माझ्यासाठी कर. याचं कारण मी मध्ये श्रम आहे..

मी मध्ये श्रमाचा पहिला स्वर आहे .तू मध्ये श्रमाचा दुसरा स्वर आहे .इतरांमध्ये श्रमाचा तिसरा स्वर आहे. अनेकांमध्ये श्रमाचा चौथा स्वर आहे. सामूहिक मध्ये श्रमाचा पाचवा स्वर आहे. सार्वजनिकतेमध्ये श्रमाचा सहावा स्वर आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकते मध्ये श्रमाचा आद्य स्वर आहे. याचंच घनार्थ असा आहे की आद्य स्वरामध्येच श्रमाचा प्रारंभ स्वर आहे.