Devayani Development and Key - Part 30 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३०

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३०

भाग  २९   वरून  पुढे  वाचा ......

 

संध्याकाळी, एक स्मार्ट तरुण देवयानीच्या फ्लॅट वर आला.

“इथे देवयानी कोण आहे? मला त्यांना भेटायचं आहे.”

“मीच देवयानी. बोला.”

“मी राजेश पटेल. विकास चा बाल मित्र. आम्ही दोघ शाळे पासून बरोबर होतो.”

“हो हो, या बसा, विकास बोलला होता मला तुमच्या बद्दल. कुठे असता तुम्ही?” देवयानी त्याला रीसीव करताच होती, तेवढ्यात सेजल बाहेर आली.

“कोण आलंय ग देवयानी? मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला.”

“ये ग. हे श्री राजेश पटेल. विकास चे मित्र. आणि ही सेजल शाह, माझी रूम पार्टनर.” – देवयानीनी सेजल आणि राजेशची ओळख करून दिली.

राजेशने सेजलला विचारलं.

“तुम्ही कुठले? पुण्याचेच का?”

“नाही आम्ही भावनगरचे. आमचं तिथे सगळंच आहे. आई, वडील, भाऊ, वहिनी सगळे.” सेजल म्हणाली.

“अरे वा आम्ही पण भावनगरचेच. અમારું ગામ પણ ભાવનગર છે. અમે નાગપુરમાં રહીએ છીએ. દાદા, દાદી, કાકા બધા ભાવનગરમાં છે. અમે ભાવનગર જતા રહીએ છીએ.” राजेश म्हणाला  आणि मग देवयानी बाजूलाच पडली. ती दोघं भावनगर मध्येच अडकून पडले. देवयानी आपली गप्पच बसली होती. मग तिनेच किचन मधे जाऊन चहा पाण्याचं बघितलं. तास भर हे लोक गप्पा मारण्यात रंगून गेले होते. मग केंव्हा तरी सेजल भानावर आली आणि तिने देवयानीला आवाज दिला.

“देवयानी, अग कुठे आहेस तू? काय करते आहेस, बाहेर ये ना.”

देवयानी बाहेर आली.

“मी इथेच आहे, तुम्ही दोघं गप्पांमध्ये इतके रंगून गेला होता की मी डिस्टर्ब केलं नाही.” – देवयानी.

मग थोडा वेळ बसून राजेश निघून गेला. अर्थात पुन्हा येण्याचं सेजलला कबूल करूनच.

तो गेल्यावर देवयानी बघत होती की सेजल हवेतच तरंगत होती. चेहरा एकदम खुशीने चमकत होता.

“काय बोलत होता ग इतका वेळ? कोड लॅंगवेज मधे?” – देवयानी.

“  कोड लॅंगवेज? अग गुजराती मधे बोलत होतो आम्ही.” – सेजल.

“ते समजलं, पण मला कुठे येते गुजराती. म्हणजे माझ्यासाठी ती कोड लॅंगवेज ठरत नाही का? थांब, आता कोणी कर्नाटक मधून आलं की कानडी मधे बोलेन, मग कळेल तुला.” देवयानीनी सेजलला चिडवलं.

“ए, तो तुला भेटायला आला होता, तू पळून गेलीस म्हणून मला त्याच्या बरोबर कंपलसरी  बोलावं लागलं. खरं तर तू मला थॅंक्स द्यायला पाहिजे. तुझ्या पाहुण्याला मी छान ट्रीटमेंट दिली म्हणून.” सेजळ म्हणाली.

“असं म्हणतेस? कंपलसरी बोलावं लागलं? आता पुढच्या वेळी तो आला की त्याला सांगेन की सेजल नाईलाजाने तुझ्याशी बोलत होती म्हणून.” – देवयानी.

“ए कम ऑन देवयानी, काय तू पण!” – सेजल.

आणि मग सेजल, राजेश बद्दल भरभरून बोलत राहिली. देवयानी तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिली. एकाच भेटीत इतकं काही झालं? आणि मग तिला लक्षात झालं की तिला सुद्धा विकास असाच पहिल्या भेटीतच आवडला होता म्हणून. तिने मनोमन प्रार्थना केली की यांची गाडी सुरळीतपणे मार्गी लागू दे.

रात्री विकासला फोन करून काय काय घडलं ते सांगितलं. विकास म्हणाला की

देवयानी, सेजल कशी आहे हे मला माहीत नाही. पण राजेश आणि त्यांच्या घरची माणसं खूपच साधी आणि सरळ आहेत. सेजल पण साधी आहे असं तू म्हणतेस मग या दोघांचं  जमलं तर फारच छान. माझा मित्र आणि तुझी मैत्रीण. वा मजा आयेगा.

सेजल आणि राजेश ची गाडी एक्सप्रेस स्पीड ने निघाली होती आणि देवयानी समाधानाने पहात होती. तिला सेजलचं  बोलणं आठवत  होत, बिचारी निराश झाली होती लग्नाबद्दल. पण आता तिचे सुखाचे दिवस आले होते. ऑल द बेस्ट सेजल असं देवयानी मनातल्या मनात म्हणाली.

 

पाहता पाहता मे संपला. अजून फ्लाइट चालू झाल्या नव्हता. लग्नाची तारीख उलटून गेली होती. कुणाच्याही हातात काहीच नव्हतं. देवयानी पार वैतागली होती. कोरोंना मुळे बाहेर कुठे, जायची सोय नव्हती. सेजल, राजेशच्या रंगात इतकी रंगून गेली होती की तिच्या जवळ राजेश शिवाय दूसरा विषयच नव्हता बोलायला. सतत राजेश पुराण ऐकून देवयानी कंटाळून गेली होती. एक दिवस शनिवारी संध्याकाळी तिला राहवलं नाहीच आणि तिने सेजलला विचारलेच.

“सेजल, मला बाई भीती वाटते, तू पूर्णिमाच्या वाटेवर चालली आहेस का?”

“अग नाही, असं तुला का वाटतंय?”- सेजल.

“इतकी तू राजेश, राजेश करते आहेस, सतत त्याच्या बरोबर फिरत असतेस म्हणून विचारते आहे.” – देवयानी.

‘बरोबर आहे तुझं, तुला राजू आणि पूर्णिमा समोर दिसताहेत म्हणून तुला असं वाटतंय. पण असं नाहीये. राजेश फार चांगला मुलगा आहे. मी तुला आत्ता सांगणारच होते, पण तू आधीच विचारलं.’ – सेजल. 

“काय सांगणार होतीस?” देवयानीनी विचारलं.

“आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. तो त्याच्या घरी बोलला परवा. आणि आज तो इथे येणार आहे.” – सेजल.

“इथे? काही खास?” – देवयानी.

“आज आम्ही त्याच्या घरच्यांशी बोलणार आहोत विडियो कॉल वरुन. तसा माझा फोटो त्यांना  दाखवला आहेच आणि माझी सर्व माहिती पण राजेशने त्यांना दिली आहे. प्राथमिक पसंती झालीच आहे. आता प्रत्यक्ष समोरा समोर यायचं आहे. राजेश म्हणाला अजिबात टेंशन घेऊ नकोस. सगळं ठीक होईल.” – सेजलनी माहिती दिली.

“अरे बापरे, मग  तुला तयारी करावी लागणार आहे. तू आत्ता पार्लर मध्ये असायला हवी होतीस.” – देवयानी आश्चर्याने म्हणाली.

“अपॉईंटमेंट तर मी घेऊन ठेवली आहे, पण मला समजत नाहीये, ते लोक नागपूरचे आहेत. नागपूर शहर आणि तिथले लोक कसे आहेत, याची मुळीच माहिती नाहीये. त्यांना आवडेल का मेक अप करून आलेलं?” – सेजलनी तिच्या मनातलं गोंधळ सांगितला.  

“हे बघ, देवयांनी म्हणाली, भडक पणा करू नकोस. हलकासा कर. इंटरव्ह्यु ला जातांना आपण कसं जातो तसं. समोरची व्यक्ति हसरी, आणि आकर्षक असली की अर्धी लढाई जिंकलेलीच असते. आणि मला अनुभव आहे ना, साधे आणि मनमिळाऊ असतात तिकडचे लोक. फारसा इगो नसतो.” – देवयानी.

“आम्ही आज त्याच्या रूम वरुन पण बोलू शकलो असतो. पण मुद्दाम इथून बोलणार आहोत.” – सेजल.

“काही खास कारण आहे का?” देवयानीची पृच्छा.

“यस मॅडम, यस खास कारण आहेच.” – सेजल.

“काय?” – देवयानी.

“इथे तू आहेस.” – सेजल.

“मी? मला समजलं नाही.” – आता देवयानी गोंधळली.

“अग राजेश आणि विकास लहानपणा पासूनचे मित्र आहेत. दोघांच्या घरचे लोक एकमेकांना चांगले ओळखतात. तुमचा साखरपूडा झाला तेंव्हा त्या लोकांनी तुला पाहीलं आहे. तुझी त्यांच्याशी ओळख पण करून दिली होती असं राजेश म्हणतो. मग आता माझ्या बरोबर तू इथे त्यांना दिसली तर त्यांना बरं वाटेल आणि मला पण थोडा धीर येईल. राहशील ना माझ्या बरोबर? तू नागपूर ला गेली होतीस तेंव्हा तुझ्या घरचे तुझ्या बरोबर होते. इथे माझ्या बरोबर तुझ्या शिवाय कोण आहे?” सेजलनी सांगितलं.

“अग असं का विचारतेस? मी असणारच आहे तुझ्या बरोबर. काळजी करूच नकोस. विकास ला सांगू का? तो ही जर जॉइन झाला कॉन्फरन्स मध्ये, तर अजूनच सोपं होईल.” – देवयानी.

“खरंच की, माझ्या लक्षातच आलं नाही. करतेस त्याला फोन?” – सेजल.

देवयानीनी विकासला फोन लावला. विकास म्हणाला की,

“मला बरंच वाटेल, पण तरी सुद्धा राजेश आल्यावर त्याला विचार, योग्य वाटलं तर योग्य वेल साधून तोच मला कॉल करेल.”

“ठीक आहे.” – देवयानी.

मीटिंग तर उत्तम पार पडली. देवयानीला पाहून राजेशच्या आई, वडीलांना पण बरं वाटलं. थोड्या वेळाने राजेशने विकासला पण जॉइन करून घेतलं. सेजल पार्लर मध्ये जाऊन आल्यावर इतकी छान दिसत होती की स्वत: सेजलला पण आश्चर्य वाटलं. राजेशच्या घरच्यांना पण सेजल आवडली. सेजल च्या घरच्यांनी राजेशला आधीच पसंत केलं होतं. त्यामुळे आता कसलाच प्रश्न उरला नव्हता.

“मग,” देवयानीनी विचारलं, “सेजल, लाडू कधी ?”

सेजलने राजेशकडे पाहीलं, राजेश म्हणाला

“लग्न तर भारतातच करायचं आहे. पण आत्ता तर भारतात जाणं शक्य नाही. थोडी वाट पहावीच लागणार आहे. कदाचित डिसेंबर उजाडेल असं दिसतंय.”

“हं ss, आमच्या लग्नाची तारीख याच महिन्यात होती. ती तर निघून गेली. बहुधा दोघांचीही लग्न डिसेंबर मध्येच होणार असं दिसतंय.” – देवयानी. 

“हो ग, तुमचं तर लांबतच चाललंय. परत तू इथे आणि विकास तिकडे भारतात. तुझ्या जागी मी असते ना तर मला वेडच लागलं असतं.” – सेजल.

“आपल्या हातात काहीच नाही म्हंटल्यांवर काय करणार. वेड लागून, लागून, शहाणी झाली आहे मी आता.” – देवयानी.

पण सेजलच्या या बोलण्याने देवयानी पुन्हा हिरमुसली. तिची फार चीड चीड होत होती. तिने विकासला फोन लावला.

“मीटिंग तर छान झाली. खुश असेल न सेजल ? काय म्हणतेय ?” – विकास.

“तिचं सोड, ते दोघं गेले बाहेर, सेलिब्रेट करायला.” – देवयानी.

“कमाल आहे, तुला नाही विचारलं? तुझा तर इम्पॉर्टंट रोल होता.” – विकास.

“खूप आग्रह केला. पण मला रागच आला होता. म्हणून नाही गेले.” – देवयानी.

“राग येण्याचं काय कारण? आणि कोणावर?” – विकास.

“माझाच मला राग आला होता. मूडच गेला, मग सांगितलं की आजचा दिवस तुमचा  दोघांचा आहे, तुम्ही दोघंच एंजॉय करा म्हणून.” – देवयानी.

“हे काय नवीन? एवढा कसला राग आला?” विकास अजूनही कन्फ्युजन मधे.

“माझाच मला राग आलाय, तुझा पण आलाय. तू तर काहीच करत नाहीयेस, नुसता आळशा सारखा बसून आहेस. मला बोलायचंच नाही तुझ्याशी.” – देवयानी.

“अरे, अरे, अरे, फोन कापू नकोस, तू प्रॉमिस केलय मला.” विकास घाई घाईने म्हणाला.

क्रमश:...........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.