Devayani Development and Key - Part 35 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३५

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३५      

भाग  ३४ वरून  पुढे  वाचा ......

 

 

“ते कुठलं इंजेक्शन म्हणत होता, ते दिलं का ?” – देवयानीनी विचारलं.

“नाही ते उद्या मिळणार आहे असं डॉक्टर म्हणत होते.” – अश्विनी. 

“उद्या मिळणार आहे म्हणजे ? आपण आणू शकत नाही का ?” – देवयानी.

“नाही त्याचा काळा बाजार व्हायला लागला म्हणून सरकार ने त्याचं वितरण आपल्या ताब्यात  घेतलं आहे. ते डायरेक्ट हॉस्पिटललाच देतात. इथल्या  कलेक्टर ऑफिस मधूनच  वितरण होतं.” अश्विनीनी सांगितलं. 

“म्हणजे आपल्या हातात काहीच नाही?” – देवयानी.

“नाही. सध्या तरी नाही.” – अश्विनी. 

“मग आता काय करायचं?” – देवयानी.

“वाट पहायची. आणि डॉक्टर ने सांगितलं आहे की याच वेळेला आलात तर रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देईन म्हणून. तेच करायचं. अजून काय?’ – अश्विनी.

“पण आता नेमकी कंडिशन काय आहे?” – देवयानी.

“तसं घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉक्टर म्हणत होते. दहा बारा दिवस राहावं लागेल पण नक्कीच बरा होईल. काळजी करण्यासारखी बाब नाहीये, हाताबाहेर गोष्टी गेलेल्या नाहीत असं डॉक्टर म्हणत होते. भय्यानेच सांगून टाकलं. मी काय म्हणतो देवयानी, आम्ही सगळे आहोत इथे काळजी घ्यायला. तू चिंता करू नकोस. आता झोप शांत पणे. रात्रीची झोप राहिली असेल ना. उद्या तुला अपडेट देतो आम्ही.” 

“ठीक आहे बाय.” – देवयानी.

तरीही बराच वेळ देवयानी नुसतीच बसून होती. सेजल उठली होती, तिच्याही कानावर बऱच काही पडलं होतच. तिने देवयानीला धीर दिला. सेजल ने केलेला गरम गरम चहा प्यायल्यावर देवयानीला जरा तरतरी आली. ती देवयानीला म्हणाली की-

“देवयानी, जरा विचार कर, विकास जर पुण्याला असता आणि आजारी पडला असता, तर किती महागात पडलं असतं. पुण्याला त्याची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. आणि नागपूर वरुन कोणीच येऊ शकलं नसतं. फार कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. पण तो नागपूरला गेल्यावर; आजारी पडला, त्याची सगळीच माणसं तिथे आहेत. तिथे त्यांच्या ओळखी पाळखी पण भरपूर आहेत. काही लागलं तर लगेच अरेंज होऊ शकतं. बघ. आणिss, आणि  मी काय म्हणते, की जर विकास एवीतेवी अॅडमिट आहेच, तर तू त्या गोष्टीचा फायदा घेऊन लवकरची डेट का नाही घेत ? तुझं चित्त लागत नाहीये ना इथे, मग जा की लवकर. नाही तरी बॉस तुझ्या फेवर मध्ये आहेच. विचार कर. तू तिथे त्याच्या डोळ्यासमोर असलीस, तर त्याची रिकव्हरी  पण लवकर होईल. तू जवळ आहेस ही गोष्ट त्याला लवकर उभारी देईल. बघ विचार कर.

देवयांनी विचार करत होती, सेजल च्या बोलण्यात तथ्य होतं. काय करावं?

थोडा वेळ विचार केल्यावर सेजल जे अनपेक्षित रित्या बोलून गेली होती, ती कल्पना देवयानीला पटायला लागली होती. काय हरकत आहे त्याच्या हॉस्पीटलायझेशन   चा उपयोग करून घेतला तर? तो चांगला असता आणि खोटं सर्टिफिकेट दिलं असतं, तर ते अनैतिक झालं असतं. पण आता कंडिशन बदलली आहे त्यामुळे असं करण्यात काहीही गैर नाही. उलट, त्याची काळजी घ्यायला मी तिथे असेन. सेजल म्हणाली त्या प्रमाणे त्याची रिकव्हरी पण लवकर होऊ शकेल. तो समोर असला तर माझ्या मनाची पण उलघाल होणार नाही. तिच्या मनाने निर्णय घेतला, आणि मग ती कामाला लागली.  तिने आंघोळ, नाश्ता वगैरे आटोपला आणि फोन घेऊन बसली. आधी एयर इंडिया च्या हेल्प लाइन ला फोन लावला. वेगवेगळ्या नंबर वर फोन करून  बोलणं झाल्यावर  तिला एकदाचा प्रॉपर माणूस भेटला. त्याला देवयानीनी सिचुएशन काय आहे याची कल्पना दिली. तो म्हणाला की बघतो काय करू शकतो ते आणि तुम्हाला मेल करतो.

आता मेल ची वाट पाहण्या पलीकडे, करण्या सारखं काहीच नव्हतं मग ती झोपायला गेली. आणि शक्य ते सर्व केल्या मुळे तिला शांत झोप पण लागली.

दुपारी तिला मेल आली. त्यात सोमवारी तिला भेटायला बोलावलं होतं.

रात्री तिने नागपूरला फोन केला. आज तिच्या डोक्यावर टेंशन नव्हतं. त्यामुळे हसऱ्या आणि प्रसन्न मूड मध्ये तिने विडियो कॉल केला. तिचा नेहमी सारखा प्रसन्न चेहरा बघून नागपूरकरांचा जीव भांड्यात पडला. त्यांना पण बोलायचं उत्साह आला.

“हॅलो देवयानी, आज खुशीत दिसते आहे स्वारी. काय खास.” – अश्विनी 

“अहो वहिनी, मी आज एयर इंडिया च्या ऑफिस ला कॉनटॅक्ट केला होता. वेळ लागला पण संबंधित अधिकारी भेटला. त्याला मी नागपूरची  सिचुएशन सांगितली आणि पटवून दिलं की होणारी बायको या नात्याने माझं नागपूर ला  असणं किती आवश्यक आहे ते.” देवयानीनी सांगितलं.

“मग?” – अश्विनी.

“त्यांनी मला सोमवारी भेटायला बोलावलं आहे. शक्य ती सर्व मदत करेन असं म्हणाला. मग आता सांगा आहे की नाही खुशी ची गोष्ट?” – देवयानी.

“अग तूच काय, आम्हाला पण आनंद झाला आहे” विकासची आई म्हणाली.

“आता तुम्ही सांगा वहिनी, काय अपडेट आहे?” - देवयानी. 

“विकास ला काल इंजेक्शन चा पहिला डोस दिला.” – अश्विनी. 

“पहिला डोस? म्हणजे असे किती इंजेक्शन द्यायची आहेत?” – देवयानीनी विचारलं.

“पांच पण तसे सहा.” – अश्विनी. 

“म्हणजे?” – देवयानी.

“म्हणजे पहिला डोस दोन इंजेक्शन चा असतो.” – अश्विनी म्हणाली. 

“हे नवीनच ऐकते आहे मी.” – देवयानी. 

“आम्हाला पण माहीत नव्हतं. अश्विनी म्हणाली. “कोरोंना नवीन आहे त्यामुळे मग सगळंच नवीन.”

मग आता बाकीचे कसे देणार?” – देवयानीचा प्रश्न.

“जसं अलॉटमेंट होईल त्या प्रमाणे देतील. खरं म्हणजे रोज एक द्यायला पाहिजे. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अरेंज करता आले तर बघा.” – अश्विनी. 

“पण वहिनी, तुम्हीच तर म्हणाल्या होत्या की सरकारच वितरण करणार म्हणून.” आता देवयानीनी गोंधळून विचारलं. 

“हो, पण अजूनही ब्लॅक मध्ये मिळताहेत असं म्हणतात. हे त्या दृष्टीने प्रयत्न करताहेत. बघूया मिळतं का? नाही तर जेंव्हा अलॉट होईल तेंव्हा.” – अश्विनी. 

“बाकी कंडिशन कशी आहे आता ?” – देवयानी.

“काही विशेष फरक नाहीये, ऑक्सिजन लेवल अजूनही ८५-९० च्या आसपास fluctuate होते आहे, आणि खोकला पण बराच आहे. पण डॉक्टर म्हणताहेत की इंजेक्शन चे किमान तीन डोस गेले की फरक दिसायला लागेल.” – अश्विनी. 

“ठीकच आहे.” देवयानी म्हणाली. “मग उद्या रात्री बोलू आता. अरे, हो एक मिनिट वहिनी,”

“हं बोल.” – अश्विनी. 

“मी काय म्हणते..”

आणि असं म्हणून, देवयानी गप्प बसली. तिला सुचेना की कसा  विषय काढावा ते.

“अग बोल ना.” – अश्विनी. 

“बोलू?” – देवयानी घुटमळत बोलली. 

“अग विचारते काय आहेस, बोल पटकन.” – अश्विनी. 

“तुम्हाला राग आला तर?” – देवयानी.

“नाही येणार राग, काय हो आई?” अश्विनीनी आई कडे  बघून विचारलं.

“हो हो, नाही रागवणार आम्ही, तू बोल बाळा, जे काही मनात असेल ते बोलून टाक.” यमुना बाई म्हणाल्या. यमुना बाईच बोलल्या मुळे देवयानीला धीर आला.

“मला तुम्ही, विकासची हॉस्पिटल मध्ये कोविडची ट्रीटमेंट चालू आहे असं हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आणून द्याल का?” – देवयानी.

सगळे एक क्षण भर तिच्याकडे पहात  राहिले आणि मग सगळेच हसायला लागले.

त्यांचं हसणं थांबल्यावर देवयानीनी विचारलं

“वहिनी, काय झालं?” देवयानीनी विचारलं. “एवढं हसायला काय झालं? मी काही विनोदी बोलले का?”

“अग नाही, आम्ही सुद्धा तुला आत्ता तेच सुचवणार होतो. पण कसं सांगायचं तुला, तुला आवडेल की नाही, याचाच विचार करत होतो. यांनी तर सर्टिफिकेट आणून पण ठेवलं आहे काल. आम्ही तुझी काय रिअॅक्शन असेल याचाच विचार करत होतो, तर आत्ता तूच विषय काढला. म्हणून हसायला आलं.” – अश्विनी. 

“औँ, काय सांगताय?” आणि देवयानीला एकदम हसू फुटलं. अगदी खळखळून हसायला आलं. अगदी नेहमी जशी हसायची तशीच. आणि साथी चा रोग असल्या सारखा नागपूरकर सुद्धा सगळेच तिच्या बरोबर हसायला लागले. वातावरण एकदम हलकं  झालं, मळभ  निघून गेलं होतं.

भैय्या म्हणाला की

“देवयानी, मी तुला सर्टिफिकेट ची कॉपी आणि एंगेजमेंट चे अंगठी घालतांनाचे दोन फोटो whatsapp केले  आहे. आत्ताच बघून घे.”

“भाऊजी, फोटो कशाला?” – देवयानी.

“असू दे. सरकारी काम आहे, जर तो म्हणाला की तुमचं लग्न ठरलं आहे याला पुरावा काय? तर तेंव्हा हे फोटो तू दाखवू शकतेस.” – भैय्या म्हणाला. 

“होss, माझ्या लक्षातच आलं नाही.” – देवयानी म्हणाली आणि तिने जीभ चावली.

वातावरण इतकं नॉर्मल झालं होतं की बराच वेळ अवांतर गप्पा झाल्यावर देवयानीनी फोन ठेवला.

 

क्रमश: .........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.