Kouff ki Raat - 3 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग ३

खौफ की रात

भाग 3

....

लेखक: जयेश झोमटे..

........

" को ..को....कोण हाय..? "

स्मशान शांततेत
किश्याच ते वाक्य त्या पुर्ण कब्रस्तानात गुंजल.

थंड हवेच्या झोकांमार्फत विव्हल,आवाज दुर घेऊन जाण्याची विशिष्ट प्रकारची शक्ति असते.

तिच ह्याला कारणीभुत होती. त्याच वाक्य पुर्ण होताच वातावरणात एक हलकासा खिदळून हसल्यासारखा आवाज आला.

" खिखिखीखिखिखीऽऽऽऽ" आवाजाची दिशा झाडाच्या दिशेने होती.


आठ नऊ वर्षाची लहान मुल ज्यावेळेस कोण्या मोठ्या मांणसाची किंवा आपल्या वयाच्याच मुलाची थेर उडवतात, मस्ती करतात

तेव्हा ते अशेच फिफिफीफी करत हसतात.

पन ते हसु ती क्रिया मानवी मनाला सुखावणारी असते.

पन हेच कृत्य जेव्हा ही अघोरी , तामसी, कृल्प्ती , शक्ति, जेव्हा एका मानवा समवेत करते.

तेव्हा त्यात मानवी मनाला सुखावनारी भावना मुळीच नसते.

भय? ,भीती? दुख? यातना.. ह्या ज्या काही मानवी मनातल्या असहनीय भावना असतात त्यांचा उदय ह्या एका कृतीने होत असतो.

लहान मुलांना ते एक साधारणस खेळ वाटत, त्यांचा हेतु फक्त आणि फक्त खेळ, मज्जा ,मस्ती, त्यातून मिळणारा आनंद हेच असत...

.
पन जेव्हा हीच अघोरी शक्ति तिच्या क्रूर बुद्धीसहित मानवा समवेत हे खेळ खेळते , तेव्हा त्यात एक आसुरी आनंद त्यांना मिळत असतं.

सरत्या शेवटी जेव्हा लहान मुलांचा खेळण्यातल रस निघून जात तेव्हा ते स्व्त:हुन ती थेर, मस्ती, खेळायच थांबवतात.

पन जेव्हा हीच बिभत्स,कृल्प्ती अघोरी शक्ति..जेव्हा तिच आसुरी आनंदी इच्छा समाप्त होते.. तेव्हा हे श्वापद, आपल्या सावजासमोर येतात , नी शेवट मृत्युने होतो.

जस की एक मांजर उंदरासोबत मनभरेस्तो पर्यंत खेळत

आणी नी मग एकदा का मन भरलं? की पुढे त्या छोठ्याश्या च्या जीवाच क्रुर अंत होतो.

मानवाच्या मनात एकदा का उत्सुकतेचा विष भिनभिनल , की समोर जे काही असेल ते पाहिल्याशिवाय त्याची हौस काही केल्या पूरी होत नाही.

मग समोर काहीही असो . अक्षरक्ष जिवावर बेतणार संकट ही का नाही असो . ते तो पाहणार म्हंणजे पाहणारच .

खर आहे की नाही?
हातात फडफडणारा कंदीलाचा प्रकाश पकडून किश्या गुढघ्यांन इतक्या धुक्यातुन एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जाऊ लागला,

चारही बाजुंना गडद धुक पसरलेल, ते धुक मुळ नैसर्गिक नव्हतच, उलट ते क्लिष्ट, अघोरी , क्रूर कर्माच्या अतृप्त आत्म्यांच एक अविभाज्य भाग होत.
ज्या धूक्यातुन एक सडका, कुजका वास येत होता.

दहा पावल चालून किश्या त्या झाडापाशी पोहचला , झाड तस म्हंणायला सोहळा फुट उंच होत.

झाड़ाच्या फांद्या वाकड्या तिकड्या भुतासारख्या आजुबाजुला पसरल्या होत्या.

झाडाच्या खोडामागे किश्याने कंदील पुढे करत एकदा वाकुन पाहील. तर तिथे त्याला अचानक...
समोर..

काहीच..दिसल नाही!

ज्या दिशेने ती स्त्री गेली होती ..लपली होती .
ती जागा आता रिकामी होती.. होती ना?

किश्याच्या नजरेस .आजुबाजुहून वाहणा-या धुक्याव्यतिरीक्त काहीही एक दिसुन आल नव्हत...
त्याच्या पाठमो-या अस्वस्थेत कितीविलक्षण बुद्धीला न पेलणार दृष्य घडल होत..! ज्या सर्व द्रुश्यास आपन तर पाहिल होतंच पन जर तेच किश्याने पाहिल असत तर?


" हुश्श.! "
किश्याच्या मानवी अंतर्मनाने नेहमीप्रमाणेच भास झाल अस समजल.

भास ह्या शब्दरचनेचा उदय असाच काहीसा होत असतो. शंभर टक्के भासांमधुन एकोणीस टक्के भास हे खरे असतात. पन मानवी मन ते मानतील तर ना? .


एक सुटकाधारक उसासा टाकुन किश्या मोठ्या आनंदाने मागे वळला, नी त्याने समोर पाहिल . त्या गोल टपो-या डोळ्यांना प्रथम खालचा हिरवा गवत , त्या गवतांवर असलेल्या पाचफुट कबरी , नी आजुबाजुंनी जाणारा जाड पांढरा पातलसर धुका दिसला.

पन त्या धुक्यात आणखीन काहीतरी होत.

एक काळा आठफुट आकार दिसत होता तिथे . अगदी स्तब्ध निर्जीव मुर्ती सारखा उभा असल्यासारखा ...

..नी एकटक किश्याकडेच पाहत असल्यासारखा.

त्या आकाराची ना कसली हालचाल होतांना जाणवत होती,

नाही ते पुढे सरसावत होत.

की समजा कब्रस्तानात कोणी किश्यासारख हरवल, चुकुन आत आल असाव.

" अहो !"

किश्याचा बारीक पातळसर आवाज. "को....को..कोण हाई तुम्ही ?"

त्याच्या वाक्यावर कसलही उत्तर आल नाही.
तसा तो पुन्हा म्हंणाला.

" कोण हाई? अर बोल की !"

ह्या अशा एन वेळेला ह्या अश्या ठिकाणी कोण आल असेल बर ?

किश्याला आता भीती वाटू लागली होती. घसा कोरडा पडत होता. आवाज खाकरून बोलल्यासारखा बाहेर येत होता. त्या उभ्या शुन्य सेल्सियंस वातावरणात किश्याला गरम होऊ लागलेल. चेहरा,पाठ घामाने भिजु लागलेली.

" अर ए ! कोण हाई, आरं बोलना बाबा !" किश्या आता रडकुंडीला आला होता.

भीती उरात चढली होती ती आता त्याच्याकडून काय-काय करुन घेईल.देवच जाणो?

पुढचा तो काळसर आकार एकटक

..वाहत जाणा-या पांढरट धुक्यात उभा राहीलेला दिसत होता.

अगदी एका पुतळ्यासारखाच म्हंणा.

किश्याने हलकेच कंदीलाचा प्रकाश पुढे सरकवत त्या आकाराच्या दिशेने जायला सुरुवात केली होती. पावले जशी पुढील अंतर कापत होती. तसा पुढचा धुका मेन वितळावा तसा वितळत होता. पुढील दृष्य साफ-होत होत.


" हा तिच्या आईला , हा ,हा,हा! "

तो हसू लागला...अगदी पागल झालेल्या मांणसासारखा तो खांदे उडवत हसत होता.

कारण ....

...
किश्याच्या समोर कब्रस्तानातल्या हिरव्या गवतावर एक निर्जीव मूर्ती ऊभी दिसत होती.
ती मूर्ती आठ फुट उंच असुन ऊभी होती,

मूर्तीच्या पुर्णत शरीरावर एक सफेद कपडा कोरला होता ,ज्या कपडयाने मूर्तीच सर्व शरीर झाकल गेल होत, हा तस म्हणायला चेह-यावरचा काही भाग म्हंणजेच टोकदार नाक, खालची हनुवटी दिसत होती.

बाकी चेह-याचा आतला भाग डोळे, भुवया ,तोंड सर्व काही अंधाराने झाकल होत अशी मुर्तीची कोरीव
रचना होती.


"च्या आईला ! मला घाबरवलं ना? थांब तुझ्या आता"

किश्या ताड ताड चालत मुर्तीजवळ पोहचला..

हाताततला कंदील तिथेच खाली बाजू ठेवला.

दोन्ही हाताने पेंट थोडी खालती सरकवली , नी नित्यकर्म त्या मूर्तिवर पार पाडु लागला.

जरा दर झाडझुडपांतून एक पिवळीजर्द सैतानी नजर त्याच ते विकृतीकरण कृत्य पाहत होती.

अद्याप किश्यासोबत त्या वाईट शक्तितिच फक्त खेळ सुरु होत. त्या शक्तिसाठी किश्या एक खेळणीतला बाहूला होता... मन भरेस्तोपर्य्ंत त्याला ती खेळावणार होती..आणि मन भरल की दोन सेकंदात ..काळाचा पडदा उघडला जाणार होता.

" च्यायला मला घाबरवलस ,दीड फुट्या!"

अस म्हंणतच त्याने पेंटवर घेतली. नी पुन्हा हातात कंदील घेऊन बाहेर जायचा रस्ता शोधण्यास जाऊ निघाला.

फड,फड काहीतरी किसन्याच्या डोक्यावरुन वेगाने उडत गेल.


" ए आयेऽऽऽ...!" अचानक झालेल्या क्रियेने किश्या दचकला.

त्याने पुन्हा मागे - वर ...सर्वदिशेना वळून पाहिल.
मागे तीच मूर्ती जशीच्या तशी ऊभी होती. पन तिच्यात काहीतरी बदल जाणवत होता. आणि तो बदल म्हंणजेच त्या मूर्तीच्या खांद्यावर बसलेल ते घुबड होय. काळ्या पिसांच , नपट्या नाकाच, टपो-या भेदक डोळ्यांच अपशकुनी घुबड.

" ही तिच्या आईला काय ब्याद येऊन बसलीये. " किश्याने खाली वाकून एक दगड हाती घेतल.

" ए हाड तिच्या, हाड..! हाड " किश्याने हातातला दगड भिरकावला नव्हताच. आवाजानेच पळून जाईल असा किश्याच समज होता.

पन तसं झाल नाही.

ते तसंच एकटक डोळे वटारुन किश्याकडे पाहतच होत.

जणू किश्याला दम देत आहे. ही जागा माझी आहे तुझी नाही.
" हाड...! आरं हाड ,. ..हाड तुझ्या आईला तुझ्या ! काय बघतंय कुत्र्यावाणी हाड,हाड!"

किश्याने आता हातातला दगड भिरकावला, पन नेम मात्र चुकला होता.

दगड मारुन सुद्धा ते ध्यान अद्याप तिथेच बसुन होत.

किश्याला जरा विचित्रच वाटल. त्या पक्ष्याला मानवाची भीती वाटायला हवी होती.. पन इथे वेगळंच झाल होत

..कारण ते घुबडच आता किश्याला घाबरवु लागल होत.

घुबडाबद्दल ऐकलेल्या काही वाईट साईट गोष्टींचा फोल्डर त्यात ...मेंदूत साठवलेल्या फाईलज मधुन एक-एक करत बाहेर घेऊन आल्या होत्या.
घुबड म्हंणजेच भुत असतं. रात्री -अपरात्री ह्याच तोंड पाहिल तर पुढील दिवशी मृत्यु ठरलेला असतो. त्या घुबडाच्या भेदक टपो-या काळसर डोळ्यांनी खुन्नस पणे किश्याकडे पाहायला सुरुवात केली होती. ते नपट नाक, आती भयानक एका चेटकीनी सारख भासत होत ते घुबड. शेवटी न राहवून किश्यानेच माघारी वळण्याच ठरवलं! कारण मानवी मनाला धोक्याची सूचना देणारी भावना भीती वाटत असतांना अगदी तिप्पटणे सक्रिय असते. भीतियुक्त भावनेत घेतलेले निर्णय नेहमीच सुरक्षित भासतात. किश्या वळला . होय तो वळला..!

आणी जस वळला..तोच..
" हिहिही! ए माटळ्या! कुठ चालला ..मला सोरुन ."

मागून आलेला आवाज ऐकताच किश्याचे डोळे विस्फारले... छातीतला काळीज धडधडायचा ब्ंद झाल
...
उभ्या मणक्यातून थंडगार निवडुंग उगवले...पायांतले त्राण गळून गेले...

कारण हा आवाज ... त्याच्या ओळखीचा होता..

क्रमश