Bhagy Dile tu Mala - 8 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ८






मध्यरात्रीचा ठोका उलटला होता. स्वराच्या दारावर थाप पडली आणि ती धावतच दारावर पोहोचली. तिने दार उघडले होतेच की कियारा आणि काही मैत्रिणी मोठ्याने ओरडत म्हणाल्या, " सरप्राइज ! हॅपी बर्थडे स्वरा मॅडम. "

स्वरा त्यांच्या सरप्राइजने आनंदून गेली होती. ती त्यांना बघतच होती की सर्व तिला बाजूला करून आतमध्ये पोहोचले. पूजाही ह्या प्लॅन मध्ये सामील झाली होती त्यामुळे ती झोपेतून अलगद उठली. तिने येऊन स्वराला घट्ट मिठी मारली आणि खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वरा दारातून हे सर्व पाहतच होती की सर्व मुलींनी रूम मध्ये घोडका केला. त्यांनी केक आधीच मागवून हॉस्टेलच्या किचनमध्ये ठेवला आणि बारा वाजताच हळूच घेऊन आले. केकसोबतच सेलिब्रेशनची सर्व तयारी सुरू झाली. कुणी तरी कँडल्स आणले आणि ते केकच्या बाजूला लावण्यात आले. स्वराला अजूनही त्या सरप्राइजवर विश्वास बसत नव्हता म्हणून ती दारातच उभी राहून ते सर्व पाहत होती. आता मात्र पूजाने तिला हात पकडतच आतमध्ये आणले. सर्व तयारी झाली आणि पूजाने फुंकर मारून कँडल्स विझवली. तिने फुंकर मारताच सर्वांनी मोठ्याने गाऊन तिला पुन्हा एकदा विश केले. आज मुली सर्व तयारीनेच आल्या होत्या त्यामुळे केक कट होऊनही त्या परत गेल्या नाही उलट मोबाइलवर गाणे लावून सर्वांचे डान्स सुरू झाले. पूजा तर स्वरासोबत किती तरी वेळ डान्स करत होती. आज कुणीच कुणाला ऐकत नव्हते. रूममध्ये नुसता कल्लोळ सुरू होता. कुणी गाणे म्हणून तिला खुश करत होते तर कुणी स्वयमच्या नावाने तिला चिडवत होते. गप्पा तर संपता संपतच नव्हत्या. आता जवळपास २ वाजायला आलेले म्हणून त्या सर्वांनी पुन्हा तिला एकदा शुभेच्छा देऊन रूम सोडली.

सर्व मुली तिला स्वयमच्या नावाने चिडवत होत्या पण स्वयमचा अजूनही मॅसेज किंवा कॉल आला नव्हता म्हणून तिचा चांगला मूड खराब झाला होता. सर्व मुली आपल्या रूममध्ये परतल्या आणि दार बंद करायला पूजा समोर जाऊ लागली. स्वरा स्वयमचा मॅसेज येईल म्हणून मोबाईलमध्ये लक्ष घालून बसली होती तर पूजा दारातूनच ओरडली , " अय्या हे काय? "

पूजाचा आवाज येताच स्वरा धावतच दारावर पोहोचली . तिने पूजाकडे लक्ष दिलं तर तिला समजलं की पूजा दाराच्या समोर बघत होती. स्वरानेही दाराच्या समोर खाली नजर करत पाहिले. दाराच्या समोर एक पिशवी होती . लक्ष जाताच स्वराने ती उचलून घेतली. पूजा, स्वरा दार बंद करतच आतमध्ये आले आणि स्वराने ती पिशवी लगबगीने उघडली. पिशवी उघडताच सर्वात आधी तिच्या हाती लागला तो सुंदर ड्रेस. रेड कलरचा वन पिस होता तो. ड्रेस बघताच तिने आरशासमोर स्वतःवर ड्रेस कसा दिसतोय ते चेक करू लागली. तिच्यावर ड्रेस इतका खुलून दिसत होता की ती काही क्षण आरशासमोर तशीच उभी राहिली. ती आरशासमोर होती तर पूजा स्वराला हळूच म्हणाली, " स्वरा ये ना आणखी काहीतरी आहे त्यात. ते बघू. "

तिने ड्रेस बाजूला ठेवतच पुन्हा ती पिशवी हातात घेतली. त्यात एक छोटासा बॉक्स होता. तिने बॉक्स उघडला. त्यात अगदी लखलख करणारी सोन्याची चैन दिसली. तीच मन क्षणभर खुश झालं आणि दुखीही. दुःखी ह्यासाठी की तिला अस कुणीही महागाच गिफ्ट दिलेलं आवडलं नसत. म्हणूनच ते गिफ्ट तिने पाहताच बाजूला ठेवल. पुन्हा एकदा पिशवी हातात घेतली. त्यात गुलदस्ता होता सोबतच एक चिट्ठी होती. तिने गुलदस्ता सुद्धा बाजूला ठेवला. पूजा तर हे सर्व बघून शॉक होती त्यामुळे ते सर्व पाहताच तिच्या तोंडून आपोआप शब्द आले, " स्वरा हे पक्क स्वयमच काम आहे. त्याने विश नाही केलं ना कदाचित सरप्राइज द्यायचं असेल त्याला. ए शहाणे बघत काय बसली आहेस? चिट्ठी तरी वाच त्यात काय लिहिलं आहे मला तरी कळू दे."

स्वराने सर्व सामान बाजूला ठेवले आणि चिट्ठी हातात घेऊन बेडवर टेकली. पूजाही तिच्या बाजूला बसली. पूजाने चिट्ठीची फोल्ड उघडली आणि वाचू लागली.

डिअर स्वरा ! जन्म दिन की लख लख बधाईया ! आपके लिये डिअर शब्द भी कम ही लगता है पर दुसरा शब्द मिला नही इसलीये इस बार इसीसे काम चला लिजीए. आपको आपके सालंगिरह का जितना इंतजार नही होगा उतना तो शायद मुझे था. बहोत दिनोसे सोच रहा था की आपको उपहार मे क्या दु? हिरा देता तो शायद उसकी चमक कम होती इसलीये सोना दे रहा हु. शायस इसकी चमक आपकी जिंदगी बना दे. पता है मुझे की इतने मेहंगे उपहार आपको अच्छे नही लगते पर एक बात बता दु की उपहार की किंमत नही देखी जाती. उसकी भावनाओ किंमत देखी जाती है. आपके लिये वो बेशकिमती है. तो मेरे लिये आप. मै तो बस आपको खुश देखणा चाहता हु. पता नही आप ये मेरे उपहार पेहनकर आओगे ये नही पर दिल-ही-दिलं ये तमन्ना है की आप जरूर पेहनकर आओ. तभी शायद ऊन चिजो की किंमत बढ जायेगी. मै आपको ऊस ड्रेस मे देखणे को बेसबरीसे इंतजार कर रहा हु. आशा है की आप मेरा नाजूक दिलं नही तोडेगी. फिर से एक बार सालगिरह की ढेर सारी बधाईया. रब आपको बहोत खुशीया दे. तरक्की दे.
आपका अपणा

स्वरा वाचतच होती की पूजा जरा आनंदी होत म्हणाली, " हाउ रोमँटिक स्वयम हा ! असा तर कधी बोलत नाही पण बघ ना किती सुंदर गिफ्ट, पत्र पाठवल आहे. यार खुप भारी आहे हे सर्व. "

स्वरा तर आता लाजलीच होती. स्वरा कितीतरी वेळ त्या गिफ्टकडे बघत होती आणि त्याचे पत्रातले शब्द तिला सतत आठवत होते. तिला त्याने दिलेला ड्रेस घालायची तिला इतकी घाई झाली होती की समोर ड्रेस बघून तिला राहावेना पण तिला आता सकाळची वाट बघावी लागणार होती. मनात उद्याबद्दल हजार स्वप्न घेऊन ती क्षणात झोपी गेली.

स्वरा सकाळी उठली तेव्हापासून राहून राहून तिची नजर त्या ड्रेसवर जात होती. त्या ड्रेसला खूप हिरे चांदी लागले होते असे नाही पण तो ड्रेस स्वयमने दिल्याने तीच मन त्याला पाहूनही भरत नव्हतं. स्वरा उठली तेव्हपासून सतत तिला कॉल्स, मेसेजेस येत होते त्यामुळं तयारीला उशीर होऊ लागला. तीच अर्ध मन त्या कॉल्सवर होत तर अर्ध मन केव्हा तयार होऊन त्याच्यासमोर जाते ह्यात अडकल होत. इतर दिवशी हेच कॉल्स आले असते तर तिला फार आवडले असते पण आज नेमकं कामाच्या वेळी कॉल्स येऊ लागल्याने ती जरा नाराज झाली होती. पूजा तर बाजूला बेडवर बसून हे सर्व बघू लागली. स्वराची अशी स्थिती बघून ती स्वतःच हसू आवरू शकली नव्हती . बऱ्याच वेळपर्यंत ती स्वराला अस बघून हसत होती आणि तिची उडालेली धांदल बघून पूजाने तिला स्वतःच मदत करायचे ठरवले.

फोन आता सायलेंट मोड वर गेला आणि स्वरा रोमँटिक मोड वर. पूजाने तिच्या तयारीत कुठलीच कमी ठेवली नव्हती. अर्धा तास झाला होता जेव्हा तिची तयारी पूर्ण झाली. तो रेड वन पिस, कपडा इतका सिल्की होता की किंमतिचा अंदाज लावणे कठीणच. गळ्यात चमचम करणारी चैन, मोकळे सोडलेले केस, एका हातात ड्रेसला मॅच होतील असे कंगण तर दुसऱ्या हातात घडी. कानात सूट होतील असे इअररिंग आणि पायात सुशोभित अस सॅंडल. तिला आज स्वयमने बघितलं असत तर बघतच राहिला असता. तीला तयार होऊन बघितल्यावर पूजाही बघतच राहिली होती. एक तर ती आधीच सुंदर त्यात स्वयमच्या गिफ्ट्सनी तिच्या सुंदरतेत आणखीच भर घातली.

स्वरा, पूजा रूमच्या बाहेर निघाल्या. कॉलेजला जायची वेळ असल्याने सर्व मुली तयार होऊन कॉलेजकडे निघाल्या होत्या. त्यात स्वरा इतकी सुंदर दिसत होती की मुलींची नजर तिच्या वरून हटत नव्हती. ना मेकप ना साजोशृंगार तरीही स्वरा इतकी सुंदर दिसत होती की पाहणाऱ्याच्या नजरा तिच्या सौंदर्यावरून हटत नव्हत्या . जाता - जाता जवळपास सर्वच मुलींनी तिला विश तर केलं होतच पण तिच्या सुंदरतेची स्तुती करायला विसरल्या नाही. काही क्षणातच तिच्या मूडमध्ये पुन्हा चार चांद लागले. आता फक्त तिला त्याच्या तोंडून तिची स्तुती ऐकायची होती आणि तिला वाटही पाहवेना.

ती हॉस्टेल क्लिअर करत आता कॉलेजच्या आवारात पोहोचली. तिने ड्रेस खराब होऊ नये म्हणून हलकेच हाताने उचलत चालू लागली. ती कॅम्पसच्या मधोमध चालत होती आणि पाहणारे तिच्याकडे पाहतच होते. सर्व कॉलेज ड्रेस मध्ये असताना ती त्या सर्वात उठुन दिसत होती त्यामुळे मुलांची तर काही खैरच नव्हती. ती जिथून जिथून जात होती तिथे तिथे मूल फक्त तिच्याकडे पाहत होते. मुलं अस बघत आहेत म्हणून स्वरा बिचारी लाजली होती तर पूजा तिची खेचून तिच्या लाजण्यात आणखीच भर घालू लागली. जरी कित्येक मूल तिच्या सौंदर्यावर आज भुलले होते तरीही तिला वाट होती ती स्वयमच्या भेटीची. ती लाजत-लाजतच क्लास मध्ये पोहोचली. तिने दारात पाऊल टाकले होतेच की पूर्ण क्लास तिच्याकडे पाहू लागला. मग काय मूल आणि काय मुली ! स्वयमही क्लास मध्येच बसून होता. सर्वांच लक्ष जाताच त्यानेही तिला पाहिले आणि पाहतच राहिला. ती इतकी सुंदर दिसत होती को क्षणभर तो तिच्यापासून नजर हटवू शकला नाही. ती दारातून आत येत होती आणि स्वयम तिच्याकडे पाहत होता. आतापर्यंत स्वराला ओढ लागली होती की त्याची नि तिची केव्हा नजरा-नजर होईल पण आता जेव्हा तो समोर होता तेव्हा ती त्याच्याशी नजर मिळवू शकत होती. पूजा तिला हळूच स्वयमच्या वागण्याबद्दल सांगत होती आणि स्वरा आणखीच खुश झाली. स्वरा आपल्या डेस्क वर जाई पर्यंत तिने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. ती डेस्ककडे पोहोचली आणि हळूच तिने त्याच्याकडे वळून बघितले. तो तिला एकटक बघत होता. त्याची नि तिची नजरा-नजर झाली आणि क्षणात सर्व जग थांबल.

दिस रेंगाळतो माझा
तुझ्या अवती -भोवती
रात्र स्वप्नांत येते
तुझ्या किनाऱ्यावरती
दिस रातीचा हिशोब
मज मांडता येईना
जीव घेणे गणितहे
बघ सुटता सुटेना

तसे ते एकमेकांकडे बघताना कायम लाजत असायचे पण आज कुणीच हार मानायला तयार नव्हत. स्वयमला तर तिच्यावरून नजर हटविणे कठीण झाले होते. ते एकमेकांत हरवले होतेच की सर क्लास घ्यायला आत आले. सरांना गुड मॉर्निंग विश करायला सर्व उभे झाले आणि दोघांचीही तंद्री भंग झाली. सरांनी आता येताच तिला सिव्हिल ड्रेसवर येण्याचे कारण विचारले आणि तिचा वाढदिवस असल्याचे माहीत होताच त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. आज एक एक क्लास समोर जात होते. सर्व तिला शुभेच्छा देत होते तर स्वयम तिला फक्त पाहण्यात बिजी होता. आज कधी नव्हे ते इतकं प्रेम तिला सर्वांकडून मिळत होत तर स्वयम अजूनही तिला विश करायला तरसत होता.

दुपारची वेळ. सर्व सेलिब्रेशन करायला कॅन्टीनमध्ये पोहोचले होते. कॅन्टीन मध्ये गेल्यावर तिला पार्टी द्यावी लागली असती पण तिच्याकडे पैसेच नव्हते म्हणून ती चिंतीत होती. ती गोष्ट स्वयमला लक्षात आली आणि त्याने हसतच तिचे सर्व टेन्शन दूर केले. त्याने पैशाची जबाबदारी घेतली आणि पुन्हा एकदा तिचा चेहरा खुलला होता. आज तिच्या आयुष्यातला आनंद संपतल्या संपत नव्हता. एक तर कियाराने रात्रीच केक आणून सुखद धक्का दिला होता तर इकडे कॅन्टीनला पण आज जल्लोष होता. तिथे एक नाही तर तीन तीन केक होते. एक नक्कीच स्वयमने आणला होता तर दुसरा केक मित्रांनी आणला होता आणि तिसरा केक कुणी आणला होता हे कुणालाच माहीत नव्हत. पण आज इतक्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये त्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नव्हत. पुन्हा एकदा तिन्ही केक तिने कट केले आणि सेलिब्रेशनला सुरुवात झाली.

स्वराच्या चेहऱ्यावरून आज आनंद दूर जात नव्हता तर स्वयमला तिच्याशी बोलायची सुद्धा संधी मिळाली नव्हती. त्याने सकाळपासून एकदाही तिला विश केले नव्हते. अस नाही की तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं पण तिच्याकडेही काही पर्याय नव्हता. त्यांची नजरा - नजर झाली की दोघेही एकमेकांकडे बघून फक्त हसत होते. केक कट झाले आणि सर्वांनी आपल्याला हवं ते खायला मागविल. खाताना पण सर्वांच्या गप्पा सुरूच होत्या . स्वयम तिच्याशी बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून त्याची नजरही हटली नव्हती. कितीतरी वेळ असच सुरू होत. सर्वांच्या गप्पा मारून झाल्या, मस्ती झाली आणि आता खाऊनही झालं होतं. स्वरा सर्व मैत्रिणींच्या मधोमध बसली होती. तर स्वयम बिल पे करायला काउंटरवर पोहोचला. त्याने पैसे काढलेच होते की काउंटरवर बसलेला व्यक्ती म्हणाला, " सर आपका बिल पे हो चुका है सो आपको पे करणे को जरूरत नही है. "

त्या माणसाच्या बोलण्याने तो क्षणभर अचंबित झाला. बिल नक्की कुणी पे केलं हे त्याला कळत नव्हतं. त्याने त्या माणसावर एकदा नजर टाकली तो हसत होता म्हणून त्याने पैसे आपल्या पॉकेट मद्ये टाकले आणि विचार करतच जाऊ लागला. तो विचारात हरवला होता तर बाकी सर्व फोटो काढायला गार्डनकडे जाऊ लागले होते. स्वराला तर कुणीच सोडायला तयार नव्हते. पूजाही समोर जाऊ लागली तेव्हड्यात त्याने तिचा हात पकडला. त्याला तिच्याशी काहीतरी बोलायच होत तेवढ्यात तीच म्हणाली, " स्वयम हाउ रोमँटिक ना ! मुझे नही पता था की तुम इतने रोमँटिक हो. वो प्यार भरा खत, इतना मेहंगा और सुंदर ड्रेस, सोने की चैन. क्या बात है! तुमने तो उसका दिन ही बना दिया. बस बहोत हो गया स्वयम ये सब अब अपणे दिलं की बात बता दो और तुम्हारे बिच की दुरीया मिटा दो. "

पूजा पटापट बोलून गेली आणि तीच बोलणं ऐकताच तिचा हात त्याच्या हातातून आपोआप सुटला कारण ती जे सर्व बोलली होती त्यातलं त्याने काहीच दिलं नव्हतं. एवढंच काय तिला सर्वात उशिरा वीश करून तिला त्रास द्यायचा त्याचा प्लॅन होता म्हणून आज त्याने विशसुद्धा केलं नव्हतं पण आता हे सर्व ऐकून त्याच्या पायाखालची जमीन नाहीशी झाली होती. हे नक्की कुणी दिलं त्याला काहीच कळत नव्हतं. तो विचार करतच होता की त्याची नजर दूरवर फोटो काढत असलेल्या स्वरावर गेली. ती त्याला हात हलवून येण्याचा इशारा करत होती म्हणून तो विचारातून बाहेर येत तिच्याकडे वळाला. काहीच क्षणात ते फोटो काढण्यात इतके दंग झाले की त्याला ती गोष्ट लक्षात सुद्धा राहिली नाही.

दुसरीकडे राजने दिलेले सर्व गिफ्ट तिने फक्त कबुलच केले नाही तर परिधान सुद्धा केले ह्या विचाराने त्याच दिवसाच चैन हरपल होत. तिचा तो आजचा खास लुक त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तीच कदाचित आज त्याच्याकडे लक्ष नव्हतं पण असा एकही क्षण नव्हता जेव्हा राजची तिच्यावर नजर गेली नव्हती.

क्रमशा .....