crayim petrol books and stories free download online pdf in Marathi

क्राईम पेट्रोल

क्राईम पेट्रोल
पुणे जिल्ह्य़ातील टिळक नगर पोलीस ठाण्यात पोलीस इन्स्पेक्टर सुधाकरराव चार्ज घेण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. त्याचवेळी एक फोन येतो. समोरील व्यक्ती सुधाकरराव यांना सांगतो, की अप्सरा जिममध्ये एका मुलाने आत्महत्या केली आहे, तुम्ही लवकर या!
फोन ठेवल्यावर सुधाकरराव घटनास्थळी जातात. त्याठिकाणी एका 18 ते 20 वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह पडलेला असतो. त्या मुलाच्या हातात एक बाटली असते. तसेच मुलाच्या तोंडामधून फेस येत असतो. सुधाकरराव समजून जातो की विष पिल्याने हा मेला आहे. सुधाकरराव बॉडीला चेक करून, बॉडी पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पाठवून देतो. हातात असलेल्या बाटलीला पुरावा पिशवी मध्ये ठेवायला सांगतो.
सुधाकरराव केसची सूत्रे हाती घेतो......... चौकशी करण्यासाठी तयारी सुरू करतो.
जिमच्या मालका पासून जिममध्ये काम करणारे नोकर, जिम करण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, एकत्र करून चौकशी करू लागतो. तेव्हा अशी माहिती हाती येते ती म्हणजे, मेलेल्या मुलाचे नाव योगेश मोरे असते. योगेश हा पुण्यातील टिळक नगर मधील राहणारा असतो, शिवाय तो वी पी मेडिकल, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो. त्याचे वडील नसतात. घरी आई आणि लहान बहीण असा परिवार असतो.
सुधाकरराव ही आत्महत्येची केस आहे की खुनाची याबाबतीत द्वंद्वात अडकलेला असतो. चौकशी दरम्यान काही गोष्टी समजल्या त्या म्हणजे, योगेशची लहान बहीण सीमा, तिला काही महिन्यापूर्वी एका सलमान नावाच्या मुलाने छेडले होते. त्यामुळेच योगेश आणि सलमान मध्ये वाद झाले होते. कदाचित त्या वादामुळे योगेशचा खून झाला असावा अशी शक्यता वाटू लागते.
सुधाकरराव तपासाची सूत्रे सलमानच्या दिशेने फिरवायला सुरू करतो. पुण्यातील बुधवार पेठेत सलमानचे चहाचे दुकान असते. सुधाकरराव सापळा रचून सलमानला अटक करतो. सलमानची चौकशी करू लागतो.पण तपासात हे सिद्ध होते की, सलमानने काहीच नाही केले शिवाय तो बरेच दिवस त्याच्या गावी मालेगाव मध्ये होता.
ही शक्यता पण संपुष्टात येते. काहीच माहिती मिळत नव्हती. सुधाकरराव योगश विषयी अजुन माहीती गोळा करण्यास सुरवात करतो. त्याच्य मित्र मैत्रीणीं विषय माहीती गोऴा करतो. सर्व मित्रांकडुन हीच माहीती मिळते की योगेश एक हुशार आणि जबाबदार मुलगा होता.
सुधाकरराव विचार करतो की प्रेमाचा काही एंगल आहे का? एकतर्फी प्रेमातुन तर ही घटना घडली नसेल ना? मग चौकशीची चक्रे त्या दिशेने फिरू लागतात. योगशची एक मैत्रिण असते जिच्याबरोबर एका शुल्लक कारणामुळे त्याचा ब्रेकअप झालेला असतो. सुधाकरराव त्या दिशेने शोध घ्यायला सुरवात करतात. त्याच्या मैत्रीणीला शुभांगीला चौकशीसाठी बोलवले जाते. शुभांगीशी बोलल्यावर सुधाकररावच्या लक्षात येते की कदाचीत हा एंगल पण चुकीचा आहे. शुभांगी म्हणते की ते एक शुल्लक भांडण होते आणि त्यानंतर दोघे एकत्र सुद्धा आले. ब्रेकअप वैगरे काही झाले नव्हते. शुभांगी योगेशच्या घरच्या मंडळींना पण ओऴखत होती आणि त्याच्या घरी तिचे येणे जाणे सुद्धा होते. लवकरच दोघे लग्न करणार होते.
आता सुधाकरराव त्याच्या कुटुंबाविषयी विचार करायला लागतो. योगशचे वडील नसतात. त्याच्या आईनेच काबाडकष्ट करुन योगेळ आणि त्याच्या लहान बहीणीला लहानाचे मोठे केलेले असते. योगेशला घरच्या परिस्थिति ची पूर्ण जाणीव होती. खुप अभ्यास करून चांगली नोकरी मिळवायची आणि आई आणि बहीणीला आयुष्यभर सुखी ठेवायचे हेच त्याचे ध्येय होते. अभ्यासात खुप हुशार , वर्गात नेहमी नंबर पहीला, अशा योगेशला मित्रच होते, शत्रु असण्याची शक्याताच नव्हती.
सुधाकरराव विचार करू लागला की आत्महत्येचे काही कारणच दिसत नव्हते, कदाचीत हा खुन असेल, पण मग काय कारण असेल ? सुधाकरराव चे डोके सुन्न झाले. तितक्यात परत फोन वाजला, पलीकडून परत हीच माहीती मिळाली की अजुन एका मुलाने आत्महत्या केली आहे. सुधाकरराव लगेच गाडी घेउन घटना स्थळी पोचला. तिथे माहीती मिळाली की अजुन एका मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला आहे. हा मुलगा पण वी पी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. सुधाकरराव पोलीस ताफ्यासह ताबडतोब घटनास्थळी पोचला. या मुलाचा मृत्यू पण योगेशच्या मृत्यू सारखाच झाला होता.
सुधाकरराव ने त्या मुलाच्या हातात असलेली बाटली फोरेन्सीक तपासणी साठी पाठवून दिली. त्या मुलाची बॉडी पण पोस्टमॉर्टेम साठी पाठवली. योगेशचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सुधाकराव च्या अंदाजाप्रमाणेच आला. विष पिउन मृत्यू. पण हे विष वेगळ्या प्रकारचे होते . ते काहीच ठिकाणी उपलब्ध होते. सुधाकररावला प्रश्न पडला की या कॉलेजच्या मुलांना हे विष कुठन बरे मिळत असेल? या गोष्टीचा काही ना काही क्ल्यू या कॉलेज मध्येच मिळेल असा सुधाकरराव याने विचार केला.
ताबडतोब तो आपली टीम घेउन वी पी मेडिकल कॉलेजला पोहोचला. वी पी मेडिकल, कॉलेज इतर कॉलेज प्रमाणेच होते पण मुल मात्र सर्व अभ्यासात व्यस्त. टाइमपास करणारी किंवा टवाळखोर एक ही मुलगा /मुलगी तेथे नव्हते. सुधाकरराव ने ताबडतोब वी पी मेडिकल, कॉलेजच्या प्रिंसीपल प्रोफेसर प्रकाश जाधव यांना भेटला. प्रथम दर्शनी सुधाकररावला लक्षात आले की हा अत्यंत प्रामाणीक आणि तत्वनिष्ठ माणुस आहे. सुधाकररावच्या डोऴ्यांमधे ताबडतोब आदर झळकू लागला. सुधाकरराव ने प्रकाश जाधव यांना नमस्कार करून बसण्याची परवानगी मागीतली. प्रोफेसर प्रकाश जाधव यांनी त्यान बसण्याची खुण केली आणि विचारले की अचानक सुधाकरराव कॉलेज मध्ये का आले आहेत? सुधाकरराव यांनी योगेश आणि देवदत्त या मुलांच्या मृत्यूविषयी चौकशीकरण्यासाठी कॉलेजमध्ये आलो आहोत अशी माहीती दिली.
प्रोफेसर प्रकाश जाधव यांनी सुधाकररावला सांगीतले की दोन्ही मुले खुप हुशार होती आणि दोघांनाही त्यांच्या मेरीट वर एडमिशन मिळाले होते. सुधाकरराव विचारू लागले की अभ्यासाचे काही टेंशन वैगरे येते का ? इतर काही प्रॉब्लेम आहेत का? प्रोफेसर प्रकाश जाधव यांनी सुधाकररावला सांगीतले की हे मेडीकल कॉलेज आहे. इथे येणार्या प्रत्येक मुलाच्या मनाची तयारी असते की दिवसरात्र खपून अभ्यास केल्या शिवाय एका मेडीकल प्रॅक्टीशनरची पदवी मिळणार नाही. पण इतका प्रेशर नसतो की मुले आत्यहत्या करतील आणि ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे ती मुलं अत्यंत हुशार होती हे मी आधीच सांगीतले आहे. तुमच्या समाधानासाठी या मुलांनी दिलेल्या इंट्रान्स एक्जाम च्या मार्क शीट आणि त्यांनी सबमीट केलेले इतर डॉक्यूमेंट दाखवतो. सर्व कागदपत्र तपासून झाले पण सुधाकररावचे समाधान होईना.
बातमी चैनल वर दाखवयला सुरवात झाली आणि सुधाकररावला त्यांच्या वरिष्ठांनी बोलावून सांगीतले की ताबडतोब या केस चा निकाल लावा. सुधाकरराव घरी परतत असताना त्यांच्या खबर्‍याने सुधाकररावला कऴवले की कॉलेज एडमिशन मध्ये घोटाळा आहे. इथे काही मुलांना खुप डोनेशन घेऊन एडमिशन दिले जाते पण कॉलेजच्या प्रिंसीपल ला या विषयी काहीच माहीत नाही. सुधाकरराव बुचकळ्यातच पडला असे कसे होईल की कॉलेज मध्ये डोनेशन घेऊन एडमीशन दिले जात आहे आणि कॉलेजच्या प्रिंसीपल ला काहीच माहीत नाही.
काहीतरी गडबड नक्कीच आहे. सुधाकरराव या वेळेला एकटाच वी पी मेडिकल, कॉलेजला गेला आणि सरळ ऑफीस मध्ये शिरला. त्याला पाहून क्लर्क च्या डोक्यावर आठ्या पडल्या. सुधाकरराव ने त्या वर्षात ज्या ज्या मुलांना एडमिशन दिले गेले त्यांची लिस्ट आणि त्यांच्या मार्कांचे डिटेल्स मागितले. सुरवातीला त्या क्लर्क ने नाटक केले पण पोलीसीखाक्या दाखवल्या बरोबर सर्व डिटेल्स दिल्या. सुधाकरराव च्या लक्षात आले की योगेश आणि देवदत्त या दोघांच्या मृत्यूनंतर दोन मुलांची एडमिशन झाली आहेत ज्यांना इंट्रान्स एक्जाम मध्ये मार्क कमी आहेत. सुधाकरराव ने क्लर्क ला विचारले की या मुलांना एडमिशन कोणी दिले? यांना मार्क फार कमी आहेत? क्लर्क म्हणाला की मार्क कमी असले तरी मेडीकल इंट्रान्स एक्जामच्या स्टॅंडर्ड प्रमाणे ही मुले क्वालीफाई झालेली आहेत पण इतर मुलांच्या रैंक च्या तुलनेने त्यांचा रैंक पुष्कळ मागे आहे. सुधाकर राव म्हणाला की असे असून या मुलांना का बर तुमच्या कॉलेज मध्ये एडमिशन दिले. क्लर्क ने अजून माहीती देण्यास साफ नकार दिला.
सुधाकरराव ने डोळे बंद केले आणि काही तरी निर्धार करून खिशातली गन काढून सरळ त्या क्लर्क च्या डोक्यावर गन ठेवली. क्लर्क ने ताबडतोब सांगीतले की पुणे जिल्हाचे आमदार विजय पाटील यांनी प्रोफेसर प्रकाश जाधव यांना फोन करून या मुलांना एडमिशन देण्यास सांगीतले होते. सुधाकरराव ने त्याला परत विचारले की यात पैश्यांचा काही मामला आहे का? क्लर्क म्हणाला की माहीत नाही साहेब, आम्हाला सांगीतले एडमीशन द्या आम्ही दिले. सुधाकरराव ताबडतोब पोलीस स्टेशन मध्ये आला त्याच्या टीम ला कामाला लावले. एका आमदाराचा फोन ऑफीशीयली टैप करणे अशक्य आहे असे टीमने सांगीतल्यावर सुधाकरराव ने सांगीतले हे काम अनऑफीशियली करायचे आहे.
बर्‍याच गोष्टी कळल्या. आमदार विजय पाटील बेकायदा कामे करण्यात अव्वल आहे. वी पी मेडिकल, कॉलेज त्यानेच सुरू केले आणि त्याचा बाल मित्राला चालवायला दिले. तो पैसे घेउन एडमिशन देतो पण ही गोष्ट प्रोफेसर प्रकाश जाधव यांना माहीत नाही. पण अजुनही खुनाचा का धागा दोरा सुधाकररावच्या हातात येत नव्हता. दिवस संपत चालले होते पण काहीच क्लू मिळत नव्हता. योगेश आणि देवदत्त यांनी आत्महत्या केली नसून तो खूनच आहे या गोष्टीवर शिक्का मोर्तब झाले पण कसा झाला काहीच समजत नव्हते.
अचानक एके दिवशी सुधाकररावला कॉलेजचे प्रोफेसर प्रकाश जाधव यांनी फोन केला ताबडतोब भेटायला बोलावले. सुधाकरराव ताबडतोब वीपी कॉलेज ला पोहोचतो आणि प्रकाश जाधवांची भेट घेतो. प्रकाश जाधव चिंताक्रांत दिसत असतात, सुधाकररावला पाहताच ते त्याला खेचतच ऑफीस मध्ये घेउन येतात आणि त्याला खुर्चीवर बसवतात आणि एक व्हिडिओ दाखवतात.
सुधाकरराव तो व्हिडिओ पाहतो. त्या व्हिडिओ मध्ये योगेश मोरे, आणि सोबत अजुन एक व्यक्ती दिसत असते. व्हिडिओ मध्ये असे दिसत होते की, योगेश समोरून त्याची सायकल घेऊन येत असतो. त्याचवेळी योगेशच्या समोरून ही व्यक्ती पण सायकल घेऊन येत असते. दोघांची समोरासमोर धडक होऊन दोघेही खाली पडतात. ती व्यक्ती त्याच संधीचा फायदा घेऊन योगेश जवळ असलेली बाटली बदलून स्वतःहा जवळ असलेली तशीच बाटली तिकडे ठेवतो आणि निघून जातो. योगेश पण ती बाटली घेऊन निघून जातो.
सुधाकररावच्या सर्व लक्षात येते. सुधाकरराव वी पी मेडिकल, कॉलेजचे प्रोफेसर प्रकाश जाधव, यांना त्या व्हिडिओ बद्दल विचारतो... तेव्हा प्रकाश जाधव, त्यांना सांगतो की, हा व्हिडिओ त्याचा कॉलेजच्या काही विद्यार्थिनी त्या जागेवर एकीचा वाढदिवस असल्याने व्हिडिओ काढत होते. तेव्हा कदाचित हे शूट झाले असण्याची शक्‍यता आहे.
प्रकाश जाधव इन्स्पेक्टर सुधाकरराव यांना सुरवाती पासून सर्व सांगायला सुरवात करतो. प्रोफेसर प्रकाश जाधव, आणि पुणे जिल्हाचे आमदार विजय पाटील, हे दोघेही मित्र असतात. आमदार झाल्यावर विजय पाटील, वी पी कॉलेजची स्थापना करतो.प्रकाश जाधवला ते कॉलेज सांभाळायला सांगतो. प्रकाश जाधव योग्य त्या मुलांची कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन करून घेत असे.. पण गेले काही वर्षे विजय पाटीलच्या शिफारशी मधून आलेल्या विद्यार्थ्यांना पण मित्राच्या मैत्री खातीर अ‍ॅडमिशन देत असे. एक दिवस एक शेट्टी नावाचा माणूस स्वतःहाच्या मुलाच्या अ‍ॅडमिशन साठी प्रकाश जाधवला भेटतो. पण प्रकाश जाधव, अ‍ॅडमिशन फुल असल्यामुळे नकार देतो. विजय पाटील अ‍ॅडमिशन लिस्ट चेक करतो.. लिस्ट मधील योगेश मोरेचे अ‍ॅडमिशन कॅन्सल करायला प्रकाशला सांगतो. प्रकाश त्याला नाही बोलतो. प्रकाशच्या त्याचवेळी लक्षात येते की, विजयच्या शिफारशी मधून आलेले विद्यार्थी हे सर्व जनतेची सेवा म्हणून नसून या सर्वांकडून विजय पाटील यांनी लाखो करोडो रुपये घेऊन अ‍ॅडमिशन घेतले होते.
ही गोष्ट प्रकाशला समजल्यावर प्रकाश, विजयला शेट्टीला अ‍ॅडमिशन नाही देणार आणि योगेश मोरेच नाव पण नाही काढणार असे ठाम पणे सांगून टाकतात. कदाचीत याच गोष्टीचा राग मनात ठेवून विजय पाटीलने काहीतरी दगा फटका केला असावा. हा क्लू मिळताच सुधाकरराव ने ताबडतोब तपासाची चक्र फिरवली आणि विडियो मध्ये दिसणारा दुसरा माणुस कोण आहे हे शोधण्यास सुरवात केली. सुधाकर राव ला कळले की माणूस आहे ‘हरी शुक्ला’. हरी शुक्ला हा माणूस वाईट कामे करण्यासाठी आमदार विजय पाटील यांनी पाळून ठेवला होता.
विजय पाटीलच्या सांगण्यावरून हरीने योगेश आणि देवदत्तचा खून केला असावा हा अंदाज सुधाकररावला आला होता. सुधाकरराव हरी शुक्लाला शोधण्यासाठी सुरवात करतो. सुधाकरराव यांच्या खबरी मार्फत हरी हा बिहार राज्यातील पटना या ठिकाणी लपून असल्याचे समजते. सुधाकरराव बिहार पोलिसांच्या मदतीने सापळा रचून हरीला अटक करतो. मुंबईत आल्यावर हरीला पोलिसांच्या खाक्या दाखवल्या बरोबर त्याने सर्व कबूल केले. हरीने सांगितले. विजय पाटील यांनी योगेश मोरे आणि देवदत्त या मुलांना मारण्यासाठी सुपारी दिली होती.
हरी, योगेशच्या बरेच दिवसापासून मागावर होता. योगेश कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, सर्व माहिती त्याला मिळते. त्याचबरोबर एक माहीत मिळते, ती म्हणजे, योगेश हा अप्सरा जिम मध्ये संध्याकाळी 4 वाजता एकटाच त्याच्या सायकलने जातो. जाताना सोबत एक बाटली पण असते. त्या बाटलीत प्रोटीन शेक असतो. याची माहिती पण हरीला मिळते. एक दिवस योगेश जिमला जात असताना, हरी सायकल वरून येता आणि योगेशच्या सायकला धडकतो. योगेश खाली पडतो आणि तो सावरून उभा राही पर्यंत हरी ती बाटली बदलतो आणि त्याच्याजवळ असलेली विष असलेली बाटली योगेशच्या बैगेत टाकतो आणि पुढे जे घडले ते सर्वाना माहीतच आहे. देवदत्त ला कोल्ड कॉफी पिण्याची फार आवड होती आणि एका कैफे मध्ये तो नेहमी कॉफी पिण्यासाठी तो जायचा, हरी हे सर्व शोधून काढले आणि निमित्त करून त्या कैफे मध्ये गेला. देवदत्तचे लक्ष चुकवून त्याने देवदत्तच्या कॉफी मध्ये ते विष मिसळले.
जवळ जवळ 20 दिवसांनी योगेश मोरेच्या आणि देवदत्तच्या खुनाची केस सोल्व झाली.
हरीला फाशीच्या शिक्षेची मागणी होते. विजय पाटीलला पोलीस अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतात.
अशा प्रकारे योगेश आणि देवदत्तला न्याय मिळतो...
सुधाकरराव आणि त्याच्या सर्व सहकारी पोलीस अधिकारी यांचे कौतुक केले जाते...
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तसेच काही साम्य आढळले तर, तो फक्त एक योगायोग समजावा हीच विनंती....
लेखक: अमित अशोक रेडकर,