Julun yetil Reshimgathi - 5 books and stories free download online pdf in Marathi

जुळून येतील रेशीमगाठी - 5

भाग - ५
.
.
.
.
.
अपूर्व - काय सांगतेस पिंकी..तुझी ताई पण बाबांसाठी लग्न करतेय हे...🥺




साची - तुझी पण म्हणजे? तुझा दादा पण?




अपूर्व - हा ना यार पिंकी..दादाला समजवल पण बोलतो कि आईला आजोबा आज्जी ला आवडले ना मुलगी झालं तर मग...कस कॉम्प्रोमाईज करतात हे लोक... ते ही आजच्या नवीन जनरेशन मध्ये...




साची - आपले घरचे वेगळे आहेत रे..ते दोघ घरच्यांचा विचार करतात स्वार्थाचा नाही...




अपूर्व - हो ग जोडीदार सुंदर नसावा चालेल पण निदान लॉयल हवा...साथ देणारा हवा...स्वार्थी नसावा... आपल्याशी थोडंतरी मेळ खाणारा हवा..हा आता opposite attracts i know पण थोडं तरी साम्यता हवी...ही मुलगी मला गडबड वाटते...नक्कीच...जशी काल होती तशी ती नाही...




साची - हो ना...हा मुलगा पण...ताईच आणि याच पटन अशक्य...जुळणारच नाही.....आयुष्य तडजोड करण्यात जाईल...... तो केव्हा बोलेल? प्रेम कधी व्यक्त करेल का? यातच आयुष्य निघेल......असं नको व्हायला..आपल्याला काय तरी करायला हवं...




अपूर्व - हम्म खरय...त्या मुलाचं नाव काय ग?




साची - गणपत माधव साखरदांडे




अपूर्व - साखरदांडे....? अरे दादाला जी मुलगी आले तिचा नाव शांती केशव साखरदांडे आहे





साची - काय? केशवा माधवा काय नक्की? ह्या शुगर फॅक्ट्रीज नी डोकं खाल्लंय नुसतं..यांना आपलीच भावंड भेटली.....





अपूर्व - आता आपल्या दोघांना मिळून काय तरी प्लॅन करायला हवा कि दोघांचं लग्न तुटेल...yes!!





साची - Yesss!!😷




अपूर्व - आपण या दोघांना तडजोडीच आयुष्य नाही काढू देणार....हे काय स्वतः ला हिरो हिरोईन समजतात का? सिनेमा सारखा सिन करायला....अजिबात नाही.... 😷





साची - हो आता आपणच करूया काय तरी.... 😷




************************



अर्जुन कॉफ़ी घेण्यासाठी कॉफ़ी मशीन जवळ गेला......
त्याच लक्ष नव्हतं.....तो मोबाईल मध्ये पाहत जात होता....
समोरून येणाऱ्या सावीची आणि त्याची टक्कर होते....
प्रसंग असा अचानक घडल्याने, गरम कॉफ़ी अर्जुनाच्या हातावर पडते...तो जोरात विव्हळतो....!!
😵😵





सावी - स स सर सर काय झालं? जास्त भाजलं का? सॉरी सर सॉरी सॉरी सॉरी.....!!
(घाबरून.....)




अर्जुन - अअअअअ जळ जळतंय हो सावी....





सावी - तुम्ही बसा इकडे....ब ब बसा बसा...काय करू? मी सर जास्त जळतंय का? 🥺





अर्जुन - हो ना ओ...





सावी - हा थांबा फस्टेड...नंदू दादा....दादा लवकर या....




नंदू - अरे साहेब काय झालं?




सावी - दादा लवकर फस्टेड आना.... लवकर....




नंदू - आणतो आणतो.....
(पळत जाताना....)





सावी - सर बघून का नाही चालात तुम्ही 🥺 अचानक टक्कर झाली ना....किती भाजलंय हात तुमचा.... 🥺माझ्यामुळे झालं सगळं? सॉरी सर.... 🥺.
(बोलता बोलताना...रडत.....)





नंदू - ताई हे घ्या....





सावी - हा..द्या... तुम्ही जा बाहेर सर्वे आत येतील नाही तर आवाज ऐकून....तुम्ही जा...त्यांना सांगा काही नाही झालंय.... ऑल ओके...





नंदू - चालतंय ताई..!




सावी - सर थोडं जळ जळ होईल सहन करा हा...🥺





सावी हळूच त्याचा हात हातात घेते.....
फुंकर मारत त्याला हातावर क्रिम लावत असते.....

काही स्टाफ चोरून आत येतात.....आणि समोर दोघांना असं बघून त्यांनाच नक्की काय झालंय हे समजतं नाही?!



कारण, अर्जुनचा हात बघून सावी रडायला लागते....पण अर्जुन मात्र काही हावभाव नं दाखवता फक्त हसतच तिच्याकडे एकटक पाहत होता....
ते ही शरीराची हालचाल नं करता....👀बस्स तिलाच बघत होता...




💕👀🫂


बस्स तेरे छुने से ही दिल को आराम मिल जाता हैं..!!❤‍🩹




सावी - आता कस वाटतय सर?




सावी अर्जुन कडे पाहते.....तो तिला एकटक पाहत असतो.....डोळ्यातलं पाणी त्या भावना बघत सावी सुद्धा त्याच्या डोळ्यात एकटक पाहते....👀





राहुल - सावी...सावी......




नंदू - सावी मॅडम....अर्जुन साहेब..... अर्रर्र दोघांना काय झालं?




विदुला - सावी..अग ए.....
अशी काय ही दोघ एकमेकांना एकटक का बघतायत....??





राहुल - काय गडबड आहे नक्की....





नंदू - थांबा...
अअअअ स साहेब.... साहेब....
(अर्जुनला हलवताना.)




अर्जुन - अअअ ह ह हो क काय झालं?





राहुल - काही नाही सर ते आम्ही तुमचा हात बघायला आलो...




विदुला - पण तुम्ही दोघ असं एकटक एकमेकांना का बघत होतात...???





राहुल - विदुला...गप 😅😅





अर्जुन - अअअअ हा मी बरा आहे...
थँक्यू सावी..





सावी - ओके सर... आणि सॉरी..





अर्जुन - ह....आ चला कामाला लागा जा....




विदुला - हो सर...





राहुल - हो हो सर...





*******************




अपूर्व - वेलकम होम दादा!!





अर्जुन - हम्म थँक्यू अप्पू....
(आईच्या कुशीत शिरून...)





संगीता - काय रे काय झालं? आज सरळ आईच्या कुशीत शिरलास?
(त्याच्या डोक्यावरुण हात फिरवत.....)





अर्जुन - असच! जरा ते कामाचं खूप लोड आलंय..खूप चीड चीड होतेय ग स्वतःवरा आई...





संगीता - होता रे असं...बघ अर्जुन आयुष्यात संकट, वळणं सगळ्यांना येतात वेगवेगळ्या बाबतीत पण त्यावेळी असं हार मानून नाही चालणार ना....नेहमी तटस्त राहावं कितीही गोष्टी होउदे तरी आपण आपली हिंम्मत कमी नाही होऊ द्यायची....




अर्जुन - ह्म्म्म....




संगीता - आपल्या मेंदूत म्हणजेच विचार शक्तीत खूप ताकद असते म्हणे.....आपण जे मनाशी पक्क करतो ते आपण अशक्य असलं तरी घडवून आणतो...आपला मेंदू आणि मन आली मदत करत.... म्हणूंन नेहमी पॉजिटीव्ह विचार करावा....





अर्जुन - हो आई! समजतंय मला...





संगीता - हो ना मग चल आता फ्रेश हो आणि जेवायला ये...!!





अर्जुन - आज्जी आणि आजोबा कुठेत ग आई?





संगीता - अरे विसरलास का.... साखरपुडा आहे ना....





अर्जुन - कुणाचा?





संगीता - अरे तुझा...थोडेच दिवस उरलेत आणि तू तुझा साखरपुडा आहे हेच विसरलास.... 🤨काय रे..





अर्जुन - अअअअ नाही म्हणजे... आहे लक्षात...





अपूर्व - ते सगळ्यांना निमंत्रण द्यायला गेलेत गावी...येतीलच उद्या....





संगीता - अर्जुना तुझ्या हे ही लक्षात नाही हो..हल्ली खूप विसरतोस...




अर्जुन - अअअ मी आलोच फ्रेश होऊन..!!
( खोलीत निघून जात..)





अपूर्व - दादूस...ऐक नाsss




अर्जुन - बोल अप्पू...





अपूर्व - काही झालंय का? शेअर करू शकतोस? असं वाटतय तुझ्याकडे बघून कि मन खूप भरलंय तुझ...त्याला हलक कर...त्रास तुलाच होईल... 😷




अर्जुन - अअअअ तू अजून लहान आहेस...एवढं मोठ्या माणसांसारखा बोलू नकोस...





अपूर्व - कमॉन दादूस...
मी लहान नाही आता..वय वर्ष बावीस लहान असतात का?





अर्जुन - क काही नाही..अरे वेड्या लहान भाऊ म्हणजे मुलासारखा आणि मुलं बापासाठी लहानच असतात.... समजलं मग ते बावीस वर्षाचे होवोत किंवा पसतीस...





अपूर्व - ठीक..... पण.... अरे तुझ्या समोर काय बोलू...... असो कधी वाटलं तर सांग...मी आहे...





अर्जुन - हम्म..!





अर्जुन आज नीटसा जेवला ही नाही......
त्याच आज कशातच लक्ष नव्हतं....मन कुठेतरी नकळतच धावत होत....
मनातला गोंधळ शांत बसू देत नव्हता त्याला....


स्वतः च आवरून तो खोलीत आला....तोवर फोन च्या स्क्रीनवर सावी चा मेसेज दिसला....त्याने लगेचच फोन ओपन केला..... (Whatsapp )


💬
अर्जुन सर, उद्या मी बँकेत नाही येऊ शकत कारण माझ्या साखरपुडयाची खरेदी करायला जायचं आहे....सॉरी अचानक सांगतेय म्हणून... मलाही आताच कळलं.....
तर उद्या नाही येणार मी...
चालेल का???
💬




अर्जुन - साखरपुड्याची खरेदी?
खरच आई म्हणते तस आजकाल मी सगळंच विसरत चालोय...सावीच पण लग्न ठरल आहे आणि साखरपुडा करतायत त्या....?
पण मला का इतका....
अअअ नाही... काही नाही....




💬
काही हरकत नाही सावी...तुम्ही घेऊ शकता उद्या सुट्टी...एन्जॉय युअर शॉपिंग.....!!
अर्जुन सर..!!
💬



अर्जुन सावीला रिप्लाय देतो आणि झोपून जातो....!!



***************************




सावी - आजच शॉपीग करायची होती का बाबा?





सतीश - हो..आजच..
थोडेच दिवस राहिलेत तुझ्या साखरपुड्याला.....





साची - हो बाबा तरी पण आजच...आणि ते ही त्या शुगर फॅक्ट्री सोबत....





सतीश - पिंकी..




सावी - असो असो भांडू नका चला आता...आलोय ना दुकानात...चला आत जाऊया...




साची - ह्म्म्म!




सतीश - तुला हवी ती साडी घे कपडे घे हा चिऊ...




सावी - हो बाबा... 😂




गणपत - हो हो सावी तुम्हाला हवी ती साडी घ्या...




साची - बोला लाजाळूचा झाड..... 🙂




सावी - अअअ हो...तुमचे बाबा का नाही आले?




गणपत- अचानक काम आलं ना त्यांना म्हणून...




सावी - अच्छा! हरकत नाही...





सावी आणि सगळे आत गेले.....सगळ्यांसाठी खरेदी करू लागले......साची तर मनाविरुद्धच आलेली म्हणूंन तीच फारस लक्ष नव्हतं.....सगळ्यांची शॉपिंग चालू होती....
सावीला कॉल आला म्हणून ती खाली निघून आली....
ती कॉल वर बोलतच होती, समोरून अर्जुन आणि त्याची फॅमिली आली.....सावीला पाहताच अर्जुन ब्लँक झाला, सगळ्यांना पुढे पाठवून तो सावीच्या बाजूला जाऊन उभा राहिला.....

नजरच हटत नव्हती अर्जुनची तिच्यावरून....
सावीने आज, व्हाईट शर्ट आणि पिंक लॉन्ग स्कर्ट घातला होता...



एकटक तिलाच पाहत होता, जणू तिला पाहणं ह्याच व्यसन झालंय....
तोवर सविचा कॉल आटोपलं...





सावी - अअअअ ह ह स स सर?
(अचानक समोर त्याला पाहून......)




अर्जुन - अअअअ सावी मीच आहे एवढं का घाबरलात....?




सावी - तस नव्हे अचानक आलात ना म्हणून घाबरले हो..बाकी काही नाही....




अर्जुन - अच्छा! एकट्याच आलात?




सावी - नाही सगळे आहेत वरती शॉपिंग चाले?




अर्जुन - माझी पण फॅमिली आले... चला ओळख करून देतो... हरकत नसेल तर




सावी - हो अर्थातच...!
.
.
.
.
.
अर्जुन - सावी, हे माझे आजोबा भाऊसाहेब कुलकर्णी....आणि आज्जी भागीरथी कुलकर्णी...





सावी - नमस्कार करते...




भाऊसाहेब - सुखी रहा बाळा..!




भागीरथी - आयुष्यमान भव :




अर्जुन - आणि ही माझी आई संगीता कुलकर्णी बाकी अपूर्व ला तुम्ही ओळखताच....




सावी - नमस्कार...




संगीता - असुदे बाळा....!





अर्जुन - तर ह्या माझ्या बँकेतल्या एम्प्लॉयी आहेत सावी सतीश पेडणेकर...





भाऊसाहेब - अच्छा अच्छा तू आहेस होय सावी...




भागीरथी - बरच कौतुक असत हा तुझा आमचा घरी...




संगीता - हो ना, जस नाव तसाच गोड आवाज आणि रूप आहे तुझा....




सावी - थँक्यू... मॅडम..




संगीता - अग वेडे मॅडम काय म्हणतेस.. 😂




सावी - सॉरी.. 😆





अर्जुन - आणि ही शांती साखरदांडे माझी फायन्से....





शांती - हाय!





सावी - हॅलो....





सावी - आणि हे गनपत साखरदांडे माझे होणारे मिस्टर..





अर्जुन - अअअ हॅलो




गनपत - नमस्कार!




********************




अपूर्व - झालं आज पुन्हा नं सांगता आलीस ना मला....? आपली पूर्ण फॅमिलीच आता भेटली एकमेकांना 😷




साची - यात माझी काय चूक पूर्ण मुंबई मध्ये तुझ्या फॅमिली ला पण हेच शॉप भेटलं का 😡





अपूर्व - तुझ्या फॅमिली ला पण? 😡





साची - हा भेटलं मग काय करणार तू आता? 😡हा काय करणार मारणार तू मला...हा..? 🤨





अपूर्व - अअअ ते मी मी काहीही करू शकतो पण आता भांडायची वेळ नाही ना... सोडतो तुला आता पुरता.... हा....





साची - जा रे डरपोक... 🤨प्लॅन सुचला का नाही काही?




अपूर्व - अग हळू आपले घरचे बघतील...





साची - अरे नाही बघणार सगले मस्त गप्पा मारतायत, शॉपिंग चाले....
तू बोल प्लॅन सुचला का?





अपूर्व - नाही ना ग पिंकी..





साची - ह्म्म्म....ह हे दोघ? इकडे?
(समोर बघताना...)




अपूर्व - कोण?
हं हे दोघ? 🤨





समोरच शांती आणि गणपत एकमेकांना एकटक बघत उभे होते......गप्पा काय मारत होते, हसत होते, नं बोलणारा गणपत तिच्यासोबत खूप बोलत होता.....जणू काय एकमेकांच्या प्रेमातच पडलेत....हे बघून अप्पू आणि पिंकी शॉकच होतात......?




साची - अरे आता हे कधी घडलं?





अपूर्व - कदाचित ते मगाशी ओळख करून दिली त्यानंतर सगळे त्यांच्या त्यांच्यात रमले तेव्हाच हे घडलं वाटतं? 🫡




साची - बापरे! एवढ्यातच....जराही वेळ नाही लागला...गडबड आहे.... चल जाऊन बघूया....🤨




अपूर्व - अग...





साची आणि अपूर्व मागच्या खांबा जवळ लपतात आणि त्यांचं बोलण ऐकतात.....



🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️




शांती - तू कसा आहेस गणू?





गणपत - मी मस्त पण..किती वर्षानी भेटलीस तू?




शांती - असे भेटू कधी वाटलंच नव्हतं..




गणपत - हो...अजूनही तशीच आहेस ग तू....तोच गोड आवाज.....मृग्नयनी डोळे....सावळा रंग...







अपूर्व - काय?? गोड आवाज...ती बोलायला लागली कि असं वाटतं पिठाच्या गिरणीत आलोय.... आणि मृग्नयनी डोळे म्हणे, ते डोळे जे जागेवरच नसतात....




साची - 😂जाऊदे तू शांत हो... 😂





शांती - इश्श तुझा आपल काहीतरीच....आता हे सगळं बोलून फायदाच काय पण?





गणपत - कॉलेज मध्ये असताना पण मी माझं प्रेम व्यक्त केल होतच.....तू गेल्यापासून कोणत्याच पोरीशी जास्त बोलो नाही....खूप बदलून गेलो मी..





साची / अपूर्व - काय?? They are College Friends?????? 🤨and Lover's??





शांती - शुईईई हळू बोल आपले घरचे इकडेच आहेत ते ऐकतील....उगाच प्रॉब्लेम नको....





गणपत- बरोबर आहे तुझा पण...





शांती - कळतंय मला...पण आता आपले लग्न ठरली आहेत....अशावेळी माघार मला योग्य नाही वाटतं..





गणपत - ठीके मग मी माझ्या मनातल्या भावना मनातच दडवतो...




शांती - हो!!❤‍🩹 यातच आपल चांगल आहे...मला आता चांगला मुलगा नवरा म्हणून भेटलाय...त्याचे लुक्स, पर्सनॅलिटी चांगली आहे....चांगला नोकरीं आहे,..




गणपत- बॉडी नाही पण चांगली नोकरीं आणि स्वतः च बंगला आहे माझा पण...... 😶🫡





शांती - ह्म्म्म.... आता काय उपयोग....





गणपत - ठीके सोड ते सगळं.....सांग मग सध्या काय करतेस...





साची - अप्पू...चल तिकडे.... तिकडे चल....





अपूर्व - हा..




साची - हे दोघं तर लवर्स निघाले रे..ते पण कॉलेज पासून चे....मला नव्हतं वाटलं या लाजाळू च्या झाडाला इतकं बोलता ही येत.... या हड्डी ला कोण पसंद करेल असं मनात पण नव्हतं आलं माझ्या...





अपूर्व - हो ना आणि या गिरणीच्या भोंग्यावर पण कोण प्रेम करू शकत...अशक्य! पण म्हणतात ना प्रेम आंधळं असत.... 😂





साची - 😂😂





(कोणाच्या ही रूपाचा....दिसण्याचा मी तिरस्कार करत नाही आहे......चुकीचा अर्थ काढू नये...हे फक्त कथे पुरता आहे..... 🙏)





अपूर्व - ए पिंकी....एक भन्नाट प्लॅन आलाय माझ्या डोक्यात....दो हंसो कि जोडी हम. मिला दे तो?🤓





साची - काय? म्हणजे?





अपूर्व - मै तेरा हिरो ही मुवि तू बघितलेस?





साची - हो खूपदा...




अपूर्व - त्यात वरुण धवन कस त्याच प्रेम मिळवण्यासाठी आयशा च लग्न अंगद सोबत लावून देतो.....आयशा ला मुद्दाम अंगद च्या प्रेमात पाडतो....लग्न करायला भाग पाडतो.....शेवटी कस होत कि त्याचा नाव पण खराब होत नाही आणि त्याच प्रेम ही त्याला मिळत....!!
तसेच आपल्याला करायचंय......म्हणजे शांती गणपतच मिलन घडवून आणावं लागेल.....पण कोणाचाही नकळत.....थोडं प्लॅन करून.....आपल नाव ही येणार नाही.....आणि हा प्रॉब्लेम पण सुटेल....कळलं....





साची - ओह! ग्रेट प्लॅन यार....! पण ते कस करायच?





अपूर्व - हम्म सांगतोच.....
आता आपल्याला मिशन शांती गनपत = शानपत पूर्ण करायचंच आहे......😈






साची - हो मिशन शानपत स्टार्ट 😈





अपूर्व -😈





*********************


क्रमश :)


आता काय असेल या दोन माकडांचा घाव??

मोडू शकतील का लग्नाचा डाव??? 😂


कमेंट्स करा कसा वाटलं भाग? शेअर करा...
आणि वाचत रहा....
#जुळून येतील रेशीमगाठी❤️





©Pratiksha Wagoskar♪