Kimiyagaar - 32 books and stories free download online pdf in Marathi

किमयागार - 32

किमयागार -घुसखोर -
दुसऱ्या दिवशी सकाळी अल फायोममधील पाम वृक्षराजी भोवती दोन हजार शस्त्रधारी लोक जमले होते. सूर्य माथ्यावर आला त्यावेळी अंदाजे पाचशे लोक क्षितिजावर दिसू लागले. ते शांतपणे येत असले तरी त्यांच्या जवळ शस्त्रे होती. ते उत्तरेकडून ओॲसिसवर पोहोचले होते.
ते एका तंबूसमोर आले आणि त्यांनी त्यांच्या कडील तलवारी,रायफली हातात घेतल्या. आणि त्या रिकाम्या तंबूवर हल्ला केला.
ओॲसिस मधील लोकांनी वाळवंटातून आलेल्या सैनिकांना घेरले आणि एक तासाच्या आत फक्त एक माणूस सोडला तर बाकीचे घुसखोर मारले गेले होते.
ओॲसिस मधील मुलें खजुराच्या झाडांच्या मागील बाजूस होती त्यामुळे त्यांना इकडे काय घडले ते दिसले नव्हते.
स्त्रिया आपल्या तंबूत बसून आपल्या नवऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत होत्या आणि त्याना पण काही दिसले नव्हते.
मृत शरीरे पडली होती तेवढा एकच बदल सोडला तर ओॲसिसवर काही वेगळे जाणवत नव्हते.
घुसखोरांच्या नेत्याला जिवंत ठेवण्यात आले होते, त्याला प्रमुखांसमोर आणले गेले. प्रमुखांनी विचारले परंपरा सोडून ओॲसिसवर का हल्ला केला ते सांग.
तेव्हा तो म्हणाला, सर्व सैनिक उपाशी होते व तहानलेले होते आणि थकले होते त्यामुळे हल्ला केला.
हे कारण योग्य नाही असे सांगून प्रमुखांनी त्याला देहांताची शिक्षा दिली.
व त्या नेत्याला झाडावर टांगून फाशी देण्यात आली.
प्रमुखांनी तरुणाला बोलावून घेतले व त्याला पन्नास सोन्याची नाणी दिली.
आणि परत एकदा जोसेफ आणि इजिप्तची गोष्ट सांगितली व तरुणाला सांगितले की तुझी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
किमयागार - पुनर्भेट -
सूर्यास्त झाला आणि तारे दिसू लागले तेव्हा तरुण दक्षिणेकडे चालू लागला.
अखेरीस त्याला एकच तंबू असलेली जागा दिसली. तो तिथे पोचला. काही अरब तिथे होते ते त्याला म्हणाले, इथे जिनी असतात.
मुलगा तिथे वाट बघत बसला.
चंद्र माथ्यावर आला त्यावेळी किमयागार घोड्यावरुन आला. त्याच्या खांद्यावर दोन बहिरी ससाणे होते. तरुण म्हणाला मी आलो आहे.
किमयागार म्हणाला तुझे दैव तुला इथे घेऊन आले आहे. खरेतर तुला इथे यायचे नव्हते ना?.
तरुण म्हणाला, टोळी युद्धामुळे वाळवंट पार करता येत नसल्याने मी इथे थांबलोय. किमयागार घोड्यावरून उतरला व तरुणाला तंबूत येण्याचा इशारा केला .
तो तंबू इतर तंबू सारखाच होता.
तंबूत प्रवेश केल्यावर त्याला तिथे बऱ्याच शेगड्या, अलकेमी साठी लागणारी साधने दिसतील असे वाटत होते पण तेथे काही दिसले नाही.
तेथे काही पुस्तके होती , अन्न शिजवण्याची शेगडी होती. व गुढ चित्र असलेले गालिचे होते.
किमयागार म्हणाला, बस , आपण काहीतरी पिऊ आणि हे ससाणे खाऊ.
तरुणाला शंका आली की आपण जे दोन ससाणे बघितले होते तेच तर हे नाहीत ना?. किमयागाराने शेगडी पेटवली आणि हुक्क्याच्या वासापेक्षा छान वास पसरला. तरुणाने विचारले तुम्ही मला का भेटू इच्छिता. किमयागार म्हणाला, शकुनांमुळे, मला वाऱ्याने सांगितले की तू येणार आहेस आणि तुला मदत लागू शकते.
तरुण म्हणाला, वाऱ्याने माझ्याबद्दल नसेल सांगितले, एक परकिय माणूस जो इंग्रज आहे त्याच्या बद्दल सांगितलं असावे कारण तो इथे तुम्हाला भेटायला आला आहे.
किमयागार म्हणाला, त्याला आधी इतर काही कामे करावी लागणार आहेत. पण तो योग्य मार्गावर आहे. तो आता वाळवंटाला समजू लागला आहे.
आणि माझे काय?. तरुण म्हणाला.
"जेव्हा एखादा माणूस तीव्र इच्छेने काही करु इच्छितो तेव्हा वैश्विक शक्ती त्याला पूर्ण मदत करतात."
राजाचे हे शब्द तरुणाला आठवले. मुलाला लक्षात आले की ही आणि एक व्यक्ती आहे जी आपल्याला ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मदत करणार आहे.
किमयागार -किमयागाराच्या तंबूत -
तरुण म्हणाला, आता तुम्ही मला काही सांगणार आहात का?.
किमयागार म्हणाला 'नाही' तुला जेवढी माहिती पाहिजे तेवढी तुला आहे. मी तुला खजिन्याची दिशा सांगणार आहे.
तरुण म्हणाला पण युद्ध चालू आहे ना?. किमयागार म्हणाला, वाळवंटात काय चालले आहे ते मला माहिती असते.