true love books and stories free download online pdf in Marathi

खरं प्रेम

खरं प्रेम
"हॅलो फ्रेंड्स" मी विजय एक सर्व साधारण घरात राहणारा मुलगा.
माझा स्वभाव खूप शांत होता मी जास्त कोणाशी बोलत नव्हतो. शाळा सोडून मला दहा वर्ष झाले होते मी 12 वि च्या नंतर B.com त्या नंतर D.ED केल होत पण हल्लीच्या जमाण्यात गव्हर्नमेंट जॉब भेटण किती अवघड झालं तुम्हाला पण माहिती आहे आमच घर हे हायवे सारख्या ठिकाणी असल्यामुळे घरी आई बाबांच्या डोक्यात विचार आला की मुलाला कुठे कंपनी मध्ये पाठवण्यापेक्षा स्वतः चा काही तरी व्यवसाय टाकून द्यावा म्हणून माझ्या घरच्यांनी मला हॉटेल टाकून दिले.पण हॉटेल कस चालवायच एवढं नाॅलेज नव्हत मला माझा मावस भाऊ त्याच्या घरी हॉटेल होत मी 15 दिवस त्याच्या हॉटेल वर काम केलो स्वतः अनुभव घेतला काय लागत कस मॅनेज करायचं हळू हळू अशीच प्रगती होत गेली तब्बल दहा वर्षांनी माझा वर्ग मित्र श्रीराम माझ्या हॉटेल वर आला मी त्याला ओळखलं देखील नाही पण त्याने मला ओळखलं ज्या वेळी आम्ही भेटलो त्या वेळेस आम्ही खूप लहान होतो आता त्याच लग्न होऊन 2 लेकर झाली त्याला त्यात त्याच अर्ध टक्कल पडल, म्हणून तो काय मला ओळखायला आला नाही.त्यानेच स्वतःहून येऊन मला विचारलं विजय ना तू मी थोडा आश्चर्यचकित होऊन त्याच्या कडे बघितल पण तो काय मला ओळखू आला नाही शेवटी तो बोला मी श्री आपण दहावीत एकत्र शिकलो तेव्हा कुठे माझ्या लक्षात आला, मग आम्ही गप्पा मारत बसलो होतो एकमेकांना तू काय काम करतो मी काय करतो या वर चर्चा झाली मग विषय निघाला दहावीच्या सगळ्या फ्रेंड्सचा कोण कुट आहे काय करत कोणी आहे का कॉन्टॅक्टमध्ये मी म्हणल नाही. माझ्याकडे कोणाचा नंबर नाही तो म्हणला व्हाट्सअप ग्रुप दहावी बॅचचा काढला ना तुला ऍड केलं नाही का मी म्हणलं, नाही ना मग त्याने माझा घेतला आणि माझी क्लासमेंट होती शुभांगी नावाची तिला कॉल केला श्री ने माझ्या पुढे तिने काही कॉल रिसीव्ह नाही केला नंतर त्याने तिला पर्सनल मेसेज केला की हा नंबर ग्रुपला ऍड कर ग्रुप मध्ये मुली आणि मुले सगळेच होते
ग्रुप मध्ये सगळे बोलायचे, एकमेकांना मी कोणालाच बोलत नव्हतो मी फक्त मॅसेज वाचायचं रोजच पण बोलायची हिम्मत होत नव्हती कारण आपण अस मुली मुला सोबत मिळून कधी बोलल नव्हतो ना म्हणून हळू हळू बोलायला सुरुवात केली सकाळी फक्त Gm चा सगळ्या सोबत मेसेज टाकून द्यायचा आणि संध्याकाळी gn एवढंच बाकीचे मित्र खूप बोलायचे दिवस भर काय घडल सांगायचे जोक शेअर करायची असायचं मी फक्त बघायचो आमच्या ग्रुपवर सगळ्यात बडबड करणारी मुलगी शुभांगी तिच तोंड कधी बंद राहायचच नाही सारखी बडबड करायची कोणा बोलणा गेल त्याला पण जबरदस्ती बोलायला लावायची एक दिवस तिने असा मेसेज टाकला विजय फक्त मॅसेज बघतो बोलत का नाही.
दुसरे मित्र सांगायचे लाजत असेल असंच चार पाच दिवस गेले मग हळू हळू बोलायला सुरुवात केली चांगलीच ओळख झाली मग रोज नवीन नवीन गोष्टी जोक नंतर मला कळालं कि
हीच ति शुभांगी शाळेत होतो तेव्हा खूप शांत असायची कोणाला बोलायची देखिल नाही पण जेव्हा मी ग्रुप मध्ये ऍड झालो तेव्हा तर सगळ्यात जास्त हीच बडबड करणारी निघाली मला तर विश्वासच बसत नव्हता कि हीच ती मुलगी आहे का जी शांत खाली मान घालून बसणारी, तिचा स्वभाव कोणाला हि प्रेमात पाडाव असा होता ग्रुप वर सगळ्यांना हसवायची सगळ्यांना बोलायला मजबुर करायची एकदम फ्री स्वभावाची तिच्या कडे पाहून वाटायच किती हि टेन्शन फ्री असते सगळ्यांना किती हसून बोलते कॊणी काही बोल तर चिडत नाही उलट हसून गोष्टी टाळते आता मला पण हळू हळू ग्रुप वर बोलायची सवय लागली होती .