Kathanakshatrapeti - 4 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | कथानक्षत्रपेटी - 4

Featured Books
  • रॉ एजेंट सीजन 1 - 4

    सारा दिन आराम करने के बाद शाम होते ही अजय सिंह अपने दोस्त वि...

  • एक शादी ऐसी भी - 2

    बॉडीगार्ड की बात सुन जिया उस बॉडीगार्ड के साथ कोर्ट से बाहर...

  • The Book of the Secrets of Enoch.... - 2

    अध्याय 3, III1 जब हनोक ने अपके पुत्रोंको यह समाचार दिया, तब...

  • Mafiya Boss - 5

    मॉर्निंग टाइमनेहा-    रेशमा!! क्या कर रही है? उठ ना यार? कित...

  • नेहरू फाइल्स - भूल-86

    भूल-86 नेहरू और समान नागरिक संहिता (यू.सी.सी.) भारत में राज्...

Categories
Share

कथानक्षत्रपेटी - 4

.
.
.
.

4.....लावण्या sssssss
.
.
.
.
.
.
.

रवी आणि केतकी यांचे लव मॅरेज होते.
लग्नाच्या दोन वर्षानंतर वंशवेलीवर ....
....लावण्या नावाचे फुल उमललं.
लावण्याचा जन्मानंतर रवीचा बिझनेस वाढत गेला.





जसा जसा रवीचा छोटा बिजनेस मोठा मोठा होत गेला त्याला प्राणप्रिय असणारी केतकी ओल्ड फॅशन वाटायला लागली आणि मॉडर्न असलेली देविका आवडायला लागली.

रवी आणि केतकी मध्ये आता मतभेद व्हायला लागले.
त्यांची मुलगी  लावन्या आता अठरा वर्षाची झाली होती..







शोधते आई मध्ये एक मैत्रीण...
बाबांमध्ये जवळचा मित्र...
दोघेही गुंतले आपल्या भांडणातच...
जसे मी आहेच नाही मग....
मीही का कुठे गुंतू नाही??


तिला आता रोज घरी आई-वडिलांचे सूरू
असलेले भांडण दिसायचे.,.
तिला घरी राहणेच मुळी आता कटकट
वाटायला लागली.
  







रवी आणि केतकी दोघेही आपल्याच धुंदीत राहत असल्यामुळे तिच्याशी प्रेमाच्या दोन गोष्टी करण्याची दोघांनाही वेळ नव्हती.








घरी सर्व सुख सुविधा असूनही ती पूर्णपणे एकटी पडली होती.









संध्याकाळी आई-वडिलांची भांडण ऐकण्यापेक्षा ती आपल्या बेडरूमचं दार बंद करून मोबाईल चाळत राहायची.
असेच एकदा मोबाईल चाळत असतांना  तिला एक डेटिंग ॲप दिसले.








कॉलेज फ्रेंड्स कडून ती याबद्दल भरपूर ऐकून होती.
ॲप द्वारे तिने एक डेट फिक्स केली.....

पहिल्या डेटला ती घाबरत घाबरत गेली होती.






डेट करताना तो मुलगा सरळ आणि मोकळा असल्यामुळे तिची घरी होणारी मानसिक चिडचिड कमी झाली आणि त्या मुलासोबत खळखळून हसायला लागली....
तिची ती संध्याकाळ खूप मस्त गेली आणि डेटिंग बद्दल असलेली भीती दूर झाली...









आता तिला डेटिंग चा चस्का लागला .
दर दोन दिवसांनी ती अशी डेटिंग करायला जायला लागली.

रवी आणि केतकीला याबद्दल काहीही कल्पना नव्हती.







केतकीने थोडीशी संध्याकाळी जाताना किरकिर केली .
तर रवी तिला ओल्ड फॅशन म्हणून गप्प करून द्यायचा आणि लावण्याला बाहेर जाण्यासाठी मोकळीक मिळत
गेली.



लावण्या एक दिवस रात्री बारा वाजून गेले तरी 
आली नाही.. केतकी  साडेबारा वाजून गेले तरीही 
ती का आली नाही म्हणून चिंताग्रस्त होऊन हॉलमध्ये बसलेली होती.







देविका सोबत एन्जॉय करून आलेला रवी ...
घरी आल्या आल्या जेव्हा केतकीला हॉलमध्ये पाहिले.. आणि त्याचा मूड खराब झाला.
" अरे यार!!!! घरी आलं तर...हिचं तोंड दिसलं ना की
सारा मूड खराब होतो."



रवी दिसताच केतकी उभी होऊन
घाबरत त्याला म्हणाली....

"अहो!!!  अजून लावण्या घरी आलेली नाही.."









"येईल आता !!!! फक्त साडेबारा तर झाले आहे."


....असं म्हणून केतकी ला  इग्नोर करून तो बेडरूम कडे गेला...







दोघांचे मतभेद झाल्यापासून घरात त्याची जी सेपरेट बेडरूम होती तेथे जाऊन झोपी गेला.





केतकी हॉलमध्ये  बसून लावण्याची वाट पाहत होती.






काय करावे??? तिला काही कळत नव्हते??? चिंतेने ती बेजार झाली होती..






आजकाल शहरांमध्ये मुलींबद्दल वाईट वाईट ऐकायला येत असल्यामुळे तिचा जीव अधिकच घाबरला...







तिने मग वाट न पाहता आपल्या दिराला विराटला फोन केला..
तिला आता आपल्या अगदी जवळचे विराटशिवाय कोणीही वाटले नाही ....
कारण तिला तर कोणी नातेवाईक नव्हते आणि होते ते जवळचे नव्हते.






तिने विराटला फोन करून सगळे सांगितल्यावर  त्याने पटापट त्या दिशेने हालचाली केल्या....

तो ए आय यु डिपार्टमेंट ला हेड असल्यामुळे पटापट सूत्रे हलवण्यात आली आणि त्याला कळले.....
लावण्या उच्चभ्रू कॉलनीत एकवीस मजली बिल्डिंगमध्ये अकराव्या फ्लोअरवर आहे.







अकराव्या मजल्यावर फ्लॅट ची बेल पहाटे जवळपास चार वाजता वाजली.

ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....

जनरली पहाटे..
चार वाजता लोकं साखरझोपेत असतात..... पण दरवाजा  उघडल्या गेल्यावर ज्या तरुणांने तो उघडला त्याच्या डोळ्यात मात्र अजिबात झोप दिसत नव्हती......

साध्या वेशातील सर्व ....ते..दहा-बारा जण...
त्या तरुणाला बोलण्याची एकही संधी न देता घरभर पसरली...






त्यांच्यातील एका जणाने त्या तरुणाला पकडून ठेवले आणि बाकीचे सर्व.... स्वतः विराटही घरात
तपासणी करू लागला.
हॉल मधूनच जोऱ्याने आवाज दिला...
"लावण्या ssssss..."





प्रश्न त्याच्या काळजाच्या तुकड्याचा होता .
तो लावण्याचे खूपच लाड करायचा...
लाडाची होती लावण्या त्याची...






नेहमी आवाज दिल्यावर एका हाकेत बेडरूम मधून धावत पडत येणारी लावण्या.... आज एवढ्या जोराने आवाज देऊनही तिचा मागमूस लागत नव्हता.


पाच रूमचा फ्लॅट होता तो.
एकाही रूममध्ये ती आढळून आली नाही.

तेवढ्यात एक जण ओरडला..

"सsssर... या रूम मध्ये काही आढळलं आहे ... संशयास्पद वाटत आहे."
असं म्हणून त्याने हातातील ड्रिल मशीन दाखवली..
आणि पुढे म्हणाला...

"आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिल मशिन्स आहेत इथे..."








विराटचे अंतर्मन घाबरले ......
इन्वेस्टीगेशननुसार तर तो बरोबर पत्त्यावर आला होता.


त्याने ऑर्डर दिला...
" सर्व एकोण एक कोपरा शोधून काढा... फ्रिज.. कबर्ड ...सगळं असेलनसेल.. खोलत नसेल तर  तोडून टाका."






इकडे तो तरुण आतापर्यंत साळसूदपणाचा आव आणून होता.. ड्रिल मशीन आढळल्याबरोबर त्याचा चेहरा-मोहरा विकृत झालेला दिसायला लागला..






तो एकही शब्द बोलायला तयार नव्हता फक्त विक्षिप्तपणे हसत होता...

पुन्हा पटापट सर्व कामाला लागले .
लावण्या त्यांना फ्रीजरमध्ये मध्ये कोंडलेली दिसली.






ज्याला दिसली त्याने जोरात आवाज केला ...
"सsss र??"






जाऊन बघितले तर तिचे हात पाय बांधून फ्रीजरमध्ये कोंडलेले होते.
तिला पटकन बाहेर काढण्यात आले .
आणि नाडी चेक केली तर अंधुक अंधुक चालताना दिसली.






आदेशानुसार बाहेर ॲम्बुलन्स येऊनच होती.





आरोपीला  त्याने बाकीच्या ऑफिसर जवळ सोपवून दिले 
आणि तिला घेऊन धावत  ॲम्बुलन्स मध्ये बसला...







तिचे तळहात आणि तळपाय गरम व्हावे
म्हणून तो चोळत होता..







इन्वेस्टीगेशन करणाऱ्यांना त्या घरात फ्रीजरमध्ये
वेगळ्या वेगळ्या काळ्या पॉलिथिन मध्ये
कापून ठेवलेले मानवी भाग आढळले होते. 







साधा भोळा दिसणारा तो तरूण .......
असा सिरीयल किलर असेल ...हे कोणालाही समजून येणार नाही एवढा तो सरळ दिसत होता....






खूपच फास्ट झालेल्या इन्वेस्टीगेशन मुळे लावण्याचा जीव वाचला होता.... अन्यथा इतरही मुलींचे जे झाले ... तेच तिचेही झाले असते.
त्याच्या विकृत मनोवृत्तीने आतापर्यंत चार मुलींचा बळी घेतला होता ....लावण्याचा नंबर पाचवा होता.



वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे तिचा जीव वाचला.

शूद्ध आल्यानंतर लावण्याला तिची चूक समजली होती.
पण तिची तिच्या घरी जाण्याची मात्र इच्छा नव्हती.






सर्व समजल्यावर रवी आणि केतकी  हॉस्पिटलमध्ये आले .
त्यांच्या जवळ न जाता लावण्या आपल्या काका विराटसोबत त्याच्या घरी निघून गेली.


🌹🌹🌹🌹🌹✍️©️D.Vaishali