Bhaji - 2 in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | भजी - भाग 2

Featured Books
  • فرصت کے لمحات

    کہاں جا رہے ہو؟ کیا آپ کو سکون مل رہا ہے؟   کس کی یاد م...

  • نیم بسمل

    حرف آغاز بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِجب درخت سے آخر...

  • शायद उसी दिन मैं मर गया

    शायद उसी दिन मैं मर गयालगता है जैसे मेरा सपना मुकम्मल हो गया...

  • Safar e Raigah - 19

    منظر ۔آیت نے دھیرے سے اپنے کمرے کا دروازہ کھولا اور اندر داخ...

  • والدین کے فرائض

    والدین کے فرائضتحریر۔شاہد شکیلوالدین اور اولاد کا رشتہ محض خ...

Categories
Share

भजी - भाग 2

🎋भजी 🎋🎋भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता  पदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत  !!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..😃🎋पावसाळी  हवामानात भजी खाणे म्हणजे भन्नाट अनुभव!!!!जो प्रत्येक जण घरी किंवा बाहेर घेतोच 😋 🎋नाव वेगळे असेल पण भारतभर मिळणारा प्रकार आहे हा. !!!साउथला बोंडा म्हणतील, नॉर्थला पकोडे म्हणतील पण भजी असतीलच. 🎋भज्याचे पीठ म्हणजे भज्याची जान जान सलामत तर भजी पचास..😀 असे म्हणायला हरकत नाही

आम्हा भावंडांचे भजी करायचे स्वयपाक घरातले प्रयोग कधी कधी असायचे पण ते आईला समजायचेच .. आणि आईचा  लटका राग झेलायला लागायचा  शेवटी राहिलेल्या पिठाचेआईला पिठले करायला लागायचे.😀 🎋कांद्याचे बारीक चौकोनी तुकडे करून आमची आई  खुप मस्त भजी करीत असे तेव्हा ती त्यात काय घालत असे वगैरे काही आम्हाला समजत नसे पण घरी येणाऱ्या प्रत्येकाची फर्माईश असे ..“आईच्या हातची भजी हवी ...अशी ..😋🎋साध्या नुसत्या गव्हाच्या पिठाची पण ती तिखट मीठ ओवा घालून भजी मस्त करत असे . 🎋 आणखी एक भजी प्रकार माझी मावशी करीत असे कदाचित तिखट नसल्याने त्याला भजी नाही म्हणता येणार ती रव्यामध्ये दही दुध गुळ आणि सोडा घालून भजी करे .त्याला ती बोंडे म्हणत असे हि लुसलुशीत खमंग गोड बोंडे मस्त असत ही बोंडे तळताना त्याचा घरभर खमंग वास सुटत असेजो येणाऱ्या जाणाऱ्याला बेचैन करून सोडत असे 😀 🎋पंजाब-हिमाचल मधलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे "पनीर पकोडा"...! पनीरच्या इंचभर रुंच पट्ट्या कापून त्यांचे अर्धा सेंमी जाड तुकडे करायचे... अशा दोन तुकड्यांमधे हिरवी मिरची, मीठ, जिरेपूड, किंचित पुदीना, थोडंसं आमचूर यांची पेस्ट लावून  ते आपसात चिकटवायचे..... आणि बेसनात भिजवून कुरकुरीत पकोडे तळायचे..... कुरकुरीतपणासाठी बेसनात थोडं मैद्याचं पीठ घालायचं  आत लुसलुशीत पनीर आणि वरून बेसनाचं कुरकुरीत आवरण... अप्रतिम चव लागते 😋🎋राजस्थानला मोठ्या जाड मिरच्या मध्ये फोडून आत लालभडक तिखट घातलेले बटाट्याचे सारण भरून भरपुर तिखट घातलेल्या अशा बेसन पिठात केलेली भजी अप्रतिम असतात अगदी रस्त्यावर सुध्दा अशी भजी मिळतात .खाताना ..हाय... हाय ....होते नाका तोंडातून पाण्याच्या धारा लागतात कानातून वाफा निघतात ..अक्षरश ब्रम्हांड आठवते पण तीही एक अनुभव घ्यायची गोष्ट आहे ....!!❤️🎋कांदा भजीची खास कोल्हापुरी पद्धत म्हणजेभरपूर कांदा ,बारीक चिरलेली  कोथिंबीर  व मिरची पावडर  नाममात्र हळद , मीठ,भरडधने व डाळीचे पिठयात कोणताही मसाला न वापरता सोडा सुध्दा न टाकता.mथोडासा  पाण्याचा हबका मारून भजी पिठ तयार करतात.सोबत गवती चहाची  पाने घातेलेला चहा ..जबरदस्त. कॉम्बो असते हे...,😋 🎋 कोल्हापूरला पन्हाळ्याला “खेकडा भजी” मिळतात नवल वाटल न नाव ऐकून .यासाठी  मोठा कांदा घेतला जातो  कांदा सोलुन  दोन तुकडे करतात व वरचा पांढरा घट्ट भाग काढून टाकतात. व उभा बारीक पण उभाच चिरतात .त्यात बिना मसाल्याचे तिखट मीठ व भरड डाळीचे पिठ (विकतचे बेसन नाही.)  त्या कांदा वर टाकतात  हाताने कालवून झाकूनठेवतात पाच दहा  मिनिटांत त्याला पाणी सुटते . हातात घेऊन हलक्या हाताने तेलात भजी सोडतात  लांब लांब कांदा चिरल्याने आकार थोडासा खेकड्या सारखा  वाटतो.ही भजी अतीशय कुरकुरीत व चवदार होतात 😋 🎋भज्याचे जाडसर तिखट पीठ पावाच्या स्लाईस वर थापून तळुन केलेली भजी म्हणजे "ब्रेड पकोडे"कोल्हापुरात प्रत्येक चहाच्या गाडी वर अशी भजी मिळतात .त्यांचा घाणा काढला की लगेच अगदी “फडशा “पडतो  या भज्यांचा ..😋🎋कोकणात एकदा तर मी चक्क हापूस आंब्याच्या फोडी ची भजी खाल्ली होती .वरून मिरची वाटण लावलेले पीठ ..आणि आत गोड स्वादिष्ट आंब्याच्या फोडी ,..अहाहा ..हा प्रकार पुन्हा नाही खाल्ला . 🎋 ब्रेडची मध्ये बटाटा भाजीचे सारणभरुन सँडविच भजी पण केली जातात .लहान मुलाना ब्रेड खुप आवडतो .. दोन ब्रेडच्या लुसलुशीत तुकड्या मध्ये बटाटा सारण लावूनडाळीच्या आणि मैद्याच्या पिठात तळली की बच्चे कंपनी एकदम खुश ..!!! 🎋  मला आठवत कॉलेज मध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीची आई भज्याची आमटी करीत असे दुपारी कॉलेज सुटले की आम्ही आवर्जून पावसाळी दिवसात तिच्या घरी जेवायला जात असू .त्या दुपारच्या जेवणाच्या तिच्या वेळी आईने खमंग आमटी फोडणीला टाकलेली असे .आणि कांदा बारीक चिरून त्याची केलेली भजी ती शेवटी त्या आमटी मध्ये सोडून पातेले खाली उतरवत असे .मग ती भज्याची आमटी आणि ताजी गरम ज्वारीची भाकरी खात खात आमचे डोळे पेंगायला लागत मग दुपारची झोप तिच्या कडे काढून मगच आम्ही घरी परतत असु,,अशी ही खमंग भज्यांची “खमंग “कहाणी !!