Operation Sindoor - 8 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | ऑपरेशन सिंदूर - भाग 8

Featured Books
  • बड़े दिल वाला - भाग - 5

    अभी तक आपने पढ़ा कि अनन्या वीर के पत्र को पढ़कर भावुक हो गई औ...

  • Age Doesn't Matter in Love - 24

    आन्या कमरे में थी ।   आन्या ने रेड कलर का लहंगा पहना हुआ था...

  • मझधार

      प्रेमी युगल अपने-अपने घरों में करवटें बदल रहे थे, नींद किस...

  • The Book of the Secrets of Enoch.... - 5

    अध्याय 22, XXII1 दसवें स्वर्ग पर, {जिसे अरावोथ (Aravoth) कहा...

  • रामेसर की दादी

    रामेसर अब गाँव का भोला-सा लड़का नहीं रहा। समय ने उसे माँजा,...

Categories
Share

ऑपरेशन सिंदूर - भाग 8

          
         रुकसारच्या वडिलानं कारगीलचं युद्ध लढलं होतं. त्यात त्यांना फार अनुभव आला होता. शत्रुंशी लढता लढता तिच्या वडिलांना वीरमरण आलं होतं. त्याचा रागही तिच्या मनात होता. विचार होता की जर भारतीय चौक्या पाकिस्तानी लष्करानं घेतल्या नसत्या तर........ तर कदाचीत माझे वडीलही मृत्यू पावले नसते. हे शल्य तिला जाणवत होतं. तसाच पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचाही तिला राग होताच. त्यांचं तिला परेशान करणं आठवतच होतं तिला. वाटत होतं की केव्हा केव्हा मी सैन्यात जाते व केव्हा केव्हा मला युद्धात संधी मिळते व केव्हा केव्हा मी माझ्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेतेय. 
          तिचा तो विचार. त्या विचारानुसार रुकसारची जी मैत्रीण होती. तिच्या पतीला पहलगाम घटनेत मारुन टाकलं होतं. ते तिलाही माहित झालं होतं. त्याही तात्कालिक कारणाचा राग तिच्या मनात धुमसतच होता. अशातच तिच्या समोर नामी संधी चालून आली व सत्ताधीशांनी तिला ऑपरेशन सिंदूर बाबत विचारताच तिनं सहजच होकार दिला. 
          ऑपरेशन सिंदूर झालं होतं. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेला लगतच असलेली काही दहशतवादी ठिकाणे नष्ट झाली होती. ती ठिकाणे भारतानं एका रात्री केलेल्या कारवाईत नष्ट केली होती. अशातच ती घटना पाकिस्तानला माहित झाली. त्यानंतर पाकिस्तान चिडलं व नेहमीच्या सवयीप्रमाणे भारतावर ते हल्ले करु लागलं. भारतानंही प्रत्युत्तरात त्यांचे ड्रोनहल्ले परतावून लावले. शेवटी मिसाईलचा मारा पाकिस्ताननं केला. तोही मारा भारतानं परतावून लावला होता. 
          भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याला उत्तर दिल्याबद्दल चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोनहल्ले केले. जणू ड्रोनची टोलधाडच पाकिस्तानने भारतावर पाठवली. मात्र भारतीय संरक्षण विभागानं त्यांना चौथे आसमान दाखवले. त्यात जम्मू काश्मीरसह श्रीनगरमधील विमानतळ, पंजाबमधील काही भाग, राजस्थानमधील जैसलमेर यांचा समावेश होता. मात्र हे सर्व ड्रोनहल्ले भारताने केवळ परतावूनच लावले नाही तर या ड्रोनाला हवेतील हवेतच संपवले. तणावाची स्थिती पाहता भारताने या भागातील काही भागात ब्लॅकआऊट केले. भोंगेही वाजवले. 
          तो जम्मू काश्मीरचा भाग. त्या भागात काही ठिकाणी अनेक स्फोटाचे आवाज ऐकायला आले होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर भरपूर गोळीबार झाला होता. मात्र भारतीय सैन्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यापुर्वी भारतीय संरक्षण विभागाने जम्मू विमानतळासह जम्मूच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून डागण्यात आलेली सुमारे आठ क्षेपणास्त्रे नष्ट केली. त्यातच सीमेवरील किमान ३६ ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले. तेही भारतीय लष्कर व संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. एवढंच नाही तर पाकिस्तानने एका रात्री तीनशे ते चारशे ड्रोनहल्ल्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक ड्रोन हे तुर्की बनावटीचे होते. तेही ड्रोन भारतानं विफल करुन टाकले होते. 
         लष्कर व परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जी बैठक पार पडली. त्यात ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली होती. यामुळंच पाकिस्तानच्या कुरापती उघड झाल्या होत्या. पाकिस्ताननं वापरलेलं असिगार्ड सॉन्गर हे ड्रोन तुर्कस्थानचे होते. गुप्तचर यंत्रणा व हवाई संरक्षण याबाबत माहिती मिळविणे हा या ड्रोनचा उद्देश होता. हे सर्व ड्रोन भारतीय सैन्याने उध्वस्त केले. 
          ऑपरेशन सिंदूरनं चिडचिड झालेला पाकिस्तान. त्यानं नियंत्रण रेषेवर बरेच दिवस गोलाबारी सुरु केली होती. त्यात काही भारतीय सैनिक जखमी झाले तर काही शहीदही होत होते. परंतु भारतीय सैनिक घाबरले नाहीत. ते पाकिस्तानच्या गोलाबारीला जोरदार प्रत्युत्तर देत होते. 
         भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यात सात दहशतवाद्यांना भारतानं मारुन टाकलं होतं. एक पाकिस्तानी चौकीही भारतानं उध्वस्त करुन टाकली होती. सांबा जिल्ह्यात देखरेख भारतीय सैनिकांना दहशतवाद्यांचा एक मोठा समूह दिसला. 
        ते घुसखोरच होते की ज्यांच्यामुळे भारत त्रस्त होता. जी घटना या घुसखोरांनी १९९८ ला घडवून आणली होती. त्याच घटनेसमान ऑपरेशन सिंदूर ही देखील घटना होती. श्रीनगर विमानतळ, दक्षिण काश्मिरातील अवंतिपोरा हवाई तळावर झालेला हल्ला देखील भारतीय जवानांनी परतावून लावला होता. जम्मू सांबा व पठाणकोट, बारामुल्ला या भागातही भारतीय सैनिकांना ड्रोन दिसले. त्याही ड्रोनांना भारतीय सैनिकांनी भुईसपाट केले. पंजाबमधील उधमपूर आणि नगरकोटा येथेही ड्रोनद्वारे पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रकार केला. तसेच रामगड व सुचेतगड येथेही पाकिस्ताननं जोरदार गोळीबार केला.       
          पाकिस्ताननं केलेला गोळीबार. त्या गोळीबारात जम्मू काश्मीरच्या पुछ जिल्ह्यात दोन नागरिक मरण पावले तर तीन नागरिक जखमीही झाले होते. तसेच उरी प्रांतात एक महिला याच गोळीबारात मरण पावली होती. तिच्या कुटूंबातील दोन जण जखमी झाले होते. 
          भारतीय सेनेने केलेला ऑपरेशन सिंदूर. त्याची तीव्रता एवढी होती की त्याची पाकिस्ताननं धास्ती घेतली होती. धास्तावलेल्या पाकिस्ताननं प्रवासी व सामान्य नागरिकांना ढाल बनवले. तसेच त्यांचा वापर ढाल म्हणून करायला सुरुवात केली होती. त्यातच पाकिस्ताननं आपल्या लढाऊ विमानावर भारतीय सेनेनं हमले करु नये म्हणून प्रवासी विमानं आपल्या लढाऊ विमानाच्याच दिशेनं सोडण्याचे प्रयत्न सुरु केले. याचाच अर्थ असा होता की प्रवासी विमानावर भारतीय सेना हमला करणार नाही. ज्यातून आपली लडाकू विमाने भारतीय सरहद्दीत शिरतील व भारतीय शहरावर व्यवस्थितरितीनं हमले करता येवून ती शहरे नेस्तनाबूत करता येतील. ज्यातून ऑपरेशन सिंदूरचा अगदी सहज बदला घेता येईल. अन् हमला केलाच तर भारताची निंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाईल. हे पाकिस्तान जाणून होता.
         भारतीय सेनेला हे माहित होताच सेनेचे अधिकारी विचारात पडले होते. त्यावर चर्चा करण्यात आली व चर्चेअंती त्यावर उपाय काढण्यात आला. आपण आपले हवाई क्षेत्रच बंद करायचे. त्यानंतर भारतानं आपले हवाई क्षेत्रच बंद करुन टाकले. 
          भारत पाकिस्तानचा हा तणाव. यामुळं त्याचा परिणाम साहजीकच विमान सेवेवर झाला होता. विमानात चढण्यापुर्वी प्रवाशांची वारंवार तपासणी होवू लागली. त्या तपासण्या अनिवार्य करण्यात आल्या होत्या. 
         ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून झालेला गोळीबार. त्याला येणारा खर्च. तो खर्च अरबो व खरबो रुपयातच होता. पाकिस्तानजवळ तेवढा पैसा नव्हता. त्यामुळं त्यानं त्यावर उपाय म्हणून आय एम एफला कर्ज मागीतले होते. परंतु युद्धाचा नाद सोडला नव्हता. जो खुळा नाद होताच. 
         पाकिस्तानला आंतकवाद्यांशी काही घेणंदेणं नव्हतं. परंतु पाकिस्तान आंतकवाद्यांना पोषत असे. त्याचं कारण होतं अल्ला. त्यांचं कुराण काही निरपराध माणसांचा बळी घ्या म्हणत नव्हते. मात्र ते अल्लाला मानत. त्या अल्लाशिवाय दुसरा कोणताच व्यक्ती मोठा नाही असंच त्यांना रोजच्या नमाजात शिकवलं जात असे. तसेच ते रमजानच्या महिन्यात रोजा ठेवत. रोजा हा भारतीय नवरात्रासारखा उपवासाचा एक प्रकार नव्हता तर तो शरीराला काटक बनविण्याचा एक प्रकार होता. खलिफा सांगत असे की जगात फक्त एका अल्लाचंच राज्य असावं. इतर कुणाचं नसावं. ना या देशात हिंदू असावेत, ना ख्रिश्चन. फक्त अल्लाच असावा. कारण हे जग अल्लाचंच आहे. यासाठीच त्यांचा प्रयत्न होता. ते आपल्या प्रार्थनेतच याचा उल्लेख करत असत. 
          सोनगर ड्रोन हे तुर्की बनावटीचे होते. पाकिस्ताननं भारतावर जे तीनशे ते चारशे ड्रोन हल्ले केले होते. त्यातील सोनगर नावाचे ड्रोन हे तुर्की बनावटीचे होते. हे रुकसारला माहित होतं. तशी तिनं त्याची माहिती पत्रकारांनाही दिली होती. सोनगर हे तुर्कस्तानच्या अंकारा शहरातून आणले होते. ते तुर्कांनी स्वतः विकसित केले होते. ते सशस्त्र ड्रोन होते. त्यात हवेतून जमिनीवर मारा करणे व पाहणी करण्याची क्षमता होती. हे सोनगर ड्रोन असिसगार्ड या कंपनीने बनवले होते. त्यातच ते ड्रोन तुर्कस्ताननं पाकिस्तानला निर्यात केले होते. हे सोनगर पंचेचाळीस किलो वजनाचे होते. तशीच त्यात नऊ किलो भारवहन क्षमता होती. त्यांची लांबी एकशे चाळीस ते पंचेचाळीस मीटर होती. उड्डाण क्षमता पंचवीस मिनीट होती. समुद्रापासून तीन हजार तर जमिनीपासून तीनशे मीटर होती. त्यातच त्याचा पल्ला तीन ते पाच किलोमीटर होता. सोनगर हे ड्रोन उणे वीस अंश ते पन्नास अंश तापमानात काम करु शकत होते. 
         काही ड्रोन हे चीन बनावटीचे होते. ते काही कामात आले नाही. जास्त दिवस संग्रहीत करुन ठेवल्याने त्यांची कार्य करण्याची क्षमता नष्ट झाली होती. 
         ऑपरेशन सिंदूर, भारत पाकिस्तान ड्रोनहल्ले. आमचा काही संबंध नाही. असं म्हणत अमेरिकेनंही आपलं अंग झटकून टाकलं होतं. अमेरिका म्हणत होतं की जिथे दहशतवाद असेल, तिथे भारत कारवाई करणारच. कारण ज्यांची अंगार झाली, तो ओरडणारच. ते खरंही होतं. कारण काय गरज होती, हिंदू म्हणून आंतकवाद्यांनी विचारायची. काय गरज होत, हिंदू सांगताच त्यांची हत्या करण्याची? काय गरज होती मुस्लीम आहो असं सांगताच त्यांना खरंच मुस्लीम आहे की काय? ही ओळख पटवून घेण्यासाठी कलमा पठन करायला लावण्याची? ज्यावर भारतानं फक्त ऑपरेशन सिंदूर अंतर्गत फक्त दहशतवादीच ठाणी नष्ट केली. त्यावर पाकिस्ताननं चिडून जायची गरज नव्हती. तरीही पाकिस्तान चिडलं व त्यांनी ड्रोनहल्ल्याला सुरुवात केली. याचाच अर्थ त्यांचं आतंकवाद्यांना सहकार्य होतं. ते एका आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान दिसलं. पाकिस्तानी सरकार एका आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत हगर होतं.
          अमेरिकन देश हा भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही शस्र खाली ठेवण्यास सांगू शकत नव्हता. त्याचं कारण होतं, त्यांनाही दहशतवादाची झळ पोहोचणं. गतकाळात त्यांच्यावरही असाच दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता व वाशिंग्टन टॉवर उडवलं गेलं होतं. त्यामुळंच त्यांनीही पाकिस्तानच्या अबटाबाद इथे कारवाई करुन लादेनला पकडून आपल्या देशातील हल्ल्याचा बदला घेतला होता. पुढं लादेनला अख्खं संपवून टाकलं होतं.
         पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचं संगोपन करणारा देश आहे. हे एकप्रकारे सिद्ध झालं होतं. ज्यातून ऑपरेशन सिंदूर घडलं. पाकिस्तान आणि भारताच्या ड्रोनहल्ल्यासंदर्भात बोलतांना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॉन्स यांनी फॉक्स या वृत्तवाहिणीच्या मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं की कोणत्याही अन्वस्रशक्तीत संघर्ष झालाच तर ती चिंतेची बाब असते. भारत आणि पाकिस्तान यामध्ये जो तणाव आहे. त्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. दोन्ही देशांना संघर्ष चिघळू न देण्याचा सल्ला तेवढा आम्ही देवू शकतो. मात्र युद्धस्थिती निर्माण झालीच तर आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नसेल. कारण ती अमेरिकेच्या नियंत्रणाबाहेरील बाब असेल. अणूयुद्ध होवू नये थासाठी दोन्ही देशांतील जबाबदार व्यक्तींनी काळजी घ्यावी. कारण अणूयुद्धाचे परिणाम हे गंभीर होत असतात. 
           भारताचंही याबाबतीत धोरण तेच होतं. पहलगाम हल्ल्यासारखी नीच आणि राक्षसी कृती करणाऱ्यांना धडा शिकविणे हे आमची प्राथमिकता असून आमचे युद्ध हे दहशतवाद्यांशी आहे. जगातील कोणत्याही भागात दहशतवाद्यांनी मुक्त विहार करु नये. हे आमचे धोरण आहे. असे मत अमेरिकेतील भारताचे राजदूत क्वात्रा यांनी मांडले होते. 
          भारतावर होणारे ड्रोनहल्ले. त्याचं प्रतिउत्तर देणारा भारत. संघर्ष वाढत चालला होता. वाटत होतं की याचं रुपांतर अणूयुद्धात होणार की काय? चिंता आणि वेदना. याच संघर्षात फसलेला भारत. युद्ध व ड्रोनहल्ले वाढतच चालले होते व भारताचं त्यावर प्रत्युत्तर देणंही तेवढंच सुरु होतं. अशातच अमेरिकेनं विचार केला. विचार केला की कदाचीत युद्ध वाढलंच तर त्याची परियंती अणूयुद्धात होईल. मग आपण जसा जपानच्या हिरोशिमा व नागासाकीवर अणूबाँब टाकला होता. त्याचे परिणाम जपानला जे आजही भोगावे लागत आहेत. तेच परिणाम भारत व पाकिस्तानला उद्या भोगावे लागतील. होवू शकते रागारागात तेही होईल. याचाच विचार करुन अमेरिकेनं यात मध्यस्थांची भुमिका पार पाडायचा विचार केला होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्माण झालेला वाद शांत करण्यासाठी. 
         पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देतांना ऑपरेशन सिंदूर घडलं. ज्यातून पाकिस्ताननं ड्रोनहल्ले केले. त्यातच युद्ध होवू नये म्हणून अमेरिकेनं मध्यस्थी केली व युद्धविराम झाला. त्यापुर्वी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मोहिम राबविल्याने चिडलेल्या पाकिस्ताननं जी गोलाबारी केली. त्यास प्रत्युत्तर देत असतांना भारतानं पाकिस्तानचे अनेक हवाई अड्डे नेस्तनाबूत केले. लाहोरमधील क्षेपणास्त्र प्रणाली उध्वस्त केली. ड्रोनहल्ले सुरु असतांना नवनवीन कट पाकिस्ताननं आखले. त्यातच भारतानं पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्ताननं शेवटी भारताशी संवाद साधून संघर्ष थांबविण्याची कळकळीची विनंती केली. त्यानंतर भारताने त्यांची विनंती मान्य केली व संघर्षविरामाची घोषणा केली. 
          भारतानं म्हटल्याप्रमाणेच संघर्षविराम केला. तसा काही काळ पाकिस्तान चूप बसला. परंतु काही काळानंतर पाकिस्ताननं पुन्हा संघर्षविराम संघर्षाचा करार तोडला व त्यानं बदामी बाग कॅन्टोन्मेंट येथे तसेच बारामुल्ला येथे ड्रोनहल्ले केले. जे भारताला टेहळणी करीत असतांना आढळले. ते ड्रोन भारतानं यशस्वीरित्या पाडले. त्यानंतर पुन्हा जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला, कथुआ, श्रीनगर इथे ब्लॅकआऊट केले गेले. 
         भारतानं ज्यावेळेस युद्धबंदी केली होती. त्यावेळेस अमेरिकेनं भारत व पाकिस्तानचे कौतुक केले होते. परंतु संघर्षविरामचा करार रद्दबादल ठरवून पाकिस्ताननं बारामुल्लावर केलेला ड्रोन हल्ला म्हणजे संघर्ष विरामचं सूचक होतं. त्यावरुन पाकिस्तान, आम्ही संघर्ष विराम केलेला नाही. याची सूचना देत होतं. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर, मेंधर, आर. एस. पुरा, चांब, भिंबेर आणि गुरेझ क्षेत्रासह श्रीनगर येथेही स्फोटकाचे आवाज येत होते.
          पाकिस्ताननं जरी जम्मू-काश्मीरमध्ये संघर्ष विरामाचे उल्लंघन करुन स्फोटके डागली असली तरी संघर्ष विराम झाला होता. कारण संघर्ष विराम संधीचं पाकिस्ताननं उल्लंघन करताच भारतानं पाकिस्तानला ताकीद देताच पाकिस्तान चूप बसला होता व संघर्षाला पुर्णतः विराम लागला होता. 
           संघर्ष विराम झाला होता. त्याचा आनंद रुकसार व सपनालाही झाला होता. मात्र एक खंत आजही रुकसारच्या मनात जीवंत होती. त्या सव्वीस महिलांचे कुंकू पुसले गेले होते. त्या स्रियांच्या वैधव्याची. त्यातील सहा दांपत्य महाराष्ट्रातील होते. काही नक्कीच तरुण होते. 
          रुकसारला दुःख वाटत होतं, तिच्यासोबत शिकलेल्या तिच्या मैत्रीणीचं. बिचारीचं नुकतंच लग्न झालं होतं व तिच्या हाताची मेहंदीही सुकलेली नव्हती. तिचं जेव्हा शुभमंगल झालं आणि हनीमूनसाठी ती काश्मीर फिरायला गेली.
 त्यातच पहलमागला गेली असता तिचं कुंकू पुसलं गेलं होतं.
         संघर्ष विराम झाला होता. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं होतं. आज त्या घटनेला बरेच दिवस झाले होते. सपना आणि रुकसार आपआपल्या नोकरीतून निवृत्त झाल्या होत्या. त्या निवृत्तीनंतर आपल्या आपल्या संसारात रममाण झाल्या होत्या. तरीही कधीकधी सपना रुकसारला भेटायला जात असे. कधी रुकसार सपनाला भेटायला येत असे. तेव्हा दोघींमध्ये चर्चा होत, हिंदू मुसलमान संघर्षाबद्दल. त्यातच ऑपरेशन सिंदूरच्या आठवणीही ताज्या होत. परंतु कधीच रुकसारला सपनाबद्दल असुया वाटत नव्हती, ना सपनाला रुकसारचा राग येत असे. कधीकधी रुकसार आपली मैत्रीण सारिका, जी पहलगामच्या घटनेत विधवा झाली होती. तिनं आपला दुसरा विवाह केला होता. जो तिच्याच सासूसासऱ्यांनी करुन दिला होता. रुकसार तिच्याही घरी जात असे. तेव्हा ती रुकसारला बिलगून रडत असे. म्हणत असे,
         "काश! देवानं हिंदू मुसलमान बिरादरी बनवली नसती तर.... तर माझं कुंकू पुसलं गेलं नसतं. रुकसार, मला तर कुंकू तरी मिळालं. परंतु त्या माझ्या गत सासू सासऱ्यांना काहीच मिळालं नाही. बिचाऱ्यांचा एकुलता एक मुलगा पहलगाममध्ये विनाकारण मारला गेला. वाटत होतं की मी कधीच विवाह करु नये. परंतु माझ्यापुढे उभं आयुष्य होतं. उभा संसार होता. मी तसा प्रयत्न केलाही. परंतु ते माझे सासूसासरे म्हणजे देवच. त्यांनीच जबरदस्तीनं माझा विवाह करुन दिला व म्हटलं की दिल्या घरी सुखी राहा. तू पुन्हा इकडे येवू नकोस. आमचा आशिर्वाद आहे तुला. मी आजही त्यांच्या आशिर्वादानं सुखी आहे. कधीकधी मी त्यांच्याकडे जात असते. तेही येतात. परंतु आईवडील म्हणून येतात. सासूसासरे म्हणून नाही." ते सारिकाचं बोलणं. ते बोलणं संपलं होतं. परंतु ते बोलणं गतकाळातील ऑपरेशन सिंदूरला व पहलगामच्या घटनेला उजाळा देत होतं.
******************************************