satkrm in Marathi Motivational Stories by Trupti Deo books and stories PDF | सत्कर्म

Featured Books
  • ایک لمحے کا یہ سفر

    یہ سفر صرف ایک لمحے کا ہے۔   یہ میرے ساتھی کے ساتھ صرف...

  • Purasra Kitab - 4 - Last Part

    چھ دوست جو گھر سے گھومنے اور انجوائے کرنے کے ارادے سے نکلے ت...

  • Purasra Kitab - 3

    یہ لسی رات آئی تھی اُن دوستوں کی زندگی میں… شاید کالی رات اس...

  • Purasra Kitab - 2

    چھ دوست تھے: رونی، عائشہ، ودیشا، ارینا، کبیر اور ہیمنت۔ یہ س...

  • Purasra Kitab - 1

    جیسا کہ آپ جانتے ہیں ہر انسان کا ایک پَیشن ہوتا ہے کسی کو کہ...

Categories
Share

सत्कर्म

"आई, या पपईच्या बिया कशा फेकून देत असतेस? यांच्यापासून तर पुन्हा झाड होऊ शकतं ना?" — आठ वर्षांचा अर्णव प्रश्नार्थक डोळ्यांनी माझ्याकडे पाहात होता. हातात त्याच्या फळांच्या वाटीत काही पपईचे ताज्या बिया होत्या, आणि चेहऱ्यावर एक निरागस कुतूहल.

 लहानसा अर्णव
निसर्गा वरती खूप प्रेम करतो. निसर्गाची काळजी कशी करायची. प्रश्न त्याच्या मनात नेहमीच राहायचं.. आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांची आजी नेहमी त्याला द्यायची. फोन कदाचित त्याचे निसर्ग वरती खूप प्रेम होतं.

मी क्षणभर थबकले. रोजच्या सवयीने पपईचे साले आणि बिया थेट कचऱ्याच्या पिशवीत टाकणारी मी, त्या छोट्या मुलाच्या तोंडून आलेल्या त्या प्रश्नाने थोडीशी मनात कुबुजली.

"हो रे राजा, झाडं होऊ शकतात त्यांच्यापासून..." मी त्याला जवळ घेत उत्तर दिलं.

"मग आपण लावूया ना झाडं! आंबा, जांभूळ, चिकू, सीताफळ, आणि ही पपई! आपण खाल्लं त्यातूनच बी वाचवायची आणि ती लावायची!" — त्याची डोळ्यातली चमक वेगळीच होती. त्याच्या त्या उत्साहाला मी नकार देऊच शकले नाही.

 पण आपल्या गच्चीमध्ये मोठे झाड आपण लावू शकत नाही.मोठी झाडं गच्चीत लावता येत नाहीत ना. त्यांच्या मुळांना मोकळं माती हवी, मोकळा श्वास हवे."
मी उत्तर दिलं, पण त्याच्या नजरेत समाधान नव्हतं.

त्या दिवशी त्यानें माझा धरला हातात हातात धरून जुना बिया साठवायचं डब्बा दाखवलं. त्या डब्ब्यात आम, जांभूळ, सीताफळ, पेरू, पपई, चिकू अशा अनेक बिया आपण साठवून ठेवू.

मग या बिया नर्सरीत देऊन टाकायच्या , किंवा सकाळच्या फेरफटक्यावर आजूबाजूच्या जंगलवजा मोकळ्या माळांमध्ये पेरते. कुठे तरी त्या उगम पावतात. आपली ओळख नसते, पण सावली मात्र कुणालाही नाकारत नाहीत!"

अर्णवने त्या दिवशी काहीही बोलला नाही. पण दुसऱ्या आठवड्यात, मला न सांगता तो पिशवीत बिया घेऊन शेजारच्या डोंगरावर गेला होता.

"आई, मी ही बिया पेरल्या. उद्या मी मोठा झालो की, या झाडांना भेटायला येईन."

त्या एका ओळीत मला समजलं – मी त्याला घरात झाड लावायला शिकवलं नाही, पण त्याच्या मनात सत्कर्माचं एक झाड नक्कीच रुजवलंय.


त्या दिवशीपासून आपल्या छोट्याशा गच्चीवर आमचं एक छोटं बी-बचाव मोहिम केंद्र सुरू झालं. प्रत्येक वेळी फळं खाताना बिया वेगळ्या करत होतो. काही कोरड्या करून ठेवत होतो, तर काही लागेल तशी मातीत पेरून देत होतो.



प्रत्येक अंकुर हे आमच्यासाठी एक नवं चैतन्य ठरत होतं. एखाद्या पानाने डोकं वर काढलं की अर्णवची उत्सुकता तुडुंब भरून यायची – "आई बघ! आपल्या पपईचं झाड उगवलं!"

त्याचे हे बालसदृश प्रयत्न बघून माझं मन एक वेगळंच समाधान अनुभवत होतं. 


मी शिकले होते की "सत्कर्मं" म्हणजे कोणाला अन्न द्यायचं, कपडे द्यायचे, गरजूंना मदत करायची – पण या छोट्या हातांनी मला शिकवलं की निसर्गासाठी केलं जाणारं कोणतंही कार्य, तेवढंच पवित्र असतं.

एकदा शाळेतून परतल्यावर अर्णव म्हणाला,
"आई, माझ्या बेंचवरचा मयूर म्हणाला की बिया लावून काय उपयोग? झाडं लावायला सरकार आहे ना!"

मी हसले आणि म्हटलं, "हो रे, सरकार आहे... पण झाडं लावताना प्रेम, चिकाटी, आणि काळजी लागते. ती कोणत्याही यंत्रणेला नाही जमत. ते माणसाला जमतं – आणि माणूस म्हणूनच आपल्याला ते करावं लागतं."

त्या दिवशी अर्णवने आपलं नवं स्वप्न जाहीर केलं – "मी मोठा झाल्यावर बी-बॅंकेचं मोठं गार्डन करणार! जिथे लोकं फळं खाऊन बी टाकतील आणि दुसरे लोकं तिथून रोपं घेऊन जातील!
 बाळा तू खूप मोठ्या सत्कर्मचा काम केलं म्हणजे काय ग!आई?"सत्कर्म म्हणजे मोठं मोठं काही करायचंच असं नाही रे. कोणाला अन्न द्यावं, एखाद्याला मदत करावी, किंवा एखादी बी सुद्धा मातीमध्ये लावावी — हे सगळं सत्कर्मच असतं."


"सत्कर्म मोठं असायला लागत नाही,
बी लावण्याइतपत छोटंसं असलं तरीही
ते जग बदलू शकतं!"



त्याचा तो कल्पक विचार म्हणजे नव्या पिढीचा सत्कर्माकडे असलेला टप्पा होता. मला वाटलं, जर प्रत्येक घरात असा एक अर्णव असेल, आणि प्रत्येक घराच्या गच्चीत असा छोटा बियांचा प्रयोग असेल, तर शहरंही हिरवीगार होऊ शकतात.

"फळ खाल्लं की बी फेकू नका,
तीच बी लावा आणि झाड व्हायला मदत करा...
कारण जीवन देणाऱ्या झाडांच्या मुळाशी,फळांच्या बियांना आयुष्य द्या – तेच खऱ्या अर्थानं सत्कर्म!"
एक छोटंसं सत्कर्म असतं – तुमचं आणि माझं!"

सौ तृप्ती देव 

भिलाई छत्तीसगड