EPISODE 1 💫सौभाग्याची शपथ 💫

कथेत दाखवलेली वातावरणनिर्मीती , पात्र, स्थळ- सर्वकाही सत्य असलं तर घडणारी कथा काल्पनिक आहे - ही कथा वाचकांनी लक्षात असूद्या , ह्या कथेचा मानवी जिवनाशी दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही.
ठिकाण : सहार , अंधेरी (पूर्व) ,मुंबई..
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ..
वेळ सकाळी : 9 वाजता..
सकाळच्या आकाशात उगवलेल्या सुर्यभानासमोरुन, सफेद रंगाचा लाल इंग्रजी अक्षरांतील एअरइंडीया नावाचा प्लेन , आपल्या पुढच्या टोकदारा नाकाने - व दोन्ही पंखांनी हवेला चिरत वssssssssssशश्शस्स असा हवेला कापणारा आवाज करत खाली खाली येऊ लागला ....
विमानाची तीन मोठी काली चाक रनवेर ढडम्मम असा आवाज करत - आदळली, सप,सप करत विमान रनवेवर वेगान धावू लागलं -

मग जसा जसा विमानाचा वेग कमी झाला वृंssss असा आवाज करत इंजिनच आवाज कमी होत गेलं - व काहीवेळाचत विमान रनवेवर एका जागेवर थांबलं....
सकाळच्या कोवळ्या उन्हात तो एयर इंडीया अभिमानाने चकचक करत होता - तोच रनवेवरुन दुरुन स्टेअर्स ट्रक - त्यामागे दोन काल्या रंगाच्या रेंज रोवर - आणी त्या रेंजरोवर गाड्यांमागून सफेद रंगाच्या दोन महेंद्रा पोलिस जिप -
सकाळच्या वातावरणात सायरणचा वाव,वाव,वाव - लाल ,निळा,भगवा प्रकाश चमचमत फेकत - थांबलेल्या प्लेनच्या दिशेने येऊ लागल्या, जसं काय त्या प्लेनमध्ये कोणितरी मोठा vip माणुस बसलेला - ?
विमानाजवळ एक स्टेयर्स ट्रक आला, स्टेयर्स ट्रकने प्लेनच्या डोरजवळ येऊन - हायड्रॉलिकने शिडी घर्र करत जुळवली- तिला लॉक केली -
स्टेयर्स, शिड्यांच्या पाय-यांवर लाल रंगाचा मखमखली - महाग कार्पेट अंथरलेलं -
विमानाच्या एकेबाजुला पुढे दोन रेंजओव्हर, आणि मागे महेंद्रा कंपनीच्या पोलिस जिप थांबलेल्या -
झप-झप करत दोन्ही गाड्यांचे दरवाजे उघडले - रेंजरोव्हरमधून चार -चार मिळून आठ भरभक्कम बांधणीच्या देहाचे बॉडीगार्ड उतरले - हाल्फ काळ्या रंगाचा शर्ट, खाली काळी पेंट ,
कानांत कनेक्टेड ब्लूटूथ, डोळ्यांवर काळा चष्मा-
धप,धप, धप, पायात घातलेल्या बुटांचा आवाज करत ते, दोन लाईन तैयार करत- डाव्या बाजुला 4 आणि उजव्या बाजुला 4 असे स्टेयरसखाली जाऊन हाताची घडी घालत उभे राहिले -
बाजुच्या महेंद्र पोलिस कार्समधून खड खड आवाज करत , खाकी वर्दीतले 6 हवालदार , विथ insa रिफील घेऊन बाहेर पडले - विमानाला चारही बाजुंनी त्या - हवालदारांनी - नजरबंद केलं -
" द लॉकेशन ईज लॉकेड विथ हाई सेक्यूरीटी , नो डेंजर झोन सेंस -प्लीज ऑपन द डोर कृ..!" एयरपॉर्ट पोलिस इन्स्पेक्टर रणशिंगे ह्यांनी - वॉकी टॉकी वरुन नोट दिली.
आण वातावरणात वाहणारी हवा एकदमच थांबली- त्याच्या एंट्रीने हवेला शांत केलं, आवाज थांबले - गेले - आण त्याच धीरगंभीर शांततेत ..
केबिन कृने दरवाज्याच हँडल फिरवल्याचा आवाज झाला , टक- असा लोक सुटल्याचा आवाज झाला - दरवाजा आधी हलका आणि मग बाहेर वळत पुर्ण उघडला -
सकाळचा तेजस्वी प्रकाश जणु त्याला पाहण्यासाठी, त्याला ऊजळवण्यासाठी त्याच्या अंगावर फेकला गेला - आणि त्याची रॉयल एंट्री सुरु झाली -

त्याच्या अंगात डार्क नेव्ही ब्लु कलरचा - टेलर मेड कोट घातला होता -आत शुद्ध पांढरा शर्ट होता ,पायात चमकदार काळे शूज होते - हातात महागड रोलेक्स सुब्मरीनेर घड्याळ होते जे सुर्यप्रकाशात हि-यासारख चमचमत होतं -
गोल्ड फेस स्कीन - तीक्ष्ण जबडा, आत्मविश्वासाने भरलेले डोळे- त्याच डोळ्यांवर
black ray ban aviator गॉगल्स - हळकी trim केलेली दाढी - शाहरुख खान सारखे वाढलेले केस - जे थोडेशे सोनेरी रंगाचे दिसत होते -
पाच सेकंद तो अगदी ताठ दरवाज्यात उभा राहिला - आणि मग त्याची रॉयल एंट्री सुरु झाली-
तो पाय-यांवरुनखाली उतरु लागला -घाई नाही, थांबाही नाही, खांदे सरळ, नजर पुढे स्थिर -
त्याच्या आगमनाने आता हवा वहायला लागली, त्याचे केस त्या हवेने मंदगतीने उडू लागले - त्याच्या चालण्यात भारदस्त कमांड होती- आजुबाजुच वातावरण आपोआप गार पडलेलं -
त्याच रुबाबदार चालीत त्याने शिड्यांची शेवटची पायरी उतरली-

अँड लेडीज अँड जेंटल मेंन मी जयेश झोमटे तुम्हासर्वाँसमोर पेश करतोय- 30 ईयर्स - मिस्टर : आदीन
राणधवा - द बिग बिलियनरी बिजनेसमैन - ऑफ इंडीया - RGI RAANDHVA GOLBAL INDUSTRIES ऑल प्रोजेक्टस क्रिएट कंपनीजचा मालक , ज्याच्या कंपनीत सगळंच महागड ब्रँड बनलं जात - मग ते
RGI:CLOTHES
RGI:MEDECINE
RGI:TOYS
RGI:MOTORS
RGI:FOODS
सर्वच प्रॉजेक्टस RGI मध्ये बनले जात , आदीन राणधवा अँड त्याचा बिजनेस हा देशो विदेशात सुद्धा आहे -
आज तब्बल 6 वर्षानंतर तो तातडीने अमेरिकेहून भारतात आला आहे! आता, का ? अस प्रश्ण तुम्हाल पडला असेलच नाही का ? तर सांगतो-
पहिलं कारण कालच आदीनच्या आज्जी म्हंणजे आंबिकादेवी राणधवा ह्यांची प्रकृती चिंताजनक आहे- हे त्याला त्याच्या वडीलांनी फोनवर कळवलं - आणि लागलीच तो एअर इंडीयाचा संपुर्ण प्लेन बुक करुन - आपल सर्व महत्वाच ऑफिस वॉर्क , मीटिंगज , ईत्यादी सर्व सोडून भारतात आला ..
आणि 6 वर्षांपूर्वी असं काहीतरी घडलेलं , की आदीनला भारत सोडून जावंच लागलं , जर तो नसता गेला , तर तिच्यावरच्या एकतर्फी प्रेमाने त्याच जिव नकोसा केला असता.
आता ती कोण? हे सुद्धा बिग बेश - सिक्रेट लवकरच फुटेलच , तो पर्यंत पुढे पाहू ? कसं आहे ? एअर इंडीया प्लेन - जास्त उशीर एकेजागी थांबू शकत नाही ना ? त्यात आदीनला त्याच्या आज्जीला पहायला जायचं आहे - तर ताफा पुढे सरकूयात - तसंही प्लेनच भाड फार आहे बाबा ते मलाच द्यावंलागणार नाही का? - .
आदीन बॉडीगार्डसच्या समोर येत - जरा थांबला -त्याच्या पिलदार शरीरयष्टीने - कोट अंगावर टाईट बसलेला - छाती पुढे आली होती- त्याने एका हाताची हालचाल केली - कोटच मधल- बटन जे लॉक होत - ते हळकेच खोळलं - मग डोळ्यांवरचा चष्मा जरा खाली वर करत एटीट्यूड स्टाईल हुकअपने हळवला -
मग बॉडीगार्डसकडे न पाहताच - मान उजवीकडे थोडीशी ईशारा देत क्लिक केली- व तसाच ताठ छातीने, कमांड़ स्टाईलने रेंजओव्हरच्या दिशेने चालत - जाऊ लागला..
धप,धप,धप आवाज करत -
बॉडीगार्ड त्याच्या पुढे धावले - चारही बाजुंनी त्याला बॉडीगार्ड प्रॉटेक्ट करत नेहऊ लागले -
एका बॉडीगार्डने झटपट रेंज ओव्हरचा पुढचा दरवाजा उघडला - तसा आदीन गाडीत शिरला - सीटवर ऐटीत बसताच , बॉडीगार्डने दरवाजा लावला -
दुसरीकडून एक बॉडीगार्ड ड्राईव्हसीटवर जाऊन बसला - तर तीनजण मागे बसले - आणि उर्वरीत 4 जण दुस-या गाडीत ...
घर्रर्र करत गाडीचे इंजिन स्टार्ट झाले , आदीन राणधवाचा ताफा - निघाला... राणधवा मेन्सेनकडे..
आकाशातून ड्रॉन सीन -
आता पोलिसांच्या गाड्या पुढे होत्या तर -
3 नंबरच्या गाडीत आदीन बसलेला - आणि चौथ्या नंबरवर बॉडीगार्डसची गाडी होती...-
गाड्यांन एक यू टर्न घेतलं व गाड्या एयरपॉर्ट बाहेर निघुन गेल्या..-
xxxxxx
काहीवेळातच आदीनच्या ताफ्याने एयरपॉर्ट मागे सोडलं - गाडी आता हाईवेवरुन धावू लागली -
आदीन आपल्या सीटवर ताठ बसलेला -
त्याची प्रश्नार्थक नजर समोरच्या पोलिस जिपवर खिळली होती - तोच आदीन जरा रागात एंग्री साउंड मध्ये म्हंणाला.
" एयरपॉर्ट पोलिस का येतायेत - आपल्या सोबत - ? तुम्हाला माहीतीये ना ? " आदीन पुढे काही बोलणार तोच - ड्राईव्हसीटवर बसलेला बॉडीगार्ड मध्येच सांगत म्हंणाला.
ज्याच वय जेमतेम आदीनच्या वयाएवढ होतं.
" आज्जीसाहेबांची ऑर्डर आहे बॉस - !"
आज्जीसाहेब , त्या नावात काय जरब असावी? व्हॉट अ स्पेशलिटी ऑफ THIS - नेम? मिस्टर : आदीन त्या शब्दापुढे एका सेकंदात गार झाला ? व बस त्याने ईतकंच म्हंटलं.
" ही आज्जी पण ना ? नुस्ती काळजी करत असते !" अस म्हंणतच तो मान नकारार्थी हळवत मंद स्मित करत एका गालात हसला.
जरा दूर पुढे जाऊन - पोलिसांच्या गाड्यांचा वेग मंदावला - गाड्या जागीच थांबल्या - ज्या पाहून आदीनच्या कपाळावर आठ्या आल्या.
" व्हॉट प्रोब्लेम - का थांबले आहेत हे ? !" आदीनने गाडीच्या विंडोमधून पुढे समोर पाहत विचारलं.
बाजुला बसलेल्या बॉडीगार्डच्या कानांत घातलेल्या ब्लूटूथ कनेक्टेड डिव्हाईसवर नोट मिळाली. तसा तो म्हंणाला..
" बॉस पोलिसांनी इन्फॉर्म दिली आहे - पाच मिनिटांच्या अंतरावर पुढे एक अपघात झालाय , रस्त्यावर ऑइल ट्रक उलटुन पुर्ण रस्ता ऑईली झालाय - तिथून ताफा घेऊन जाण रिस्की आहे - म्हंणून - ताफा स्वामी समर्थ मठ रोडवरुन घेऊन जाऊयात असं ते म्हंणतायेत..!" तो बॉडीगार्ड म्हंटला.
त्यावर
" हम्म...!" आदीनने पुढे पाहत हूंकार भरला - मग जरा वेळ थांबून म्हंटला. " ओके!"
वर आकाशातून ड्रॉन सीन -
पोलिसांच्या गाड्या प्रथम एक यु टर्न घेत मागे वळाल्या- मग त्यांच्या मागे रेंजओव्हर वळाल्या
गाड्या त्या पुलावरुन पुढे जाऊ लागल्या -
पुलाच्या उजव्याबाजुला एक वळण होत, ते वळण उतरण घेत - नागमोडी वळण घेत पुलाच्या खाली गेलेल!
आणि खालून एक सरळ रस्ता गेलेला -आदीनच्या ताफ्याने पुलाची हद्द उतरण ओलांडली - आणि गाड्या पुलाखालून गेलेल्या रस्त्यावरुन भरधाव वेगान धावू लागल्या..
फ्लायओव्हर पुल कॉंकरेटच्या पिलरांवर उभा होता , पुलाच्या डाव्या बाजुला तारेच कंपाउंड आणी पलिकडे एक हिरव माळरान होतं -
आदीन त्या माळरानाकडे पाहु लागला -
तसं त्याच्या एका गालावर हळक स्मित आलं - ह्या अश्या हिरव्यागार गवतावर तो लहानपणी त्याच्या आज्जीसोबत खेळायचा ना - त्याच आठवणींचा उजाळा नजरेत भरत होता - आदीनने डोळे मिटले - व मान तशीच सीटमागे टेकून डोळे बंद करुन बसला...-
तसं त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडीलांनी काल फोनवर बोलत असतांना आज्जीची ईच्छा सांगितलेली , जी त्याच्या कानांत ऐकू येऊ लागली..
" आता वय झालंय, शरीर साथ देत नाही- देवाच्या ईच्छेने सर्व सुख मिळालंच आहे- बस आता शेवटची ईच्छा आहे ज़माझ्या आदीनच लग्न पाहण्याच , आणि नातवंडाच तोंड पाहायला मिळालं तरी चालेल - पण सुनबाई आणी आदीन दोघांच संसार पाहिलं तरी मी डोळे मिटायला मोकळी.!" आज्जीची ही ईच्छा आदीनच्या कानांत गुंजत घुमत होती.
आण तेवढ्यात..-
अचानक - गाडीला कर्रकचून ब्रेक मारलं गेलं - आदीनने सीटबेल्ट घातली नव्हती - अचानक ब्रेक बसल्याने - त्याच खांदा पुढे आला- डोक पुढे येत - डेशबॉर्डवर आदळलं - डोळ्यांवरचा चष्मा खाली पडला - कपाळाला थोडी जखम झाली, कपाळातून पातळसर रक्ताची रेष खाली आलेली..
अचानक ब्रेक मारल्याने आदीनचा राग आऊट ऑफ कंट्रॉल झाला, त्यासहितच त्याच्या कपाळाला लागलेल्या जखमेने जळजल होत होती.. -
" व्हॉट द हेल आर यू डू..!" आदीनचा क्रोधहिंत सुर वाढलेला - अस म्हंणतच- मान जरा वर करत तो बॉडीगार्डकडे पाहणार तोच त्याच्या नजरेच्या कोप-यातून नकळत त्याला ती दिसली...-
6 वर्षापुर्वीची ती ..-जिच्या एकतर्फीप्रेमाने तो हा देश सोडून गेलेला - ती दिसली , काय योगयोग घडून आलेला - नियतीचे फासे न जाणे कसे पडलेले..
वयाने ती 24 च्या आसपास होती- तिने लग्नात नवरीला घालतात तशी अंगावर हिरवी साडी , आणि चौकलेटी ब्लाऊज अशी- साडी घातलेली, डोक्यावरचे विस्कटलेले केस - कसेतरी स्वत:च आस्तित्व टिकवू पाहत होते..- डोळ्यांखाली घातलेला काजळ- रडून पातळसर होऊन डोळ्यांखाली पसरलेला - तिच्या गो-या मुलायम कांतीवर तो भडकपणे दिसत होता, तिच्या टपो-या डोळ्यांच्या नजरेत भीती आण मदतीची भिक होती, चेह-यावर घाबरलेले अशक्त, भाव होते - तीने रात्रभर काही खाल्लं नसाव ह्याची शाश्वती देऊन जात होते..
तिला पाहताच आदीनची वेदना -राग, सर्वकाही उडून गेलं - वेळेची गती मंदावलेली- तो कठोर होता - पण तिला पाहताच त्याच्या आतल्या कठोरतेच्या भितींना तडा गेला - ह्दयाची धडधड वाढली, नजरेत अनपेक्षित कोमलता उतरली- त्याचा भक्कम, पौलादी मन तिला पाहताच मेनासारखा वितळला...-
दोन सेकंद तिच्या पाणीदार टपो-या डोळ्यांनीही तिने त्याच्याकडे पाहिलं - दोघांच्या नजरेंनी जनू मनाचा धागा जोडला गेला होता..
पण तेवढ्यातच पुन्हा तिच्या चेह-यावर वेदना झळकली- कोणीतरी एका गुंडाने त्याच्या हाताच्या पौलादी मुठीत तीचे पातळसर काळे केस पकडलेले -
त्याच गुंडाच्या मागे अजुन 2 जण मवाली टाईप गुंडे हातात - तलवार, हॉकी स्टीक घेऊन उभे होते..-
आणि त्यातील एक बुटका माणुस सफेद रंगाचे कपडे घातलेला पोलिसांच्या गाडीभोवती उभा राहून ओळख असल्यासारखा बोलत होता..
" आह्ह्ह्ह्ह !"
ती विव्हळली- नकळत तिच्या डोळ्यांतून
अश्रु बाहेर पडले...-
तिला झालेल्या वेदना पाहता - आदीनच्या डोक्यात क्रोधाचा घुमसता वणवा पेटला.... - आण डोक्याला एक शॉट बसला...
क्षणार्धात चेह-यावर रागिट भाव पसरले
बोलणा-या आभाळीचा चांदम्या तोडलेला पिरतिचा बंध गोड रगतात भिणभिणला......' ..
क्रमश:
कोण ती ? अशी नव्या नवेली नवरीच्या साडीत -पुलाखाली काय करतीये ? आणी ते गुंड? तिला घेऊन का जायला आलेत ? आणी आदीन ? तो तिला वाचवेल का ?
ह्या सर्व प्रश्णांची उत्तर पुढच्या भागात पाहू!
प्रिय वाचक मायबाप तुमची एक 5 स्टारची समिक्षा मला लिहायला हूरुप देईन- सो प्लीज तेवढ कष्ट घ्या - कमेंट, रेटिंगद्या...