EPISODE 2 💫सौभाग्याची शपथ 💫
" तुझे आयला तर लय पळत होती नाय, थांब जरा - सायेब तुझी आता बरोबर खाज जिरवतील बघ !" त्या काळ्याकुट्ट - राक्षसी गुंड्याने तीचे केस - मुठीत ताणून आवळून धरलेले - ज्याने तिला वेदना होत होती..
" आह्ह्ह्ह - !" तिच्या तोंडातून वेदनेचा पुर वाहत होता , डोळ्यांतून अश्रुथेंब वाहत - तिच्या मुलायम गाळावरुन अलगद ओघळत जात होते.
त्या गुंडाने तिला तशीच , डोक्यामागचे केस गच्च धरुन- उलटी फिरवली, आणि तिला वेदना होतायेत, दुखतंय- ह्याची परवा न करता - तो तिला तसाच घेऊन जाऊ लागला..-
" सोड मला - सोड !"
तिने जराशी झटपट केली - त्याच्या हातावर आपल्या नाजुक हाताने फटके मारले - त्याच्या हातावर मांजरी सारखी आपली नख ओरबाडली-
" आह्ह्ह !" तो गुंड जरा विव्हळला - मग पिसाळला दात ओठ खात म्हंणाला..
" ए मांजर साली तुजी आवरी मजाल, तुझ्या आयसला तुझे तर - थांब दावतय तुला!"
त्या गुंडाने एका हातात तिची मान - वर केली- आणी उजव्या हाताची एक चपराक तिच्या गो-या कांतीच्या गाळावर मारली..-

त्याच्या राकट हाताचा पंजा, तिच्या लाल गालांवर पाच बोटांचा व्रण उमटून गेला- आण हळकेच तिच्या नाकातून - लाल रंगाची धार बाहेर पडली.. - तिला नक्कीच रात्रभर उपाशी ठेवलं असाव ? ज्याची तिला सवय नसावी? कारण त्या माराने ती जागीच बेशुद्ध झाली -
तो " फट्ट ' असा झालेला आवाज - आदीनच्या बाजुच्या उघड्या खिडकीतून थेट आत येत, त्याच्या कानांवर आदळला -
आण काळजात , उक्ळ्या फुटू लागल्या - त्याच ह्दय जणू- गरम उकळत्या पाण्यात उकळत ठेवलंय - असं त्याला जाणवू लागलं..
आण हाताची उजवी मुठ नकळत - आवळली गेली, त्याच्या स्नायूंवर तट्ट फुगलेल्या रक्ताच्या हिरव्या नसा उमटल्या..
त्या गुंडासमोर एक सफेद हाफ बाह्यांचा शर्ट, सफेद पेंट, आणि खाली सफेद चप्पल- असा एक काळ्या रंगाचा बुटका माणुस येऊन उभा राहीला - त्याचे केस मेहंदीने केशरी रंगात रंगवलेले होते -
त्या बुटक्याने खाडकन त्या गुंडाच्या कानशिळीत आवाज काढला- व त्याची कॉलर पकडून त्या 6 फुट उंच गुंड्याला दोन फुट खाली झुकवलं व दात ओठ खात खेकसत बोलला.
" ए भडव्या, काय बाप माल समजतोस व्हंय रे पोरीला ? ह्या पोरीला तू हात लावलाय हे जर शेटला समजला ना ? तर शेट तुझी अशी हालत करीन ना , की तू मागचा भांडा धुवायच्या बी लायकीचा नाय राह्यचा !" एवढ म्हंणत त्याने त्याची कॉलर सोडली..-
तस पटकन सफेद रंगाची मारुती Eco van येऊन त्याच्या बाजुला थांबली, सर्रर आवाज करत - गाडीचा दरवाजा उघडला -
" ए टाकारे ह्या मांजरीला , साला ले वणवण भटकवलाय ह्या सालीने !" तो बुट्या हूकम देत म्हंटला.
मागे असलेले 2 जण धावत तिथे आले - त्या चापट खाललेल्या गुंडाने आणि त्या उर्वरित असं 3 मिळून त्या पोरीला गाडीत टाकली..- आणी सुसाट वेगाने - Eco तिथून निघुन गेली..-
जाताना त्या इंन्स्पेक्टरने - त्या गाडीला हात दाखवला..-
ती गाडी आपल्या नजरेसमोरुन - त्या मुलीचं अपहरण करुन गेली, आणि आपण ? असं शांत बसलो? काहीचंच केलं नाही? आदीनच्या मनात - काहूर माजलं , तो स्वत:लाच दोष देऊ लागला..-
तिला काही झालं तर ? तिची फार चिंता होऊ लागली.
त्याच्या नजरेसमोर तिचा केविलवाणा चेहरा - दिसू लागला , तिच्या डोळ्यांत त्याला मदतीची हाक ऐकू येऊ लागली..
आदीनच्या बाजुला बसलेल्या बॉडीगार्डच्या
कानांवर असलेल्या ब्लुटूथवर पुन्हा नोट आली-
" येस !" तो ईतकंच म्हंटला..- व ताफा पुन्हा पुढे जाणार तोच - आदीनला न जाणे काय झालं.
" बॉडीगार्ड फॉलो द Eco व्हेन. आणी मागे बसलेले तुम्ही तिघे खाली उतरा!"
आदीन खूनशी आवाजात हळूचंच म्हंटला.
त्याच्या त्या वाक्यावर त्या बॉडीगार्डने - न समजून कसंतरीच आदीनकडे पाहिलं. -
जणु तो चेह-यावरील हावभावानेच - बोलत असावा ? आता तर हा मस्त ऐटीत बसलेला ? अचानक ह्याला काय कुत्रा चावला काय? असं का वागतोय हा बॉस?
" पण बॉस तो आपला मेटर नाहीये!" तो बॉडीगार्ड पुढे काही बोलणार तोच -
आदीनने मंदगतीने तिरकस नजरेने - भुवया बारीक करत - अगदी तीक्ष्ण नजरेने त्याला रोखून पाहिलं - व धारधार शांत आवाजात म्हंटला.
" मग मला तिच्यासाठी मेटर स्वत:वर ओढवून घ्यायचं - आहे, मला ती van स्वत:च्या नजरेआड व्हायच्या अगोदर तिथे पोहचव नाहीतर!"
" बट बॉस रिस्क आहे.!" बॉडीगार्ड थरथरत्या आवाजात म्हंणाला.
" रिस्क !"
आदीन एका गालात राक्षसी हसला -
" यू बुल शट- आदीन राणधवा नाव आहे माझं , आणि मी तेच काम करतो - जे हाई रिस्की असतं .!" आदीन सीटवर पुन्हा ऐटीत बसला -
त्याने उजवा पाय सीटवर ठेवलं - आणि उजवा हात गुढघ्यावर ठेवत - डाव्या हाताने दोन बोटांनी कपाळावरच रक्त पुसलं - व त्या दोन हातांच्या चिमटीने ते रक्त चोळत त्या रक्ताकडे पाहू लागला - ज्या रक्तात त्याला - तिचा चापट मारल्यानंतर फुटलेल्या ओठांतून
वाहणार चेहरा दिसत होता.. -
" दोन मिनिटांत मला ती व्हेन - माझ्यासमोर उभी हवीये नाहीतर..!" आदीनच्या शेवटच्या नाहीतर ह्या शब्दांत धमकी होती, नाहीतरच्या पुढे विचार करुण त्या बॉडीगार्डसचा थरथराट झाला... -
मागचे दरवाजे खाडकण उघडले - मागे बसलेले बॉडीगार्ड बाहेर उतरले..
' भूर्र्र्र्र ' आवाज करत - रेंजओव्हरच्या सायलेंसरमधून धुर बाहेर पडलं- चर्र्रर्रर्रर्र आवाज करत गाडीचे काळे टायर - 3 सेकंद रेस होत भिंगले - काळ्या टायरमधून रबर जळाल्याचा सफेद धुर बाहेर पडु लागला..आण बॉडीगार्डने क्ल्चवर,पाय ठेवत गियर टाकलं- व क्ल्च सोडून - एक्सीलेटर दाबलं -
भूर्र्रर्र्रर आवाज करत - गाडी वेगान पुढे धावली- बॉडीगार्डने स्टेरिंग उजव्याबाजुला वळवत - गाडी पोलिसांच्या दोन्ही गाड्या मागे सोडत भरधाव वेगान- पुढे निघुन गेली-
" आदीन साहेब !"
पोलिस इंन्पेक्टर - आश्चर्यचकीत होत - न समजल्यासारख - भरधाव वेगान - पुढे पुढे जाणा-या रेंजओव्हरकडे पाहतच राहिला .-
त्यासहितच - दुसरा धक्का बसला तो म्हंणजे - हवालदार ठम्मासारखा गाडी जागेवर उभा ठेवून उभा होता -
" अरे ए बाबा चल ना , काय जेवायला थांबला का ईथे -फॉलो कर ना बाबा !" इंनस्पेक्टर रणशिंगे - दयाळू मळूल - नजरेने भिकमांग्यासारखे हवालदारला - रिक्वेस्ट करत म्हंणाले.-
तसा हवालदारला - मोठी लाज वाटली.
" सॉरी सर!" पोलिसांच्या गाड्याही आदीनच्या गाडीमागे धावल्या.
xxxxxxxxxxx
Eco व्हेन - मध्ये तिला मागच्या सीटवर तोंडात बोळा कोंबून- हाताला दोरी बांधून बसवलेली- ती अद्याप बेशुद्धच होती-
दोन गुंडांनी तिला पकडुन ठेवलेलं..
तिथेच तो तिला चापट मारलेला गुंडा बसलेला - तर ड्रायव्हरच्या बाजुला - तो बूट्या ...
तोच तो बूट्या म्हंणाला.
" कय रे ए झिंग्या अव-या जोरान, चपराक मारायची कय गरज होती का? खपली बिपली असती ना पोर, तर शेटनी बक-या जागी तुला न मना शिजवला असता ...!
" सॉरी चंदू अप्पा - साला दो दिस झाले खोपटान शोधतोय हिला ! जेवण खावण सगळा सोरलाय- हिच्या मुळं- अन त्यात ही हातातून निसटली, मग डोस्कं फिरला माझा .!!" मागून झिंग्या- त्याची बिन केसांची मैदानी कवटी चोळत म्हंणाला.
ह्या दोघांच बोलण सुरु होतंच - तोच ड्राईव्हरला साईड मिरर मधून एक काळ्या रंगाची रेंजरोव्हर खालचा मातीचा रस्ता - त्या रस्त्यावरची धुळ हवेत उडवत- उधळलेल्या घोड्यागत पुढे पुढे येतांना दिसली.-
गाडीचा स्पीड़ ईतकं होतं , की धुळीचा एक सरळ पट्टा वर हवेत उडून- वीस- वीस सेकंदाकरीता राहत होता..-
" चंदू अप्पा - ही गारी ..?"
तो ड्राईव्हर अस म्हंणतो- ना म्हंणतो , तोच , ती रेंज ओव्हर Eco पाशी पोहचली-
काळी Range Rover वीजेसारखी पुढे झेपावली…
कॅमेरा टायरवर —रस्त्यावर घर्षण… धुळीचे ढग हवेत उडाले…
स्लो मोशन Range Rover व्हॅनच्या अगदी पुढे आली अचानक स्टेअरिंग उजवीकडे वळलं…
गाडी आडवी घसरत गेली…
ब्रेकचा तीव्र आवाज…झाला जळत्या रबरचा धुर वास…पसरला..
Eeco ड्रायव्हरने घाबरून ब्रेक मारलं..
क्षणार्धात रेंजओव्हरने उधळवलेली धूळ खाली बसली…Range Rover आडवी उभी.
रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला...
चंदू आप्पा - झिंग्या त्याचे जोडीदार सर्वजन रेंजओव्हरकडेच आ -वासून पाहत होते -
रेंजओव्हरच्या काळ्या काचा वर होत्या तोच ड्राइव्हर बाजुचा दरवाजा हळूहळू करत उघडला.… आणि आदिनने त्याचा चकचकीत काळ्या शूजचा पाय बाहेर ठेवला..बूट जमिनीवर टेकताच - हळूचंच खालची माती -व्हव असा हवेची फुंक मारत वर उडाली...- झटक्यात आदीन संपुर्णत बाहेर आला - ब्लु कलरचा नेव्ही कोट त्याने काढुन गाडीत ठेवलेला - अंगावर आता व्हाईट शर्ट होता - खाली पेंट होती , त्याने डोळ्यांवरचा चष्मा हळुच काढला..- त्याच्या डोळ्यात थंड, निर्विकार भाव होते..
कॅमेरा क्लोजअप —
ओठावर हलकंसं स्मित होतं - तो तसाच व्हॅनकडे चालत जाऊ लागला..
Eco van मध्ये बसलेल्या चंदू अ प्पा , झिंग्या आणि त्या उर्वरीत 2 गुंडां च्या चेह-यावर अनोळखी भाव पसरलेले -
" कोण हाय हा हिरो , ईथं कय करतोय ? ए बंट्या , जगन जा बघ कोण हय तो !" मागे बसलेला - झिंग्या म्हंणाला.
Eco चा दरवाजा उघडून चेह-यावर, उर्मट भाव ठेवत - बंट्या - जग्या बाहेर आले - बंट्याच्या च्या एका हातात हॉकी स्टीक, तर जग्याकडे चाकू होता.
" ए हिरो , काय हिरोगीरी हे रे ? चल रस्ता साफ कर , आमच्या मामल्यात पडु नको!"
बंटी उर्मट स्वरात - हातातील हॉकी स्टीकने - माघारी जा असा ईशार देत - आदीनला म्हंटला.
परंतू आदीनच त्याच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं - त्याने फक्त शर्टच्या हाताच्या बाह्या मूडपत - वर सरकवल्या..
जे पाहून बंट्याचा राग डोक्यात गेला -
" ए तुला एकदा सांगून समजत नाय काय!" बंट्याने पुढे येत आदीनच्या - खांद्यावर हात ठेवला -
तोच आदीनने त्याच्या हाताचा पंज्या, आपल्या उजव्या हातात पकड़ला- आण कड कड असा आवाज होत - पंज्याची बोट एका झटक्यात - आवळत मोडली , बोटांचा जनू भुगा भुगा...झाला...
" आह्ह्ह्ह्ह !" बंट्याची एक आर्तकिंकाळी उभा आसमंत भेदत घुमली- आण तो मोडलेला - पंज्या दुस-या हातात पकड़त बंट्या गुढघ्यांवर जमिनीवर बसला...-
Eco मध्ये असलेला - अप्पा, झिंग्या- ड्राईव्हर तिघांच्या चेह-या आश्चर्यकारक भाव पसरले.. -
आपल्या मित्राला मारलं हे पाहून, जग्याला राग आला - हातातला सुरा घेऊन - तो आदीनच्या अंगावर धावून आला, त्याने आदीनवर सुरा उगारला - पण आदीन सावध होता , विजेच्या वेगाने आदीनने गिरकी घेतली- आदीन जग्याच्या मागे आला - व त्याने पाठमो-या अव्स्थेतच जग्याचा मागून शर्ट पकडला- व पुर्णत जोर लावून जग्याला - वर उचलंत - वर पाय खाली मुंडी- असा हवेतून गोल भिंगवत - Eco च्या बोनेटवर खाडकन आपटला -
धाड आवाज करत Eco ला हादरा बसला - Eco जरा मागे चालत गेली-
" ए ह्याच्या आईला, , थांब ह्याच्या तर साल्याला ?" असं म्हंणतच - Eco चा दुसरा दरवाजा उघडून झिंग्या बाहेर आला -
आदीन 5 फुट तर झिंग्या 6 फुट उंच होता.-
आदीन हळूचंच बंट्या, जग्या दोघा गुंडांना मागे सोड़त पुढे चालत आला -
" ए तुझी हिंम्मत कशी झाली रे , माज्या मांणसांना माराची , तुज्या त..ss !" दात ओठ खात झिंग्या आदीनच्या अंगावर धावत आला -
तोच आदीनने त्याच्या पोटात एक लाथ मारली-
" आह्हह्ह! !" करत झिंग्या खाली वाकला.
थंडगार नजरेने - आदीनने त्याच्याकडे पाहिलं - व डाव्या हातात त्याची हनुवटी धरत , तोंड वर आणलं -
उजव्या हाताची मुठ आवळली- मुठ आवळताच - पाचही बोटांचा कडकड़ असा आवाज झाला - आण तीच पंच आदीनने झिंग्याच्या नाकावर मारली-
फट असा आवाज झाला -
नाकाच हाड़ फुटून शेंबडासारख रक्त बाहेर येत नाक वाहू लागलं..
आदीनने पुन्हा एक पंच लगावली-
ह्यावेळेस तोंडातले तीन - चार दात तोडले ,
मग पुन्हा एक पंच मारली- प्रत्येक पंचसरशी - त्याच्या आत उफाळून घुमसत -असलेला राग तो बाहेर काढत होता.. -
त्याच्या नजरेसमोर - झिंग्याने कशी तिच्या कानशिलात लगावली- ते दृष्य त्याच्या डोळ्यांसमोर recap होत दिसत होतं..-
पंच खाऊन खाऊन झिंग्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला - आदीनने कॉलरला धरुन त्याला उचल्लं - व जोरात मागे धक्का दिला -
धाड आवाज करत - झिंग्या Eco van च्या बोनेटवर आदळला -
आदळण्याचा वेग ईतका वेगवान , पावरफुल होता - की पुढचे दोन्ही टायर फुटून मागे उडाले - Eco ची पुढची - विंडो खळ खळ आवाज करत फुटली..- ड्राईव्हचा- आणि बाजुचा दरवाजा खाडकन उघडला गेला..-
आण त्याच उघडलेल्या दरवाज्यातून आदीनची एक्शन पाहूण ड्राईव्हर ढुंगणाला हात लावून पळून गेला..-
ड्राईव्हरच्या बाजुला बसलेला बुटा अप्पा - त्याची मात्र भीतीने घाबरगुंडी उडालेली - आता हा काय मला मारायला येतो की काय ? त्याची पेंट ओली व्हायला लागली- सीटला टेकून - तो तसाच पुतळा होऊन बसला..
आदीन त्याच्या बूटांचा शांततेत आवाज घुमवय तो Eco van च्या मागच्या दरवाज्यापाशी आला क्षणभर थांबला..
आत —ती बेशुद्ध पडलेली.
केस विस्कटलेले हातावर ओरखडे होते.
क्षणभर त्याचा श्वास थांबला.
त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती चमकली..
तो जरा पुढे झुकला -
तिच्या चेहऱ्याजवळ आला...
6 वर्षांपूर्वी ती जशी दिसायला होती, तशीच आताही होती- काहीही बदल नव्हता.-
तिचा चेहरा ईतक्या जवळून पाहता - त्याच्या हार्टबीटस वाढलेल्या -
“ए…” आदीनचा आवाज हलका… जवळजवळ कुजबुजतच तो काळजीने म्हंटला..
पण तीची काहीच हालचाल झाली नाही.
तसा त्याचा कठोर चेहरा मऊ झाला..-
त्याने तिच्या कपाळावरचे केस बाजूला सारतो.
त्याच्या बोटांना थोडंसं रक्त लागलं…
त्याची नजर अचानक बदलली.
डोळ्यात रागाची ज्वाला आणि काळजी दोन्ही झळकल्या..
त्याने तिला दोन्ही हातांनी अलगद बाहेर उचलली.
कॅमेरा क्लोजअप —
तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं आदिनने दोनक्षण डोळे बंद केले - आणि क्षणभर…6 वर्षांपुर्वीचा तो मनाला बोचणारी, काट्यासारखी टोचणारी आठवण झळकली-
पण त्याने जणू स्वतःला सावरलं..
तो तसाच तिला - दोन्ही हातांत उचलून धरत - रेंजरोवरपाशी आला -
ड्राईव्हसीटवर बसलेल्या - बॉडीगार्डने दरवाजा उघडला - त्याने तिला अलगद मागच्या सीटवर ठेवली -
आण तो ही तिच्या बाजुला बसणार तोच - पुन्हा ती आठवण डोळ्यांसमोर - ते क्षण, तो अपमान, तो तिरस्कार - आण त्याच्या चेह-यावर पुन्हा राग पसरला..-
त्याने मागचा दरवाजा लावला - व पुढे ड्राईव्हर बाजुला येऊन बसला..-
" बॉडीगार्ड घरी चल !"
तो थंड आवाजात म्हंटला.
गाडी सुरु झाली-
मध्ये -मध्ये त्याने कितीही स्वत:ला समजवलं असलं की मागे वळून पाहायचं नाही, तरी सुद्धा त्याच्या मनाला ती सुचना पटली नाही- त्याने खुपदा समोरच्या आरश्यातून तिच्या चेह-याकडे काळजीपूर्वक नजरेने पाहिलं...
काहीवेळाने गाडी राणधवा मेन्सनपाशी - पोहचली... जिथे राणधवा फैमिली 6 वर्षानंतर
घरी आलेल्या - आदीनच स्वागत करायला म्हंणून उभे होते -
पण लवकरच - त्यांना आदीन आपल्यासोबत कोणाला घेऊन आला आहे. हे कळल्यावर - एक आश्चर्य,अक्ल्प्नीय असा धक्का बसणार होता..-
क्रमश :