Letter to Sumane..Your special sentences Part 1 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १

Featured Books
Categories
Share

पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १

प्रिय सोना

तुझा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता काही काही वाक्य अशी बोलायचा की त्यात तुझी अशी खास लकब होतीजी माझ्याकडून कधीच विसरली जाणार नाहीतकधी कधी मी घरात घालायच्या चपला वरच्या मजल्यावर विसरून खाली यायचे तू वरून खाली येताना मुद्दाम मिश्किल हसून मला विचारायचा.."महाराज आपल्या पादुका राहिल्यात आणून देऊ का "मे म्हणायचे अरे नको आणते माझ्या मी.😀उन्हाळा तुला थोडा कडक वाटायचातब्येतीला सोसायचा नाहीमग तुझं नेहेमीच वाक्य.."हे उन नुसत घाम काढतय..Humidity लय वाढलीय"😊एखादी गोष्ट मला काही वेळा पटायची नाही किंवा समजायची नाहीअशा वेळी खोट्या रागाने तू मला म्हणायचा"लते तू मंद आहेस का"?हे वाक्य खरे म्हणजे तेव्हा एका गाजलेल्या मराठी सीरियल मधे होते 😊आपल्या समोर राहणाऱ्या वहिनी नेहेमी आपल्या घरासमोरून निघाल्या की आपल्या घराकडे न बघता जायच्याअशा वेळी त्या वरती बघून चालायच्यामग तू म्हणायचा.."मामी वरती कडे त्वांड करून चालल्यात बघ"😀त्यांच्या नवऱ्याला उगाचच अंगणातली झाडे तोडायची सवय होतीअशा वेळी ते टॉवेल गुंडाळून कुऱ्हाड घेऊन अंगणात येतते असे टॉवेल गुंडाळून दिसले की तू म्हणायचा"मामा निघाले टॉवेल लावून आता झाडांचं काही खरे नाही"😃काही काही वेळा काही गोष्टी ठरवून सुद्धा होत नसत..मग मी तुला सांगत असे मला असे करायचे होते पण जमलेच नाही काय करायचं नाईलाज झाला..अशा वेळी तू म्हणायचा जाऊदे सोडून दे"नाइलाज को क्या इलाज"😊आपल्या शेजारी राहणाऱ्या नर्स बाई दिवसभर घरात कोणाशीही निरर्थक बडबड करीत असतआणि गंमत म्हणजे कितीही कान देऊन ऐकले तरी त्या काय बोलत आहेत बिलकुल समजत नसेअशा वेळी मी म्हणत असे त्या काय बोलतात ते समोरच्या माणसाला तरी कळते का नाही कोण जाणेउगाच दिवसभर पिटर पीटर बोलत असतात...त्या त्यांच्या खिडकीत आल्या की तू म्हणायचा"तो बघ पीटर आला"😃त्यांच्या नवऱ्याचा आवाज घरात कमी असायचामी म्हणायचे हे कधीच बोलत नाहीतमात्र कोरोना काळात तो रोज सकाळी मोठ्याने ओम जप करायचातेव्हा तू म्हणायचा बघ देशपांडू ओम ओम बोलतोय😀आपल्या संपूर्ण घराच्या खिडक्या दारांना तू चौकटी मारून बारीक जाळी बसवून घेतली होतीस जेणेकरून डास अथवा बारीक किडे आत येऊ नयेतडॉक्टर असल्याने तुला माहित होत डासांच्या चावण्याने भयंकर रोग होऊ शकतातसंध्याकाळी सहा आणि सकाळी सहाच्या आसपास डास घरात येत असतातत्यावेळी दार बंद ठेवायची तुझी ताकीद असेकाही कारणाने त्यावेळी दार थोडा वेळ जरी उघडे राहिले आणि डास आत आले की तू रागाने म्हणायचाबघ डासोपंत चावरेना आत घेतलेस ना😊कधी कधी काही गोष्टीतमाझी निर्णय क्षमता कमी पडत असेहो नाही असे माझे होत असेकरू का नको असे वाटत असेमग तू रागावून म्हणायचा काहीतरी एक चटकन ठरव"सारख दही खाऊ माहि खाऊ करू नको"😃आठवड्यातून एक दिवस तुझा घरातले फर्निचर पुसायचा वार असेसाफ सफाई तुला अतिशय आवडत असे सकाळ पासून तू"पुसा पूसी खेले आओ"हे वाक्य गाण्या सारखे म्हणत असायचाजेणे करून मला कळावे तुझे काम आणि त्या कामात तू घेत असलेला आनंद😀कधी कधी एखादे कामं मी ठरवुन हातात घेत असेपण नंतर मला समजत असे उगाचच आपण हे हातात घेतलेआपल्याकडून नाही होणार हे काम खरेतर हे काम नाही जमू शकत हे सांगून तू मला सावध केलेले असायचेपण मीच हट्टी...अशा वेळी "अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग कशाला करतेस" असे म्हणून तू माझ्यावर रागवायचाफिरून किंवा काम करून झाले की थोडे दमायला होत असे अशा वेळी मी दमले असे ना म्हणतामी तोंडातून बुफ असा आवाज काढत असेलगेच तू सावध मला काही होतेय का, दमायला झालेय का असे विचारायचा अशा वेळी तुझ्या माझ्याविषयीच्या काळजीचे हसू येत असेमग मी म्हणे नाही रे बाबा दमले मी आणि मला काही होत नाहीयतुला ते अजिबात पटायचं नाहीमग तू मला विचारायचाकाही होत नाही तर बुफ..का म्हणतेसमी हसून टाळून द्यायचेपण तुला माझी काळजी असायची मग थोडा वेळ तू माला काहीही करू द्यायचा नाहीवृषाली बेन आराम करा तुम्ही जराअसे म्हणत मला बसवून ठेवायचासंध्याकाळी किंवा सकाळी मला भुक लागली आणि खायची वेळ नसेल किंवा खाण्याचे काही तयार नसेल तर अगदी माझ्या चेहर्या वरून तुला समजायचे मग तू विचारायचा"तुला बुके. का" म्हणजे.भूक लागली का मग चल खाऊया मग जरुर असेल तर पदार्थ बनवायला मला मदत करायचा तसेच रात्री टीव्ही पाहताना मला लवकर झोप आली की माझ्या डोळ्यावरून तुला समजायचे लगेच माझ्याकडे बघून जोपडी आली का तुला.. असा प्रश्न यायचा.. मी हसल्यावर आता जोप कर तू असे म्हणून टीव्ही बंद करून झोपायच्या तयारीला लागायचा