swami-sadiv pathishi in Marathi Spiritual Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | स्वामीराया - सदैव पाठीशी

Featured Books
Categories
Share

स्वामीराया - सदैव पाठीशी

सकाळची १० ची वेळ अनिरुद्ध ने गाडी थांबवली आणि कौलारू अश्या घराच्या गेट चा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला त्याला समोर एक वयस्कर माणूस झाडांना पाणी देताना दिसला तो त्याच्या कडे गेला आणि म्हणाला 

"नमस्कार वसंत काका  "

"अरे अनिरुद्ध तू आणि इथे आणि कधी आलास परदेशातून "

"झाले दोन दिवस काका कसे आहात "?

"आहे बरा तू एकटाच आलास माधव आणि वाहिनी बरे आहेत ना "?

"हो काका ठीक आहेत मी तुम्हाला भेटायला आलोय "

"हो का ये आत ये असे म्हणून वसंत काका आणि अनिरुद्ध आत गेले "

"बर बाळा काकू मंदिरात गेली आहे मी चहा टाकतो मग आपण बोलू "

"नाही काका चहा नको बसा तुम्ही "

"बरे काय म्हणत होतास" ?

"काका पुढच्या आठ्वड्यात १५ तारखेला आई बाबाच्या लग्नाला ६० वर्ष पूर्ण होणार म्हणून आम्ही तो दिवस आपल्या माणसासोबत साजरा करायचा ठरवला आहे आपल्याच शेजारी मिनी हॉल आहे ना तिथे संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल "

"वाह छान कल्पना आहे तुझ्या आई बाबाच्या लग्नाचा प्रवास मी जवळून पहिले आहे त्यांनी खूप कष्ट केले आहे आणि त्याचे फळ म्हणजे तुझ्या मनात तो दिवस साजरा करण्याची इच्छा नाहीतर आज काल ६० वर्ष जुने झाले म्हणून विसरून हि जातात पण तुझे विचार ऐकून भरून आले मी आणि वसुधा नक्की येऊ "

"बरे काका निघतो बरीच कामे आहेत "

"बरे आलास बरे वाटले सावकाश जा "

वसंत काका चा निरोप घेऊन अनिरुद्ध बाहेर पडला ........

पण तिथे अनिरुद्ध चे बाबा मात्र चिंतेत पडले होते "अनिरुद्ध कुठे केला काही सांगून गेलं आहे का फोन हि लागत नाही त्याचा "?

"नाही बाबा बाहेर जातो म्हणून सांगितले काय झाले काही काम होते का "?

"तसे काही महत्वाचे नव्हते अवंतिका पण "?

"पण काय बाबा सांगा मी करते काही असेल तर "

"सुनबाई नाही मी मठात जात होतो म्हटले तो सोबत असला तर बरे असेल म्हणून "

"एवढाच ना तुम्हाला सोबत हवी मी आले असते पण आईंना स्वयंपाकांत मदत करायची आहे बाबा तुम्ही  सोहम ला घेऊन जा "

सोहम असे म्हणून अवंतिका ने सोहम ला हाक दिली तसे 

"हा मॉम काय म्हणालीस का "?

"अरे आजोबा बरोबर जरा मठात जाऊन ये "?

"मठात ते कुठे आणि मठ म्हणजे "?

"ते आजोबा सांगितली तुला" 

"चल माझ्याबरोबर सांगतो तुला असे म्हणून आजोबा सोहम ला घेऊन गेले "

आजोबा नि सांगितलेल्या दिशेने  सोहम ने गाडी वळवली आणि गाडी येऊन एका ठिकाणी थांबली  तसे आजोबा उतरले सोहम तसाच बसलेला पाहून म्हणाले 

"चल सोहम तू पण ये ना "?

"नाही आजोबा तुम्ही जा मी इथे थांबतो "

"अरे मठ म्हणजे काय ते बाहेरून थोडेच कळणार आहे आत ये मगच कळेल "

"नाही आजोबा तुम्ही या "

"बरे बाबा नको येउस मनात नसेल तर राहू दे" असे म्हणून आजोबा आत गेले 

सोहम गाडीत बसला अर्था तास झाला आजोबा आले नाही म्हणून सोहम गाडीतून उतरला आणि इथे तिथे पाहू लागला एवढ्यात आजोबा येताना त्याला दिसले तो आजोबा ना पाहत म्हणाला 

"काय आजोबा केवढा उशीर कंटाळा आला मला इथे बसून "?

"अरे मी तुला सांगत होत आत ये म्हणून आत गेल्यावर मनाला ची शांतता भेटते त्याचे सुख काही वेगळेच आहे "

"आजोबा हे तुमच्या वयाला शोभते आणि मला काही मनाच्या शांततेसाठी असल्या मठाची गरज भासत नाही "

त्याचे हे बोलणे ऐकून आजोबा हसत हसत म्हणाले "स्वामींच्या भक्तीला वयाची नाही निखळ भक्तीची गरज असते आणि स्वामींना आपली नाही आपल्याला स्वामींच्या मठाची गरज कधी ना कधी भासते "

"अवंतिका हा अनिरुद्ध कुठे गेला आहे जेवणाची वेळ होत आली सकाळी गेला आहे "

"हो ना आई मी फोन लावला तर स्वीटच ऑफ येतो "

"काय अजून हि स्वीटच ऑफ गेला कुठे हा अनिरुद्ध "

"मॉम आजोबा आजी कशाला काळजी करतात बाबा काही लहान नाही आहे येईल "

"अरे लहान नाही पण सकाळी गेलाय आणि अजून आला नाही मग काळजी वाटणार ना "

"हो आजी ओके तुम्ही काळजी करू नका येईल बाबा "

अनिरुद्ध च्या बाबांनी त्याच्या मित्राच्या घरी फोन लावला पण तो तिथे न आल्याचे कळले पाहत पाहता संध्यकाळी होत आली पण अनिरुद्धचा काही पत्ता नाही हे पाहून सगळेच घाबरले 

एवढ्यात दरवाजावरची बेल वाजली अवंतिकाने लगेच दरवाजा उघडला तर समोर अनिरुद्ध उभा होता त्याला पाहताच अवंतिका ने त्याला विचारले कुठे होतास एव्हडा वेळ कुठे होतास "?

"काही नाही जरा काम होते आणि मोबाईल ची बॅटरी पण संपली होती "

"आमच्या जीवाला तर घोर लागला होता "अनिरुद्ध चे आई बाबा म्हणाले 

"आई बाबा आलॊ ना मी कशाला उगीच काळजी करता "

"मी सांगत होतो बाबा ह्यांना पण हे लोक उगीच देवाला वगैरे बोलवत होते आणि आजोबा तर स्वामी स्वामी करत होते त्या स्वामींनी तुला इथे आणले वाटत "

"सोहम अति होतंय "

"मॉम मी खरे तेच बोलतोय "

"जाऊ दे अवंतिका आताच्या पिढीला नाही कळणार "असे म्हणून आजोबा बाहेर गेले ते पाहून अवंतिका म्हणाली 

"सोहम हे काय चालू आहे तुझे असे कोणी बोलते का "?

"मॉम पहिली तर मी काही वाईट बोललो नाही अरे आजोबा इथे राहून स्वामी स्वामी करत आहेत मला सांग बाबा कुठे आहे ते कळणार होते का काहीही तुमचे "

"हे बघ त्याची श्रद्धा आहे उगीच त्याची मस्करी नको "

"ओके समजले समजले उगीच रागावू नकोस "

अनिरुद्ध रूम मध्ये बसला होता अवंतिका तिथे सोहमच्या वागण्याबद्दल बोलत येते पण अनिरुद्धला टेन्शन मध्ये पाहून 

"काय झालं अनिरुद्ध असा चिंतेत का आहेस "?

"अवंतिका माझी नोकरी गेली "

"काय पण कशी आणि का "?

"आमच्या कंपनीला दुसऱ्या कंपनीने विकत घेतले आणि नवीन माणसे भरती करणार आहेत "

"काय अरे पण हे अचानक "?

"नाही ह्याची चाहूल मला होती पण हे एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते म्हणून मेल वाचला  काय करावे सुचेना म्हणून एकटाच शांत समुद्र किनारी बसलो होतो "

"पण तू घरी येऊन आम्हला "

"नाही आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस होई पर्यत हे त्यांना कळता कामा नये उगीच त्यांना त्रास होईल "

'ओके नाही सांगणार तू सांभाळ स्वतःला आपण पाहू काय करायचे "

"नाही मी उदास होतो पण ना समुद्र किनारी मी एका बाबाच्या वयाच्या माणसाला मक्याची कणसे विकताना पहिले मी त्यांना विचारले "तुम्ही का काम करता तुमची मुले नाही का "?त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले "जो पर्यत हातात ताकद आहे कोणावर कशाला अवलबूंन राहायचे "

"बरोबर बोलले ते काका आणि तुझ्याकडे तेव्हडी कॅपॅब्लिटी आहे कि तुला दुसरी नोकरी लगेच मिळेल "

"नाही ते मला माहित आहे पण तिथे आपले लोन पण चालू आहे आणि सोहम चे हे लास्ट इयर आहे सगळे व्यवस्तीत पार पडायला हवे नाहीतर आपल्याला भारतात कायमचे परत यावे लागेल पण  हि गोष्ट कोणालाच कळता कामा नये "

सोहम ने रूम बाहेरून जाताना हलकेच ऐकले आणि तो आत आला "काय भारतात काय झालं बाबा आणि मी काही माझी कॉलेज सोडून इथे येणार नाही "

"सोहम जरा हळू बोल "

"मॉम पण  काय झालं "?

त्याच्या ह्या प्रश्नवर अनिरुद्ध ने त्याला समजावत सांगितले "सोहम काही झाले नाही आणि हो तू जे काही ऐकले अशील पण ते कोणासमोर येऊ देऊ नकोस "

"पण बाबा काय झालं कि तू मॉम ला असं का म्हणाला कि भारतात कायमचे परत यावे लागणार "

"सोहम काही नाही तसे काही होणार नाही मी पाहीन पण तू हे बाहेर कोणाकडे बोलू नकोस "

"बाबा मी आताच सांगतो मी इथे काही दिवसासाठी येऊ शकतो नॉट फॉर लाईफ टाईम "

"सोहम बाबानी सांगितले ना मग जरा गप्प राहा आम्ही आहोत आम्ही काय ते पाहू आणि हो हे आजी आजोबाना कळता काम नये "

"ओके "असे म्हणून सोहम बाहेर गेला 

असेच दिवस गेले गुपित तिघामध्येच फिरत होते लग्नाचा वाढदिवस चा दिवस उजाडला सकाळी अनिरुद्धच्या आई बाबांनी अनिरुद्ध ला त्याच्या सोबत मठात येण्याचे सांगितले तसे अनिरुद्ध आणि अवंतिका निघाले सोबत त्यांनी सोहम ला येण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला तसे ते चार जण मठात गेले आजी आजोबा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले अनिरुद्ध हि स्वामी चरणी नतमस्तक झाला तो काही धार्मिक नव्हता पण आज त्याच्या तोंडून नकळत मनात शब्द आले "स्वामी माझी परिस्थिती कशी आहे हि माहित आहे मी भारतातून जाण्यापूर्वी मला नवीन नोकरी मिळू दे "

थोडा वेळ ते तिथं बसलं आणि निघाले अनिरुद्ध ने स्वामी च्या मूर्ती कडे परत नजर टाकली जसे  त्याला स्वामींना काहीतरी आठवण करून द्याची आहे आणि ते निघाले गाडी सुरवात करणार एवढ्यात त्याचा फोन वाजला तो गाडी बाहेर ला त्याने कानाला लावला आणि त्याच्या चेहऱ्याचा भाव बदला त्याने फोन ठेवला  गाडी सुरु केली आणि ते घरी परतले त्याने फोनवर चे बोलणे घरी आल्या आल्या अवंतिकेला आणि सोहम ला सांगितले ते ऐकून अवंतिका म्हणाली 

"खरे काय सांगतोय "?

"हो मला वाटले नव्हते मला त्या नवीन कंपनीत ठेवतील माझा पेर्फोमन्स पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आणि मी त्यांना म्हणालो "कि मी सुटीवर आहे तर ते म्हणाले कि काही घाई नाही आम्ही नवीन सेट उप पुढच्या महिन्यापासून सुरु करणार आहोत मग तुम्ही पुढच्या महिन्यात जॉईन करा आणि तुला माहित आहे जे बोलत होत ते भारतातले होते आणि ते मला म्हणाले"कि तुझ्या कामात तुझा प्रामाणिक पणा आणि चांगली निष्ठा आहे मग तुझ्याबरोबर वाईट कसे घडेल आणि त्यांनी फोन ठेवला माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले  अवंतिका "

हे सर्व ऐकून सोहम म्हणाला "वाह बेस्ट आता तर सेलिब्रेशन झालेच पाहिजे "

"पहा ना अवंतिका एवढे दिवस मी चिंतेत होतो आणि आज मठात जाऊन आलो आणि बाहेर येताच हा योगायोग कि "?

"बाबा आता तू हि स्वामी स्वामी करायला लागणार वाटतं "?

"सोहम तुला मी कितीदा सांगितले उगीच मस्करी करू नकोस "

"मग काय करू बाबा सांगतोच कसा म्हणजे त्या मठात जाऊन त्याला नोकरी मिळाली असेच ना "?

"सोहम तुला सांगून काहीच फायदा नाही तू काही ऐकून घेणार आहेस का "?

"मॉम आजी आजोबा वयानुसार स्वामी स्वामी करतात पण तुम्ही हि आता करू लागलात सोड तुम्हला काही बोलून काही फायदा नाही असे म्हणून सोहम बाहेर गेला ते पाहून 

"जाऊ दे अवंतिका चल संध्यकाळच्या कार्यक्रमाची तयारी करूया या "

लग्नाच्या वाढदिवसाची  संध्याकाळ सिटी मिनी हॉल अनिरुद्ध ने कार्यक्रमाची जय्यत तयारी गेली होती बाहेर आई बाबाचा स्वागत करणारा फोटो सजावट कार्यक्रम साठी निवेदक त्यात काही खेळ आठवणींचा कप्पा असे काही कार्यक्रम ठेवले होते आई बाबाच्या आवडीच्या पदार्थाची मेजवानी होती एका तासांनी कार्यक्रम संपत आला केक कापून आनंद साजरा केला काही जण मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी गेले तर काही अनिरुद्धच्या आई बाबा बरोबर फोटो काढण्यात व्यस्त होते एव्हडयात अनिरुद्ध चे लक्ष गेले कि सोहम कुठे दिसत नाही त्याने अवंतिकाला विचारले 

"अवंतिका सोहम कुठे दिसत नाही "?

"माहित नाही असेल इथेच काही काम होते "

"नाही कार्यक्रम संपत आला आहे एक आपला आई बाबा बरोबर फॅमिली फोटो काढावा म्हणून विचारले मी करतो फोन असे म्हणून सोहम ला फोन लावला त्याने तो उचला नाही परत काही वेळात फोन लावला तो पर्यत सगळी मंडळी निघून गेली होती तरी  त्याने फोने उचला नाही तिसऱ्या वेळी त्यांनी फोन उचला 

"हा बोला कोण बोलतंय"?

"आपण कोण "?

"मी हॉस्पिटल मधून बोलतोय "

"हॉस्पिटल अहो हा नंबर माझ्या मुलाचा आहे सोहम चा "

"हो का अहो त्याला सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे "

"सिटी हॉस्पिटल पण काय झालं "?

"अहो त्याचा असिसिडेन्ट झाला आहे डोक्याला मार लागला आहे "

"काय आणि कुठे आणि आता कसा आहे  "?

"हे बघा आता तो ऑपेरेशन थिएटर मध्ये आहे "

"काय मी येतो मी येतो असे म्हणून त्याने स्वतःला सावरत अवंतिका ला म्हणाला अवंतिका मला जरा काम आहे  तु आई बाबांना घेऊन घरी जा असे सांगून लगेच हॉस्पिटल गाठले रेसिपिशन वर विचारून तो ऑपेरेशन थियटर कडे वळला तिथे त्याला एक माणूस उभा दिसला 

"तुम्ही मला फोन केला होता का "?

"हो तुमच्या मुलाचे ऑपेरेशन चालू आहे त्याच्या डोक्याला मार लागला आहे "

"पण हे कसे झाले आणि तुम्हला कुठे सापडला "?

"तो फास्ट होता आणि बाईक वरून एकदम कोसळला माझे समोरच दुकान आहे मी लगेच त्याला हॉस्पिटल मध्ये आणले "

एवढ्यात डॉक्टर बाहेर येताना दिसले अनिरुद्ध त्याच्याजवळ गेला "आत आहे ना तो माझा मुलगा आहे कसा आहे तो "?

"डोक्याला मार लागला आहे दारूची नशा हि खूप आहे शुदीवर येई पर्यंत काहीच सांगू नाही शकत हे ऐकून अनिरुद्ध ने चकित होत डॉक्टरना म्हटले "नाही डॉक्टर माझा सोहम दारू नाही पीत "

"हे बघा मिस्टर मी का खोटे बोलेन "असे म्हणून डॉक्टर गेले तसे तो माणूस अनिरुद्ध च्या जवळ आला आणि म्हणाला "भाऊ डॉक्टर खरे सांगत आहेत तुमच्या मुलगा नशेत होता आजकाल ची मुले आई बापाला लपवून काही गोष्टी करतात पण भाऊ काळजी करू नका तुमचा मुलगा ठीक होईल "

"तुम्ही माझ्या मुलाला इथे आणलेत मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही तुम्ही जा मी आहे आता "

"नाही भाऊ मी थांबतो तुमच्यासोबत "

"नाही माझ्यासाठी मी येई पर्यंत इथे थांबलात हेच मोठे आहे तुम्ही या   "

"बरे काळजी घ्या असे सांगून ती व्यक्ती गेली 

अनिरुद्ध ला समजत नव्हते कि काय करावे रडू हि येत होते आणि सोहम चा राग हि  एव्हडयात अवंतिका चा फोन आला तो स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने सर्व सांगितले ते ऐकून अवंतिका फोन वर रडू लागली अनिरुद्ध  च्या आई बाबांनी अवंतिकाला  सांभाळत हॉस्पिटल ची वाट धरली ते क्षणात हॉस्पिटल मध्ये पोहचले सोहम ची  अवस्था पाहून तिघे हि कोलमडले 

"काय होऊन बसले हे अनिरुद्ध आणि हा हॉल सोडून बाहेर कुठे गेला होता "

"अवंतिका आपला विश्वासघात झाला आहे "

"काय झालं अनिरुद्ध "?

"अवंतिका सोहम दारूच्या नशेत होता "

"काय  नाही रे हे काय बोलतोस तू "?

"हो एवढे दिवस आपल्याला तो फसवत होता पण आज त्याची चूक आपल्यासमोर अशी आली डॉक्टर ने स्पष्ट सांगितले आणि तो माणूस हि तेच म्हणाला ज्यांनी सोहम ला इथे आणले "

हे सर्व अनिरुद्ध च्या आई बाबांनी ऐकले ते पुढे येत त्या दोघांना सावरत म्हणाले "बाळा तो चुकला पण तो लवकर बरा होऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना तू जरा शांत राहा "हे बोलून त्या दोघांनी आपले डोळे पुसले 

सोहम ची अवस्था पाहून अनिरुद्ध चे आई बाबा खूपच बावरले होते ते अनिरुद्ध ला परत परत हेच सांगत होते 

"तुम्ही इथे आलात नसता तर हे सर्व घडलेच नसते तू उगाचच वाढदिवसाचा घाट घातलास तुम्ही इथे आलास नसतात तर आज सोहम ची हि अवस्था झालीच नसती "

"आई  बाबा असं काही नाही उगीच तुम्ही काहीही विचार करू नका जे होणार होत ते झालं इथे काय तिथे घडले असते जे झाले त्यात माझ्या इथे येण्याचा काहीही संबंध नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका "

"कसे करू नको अनिरुद्ध सोहम ला असे पाहवत नाही रे आमच्या ह्या वयात आमच्या तरुण नातवाला असे पाहू शकतो का "?

"आई बाबा तुम्हला काय वाटत मला पाहवत आहे मला हि त्याची हि अवस्था पाहवत नाही पण मी काय करू मी अवंतिकाला धीर देण्यासाठी माझे मन घट्ट करत आहे "

"हो रे आई म्हणून त्या बिचारी ची अवस्था मी समजू शकते आपल्या ला तिला धीर द्यावा लागेल आपल्या समोर आपला बाळ असा निशब्द पडला आहे हे एक आई म्हणून नाही सहन होणार "

"आई बाबा तुम्ही घरी जा मी आणि अवंतिका आहोत इथे "

"नाही बाळा आम्हला घरी चैन नाही पडणार आम्ही राहतो "

"पण आई बाबा तो कधी शुद्धीवर येईल सांगता येत नाही किती वेळ बसून राहाला "?

"नाही सोहम शुद्धीवर येई पर्यंत आम्ही पण तुमच्या सोबत राहू तू आमची काळजी करू नकोस अवंतिकाला सांभाळ "

अनिरुद्ध ने पहिले तर अवंतिका सोहम असलेल्या रूम बाहेर बसून रडत होती तो तिथे गेला 

"अवंतिका उठ "

"अनिरुद्ध सोहम कधी जागा होणार नाही पाहवत त्याला असे काय होऊन बसले रे पहा त्याच्याकडे काहीच बोलत नाही त्याला काही होता काम नये त्याला काही होता कामा नये असे म्हणून ती रडू लागली 

"अवंतिका शांत हो आपल्या सोहम ला काही होणार नाही "

अवंतिका आणि अनिरुद्ध ला असे रडताना पाहून अनिरुद्धच्या आई बाबांनी हात जोडले "स्वामी तुम्हीच सांभाळा आमच्या' बाळाला आमचे बाळ लवकर बरे होऊ दे .........."

दिवस आठवा 

सकाळची वेळ अनिरुद्ध अवंतिका आणि त्याचे आई बाबा सोहम अजून हि शुद्धीवर आला नाही म्हणून चिंतेत होते एवढ्यात डॉक्टर सोहम ला चेक करण्यासाठी गेले ते पाहून चौघांनी मिळून देवाला हात जोडले ते एकच धावा करत होते कि सोहम लवकर बरा होऊ दे

एवढ्यात डॉक्टर बाहेर आले अनिरुद्ध विचारण्यासाठी पुढे सरकवला त्या पहिलीच डॉक्टर म्हणाले "काही सांगू शकत नाही अजून हि तो शुद्धीवर आला नाही असे म्हणून डॉक्टर गेले ते पाहून सगळ्याच्या डोळ्यात पाणी आले पण अनिरुद्ध ने डोळे पुसत सावरत म्हणाला "येईल तो शुद्धीवर तुम्ही रडू नका "आणि तो तिथून निघून गेला 

सगळेच आतून कोडमडले होते पण एकमेकाना सावरण्याखेरीस त्याच्याहातात काहीच नव्हते जो तो डोळे मिटून फक्त देवाचा धावा करत होते 

संध्याकाळ होत आली डॉक्टर परत राऊंड साठी आले ते सोहम असलेल्या रूम मध्ये गेले काही मिनिटांनी ते बाहेर आले आणि अनिरुद्धला हसत हसत म्हणाले "तुमचा मुलगा शुद्धीवर आला आहे आठव्या दिवशी अश्या अवस्थेतून तो बाहेर आला हा चमत्कारच म्हणावा 

हे ऐकून  सगळ्याचा चेहऱ्यावर समाधान पसरले अनिरुद्ध ने डॉक्टर आम्ही त्याला भेटू शकतो 

"हो पण सगळे एकदम जाऊ नका आणि हो त्याला ताण वाटेल असे काही बोलू नका "

अवंतिकाची अवस्था पाहून सगळ्यांनी अवंतिका ने आत जाण्याचे ठरवले ती आत गेली आणि तिने पहिले कि सोहम ने डोळे उघडले आहे त्याला पाहतच तिला रडू फुटले पण स्वतः ला सावरत ती त्याला जवळ गेली त्याच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवून म्हणाली "बाळा कसा आहेस बरे वाटतं आहे ना लवकर बरा हो "

हळू आवाजात सोहम म्हणाला "हो आई मी ठीक आहे "

"आई आजोबा कुठे आहेत "?

"बाहेर आहेत रे आम्ही सगळेच जण तुला शुद्धीवर येण्याचा वाट पाहत होतो का रे काय झालं "?

"आई मला आजोंबाना काहीतरी सांगायच आहे "

"बरे आता नको डॉक्टर नि जास्त बोलू नको म्हणून सांगितले आहे घरी गेल्यावर आजोबांशी बोल आता अराम कर असे सांगून आई बाहेर आली 

असेच आठ दिवस गेले  त्याच्यात सुधारणा झाली हे पाहून सोहम ला डिस्चार्गे देण्यात आले सगळे त्याला घरी घेऊन जाण्यास निघाले वाटेत सोहम म्हणाला "आजोबा मला स्वामींच्या मठात जायचे आहे" हे ऐकून सगळेच अवाक झाले 

"काय तुला "?

"हो आजोबा "

"बरे अनिरुद्ध मठा कडे गाडी जाऊ दे "

सगळेच मठात आले अनिरुद्ध अवंतिका आजी आजोबा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले सोहम हि न सांगता नतमस्तक झाला थोडा वेळ मठात राहून त्यांनी घरची वाट 

सोहम चे  औक्षण करून घरात प्रवेश घेतला सोहम त्याला त्याच्या रूम मध्ये नेण्यात आले त्याचे जेवण वगैरे करून तो झोपी गेला तो पर्यंत संध्याकाळची वेळ झाली आई आजी आजोबा आणि बाबा निवांत बसले होते एवढ्यात सोहम आपल्या रूम मधून बाहेर आला ते पाहून "अरे तू कशाला आलास काही हवे होते तर आवाज द्याचा ना मी आता पाहून आली तू झोपलास म्हणून  मी काही बोलले नाही "

"मॉम मी ठीक आहे आता किती झोपू झोपून झोपून कंटाळा आला म्हणून मी तुमच्यासोबत बसायला आलो "

"बरे बाळा बस "

"आजोबा आजी मॉम बाबा माफ करा मला माझ्यामुळे तुम्हा सर्वाना खूप त्रास झाला "

"बाळा हे काय बोलतोस तू त्रास अरे तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस आणि तुझा आम्हला त्रास कसा होईल "

"पण मॉम हे सर्व माझ्यामुळेच झाले ना "

"बाळा अपघात होणार हा तुला थोडेच माहिती होते ह्यात तर अनपेक्षित गोष्टी आहेत "

"पण आजी अपघात होण्यासाठी मीच जबाबदार आहे ना "?

"बाळा असे का म्हणतोस असे काही नाही आहे "

"मॉम मी तुला आणि बाबाला फसवत आलो होतो पण आज ते असे समोर आले मी दारू पितो हे मी तुम्हला कधीच कळू दिले नाही रौनक च्या घरी मी ग्रुप स्टडी साठी जातो म्हणून सांगून जायचो पण आम्ही तिथे अभ्यास न करता दारू प्याचो घरी आलो कि गुपचूप झोपून जायचो तुम्हला हि काही कळायचे नाही पण आज माझ्या ह्या गुपितामुळे मी फसलो वाढदिवसच्या दिवशी मला त्या कार्यक्रमात रस नव्हता म्हणून मी बाईक वरून बाहेर पडलो मला तिथे एक बार दिसला मी आत गेलो आणि प्यालो आणि मग लक्षात आले कि मला हॉल मध्ये असायला हवे म्हणून मी फास्ट आलो आणि एका सामसूम असलेल्या जागेवर येऊन पडलो आणि मग मला काहीच आठवत नाही मॉम बाबा  आजी आजोबा सॉरी मी चुकलो मी असे वागायला नको होते "

हे ऐकून अनिरुद्ध म्हणाला "खूप लवकर तुला कळले तुझी अवस्था पाहता त्या दिवशी जर तो दुकान वाला तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन आला नसता ना तर आमची आज काय अवस्था असती ना ते विचार करून हि मला खूप त्रास होतो "

"अनिरुद्ध जे झाले ते झाले आता उगीच राग राग नको करूस "

"नाही आजोबा बाबाला रागवण्याचा हक्क आहे आणि जे तो बोलला ते मला वाईट वाटले नाही पण बाबा तू म्हणतोस कि मला तिथे असलेल्या दुकानवाल्याने हॉस्पिटल मध्ये आणले पण  मी जिथे पडलो तिथे चार हि बाजूनी झाडे होती हे माझ्या लक्षात आहे "हे ऐकून आजोबा म्हणाले "देव तारी त्याला कोण मारी "

"हो बरोबर बोललात तुम्ही देवाची कृपा होती म्हणून आपला सोहम आपल्या समोर आहे बाळा आता परत अशी परिस्थिती कधी आपल्यावर येऊ देऊ नकोस "

"नाही आजी मी जे अनुभवले आहे आणि मला जे त्यांनी समजावले आहे ते मी कधीच विसरणार नाही "

"त्यांनी म्हणजे कोणी बाळा "?

"हो बरोबर बोललात तुम्ही देवाची कृपा होती म्हणून आपला सोहम आपल्या समोर आहे बाळा आता परत अशी परिस्थिती कधी आपल्यावर येऊ देऊ नकोस "

"नाही आजी मी जे अनुभवले आहे आणि मला जे त्यांनी समजावले आहे ते मी कधीच विसरणार नाही "

"त्यांनी म्हणजे कोणी बाळा "?

"स्वामींनी स्वामी समर्थानी "

सोहम च्या तोंडून स्वामी समर्थाचे नाव ऐकून आजी आजोबा चकित होत म्हणाले 

"स्वामी समर्थ "?

"हो आजी आजोबा मी तुमच्या समोर त्याच्यामुळेच आहे मी शुद्धीवर येण्याअगोदर त्या दिवशी माझ्या स्वप्नात एक प्रकाशाची झोत आली आणि त्यातून एक व्यक्ती मला पुढे येताना दिसली ती व्यक्ती माझ्या जवळ येऊन बसली त्यांनी माझा हात हातात पकडला आणि मला आवाज दिला "सोहम उठ बाळा हि तुझी झोपण्याची वेळ नाही असे झोपून राहून काहीही होणार नाही आता तर तुला काही तरी करून दाखवण्याची वेळ आहे उठ बाळा उठ असा निशब्द नको पडून राहूस बाळा उठ "त्यांचा  तो आवाज माझ्या कानापर्यंत असा घुमला कि मी क्षणात डोळे उघडले आणि पाहतो तर स्वामी माझ्या जवळ बसले होते मी त्यांना पाहत चकित होत म्हण्टले "तुम्ही तेच ना आजोबांचे स्वामी तुम्ही इथे कसे ?

"ते हसत हसत म्हणाले "हो हो मी तुझ्या आजोबाचा स्वामी मी इथे कसा का हे न विचारता मी इथे का आलो हे महत्वाचे आहे "?

"म्हणजे "?

"बाळा तुझा अपघात झाला डोक्याला मार लागला गेले आठ दिवस तू इथे असा बेशुद्ध अवस्थेत आहेस बाहेर तुझे आई बाबा आजी आजोबा तहान भूक विसरून फक्त तु शुद्धीवर येण्यासाठी डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहे तुझा अपघात तू गाडी जलद चालवली म्हणून झाला पण तुझ्या अपघाताला तू नशेत हि होतास हे मुख्य कारण आहे ह्या वयात चांगला अभ्यास करून आपल्या आई बाबाचे आजी आजोबांचे नाव मोठे करायचे सोडून तू ह्या नशेच्या आहारी कसा केलास ?दारू पिणे हि काही चांगली गोष्ट नाही आहे तुझे आई बाबा तुझे चांगले भविष्य घडवावे म्हणून रात्र दिवस एक करून परदेशात नोकरी करत आहेत तूला काही कमी पडू नये ह्यची ते काळजी घेत आहेत आणि तू दारू पिऊन त्याच्या स्वप्नावर पाणी फेरत आहेस "

"त्याचे सोडून दे रे पण दारू पिणे हि आजकालची फॅशन आहे असे तुला वाटतं असेल पण त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम किती असतो हे न समजण्याएव्हडा तू नाही आहेस तुझे बाबा हि परदेशात राहतात पण त्यांनी कधी हि दारूला स्पर्श हि केला नाही हा त्याचा मोठेपणा आहे तुझे आजी आजोबांचे संस्कार तुझ्या बाबांनी टिकून ठेवले हे महत्वाचे आहे "

"तुझे आजी आजोबा हि दोघे हि भली माणसं कोणाचे हि वाईट न करता सगळ्यांना मदत करण्यात ती पुढे असतात त्यांना ह्या उतार वयात तुला ह्या अवस्थेत पाहताना किती यातना होत असतील "

"तू म्हणशील कि तुझे आजी आणि आजोबा स्वामी स्वामी करत असतात म्हणून मी त्याचे गुणगान गातोय तर नाही तुला एक गोष्ट सांगतो एक व्यापारी होता त्याने आपल्या दुकानात घरात माझा मोठा फोटो लावला होता सकाळी १ हजार वेळी नामजप करी स्वतःला स्वामीभक्त म्हणत असे पण त्याची वागणूक मात्र विचित्र होती घरात्याला लोकांशी व्यसायातल्या कामगारांशी उद्धटपणे वागणे दारू पिणे व्य्सय्यात हि ठगबाजी करणे एक दिवशी त्याच्या ह्या ठगबाजीने त्याला पोलीस कोठडी दाखवली  आणि त्याची असलेली प्रतिष्ठा धुळीस मिळाली मग मात्र तो मला दोष देऊ लागला मी तुमचे एवढे करायचो मला का नाही वाचवले पण बाळा मला तू सांग अश्या माणसाला मी का वाचवू तो भले हि माझे नाम जप करत होता पण एक माणूस म्हणून तो योग्य नव्हता तुमची भक्ती निखळ असायला हवी मन निर्मळ हवे मग तुम्ही माझे नाव दिवसातून एकदा का घेईना दिवसभर नामजप करून जर वाईटच करणार आहात तर असली भक्ती कशाला हवी "

"सोहम मी तुला हे सांगतो कारण तुझे आताचे वय वाहत्या वाऱ्यासारखे आहे ज्या दिशेने जास्त वारा असेल तिथे ते वळेल पण येणारे वारे म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला सामोऱ्या जाणाऱ्या गोष्टी कुठल्या आपल्यासाठी चांगल्या आहे आणि कुठल्या वाईट ह्याची पारख तू करणे गरजेचे आहे तू तुझ्या आई बाबा पासून दारू पिणे लपवले तुला काय वाटले त्यांना कधीच कळणार नव्हते पण एका वाईट प्रसंगातून हे सगळ्यांसमोर आले तुझे आई बाबा आजी आजोबा हयांना तर हा धक्काच बसला असेल बाळा विचार कर आज तुला काही झाले असते तर तुझ्या आई बाबाची आजी आजोबाची अवस्था काय झाली असती अरे तू एकुलता एक त्याचा आधार आहेस ते जगून हि मेले असते त्यामुळे भविष्यात असे काही करू नकोस ज्यांनी त्यांना आणि तुला स्वतःला त्रास होईल आता लवकर बरा हो परदेशात जा चांगला अभ्यास कर आपले भविष्य घडव मी तुझ्या सदैव पाठीशी असेन एवढे सांगून स्वामी दिसेना से झाले "

हे ऐकून सगळेच चकित झाले  आजोंबा म्हणाले "काय स्वामींनी तुला दर्शन दिले खूप नशीबवान आहेस तू सोहम बाळा स्वामींनी तुला जगण्याचा उपदेश दिला तो कधीही विसरू नकोस "

"नाही आजोबा मी कधीही विसरणार नाही मला तुमचे शब्द आठवतात स्वामींना आपली नाही आपल्याला स्वामींची गरज भासते खरे आहे मी त्या दिवशी त्याच्या मठात जाण्यास नकार दिला पण माझ्या गरजेमुळेच मी मठात पोहचलो माझ्या मनात नेहमी येत असे कि काय हे आजोबा स्वामी स्वामी करत असतात पण आता कळले स्वामी अनुभवातूनच जाणवतात आजोबा आजी मॉम आणि बाबा आज पासून मी शब्द देतो मी असे काही वागणार नाही ज्यांनी तुम्हला आणि स्वतःला त्रास होईल "

त्याचे समंजस असे बोलणे ऐकून सगळ्याचे डोळे पाणावले ते पाहून सोहम म्हणाला "आजोबा उदयपासून रोज मी इथे असे पर्यत आपण सोबत मठात जाऊ आणि हो आजोबा मला परदेशात घरी स्वामींची मूर्ती पण बसवायची आहे "

"हो हो आपण उद्यापासून नक्की जाऊ आणि स्वामीची मूर्तीना तू नक्कीच इथून घेऊन जा स्वामी आमच्या लग्नाचा वाढदिवस अनिरुद्ध चे सह कुटूंब इथे येणे सोहम चा अपघात त्यातून त्याला मिळालेली हि शिकवण स्वामी तुमची कृपा अगाध आहे बोला स्वामी समर्थ महाराज कि जय !! 

 

******************************समाप्त ********************************************************