2. मला जगायचे आहे.....🥺
आई sss बाबा sssss.... बघा मी कॉलेज मधे यावर्षी सुध्दा टॉप केलय..... आई ssss बाबा sssss
तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती.... गरिबीतून शिक्षण घेऊन खूप कष्टाने तिने टॉप केलं होतं.... गरीब पण सुखी आनंदी कुटुंब होत तिचं . आई बाबा एक छोटा भाऊ आणि ती.... मुक्ता
"पोरी आयुष्याचं सोनं केलीस ग आज. अशीच मोठी हो खूप प्रगती कर.....!" मुक्ता ची आई
"मुक्ता... पोरी माझ्या कष्टाचं चीज केलंस ग तू ...!"
तिचे बाबा म्हणाले
आताच तो पाटलाचा पोरगा सांगत होता तुमची लेक लय हुशार आहे कॉलेजात पाहिली आली ती...अग साऱ्या गावाने अभिनंदन केलय तुझ ..... बाहेरून आलेले तिचे बाबा ओले डोळे पुसतच तिला बोलले....
लय मोठ्ठी हो ..... लय शाळा शिक..... काय बी काळजी करू नको तुझा बाप तुला काय कमी पडू द्यायचा नाही बघ..... तिच्या बाबांनी बोलतच तिला जवळ घेतले
आपल्या बाबांच्या सुरक्षित कुशीत ती .... खुप खुश होती... तीला काय माहीत तिच्या आयुष्यात एक वादळ येणार होते.....जे तीला मुळापासून हादरून टाकेल...... विकास 😈
दुसऱ्या दिवशी,
"अग ए..... मुक्ता गेली का कॉलेज ला ?"... तिचे बाबा तिच्या आईला म्हणाले
"होय मगाशीच गेली!" तिची आई
"आहो sss मी काय म्हणते..!"
"हम्म काय झाल ? "तिचे बाबा
"वन्स चा फोन आला होता! "..... उद्या यायचं म्हणतात त्या तुम्ही उद्या घरी थांबा ह.... तिची आई
"ताई येणारं...अशी अचानक कशी ग ... सगळ ठिक असेल ना ?" ते जरा काळजीत पडले
"उद्या बघूच की तूम्ही काळजी करु नका!" .... तिची आई
उद्याच्या सकाळी,
"आत्या कशी आहेस कित्ती दिवसातून आलीस ग तू!"... मुक्ता
"मी बरी आहे तु कशी आहेस आणि माझा तो लाडका दिपू कुठाय ग दिसत नाही ?" आत्या इकडे तिकडे पाहत बोलल्या
आत्या तू ज्याला शोधतेस ना....तो गेला ...क्रिकेट खेळायला आता संध्याकाळ पर्यंत येतं नाही बघ तो....... मुक्ता हसतच आत्याला सांगू लागली
यावर सगळेच हसतात 😄😄😄😄
चहा पाणी झाल्यावर...... तिचे बाबा आई आणि आत्या व ती बैठकीत बसलेले असतात
"ताई सगळ ठिक आहे ना ग ?".... तिच्या बाबांनी विचारलं
हे बघ दादा मी जरा स्पष्टच बोलते. माझ्या नवऱ्याचा स्वभाव तर माहीतच आहे तुला...
जाऊ दे सोड....... काल माझ्या सासूबाई नी माझ्या मोठा मुलगा शरद साठी त्यांच्या नात्यात ते एक स्थळ काढले आहे. माझी चुलत नणंद आहे तीच्या भावाची मुलगी
"खरच आत्या शरद दादा च लग्न!"....... मुक्ता आनंदून बोलली
आहों वन्स मग चांगल आहे की त्यात काळजीचं कारण काय आहे..... मुक्ता ची आई म्हणाली
एक मोठा श्वास घेत आत्या बोलली..... माझ्या मुलाचे लग्न आणि माझा संसार आता फक्त तुम्हा तिघांच्या हातात आहे.....
ताई अस का बोलतेस... त्यात आम्ही काय करणार.... तिचे बाबा बोलले
माझ्या नणंदेणे लग्नाची एक अट ठेवली आहे.... आत्यानी सांगितले
"लग्नाची अट.... कसली अट?" मुक्ताने विचारलं
इकडे मुक्ताच्या आई बाबा च्या काळजात वेगळीच भिती दाटून आली....😱
ताई जे असेल ते स्पष्ट बोल.... तिचे बाबा बोलले
त्यानी त्याच्या एकुलत्या एक मुलासाठी आपल्या मुक्ताचा हात मागितला आहे.........
काहीवेळ तिथे भयाण शांतता पसरली...... मुक्ताच्या डोळ्यातून एक चुकार अश्रू बाहेर पडलाच 🥺 तिच्या स्वप्नांची चीता तिच्या डोळ्यांसमोर जळत होती.
तिला तिच्या आत्याचा स्वभाव चांगलाच माहित होता. स्वतःच खर करायला ती कोणतीही पातळीला जाऊ शकते... इतक तिला चांगलच ठाऊक होत.
ती आशेने तिच्या आई बाबा कडे पाहतच होती की इतक्यात,
हे बघ दादा वहिनी नकाराचा प्रश्न येतच नाही मुळगा शहरात चांगल्या नोकरीला आहे घरात फक्त आई आहे खूप श्रीमंत आहेत ती लोक.... आणि ते मुक्ताला पुढे शिकायला ही पाठवणार बोललेत.... माझ्या नवऱ्याने चांगली कसून चौकशी केली आहे.... कुठेच कमी नाही..... राज करेल आपलीं मुक्ता तिथे....... आत्या एका श्वासात बोलून रिकाम्या झाल्या.
माझ्या सासूने धमकी दिलीये मला जर हे लग्न झाले नाही तर माझा नवरा मला सरळ घटस्फोट देईल म्हणाल्या त्या.........आणि ते तर आधीच आईच्या पदराला बांधून आहेत........आता माझा संसार तूच वाचवू शकतोस दादा......समोरचा टेबल वरील पाण्याचा ग्लास आपल्या पोटात रिकामा करुन त्या डोळ्यातून पाणी काढत मुक्ताच्या बाबाचे पाय धरण्याचे नाटक करत रडतच बोलल्या .....
वन्स..... वाईट वाटून घेऊ नका... पण माझी पोर अजुन लहान आहे तिची शिकण्याची इच्छा आहे. एकुलती एक लेक आहे आमची अस कसं दुसऱ्याच्या पायात तिचं वाटोळ करु मी ..... मुक्ताची आई जरा रागातच बोलली
मला पटतय तिचं ताई..... अग हा काय ? बाहुला - बाहुली चा खेळ आहे का ग अस कस माझ्या काळजाचा तुकडा कोणा अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ... तिचे बाबा जरा कठोर शब्दात बोलले
म्हणजे आम्ही तुमचं कोणीच लागत नाही का? माझा नवरा काय खोटं बोलेल काय? मी काय तिच्या वाईटावर आहे का ...... आत्या रागाने लालबुंद होऊन बोलल्या
ताई अग ऐक! ..... तसं काही नाही उगाच गैरसमज करून घेऊ नकोस... तिचे बाबा बोलले
ते काही नाही ह्या स्थळाला होकार दे नाहीतर..... मी इथेच माझ्या आई बापाच्या घरात गळफास लावून घेते..... काय उपयोग आहे माझा नवऱ्याने सोडल्यावर जगून तर काय करू मी.... रडत ओरडत... आत्या जवळच पडलेली शेताच्या समानातील दोरी घेऊन आतल्या रूम मध्ये धावल्या आणि दार बंद केले.......
आणि अचानक एक मोठा आवाज ऐकून तिथं खळबळ माजली......😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱
क्रमशः
आता काय होईल मुक्ताच्या आयुष्यात ❓काय तिचे शिक्षण पूर्ण होईल की या समाजाच्या नियमाप्रमाणे फक्त चूल आणि मुल यातच ती अडकून पडेल❓ पाहूया पुढच्या भागात,
©®. Priyaa pujari
#💞_KiYa _💞