विक्रम आणि वेताळ जीवन: अनेक प्रश्न चिन्हे 2 राजा विक्रमादित्य काही क्षण तसाच चालत राहिला." राजा आज तू पहिल्यांदाच हरलास वाटत. तूझी बुध्दी काम देत नाही का?राजा विक्रमादित्याने उजव्या हातातील तलवार वर करून वेताळाला शांत राहण्याचा इशारा दिला."ऐक, वैशाली दळवींनी ना आत्महत्या केली ना त्या कुणासोबत पळून गेल्या किंवा ना त्यांचा खून झाला नाअपहरण झाले."" राजा, तू हे एवढ्या आत्मविश्वासाने कसं म्हणू शकतोस. मग त्या कुठे गेल्या?"" सगळं सविस्तर सांगतो. अगदी शेवटी सोमवारी तिने भिंतीवरच्या पतीच्या फोटोला चाफ्याच फुल घातले होते. हा तिचा नेहमीचा नित्यक्रम होता.तिचं आपल्या पतीवर प्रेम होतं.तिच्या मनात इतर कुणाबद्दल ही आकर्षण नव्हते. शिवाय त्या दोघा वासनांध नराधमांना तिने ज्या प्रकारे उत्तरे दिली होती त्यातून ते कळत. पतीने विकत घेतलेली जमीन ती त्यांची आठवण म्हणून कोणत्याही परिस्थितीत विकायला तयार नव्हती. पळून गेली असती तर किमान आपल चप्पल घालून गेली असती.मोबाईलमुळेलोकेशन कळलं असतं पण चप्पलांचा काही संबंध नव्हता."" वा राजा, तुझा तर्क अगदी बरोबर आहे."" ती आत्महत्या करणेही शक्य नाही तिने तिघा निर्दयलांडग्यांशी वर्षभर लढा दिला होता. ती असहाय्य होती पण भित्री नव्हती. तिचं अपहरण झालं नव्हतं कारण घरात कुठेही झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या.दारव्यवस्थित ओढून घेतलेलं होत.अपहरण करणारे लवकर तिथून निघण्याच्या नादात दार एवढं व्यवस्थित ओढून घेणे शक्य नाही."" एकदम बरोबर .मला हे पटलं."" तिचा खून झाला नसावा...कारण खून फक्त एकच माणूस करु शकत होता तो म्हणजे मंगेश मस्के! पण त्यांच्या विरोधात ती एकदा पोलिसांत गेली होती.त्यामुळे खून झाला असता तर पहिला संशय त्याच्यावरच घेण्यात आला असता. तेंडुलकर खून करणे शक्य नाही त्याचे पैसे त्याने मिळणार नव्हते उलट बुडणार होते.श्याम मेस्त्रीची नजर तिच्या शरीरावर होती तो ही तिला मारणे शक्य नव्हते."" राजा !मस्के, तेंडुलकर व मेस्त्री यापैकी सगळ्यात नालायक माणूस कोण आहे?"" निःसंशय श्याम मेस्त्री! बाकी दोघे जमीन किंवा पैश्यासाठी तिच्या पाठी लागले होते.पण श्याम हा तिचा पूर्वाश्रमीचा प्रेमी होता.त्याने तिचा विश्वासघात केला होता.ऐनवेळी त्याने तिला लग्नाला नकार दिला होता .पण एवढ्या वर्षांनंतरही तो तिच आयुष्य उद्ध्वस्त करु पाहत होता. ज्याच्या खांद्यावर तिने कधीकाळी विश्वासानेमान ठेवली होती तोच तिची मान कापू पाहत होता.मला वाटत त्याने अजूनही काही उचापती केल्या असाव्यात."" राजा,तूझ्या बुध्दीला आणि तर्कशुद्ध विचारसरणीला तोड नाही."वेताळ खूष होत म्हणाला." पण मग ती कोठे होती व का?"" मला वाटतं वैशालीने त्या रात्री थंड डोक्याने विचार केला असावा . या तिघांशी एकट्याने लढत शक्य नव्हते.मस्के अत्यंत प्रभावी इसम होता.तेंडुलकर जवळ कर्जाची कागदपत्रे होती.तर श्याम जवळ तिचे जुने फोटो होते.या सगळ्यामुळे पोलीसात जाणे शक्य नव्हते.पण जर त्यांची परस्पर पोलीस चौकशी झाली असती तर ते तिला हवंच होतं.यासाठी तिने गायब होण्याचा ठरवलं.तिच्या मुलाने व भावाने तिला अपेक्षित होतं तेच केलं ते पोलीसात गेले.ती निश्चित घरातच होती व ती बेडरूम मध्येच असावी तिथे एखादं तळघर असावं.मला वाटत इन्स्पेक्टर धोंड यांनी ते शोधलं असावं."" सुंदर!! अप्रतिम!"वेताळ खूष होत हसला. " राजा, पुढे काय घडलं ते मी सांगतो ऐक...." इन्स्पेक्टर धोंडांनी दोन दिवसांतच सगळं प्रकरण उलगडले. त्यांनी प्रथम त्या तिघांची चौकशी केली.तेंडुलकर याला त्यांनी प्रथम पठाणी व्याजाने पैसे देतो या आरोपाखाली अटक करुन तुरुंगात टाकलं.श्याम मेस्त्री यांचा शेवटचा कॉल ऐकून ते संतापाने बेभान झाले.त्याला त्यांनी थर्ड डिग्री देताच तो भडाभडा सगळं ओकला. तो कर्नाटक धारवाड येथे राहत होता.पण विस वर्षांपूर्वी त्याने सावंतवाडीत स्वतःच टू व्हीलरच गॅरेज घातलं होतं. तो कुशल मॅकेनिक होता.त्याच गॅरेज जोरात चालत होतं.अश्यातच वैशालीशीत्याची ओळख झाली.त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.पण आपण पळून जावून लग्न करूया असा सूर वैशालीने लावताच त्याने तिला झिडकारून धारवाडला पलायन केले.पण दिड वर्षांपूर्वी त्याने पुन्हा मुंबई गोवा हायवेवर गॅरेज घातलं होत.धोंडांनी त्याच्याकडेचे फोटो व निगेटिव्ह मिळवली.त्यांनी ब्लॅकमेलच्या आरोपाखाली त्याला अटक केली.मंगेश मस्केला पोलीस चौकशीला बोलवताच धोंडाना ऐकून तिने फोन आले.त्यात दोन राजकरण्यांचे होते तर एक वरीष्ठ पोलिस अधिका-याचाहोता.पण त्यांनी कुणालाच भीक घातली नाही.इन्सपेक्टर धोंड यांना राहून राहून वाटत होतं की मेस्त्री व मस्के यांचा काहीतरी संबंध असावा. नंतर त्यांनी वैशाली नेमकी कुठे असावी याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.विशाल व त्याचा मामा यांच्याकडून काहीच माहिती मिळत नव्हती.ते पुन्हा वैशाली दळवींच्या घरात गेले.त्यांना ते बेडरूम मधले कपाट खूप संशयास्पद वाटल.काल ते बेडवर बसले होते तेव्हा एक वेगळाच आवाज फरशीचा आला होता.त्यांनी त्या बाजूचा बेड आत ढकलला.तो सोफा कम बेड होता. मोकळ्या जागेतल्या फरश्या ठोकून बघताच त्यांना त्या खाली पोकळ जागा असल्याचं जाणवल.निश्चितच खाली पोकळ भाग होता.त्यांनी याबद्दल विशालला विचारले पण त्याला असं काही आहे किंवा असावं याची कल्पना नव्हती.धोंडानी भिंतीवरची सगळी बटन दाबून बघितली पण काहीच घडले नाही. अचानक त्यांच लक्ष कपाटात मागच्या वितभर रूंदीच्या मोकळ्या जागेत गेलं.तिथे एक छोटा बटन होता.तो बटन दाबताच सुरूवातीच्या दोन फरश्या झरकनआत दुमडल्या गेल्या.विशाल व त्याचा मामा आवक् होत पाहतच राहिले. धोंड त्वरित खालच्या छोट्या पाय-या उतरले.एकूण पाच पायऱ्या होत्या.खाली दहा बाय दहाची खोली होती.तिथे एक छोटं टेबल...एक खुर्ची..टेबल लॅम्प...लिखाणाचं साहित्य होत.समोर एका माणसाचा फोटो होता.कदाचित तो वैशालीच्या पतीचा असावा. खुर्चीवर वैशाली पाठमोरी बसली होती." वैशालीताई तुम्ही हे पाऊल का उचलले?"" साहेब माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.लपून राहणं हेच योग्य वाटलं मला." ती वळत म्हणाली.इन्स्पेक्टर धोंड हसले." पण हे तळं घर?"" त्यांनी मुद्दाम तयार केलं होतं.ते साहित्यिक होते.त्यांना शांतता व एकांत लागायचा. त्यांचा मूड लागला की ते इथे यायचे दिवसभर इथेच लिहित राहायचे.मला सुध्दा खाली जायची परवानगी नव्हती."" तुमच्या मुलाला माहिती नव्हती?"" नाही.तो पुण्याला गेल्यावर ही रुम तयार करून घेतली होती.सोमवारी,एक वर्षांनंतर मी इथे आले. इथं त्यांच्या आठवणी आहेत."धोंडांनी मेस्त्री कडून जप्त केलेले फोटो व नेगेटिव्ह वैशाली कडे दिले. " लवकरच, हे नष्ट करा. माझ्याजवळ त्यांचे कॉल रेकॉर्डींग आहे ते पुरेसे आहे."" खरं तर मी माझ्या गतआयुष्याबद्दल त्यांना सांगितले होते पण मला विशालला काय वाटेल याची भिती होती."" तुमच्या पतीचा अपघात कसा झाला?"" मोटरसायकलचे ब्रेक्स फेल झाले होते.उताराला असताना समोरून एक कार आली व गाडी सावरायच्या नादात त्यांची कारला जोरदार धडक बसली."" काय कोण चालवत होता."" विश्राम सामंत.. म्हणून कुणीतरी होता."अचानक धोंड चमकले.विश्राम सामंत पूर्वी मंगेश मस्केंकडे ड्रायव्हर होता." तुमचे पती कुठच्या गॅरेज मध्ये त्या दिवशी गेले होते काय?"" बाहेर पडताना ते म्हणाले होते...गाडीची चेन लूज झालीय जाताना गॅरेजमधून ती घट्ट करूनच जाईन." " वैशाली ताई तुमच्या पतीचा अपघात नाही तर खून झालाय आणि हे प्लानिंग मस्के व मेस्त्री यांच असावंती फाईल मला नव्याने ओपन करावी लागेल."धोंड साहेब म्हणाले.एवढं बोलून वेताळ थांबला." राजा,तू अगदी बरोबर ओळखले होते.त्या मेस्त्रीने वैशालीच्या पतीच्या खूनात गाडीचे ब्रेक सैल करूनमस्केला मदत केली होती.त्यानेच मस्केला सूचना दिलीहोती .मग मस्केने विश्राम सामंतला त्या मार्गावर पाठवलं.मस्केला जमीन पाहिजे होती तर मेस्त्रीला वैशाली पाहिजे होती.पण आता तू बोलल्यामुळे अट मोडली गेलीय.हा बघ मी चाललो." वेताळ अजब किंकाळ्या फोडत पुन्हा प्रेतासहित झाडाकडे उडत गेला.-----*****-------*****------******------****समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026