Vikram aani Vetaal - 1 in Marathi Crime Stories by Balkrishna Rane books and stories PDF | विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 1

Featured Books
Categories
Share

विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 1

विक्रम आणि वेताळ जीवन- अनेक प्रश्नचिन्हे( रहस्य कथा)    धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला होता.त्या काळ्या कुट्ट काळोखात आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेक चित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला..." राजा, तुझे कौतुक करू की कीव करू ते कळत नाही.गेले कित्येक शतके तू आणि मी हा खेळ खेळत आहोत.ना तू थकलास ना मी. आता एकविसाव्या शतकात आपण तेच करतोय.तुझे मनोरंजन होण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो...ऐक..           कोकणात एक प्रांत आहे कनकनगरी. या कनकनगरीच्या अलिकडे महामार्ग लगत गोव्याच्या दिशेनेजाताना उजव्या बाजूला एक घर आहे.घर छोटे पण सुंदर आहे.घरच्या आसपास दहा ते बारा गुंठे होतील एवढी मोकळी जागा आहे.या घरात वैशाली दळवी ही विधवा महिला राहत असे.तिचा मुलगा शिक्षणासाठी पुणे इथे राहत होता. विशाल दहावी झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी पुण्याला ठेवले होते. श्रीमती दळवी त्या दिवशी  रविवार असल्याने घरीच होत्या.सकाळचे दहा वाजले होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.त्रासिक चेहरा करत त्यांनी दरवाजा उघडला.समोरचा माणूस बघताच त्यांच्या कपाळावर आट्यांच जाळ उमटले." तुम्ही पुन्हा का आलात?"" आत तर येऊ द्या." तो इसम अशा आवाजात बोलला की त्या आपोआप बाजूला झाल्या.दळवीचीची परवानगी न घेताच तो सरळ खुर्चीवर बसला." मी हजार वेळा सांगितलय की मला ही जमीन विकायची नाही म्हणून." दळवी रागात म्हणाल्या.समोरचा माणूस फक्त हसला." हे बघा तुम्ही इथून निघा. "" बाई,तुम्हाला पैश्यांची गरज आहे. मला माहित आहेतुमच्या डोक्यावर कर्ज आहे. मागच्या वेळी मी एक कोटीम्हणालो होतो.आता  एक कोटी पंचवीस लाख व ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट देतो."" मी शेवटच सांगते...निघा इथून माझ्या नवऱ्याने विकत घेतलेली ही इस्टेट मी विकणार नाही."तो माणूस शांतपणे उठला." पुढच्या वेळी मी कागदपत्रे घेऊन येईन.तुम्हाला फक्त सही करायची आहे.तुमचा एकुलता एक मुलगा पुण्याला असतो नाही का? " त्याच्या वाक्यात एक जहरीपण होता.दळवीबाई शहाऱल्या. अरे देवा, नेमके काय सुचवायचे आहे याला?तो माणूस दार ओलांडून गेला सुद्धा.दळवीबाई विचारात पडल्या.त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन केला." विशाल .. ऐक कॉलेजला जाता येता एकटा जाऊ नकोस. उगाचच बाहेर फिरू नकोस."" का ग?"" अरे सध्या पुण्यात जे काही घडतंय ते भयानक आहे...भरदिवसा रस्त्यावर खून होतायेत म्हणून सांगितलं."" उगाच काळजी करू नकोस ! परवा माझा शेवटचा पेपर आहे.दुसऱ्याच दिवश मी येणार आहे." दळवीबाईंनी  खरं काय ते मुलाला सांगितलं नाही.उगाच तो काळजीत पडेल.शिवाय त्याची परीक्षा चालू होती.पण मंगेश मस्केनी अप्रत्यक्ष धमकी दिली होती की तो तिच्या मुलाच बर वाईट करू शकतो अशी. विशाल हा तिच्या जगण्याचा आधार होता.त्याच काही बरं वाईट झालं तर ?या कल्पनेनेच तिचे हात पाय थरथरू लागले.तशी ती दिवसभर अस्वस्थ होती.नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात येत होते. मंगेश मस्के हा परिसरातला नामवंत बिल्डर होता. अनेक राजकीय माणसांशी त्याचे लागेबांधे होते.शिवाय त्याच्या सोबत नेहमी गुंड असत.एखादी जमीन त्याच्या नजरेत भरली की तो ती येनकेन प्रकारे ताब्यात घ्यायचा.गेले तीन चार महिने तो वैशालीदळवींच्या जमिनीसाठी प्रयत्न करत होता.तिने पोलिसांकडे तक्रार केली होती.पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. दुपारी जेवल्यावर त्या झोपल्या.काही वेळ गेला आणि पुन्हा बेल वाजली.त्या दचकल्या.पुन्हा मस्के तर आला नाही ना? या विचाराने ती थरारली. ती थरथरत दाराजवळ गेली. दरवाजा उघडला. समोर महेश तेंडुलकर उभा होता." अरे देवा, आता दुसरा नराधम आला तर!" तीमनातल्या मनात पुटपुटली."  दळवी बाई, ओळखले काय? बाकी आमच्या सारख्या गरिबाला कुठे लक्षात ठेवता म्हणा तुम्ही !"त्याची नजर तिच्या शरीरावरून गिधाडं सारखी फिरत होती. तिला ती नजर असह्य झाली." तेंडुलकर साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं की चार दिवसांनी या म्हणून...अजून पैसे मिळाले नाहीत."" बाई,तुम्ही फक्त व्याज देत आहात.दीड लाख मुद्दल तसंच आहे."" थोडा वेळ द्या मला.मुलाच्या शिक्षणासाठी तुमच्या कडून कर्ज घेतलं .ते मी फेडणारच."" वेळ पाहिजे , देईन , थोड माफही करू पण...जेव्हा तुम्ही हे तुमचे वैभव मला ..." तो तिच्या भरदार शरीराकडे हात करत म्हणाला." खबरदार ! पुन्हा अस बोलाल तर! निघा इथून .लवकरचतुमचे पैसे तुम्हाला मिळतील."तिने रागाने दरवाजा बंद केला." पैसे तर मिळविणच आणि तुम्हाला पण सोडणार नाही."त्याचे ते विखारी शब्द तिच्या कानी पडले.    एका एकट्या विधवा बाईला जगणं किती अवघड असत हे गेले काही काळ तिला समजले होते. ती दिवसभर बाहेर पडली नाही.दरवाजा सुद्धा आतून बंदच ठेवला. आता कोणासाठीही दरवाजा उघडायचा नाही असे तिने ठरवले. एका वर्षांपूर्वी तिचा नवरा एका अपघातात वारला होता.तो एका खासगी बँकेत नोकरीला होता. तो कवी व लेखकही होता.आता ती शिवणकाम करणे. मेहंदी काढणे तशेचछोट्या कार्यक्रमांचे नियोजन करणे हे काम करत होती.अजून पर्यंत तिने अनेक संकटांना तोंड दिले होते.पण आज तिला खूपच थकल्यासारखे वाटत होते.रात्री थोडीखिचडी खाऊन ती झोपायला बेडरूम मध्ये जाणार तेवढ्यात तिचा फोन वाजला तिला वाटलं विशालने फोन केला असेल तिने फोन उचलला." वैशू ,अग तू मला विसरलीस. फोन पण उचलत नाहिस."तिला वाटलं आजचा अख्खा दिवस तिच्यासाठी पाठीवर पनवती घेऊन आलाय." हे बघ श्याम, मी मागच्या वेळी तूला स्पष्टपणे सांगितले आहे.तू माझ्या जीवनात पुन्हा डोकावू नकोस म्हणून."" अरे व्वा! असं कसं होईल .कधी काळी तू माझ्या शिवाय राहू शकत नव्हतीस,आठवतय ?आपण प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या."" हो.पण तो माझा मूर्खपणा होता. तूझ्या सारख्या पळपुट्या ... ऐनवेळी अंग काढून घेणा-या माणसावर मी कधी काळी प्रेम केलंय याचा आयुष्यभर पश्चात्ताप होईल मला.तुझी सावलीही मला आता सहन होत नाही.घृणा वाटते तूझी."" तूझा शोध काढत मी गेल्या वर्षी इथे आलो...ते तुला सोडण्यासाठी नाही.तू विधवा आहेस तुला आधाराची गरज आहे. मी तो अधार देईन."" तू नुसता निर्लज्जच नाहिस तर नराधमही आहेस."पलिकडून तो हसला." हे बघ आपल्या दोघांचे गळ्यात गळा घालून काढलेले ते फोटो आजही माझ्याकडे आहेत.तूझ्या मुलाने ते बघितले तर त्याला काय वाटेल?"तो चक्क तिला ब्लॅकमेल करत होता.तिने फोन खाली ठेवला.   आयुष्याच्या अशा वळणावर ती होती की तिचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही तिचा पाठलाग करत होते. ती चारही बाजूंनी घेरली गेली होती.यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता.ती पाय ओढतच बेडरूम मध्ये गेली. तिने स्वतःला बेडवर झोकून दिले.उशीत तोंड खुपसून ती ढसाढसा रडू लागली.--------*****-----****------****-------****---बुधवारी दुपारी विशाल घरी आला.आईची भेट होणार,तिच्याशी खूप गप्पा मारता येतील या विचाराने तो खूष झाला होता.त्याला पेपरही सोपे गेले होते.दरवाजा बंददिसत होता." आई,..आई..." हाक मारत त्याने दरवाजा ढकलला.दरवाजा उघडला." आई...! कुठे आहेस?"पण आतून कोणतीही हालचाल दिसली नाही.आई कदाचित बाथरूममध्ये असेल असा विचार करून तो बॅगबाजूला ठेवून खुर्चीवर बसला.समोर भिंतीवर लावलेल्या बाबांच्या फोटोला त्याने तिथूनच नमस्कार केला.फोटोवर   सुकलेल चाफ्याच फूल दिसत होतं .बाबांची आठवण होताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. अर्धा तास उलटूनहीआई आली नाही तेव्हा मात्र तो विचारात पडला.त्याने पुन्हा हाक मारली तो बाथरूमजवळ गेला त्याच्या लक्षात आले की बाथरूममध्ये कोणीच नाहीय.विशालने घरभर आईला शोधले.तो गच्चीवर गेला.तिथून सगळा परिसर न्याहाळला.पण वैशाली कुठेच दिसली नाही.आता मात्र तो घाबरला.ती कनकनगरीला गेली असेल असा विचार त्याच्या मनात आला.पण मग दरवाजा आतून उघडा होता...तिचा मोबाईल सुध्दा टेबलावर तसाच होता.त्याने सावंतवाडीला मामाला फोन लावला.पण तिथेही ती नव्हती. दिड तासात सूर्यकांत मामा तिथे पोचला.काहीतरी अप्रिय घडलंय हे लक्षात येताच मामा व विशाल पोलिस स्टेशनमध्ये गेले रितसर तक्रार नोंदवली.विशालने आईचा फोटो पोलिसांना दिला.विशालला सारखं रडू येत होते.मामा त्याला धीर देत होता.सायंकाळी कनकनगरीचे पी.एस.आय. संदिप धोंड ,महिला कॉन्स्टेबल प्रिती कोळेकर व हवालदाररानडे घरी आले.धोंड साहेब हे अत्यंत हुषार व स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधिकारी होते. आल्या आल्या त्यांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी सगळ्या घराचे निरीक्षण केले. कुठेही झटापट झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या.त्यांच नेहमीच चप्पल ही जाग्यावर होत. बाथरूम...दोन खोल्या...किचन तपासल्यावर ते बेडरूम मध्ये गेले.बेडवरची चादर  दोन्ही बाजूला ओढल्यासारखी एकत्र गोळा झाली होती बाजूलाच केसांचा रबरही दिसत होता. बेडच्या बाजुला एक मोठं कपाट दिसत होत. धोंड साहेब क्षणभर बेडवर बसले.तेचमकले काहीतरी चुकल्यासारखे त्यांना वाटले. डोकं झटकत त्यांनी बाजूच्या टेबलावर पाहिले.त्याटेबलावरचा मोबाईल त्यांनी ताब्यात घेतला.त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली होती.फोन चार्जिंग करून त्यांनी त्यावरचेकॉल डिटेल्स तपासले.तिन फोन नंबर त्यांना ब-याच वेळ रिपीट झालेले दिसले.अगदी रविवारी रात्री आलेला शेवटचा फोन नंबर त्यांनी नोट केला." कोळेकर या फोनवरच संभाषण तपासावे लागेल वउरलेले दोन फोन कोणाचे आहेत ते बघा."कोळेकरांनी ट्रु कॉलरचा उपयोग करून दोन्ही नंबर कोणाचे आहेत ते तपासले." साहेब,एक फोन मंगेश मस्के व दुसरा महेश तेंडुलकर यांचा आहे."" मस्के म्हणजे तो बिल्डर...पक्का डॅंबिस माणूस आहे. तेंडुलकर म्हणजे पठाणी व्याजावर कर्ज देणारा ज्याच्या बद्दल मागे एक तक्रार आली होती तोच ना?"" होय ,साहेब..आणि मस्केंच राजकीय वजन खूप आहे."रानडे म्हणाले.धोंड साहेब हसले..." असू दे.माझ्या तावडीत सापडला तर त्याला सोडणार नाही. दोघांना पोलीस स्टेशनवर बोलवा.चौकशी करावी लागेल. बरं तिसरा फोन कुणाचा आहे?"" कुणीतरी श्याम मेस्त्री आहे."" ठिक आहे.आपल्या आय.टी.डिपार्टमेंट कडे फोन द्या.पत्ता शोधा..सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाषण काय झाले त्याचे डिटेल्स मिळवा.या श्यामलाही फोन करून स्टेशनवर बोलवा.तिघांना वेगवेगळ्या वेळी बोलवा.तसेच  कुठे एखाद्या अनोळखी स्त्रीचा मृतदेह वैगेरे सापडला आहे का त्याची माहिती घ्या."पोलीसांनी विशाल व त्याच्या मामाला काही प्रश्न विचारले व ते त्यांना धिर देत निघून गेले.------****-------*****------****------****--एवढे बोलून वेताळ थांबला. राजा ,तू ही कथा कितीएकाग्रतेने ऐकलीस ते मी बघत होतो.!तू हुषार आहेत .मग सांग वैशाली दळवीच नेमकंकाय झालं असेल ?तिचा खून झाला,अपहरण झालं कीसगळ्या परिस्थितीला घाबरून तिने आत्महत्या केली?की कुणा दुसऱ्याच्या हात धरून ती पळून गेली ?उत्तर माहित असूनही तू बोलला नाहीस...मौन भंग केले नाहिसे तर तूझ्या डोक्याची शंभर शकलं होतील...हो आणि तू बोललास तर मी नेहमी प्रमाणे पुन्हा झाडावर जाऊन बसेन . वेताळ खदाखदा हसत म्हणाला.------******------******-------****------***भाग १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026