Mukta...??️ - 5 in Marathi Short Stories by sabdhpriyaa books and stories PDF | मुक्ता....??️ - 5

Featured Books
Categories
Share

मुक्ता....??️ - 5

            5. मला जगायचे आहे.....🥺




मागच्या भागात आपण पाहिलं की,

मुक्ता च्या बदललेल्या  रूपाने सगळे  शॉक मधे होते.आता पाहू पुढे काय होणार ते.....





"आई ss..... हिच्या अंगात अचानक काय शिरलं तर नसेल ना म्हणजे भूत वैगेरे!"🤔 



"काही पण बोलू नकोस गप्प बसा... हिला तर वळनावर आणायला मला  जास्त वेळ लागणार नाही. आता प्रश्न त्या येणाऱ्या पाहुण्यांचा आहे. त्याच काय करायचं ते बघ?" त्याची आई गहन विचारत हरवत बोलली.




"अरे या ...या... आत या बसा!" काही त्रास झाला नाही ना पत्ता शोधायला..... नाही म्हणजे माझ्या विकास ला सगळेच ओळखतात , लहान मुलगा सुध्दा सांगेल आमचं घर....  अ .... लाजू नका घ्या चहा घ्या.... आपलच घर समजा .... निसंकोच पने बोला.... आहों...ताई....हे काय अजुन तूम्ही काही घेतलंच नाही घ्या ना ... हॉ ssss (मोठेपणाचा आव आणत उसण्या असलेल्या हसण्याचा आवाज)
आ.. तुम्ही बसा ह मी विकास ला बोलवते.... इतकं बोलून विकास ची आई आत गेल्या.





अरे ये नालायका त्याच्या डोक्यात मारत .... मोबाईल वर गेम काय खेळतोय उठ पाहुणे आलेत चल बाहेर .... काही तरी आठवत अरे ये बाबा... त्या महारोगीला ते दूध पाजलस ना....??



काय ग आई किती... किरकिर करतेस... आणि पिले तिने दूध ...मी होते च तिथे पण काय ग काय होत त्यात...🤨



जास्त शहाणपणा करीत होतीना काल..... आता झोप म्हणावं कुंभकर्णासारखं .... त्या हसतच बोलल्या. चल रे बाहेर चल...त्या विकास ल बाहेर ओढतच घेऊन निघाल्या.



ये आई थांब तो हात झटकत मागे झाला. तु त्यांना माझी अट सांगितली आहे ना. बिन पगारी फुल अधिकारी सारखा तो नसलेली कॉलर उडवत बोलला. इकडे त्याच्या आईनं कपाळावर हात मारून घेतला. 



अरे माझा मुलगा असून अक्कल कशी नाही तुला एक तर दुसर लग्न आहे तुझ आणि तुला नवरीसारखे नखरे सुचतात. 20 तला तरूण नाहीस गाढवा.... एका पोराचा बाप आहेस. चल आलीय होणारी नवरी त्या बडबडत करीत त्याला बाहेर घेऊन गेल्या.



मुक्ताला झोपेची गोळी दुधात टाकून पाजली होती.
आणि घरात आलेले लग्नाचे स्थळ..........
काय होईल पुढे, मुक्ता वाचवेल आपला संसार की, नवीनच रामायण घडणार 🤔🤔🤔🤔



                    (विकास ची आई)



हॅsss हॅsss हॅsss हॅsss (हसण्याचा आवाज) हा माझा मुलगा विकास....

*** नमस्कार....🙏🙏🙏




ते तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. ह्याची पाहिली बायको ..... जरा वेडसर आहे. आणि आता सारखी आजारी असते ना . माझा नातू लहान आहे वो.... त्याचीच काळजी खातेय माझ्या विकास ला बघा ना कसा चेहरा सुकलाय माझ्या लेकराचा...




त्याचवेळी विकास ने अगदी अन्याय पीडित असल्यासारखे तोंड केले होते.



मुलिकडच्या लोकांना ही खोटच सांगितलं होतं पोट फुटेपर्यंत खोटं बोलून रिकामे झाले होते. माय लेक दोघे आणि आता साळसूद पणाचा आव आणत बसले होते.
त्यांचे हे नाटक चांगलेच महागात पडणार होते हे नक्की 🤨🤨🤨🤨




विकास त्याचा आईला खुणावत होता. ते तुम्ही म्हणजे आपल ठरल होत ना मुलीला घेऊन यायचं ते... कुठे दिसत नाही म्हणून विचारले.



अरे तस काही नाही माझी मुलगी आणि मुलगा यायला लागलेत वाटेत आहेत . येतील इतक्यात ते काय आहे माझी मुलगी समाजसुधारक संस्थेत काम करते ना . काय ते.... हा... नारी शक्ति संघटना? मुलीचे वडील बोलले.




इकडे विकास आणि त्याची आई झटका लागल्यासारखे उठून उभे राहिले. दोघांनाही कानात उकळते तेल ओतल्याच्या वेदना होत होत्या. पण अतिशय धीट होती दोघेही.....




आ.... म्हणजे सांगितलं नाही आधी तुम्ही. अचानक हार्ट अटॅक आणला हो तुम्ही.... त्याची आई कसनुस हसत बोलली. 




ते काय आहे माझ्या विकास ल शिकलेली आत्मनिर्भर मुलगी च बायको म्हणून पाहिजे होती. तसे आम्ही काय जुन्या रूढी परंपरा ना मानत नाही.
ह्याच्या पहिल्या बायकोने तरी ह्याला सुख लावले नाही. किती मागे लागलो होतो आम्ही बाई तुझ शिक्षण पूर्ण कर नोकरी कर .पण कुठल काय .. जाऊदे आता माझी ही सुन तरी माझे स्वप्न पूर्ण करेल... होना रे विकास... त्यांच्या आईने त्याच्याकडे पाहिलं..... पण तो...... वेगळ्याच विश्वात भीतीच्या छायेखाली होता. डोक्यात एकच नाव घुमत होते.


          🥶 😵‍💫"नारी शक्ति संघटना" 😵‍💫🥶







टिंग sss टाँग sss दरवाज्याच्या बेलने सर्वांचे लक्ष तिकडे लागले.





अग बाई sss  आली वाटत माझी सूनबाई ssss विकास ची आई धावतच दरवाज्याकडे पळत गेली.
त्यांचा आनंद पाहूनच सगळे पाहुणे मंडळी अवाक झाले. आणि विकास ने कपाळावर हात मारून घेतला. "ही आई पण ना आता काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं !" 🤦






इकडे दरवाजा उघडला आणि त्याबरोबर त्यांना 440 चा करंट लागला. आ केलेले तोंड वाकडे व्हायची वेळ आली. 😱😱😱😱😱😱😱😱😱😱



कपाळावर घाम आणि थरथर कापणारे हात पाय गळ्यावर कोणी तरी चाकू फिरवत आहे अशी अवस्था.........😱😱😱😱😱😱






टणाटण उड्या मारत माझी सूनबाई 💃 माझी सूनबाई करणाऱ्या विकास च्या आईला हार्ट अटॅक का आला असेल????


कोण होत दारात???


होईल का विकास च लग्न??


काय करेल मुक्ता??


 

क्रमशः 



जाणुन घेण्यासाठी वाचत रहा माझी स्टोरी...."मला जगायचे आहे....🥺" ... आणि हो मला फॉलो करायला विसरू नका..... कॉमेंट्स आणि रेटिंग द्यायला विसरू नका .


कहाणी वाचतात तरी सगळे पण ना कमेंट करतात ना रेटिंग देतात, असे करत जाऊ नका. तुमचा प्रतिसाद जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत लिखाणाला चालना भेटत नाही.plz 🙏🙏🙏

©. Priyaa pujari 
           #_KiYa _