❤️फक्त तुझ्याचसाठी ❤️4
आर्यवीर हळूहळू त्या हल्लेखोरांकडे वळला.
तो गुंड अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता.
"तू कोण आहेस?"
त्याने शेवटी विचारलं.
आर्यवीर काही क्षण शांत राहिला.
मग तो हळू आवाजात म्हणाला—
"तुला माझं नाव माहीत नव्हतं... आणि तरीही तू माझ्यावर हल्ला केलास."
आर्य वीर त्या गुंडा समोर हलका वाकला.. आणी त्याच्या कानात कुबुजला...
"Imagine what happens when you know my name."
त्या वाक्यानंतर तिथे शांतता पसरली.
त्याची ती थंड आणी तीक्ष्ण नजर त्या गुंडाचे हृदय थरथरून टाकत होती..
समोर उभा असलेला व्यक्ती फक्त बिजनेस मन न्हवता... तर गुंड ही होता... असा गुंड जो त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचा होता..
आणी या बिझनेस क्षेत्रात फक्त एकच असा होता...
एक माणूस घाबरत कुजबुजला,
"आर्यवीर..."
दुसऱ्याने त्याच्याकडे पाहिलं.
"काय?"
तो हळू आवाजात म्हणाला,
"आर्यवीर खुराणा..."
त्या नावाने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला.
आणी आर्यविरच्या चेहऱ्यावरील डेव्हील स्माईल आणखी डार्क झाली...
"आर्यवीर फक्त नाव न्हवते... तर चालता बोलता शैतान होता...त्याच हे शैतानी रूप कधी तरीच समोर यायच.. पण जेव्हा यायचे.. तेव्हा कोणाची नां कोणाची वेळ भरलेली असायची...
बिझनेस जगतातील बेताज बादशहा...
एका असा व्यक्ती..
ज्याने आजवर कधीच हार स्वीकारली न्हवती...
आर्यवीरने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं.... ते सगळे भीतीने काफत होते...
तो शांतपणे म्हणाला—
"Fear is not my goal."
"पण जे लोक सीमा ओलांडतात..."
त्याची नजर कठोर झाली.
"They learn the consequences."s
त्याने समोरच्या त्या गुंडाची मान ऐका झटक्यात मागच्या दिशेला वळवली..
कारण त्याला सोडणे म्हणजे दुसऱ्या शत्रूला आमंत्रण देणे...
त्यातील ऐक गुंड लगेच हात जोडून त्याच्या पायावर पडला...
"माफ करा चुकल आमंच, ही सुपारी घेऊन आमंची चूक झाली...
'आर्यवीरने थंड नजरेने त्याच्या कडे पाहिले '...
"कोणाच्या आदेशावर?"
पण उत्तर मिळालं नाही.
कारण त्यांना स्वतःलाही पूर्ण माहिती नव्हती.
फक्त एक नाव...
एक कोड...
आणि एक आदेश...
तो गुंड सांगू शकला नाही नाव कारण सुपारी देणाऱ्याने फक्त पैसे दिले होते....
'आत्ता आपला शेवट होणार या भीतीने त्या गुंडाने भीतीने डोळे घट्ट बंद केले...
"पण त्याच वेळी तेथून गाड्या जातानाचा आवाज आला...
त्याने त्याला मारले न्हवते....
मृत्यूच दर्शन देवून तो यमाचा दूत निघून गेलेला...
आपल्याला जिवंत सोडल याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरतच होता की मागून ऐक गोळी आली आणी त्याच्या पाठीत घुसली...
जर तु जिवंत राहिलास तर कधीना कधी माझ नाव समोर येईल...
डोंगरा वर उभ्या असलेल्या त्याने बंदूकी वर फुक मारली..
आणी शांत पणे खिश्यातील फोन बाहेर काढला..
"तो जिवंत वाचला, आत्ता परिणाम भोगायला तयार रहा "..
त्याचे ते शब्द ऐकून समोरच्या व्यक्तीच्या हातून फोन गळून पडला....
दुसऱ्या दिवशी सकाळी.....
खुराणा कॉर्पोरेट टॉवर.
काचेची भव्य पन्नास मजली बिल्डिंग..
इथे येऊन त्याच्या बरोबर हात मिळवण्यासाठी खूप जण तरसायचे पण त्यातील कवचितच कोणाचे तरी स्वप्न पूर्ण व्हायचे... कारण तो आपल्या आसपासची माणसे देखील अंत्यत चोखंदळपणे निवडायचा....
आज संपूर्ण बोर्डरूममध्ये तणाव होता.
कारण तो येणार होता..
काल रात्रीची बातमी अजून ही बहुतेकांना समजली न्हवती....आणी ज्यांना समजली होती त्यांच्या घश्याना कोरड पडलेली... भीतीने हात पायांना घाम फुटलेला...
ही बातमी त्यांना समजली याचाच अर्थ असा होत होता ते त्या गोष्टीशी निगडित होते....
"काय झाल देसाई आज खूपच शांत आहात?"..
मिस्टर शर्मानी शांत बसलेल्या देसाईना विचारले..
"हम्म ते "..
"भीती वाटते नां?.. त्यांच्या प्रश्नाणे देसाई ने चमकून त्यांच्या कडे पाहिले..
"आय नो.. मला ही वाटते... "..
त्या डेव्हिडची भीती कोणाला नाही वाटतं...
शर्मा हळूच कूजबुजले...
"हमम "..
देसाई..
त्यांनी हळूच नजर विक्रांत कडे वळवली..
विक्रांत मल्होत्रा.
आर्यवीरचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी...आणी आतेभाऊ देखील..
दोघांच्यात रक्ताच नात जरी असल तरी मनाने ते कित्येक कोस दूर होते...
त्यांची दुष्मनी खूप जुनी होती अगदी लहान पणा पासूनची...
विक्रांत ला कायम त्याची ईर्षा वाटायची... त्याच्या दिसण्या पासून त्याच्या यशा पर्यन्त तो त्याच्या प्रत्येक गोष्टींवर जळायचा...
आणी आर्यवीर शांतपणे फक्त टाळायचा कारण.. त्याने त्याच्या लाडक्या ग्रँड माँला वचन जे दिले होते..
जसे कृष्णाने शिशुपालचे अपराध माफ केले होते अगदी तसेच....
त्यात आर्यवीर इतका पुढे गेला होता की... विक्रांतला त्याच्या नावाचा ही राग यायचा..
त्याचा चेहरा ही उतरलेला होता.. पण त्याच कारण वेगळं होत...
"जे काल ठरवलं होत आज त्यातील काहीच होत न्हवते "...
त्याला वाटलं होत
"आजचा दिवस खुराणा ग्रुपसाठी शेवटाची सुरुवात असेल."
पण झाल भलतच होत.....