❤️❤️फक्त तुझ्याचसाठी ❤️
तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं...आणि केस टॉवेलने पुसत सई बाहेर आली."काय गं?""सकाळपासून कोणाचं कौतुक सुरू आहे?"गौरीने छाती पुढे काढली."माझंच."सईने हसत तिच्या गालावर हलकी चिमटी काढली."स्वतःचं कौतुक स्वतःच करणारी एकच व्यक्ती आहे या जगात...""आणि ती म्हणजे..."दोघी एकाच वेळी म्हणाल्या..."गौरी!"पुन्हा एकदा घरभर हसण्याचे आवाज घुमले...साधा पण अतिशय नेटका ऑफ-व्हाइट कुर्ता, निळी जीन्स,.. स्टेट केलेले केस व्यवस्थित क्लचर मध्ये अडकवून तिने ओठांना लीप बाम लावला...बस झाला तिचा मेकअप...हातात फाईल आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास...ती इंटरव्हिव साठी तयार झाली ...मनात थोडी भीती होती... पण तरी ही ती स्वतःला शांत करत आरशासमोर उभी राहून तिने एक दीर्घ श्वास घेतला."ऑल द बेस्ट, सई...तू बेस्ट आहेस... आणी आजचा इंटरव्हिव ही बेस्टच देणार.. मला विश्वास आहे स्वतःवर "ती स्वतःशिच बोलत होती ...."ये मेरे माँ बाप कि ऐक लोती लाडली संतान, मातोश्रीने आपको बाहर बुलाया हे "..दरवाजाला टेकून उभ्या असलेल्या गौरीने ऍपलचा ऐक तुकडा दातांनी तोंडून तिच्या कडे घुरून पाहिले..."शट अप ss......"तिला शांत करून ती पुन्हा स्वताची हिम्मत वाढवत होती....."स्वताशिच काय बोलाव माणसानं... हित मी आहे बोलायला.... माझ्याशी बोल!".."तुज्याशी आल्यावर बोलील... आत्ता मला उशीर होतोय जायला हव!"....सईने पर्स खांद्याला अडकवली आणी फाईल हातात घेतली...."किंतु बालिके sss अश्व् नसलेला तुमचा तो रथ..अर्थात तूमचे वाहन...काही कारणास्थव.. ऐका जागी उभे आहे...बहुतेक त्याला इंधणाची गरज आहे....तर तूम्ही आत्ता कश्याने मार्गक्रमन करणार आहात?..."ओ नो ss स्कुटी बंद आहे... मी विसरले होते... आत्ता मी कश्याने जाऊ गौरी?"..सईला टेंशन आले..."या महानुभवी गौरी ताईनं कडे हर समस्याच समाधान असतच असत...तु कॅब सुद्धा घेऊ शकतेस... अर्थात... तुझी ईच्छा असेल तर. अन्यथा पाई सुद्धा मार्गक्रमन करू शकतेस ..गौरी दोन बोटे पुढे माघे करत म्हणाली..."तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही... सईने तिच्या डोक्यात फाईल मारली...आणी बाहेर आली हॉलमध्ये येताच तिच्या बाबांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवून तिच्याकडे पाहत हसले.सई शांतपणे आई-वडिलांच्या पाया पडली."देव तुझ्या मेहनतीला यश देवो."आईने आशीर्वाद दिला...वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं,"यशस्वी हो... पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगली माणूस म्हणून कायम उभी राहा."आईने तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला."आत्मविश्वास कधी सोडू नको."तेवढ्यात गौरी हातात दह्याची छोटी वाटी घेऊन आली."थांब... शुभ कामाला दही-साखर तर खाऊन जा."सईने हसत एक घास घेतला.गौरी लगेच कानात कुजबुजली..."ताई... इंटरव्ह्यू च जास्त टेन्शन घेऊ नकोस..मी कायम तुझ्या सोबत आहे... काहीच झाल नाही तर ओल्या भेळीचे दुकान आपण दोघी लावुच शकतो..."ही आणी हिची स्वप्ने... कमसे कम स्वप्न तरी मोठे बघ..दुकानच टाकायच तर सोन्याच तरी टाक ".."आणी त्या दुकानात ठेवायला सोन कुठून आणु... ढाका टाकू का कुठ"?त्या दोघी परत सुरु झाल्या..हे पाहून सईने वडिलांकडे पाहिले... आणी त्यांना बाय करून घरा बाहेर पडली...तिने लगेच कॅब बुक केली... गाडी यायला अजून दहा मिनिटे तर नक्कीच लागणार होते.. म्हणून ती जवळच्याच स्वामी मंदिरात गेली..देवाच्या पाया पडून ती लगबगिने बाहेर आली..कॅब आली का पाहण्यासाठी तिने पुन्हा फोन केला..."हो मॅडम ऐका मिनिटात आलो टर्नच घेत आहे..गाडी आली म्हणून ती लगेच रस्त्या जवळ आली आणी त्याच वेळेला ऐक आलिशान गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली..काळ्या कलरची ती आलिशान कार पाहून ती ऐक पाऊल माघे झाली... तिच्या कॅब ड्रायव्हर ने सांगितले होते तो ऐका मिनिटात येतो म्हणून...मध्येच ही गाडी कशी?तिने वळून त्या गाडीची नंबर प्लेट पहिली आणी ती शॉक झाली..ही तर तिने बुक केलेली गाडी होती...तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले...सईने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं.कॅबचं लोकेशन अगदी तिच्या समोरच दाखवत होतं.तिने पुन्हा एकदा स्क्रीनवरचा गाडीचा नंबर पाहिला आणि मग समोर उभ्या असलेल्या गाडीकडे नजर टाकली.नंबर अगदी तोच होता.गाडीही त्याच रंगाची होती.तरीही काहीतरी मनाला खटकत होतं."हीच असेल का?"सईने स्वतःशीच विचार केला.गाडी मात्र कॅबसारखी अजिबात वाटत नव्हती. दिसायला ती चांगलीच आलिशान होती.आजकाल अनेक लोक स्वतःच्या गाड्या कॅब सर्व्हिसला जोडतात, हे तिला आठवलं."पण इतकी आलिशान गाडी कोण कश्याला लावेल?पण नंबर??. तीच डोक चालेना झालेले...."तरीही खात्री करून घेणं तिला योग्य वाटलं.ती तिथेच दोन मिनिटं उभी राहिली आणि मग मोबाईलमधून ड्रायव्हरला फोन लावला.फोन दोन रिंगमध्येच उचलला गेला."हॅलो?""तुम्ही कुठे आहात?" सईने विचारलं."मॅडम, मी आलोय. तुमच्या समोरच आहे."सईने समोरच्या गाडीकडे पाहिलं."काळ्या रंगाची गाडी आहे?""हो मॅडम.""ठीक आहे."तिच्या मनातला शेवटचा संशयही दूर झाला.सईने फोन ठेवला आणि गाडीच्या दिशेने चालू लागली.पण अजून ही त्या आलिशान गाडीला पाहून तिच्या छातीत धडधडत होते.."तिने हिम्मत करून खिडकी वर टक टक केली...ड्रायव्हर ने खिडकी खाली केली..."खुराना इंडरस्टीज?".."तो ड्रायव्हर तेथेच काम करत असल्यामुळे आपसूक तो ' यस ' म्हणाला...तस तिने पटकन डोअर उघडल आणी आत बसली..."ओ मॅडम काय करत आहात "..तो ड्रायव्हर चिडला...पण तीच लक्ष न्हवते त्याच्या कडे..." आतल डिझाईन पाहून तर लीट्रली तिचे डोळेच मोठे झालेले ... इतकी आलिशान गाडी तर ती पहिल्यांदा पहात होती....आणी गाडीतील तो सुगंध तर तिला वेगळ्या जगातच घेऊन गेलेला....जर आज माझा जॉब लागला तर भविष्यात कधी तरी मी ही आशिच गाडी घेणार '..तिने मनाशी पक्क केल...पण लगेच भानावर आली आजचा जॉब मिळवण्यासाठी पहिला इंटरव्हिव तर द्यावा लागेल आणी त्यासाठी तिथे वेळेवर पोहचायला हव..."भय्या जल्दी चलो! ".."त्या ड्रायव्हर ने आश्चर्यमिश्रित नजरेने तिच्या कडे पाहिले.."हे पहा मिस तूम्ही चुकीच्या गाडीत बसला आहात .. ही गाडी खुराना इंडरस्टीज मध्ये जात आहे.."तो शांत पणे म्हणाला.."हो माहित आहे मला ss मीच तर सांगितल लोकेशन.. आत्ता टाईम वेस्ट करू नका.. नऊचा इंटरव्हिव आहे माझा.. जर वेळेवर पोहचले नाही तर जॉब जाईल माझा..त्यामुळे पटकन चला.."मॅडम तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे"..तो ड्रायव्हर शांत पणे तिला समजवत होता... पण त्याच्या शब्दांत भीती होती.. कपाळावर घाम साचला होता... त्याने तिरका कटाक्ष माघे टाकला.. तर माघे बसलेला तो रागाने समोरच पहात होता..."अस काय करत आहात तूम्ही मी ऑनलाईन पेमेंट केले आहे, आत्ता येणवेळी अचानक दुसरी गाडी कोठून भेटणार मला?... तूम्ही अगोदरच नाही म्हणायला हव होत...तिला ही टेन्शन आलेले..."मी तेच सांगत आहे तुम्हाला... तूम्ही चुकीच्या गाडीत बसला आहात.... तूम्ही बुक केलेली गाडी ही नाही "..त्याने तिला शांत पणे समजवले तशी तीही वरमली... त्याच वेळी तीच लक्ष तिच्या बॅगेतील फोन वर गेल...त्याच कॅब ड्रायव्हरचा फोन होता त्याचे तीन चार फोन येऊन गेलेले... भांडणाच्या नादात तीने फोन कडे पाहिलेच नाही..तिने लगेच त्या नंबर वर फोन केला..."हा बोला दादा कुठे आहात तूम्ही?"..कुठे म्हणजे काय तूम्ही सांगितलेल्या ठिकाणीच होते... चार फोन केले मी पण तूम्ही उचला नाही म्हणून निघून आलोय..."निघून गेलात.. प्लिज अस करू नका परत या "..ती बोलत होती... आणी तिच्या बाजूला बसलेला ड्रायव्हर वैतागून तिच्या कडे पहात होता..."ओ मॅडम बाहेर जाऊन बोला प्लिज ss... तो रिक्वेस्ट करत होता ".."सॉरी हा"...सई ही पटकन गाडीतून बाहेर आली... आणी त्या कॅब ड्रायव्हरशी बोलू लागली कॅब ड्रायवर परत यायला तयार न्हवता...हाताश होऊन ती तेथेच उभी राहिली....यावेळेस तिला गाडी ही भेटणार न्हवती.... आणी इंटरव्हिवला जाणे खूप गरजेचे होते....ती हिम्मत एकवटून पुन्हा त्या ड्रायव्हर जवळ गेली...