Abhijeet in Marathi Love Stories by Reshma books and stories PDF | अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 4

❤️अभिजित ❤️4

पण त्याला माहित नाही इंग्रज चरख्या मुळे नाही तर काठी मुळे पळून गेलीत... असो आपल्याला काय करायचय?..जो पर्यन्त अहिंसेचें भूत त्याच्या मानगुटीवर आहे तो पर्यन्त आपण आपली चांदी करून घ्यायची बस ...प्रताप एटित उभा रहात म्हणाला..

आणी हे भूत कधीच नाही उतरणार त्या आब्याच्या मानगुटी वरून तो गांधी भक्त जो हाय.. बज्या..

आणी आपण कधी ते उतरू पण द्यायचे नाही.. त्याच्याच हातांनी त्याचा वंश संपवून टाकायचा.. आणी मल्लपूर सारख श्वेतपूर वर ही ताब्यात घ्यायच . 
बज्या लिहून ठेव,..या दोन गावावर एकदिवस माझ राज्य असेल,.. आणी या दोन गावांचा मी राजा असेल .. आणी तुम्ही भिकारडे लोक माझी प्रजा... दोन्ही हात हवेत पसरवून प्रताप क्रूर हसत म्हणाला..

त्यावर बज्या ही कसनुसा हसला.. नाही म्हणल तरी भिकारड म्हणलेले कोणाला आवडेल...

'प्रताप आनंदाने चेकाळला होता त्याच वेळी विक्रम आणी त्याचे लोक काठीपालखी घेऊन तेथे आले'...

घामाने न्हाहून निघालेल्या विक्रमला प्रतापने पुढे होत कडकडून मिठी मारली... या वर्षी ही विजय त्यांचाच होता प्रतापच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता तर विक्रमची ही छाती अभिमानाने फुगली होती..
जणू हे यश केवळ आणी केवळ त्याच्यामुळेच मिळाल असा त्याचा ग्रह होता... नाही तर इथवर येणे कोणालाच शक्य झाले नसते अशी धारणा करत विक्रमची छाती गर्वाने फुगली..

"वा रे माझ्या पठ्या! "ss.. प्रतापची थाप पडताच विक्रमच्या छातीच्या पिंजरा इंचभर वाढलाच..

पायातील बूट काढून टाकत प्रतापने विक्रमच्या खांद्यावरील भार आपल्या खांद्यावर घेतला अन पुढची धुरा संभाळली... 

बज्याने पळत जाऊन गाडीतील पाण्याची बाटली विक्रमला आणून दिली...
चेहऱ्यावर पाणी ओतुन राहिलेले पाणी विक्रमने गटगट पिले..
बाकीच्यांना ही तहान लागली होती.. पण त्यांची दखल कोण घेणार.. बाजूलाच आड होता पण पालखी आत जात पर्यँत बाकीच्यांना तहान क्षमवण्याचा अधिकार न्हवता...



'प्रतापने पालखीला खांदा घेताच त्याच्या लोकांनी एकच जल्लोष केला'..
ढोलावर पुन्हा थाप पडली, ताशा तडतडू लागले.... लोक आनंदाने नाचू लागले ...

"आकाशाला भिडत होते सप्तसूर, आनंदाने नाचत होते मल्लपूर "...

गजर, गोंधळ, उत्साहात मल्लपुरचे लोक त्या भव्य मंदिराच्या मोठ्या दगडी कमाणीतून आत आले.. खूप आनंदी होते सर्वजण पण आपला हा आनंद पहायला श्वेतपुरचे लोक समोर असते तर हाच आनंद द्विगुणित झाला असता त्यांचे उतरलेले, हारलेले, नाराज चेहरे पहाण्यात जी मज्या हाय ना ती कश्यातच नाय... लोकांच्या संभाषण सूरू होते..

खर हाय लका, श्वेतपूर वाल्यांची पडलेली तोंड पहाण्यात जी मजा हाय ना तितकी मजा तर फडातल्या बाईकड पाहून बी यत नाय... एकजण हसत म्हणाला....तसा दुसर्याने लगेच त्याच्या गळ्यात हात टाकला...

"खर हाय ss बाई काळजावर वार करती. पण श्वेतपूर वाल्यांची पडलेली तोंड पाहून काळजाला थंडावा मिळतो... छातीवर हात ठेवत तो म्हणाला....

आर गप्पा कि लकाss. देवळात आलोय आपुन हित तरी बाईचा इशय नका काढुत .... 

आत्ता गपतो, पण रातच्याला मालकानं सगळ्यांसाठी शेतावरच्या वाड्यावर पक्कड बैठक ठेवलीया सगळ्यांन साठी...तिसरा गुदगुल्या झाल्या सारखा अंग हलवत म्हणाला..

ऐकून काय!... मल्लपुरचे भले बुरे सगळेच खुश होते..आनंद त्यांच्या नसा नसातुन वाहत होता...

आणी या सगळ्यात पुढे होता प्रताप ,...मिशीवर ताव देत तो त्या भव्यदिव्य पुरातन मंदिराच्या उंबरठ्या जवळ आला....

दरवर्षी  पालखीचे स्वागत करायला स्वतः पुजारीगन उपस्थित असायचे... गुरुजीचें मंत्र पठण सुरु असायचे तर त्यांचे शिष्यगण पालखी धारकांच्या पायावर पाणी घालून  मोठ्या भक्तीने  पालखीत असलेल्या गाव देवीचे स्वागत करायचे.... पण आज कोणीच कसे न्हवते तेथे?...

"गुरुजी" ssss विक्रमने आवाज दिला.. पण लोकांचा आवाज इतका होता कि आत आवाज जाणे शक्य न्हवते...

"मी पहातो"...बज्या पटकन आत गेला..पण आत जाऊन तो फसला होता... कारण समोर दिसणारे दुष्य जर प्रतापला सांगितले तर रागात त्याचा शीरछेद करील कि काय त्याला भीती दाटून आली...
बाहेर जाव कि नको त्याला भीती वाटत होती... भीतीने थरथरत तो तेथेच उभा राहिला...

"लका कुठ मेला हा बज्या "!... बराच वेळ झाला तरी बज्या बाहेर आला नाही हे पाहून विक्रम त्याच्या माघे  गेला... आणी समोर मांडलेली पूजा पाहून तो धावत बाहेर आला... 

दादाssss आत ss,.आत तो अभ्या आणी अज्या त्यांची पालखी घेऊन आल्याती....विक्रम घाबराघुबरा होऊन बोला...

काय भांग प्यायलास काय?... ती कशी येतील?.काय आकाशातून टपाकतील का?... प्रताप चिडला..

आर दादा ss खरंच र ss गुरुजी त्यांच्या ग्रामदेवीची पूजा करत आहेत... विक्रम बोलताच प्रतापने खांद्यावरची धुरा दुसऱ्या कडे सोपवली आणी लागलीच आत आला..
त्याच्या बरोबर त्याचे बाकी लोक ही आत आले... आतील दुष्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली....

"गुरुजी"... हाताच्या मुठी घट्ट आवळत दात ओठ खात तो रागात कडाडला...

मंत्र पठण करणाऱ्या गुरुजींनी मान तिरकी करत त्याच्या कडे पाहिले त्यांच्या ओठांतून आजून ही मंत्रांचे उच्चारण होत होते.... प्रतापला पाहून ही त्यांनी पूजा थांबवली नाही....

आणी का थांबवतील?.. काय कारण?.. ती देविची पूजा होती... तेथे पहिल्या येणाऱ्या पालखीचा मान होता.. ती कोणत्या ही गावची असेना.. पूजा पहिल्या येणाऱ्या पालखीचीच होणार होती.. मान त्याच पालखीला मिळणार होता...
तेथे प्रताप काय कोणाचीच मक्तेदारी चालणार न्हवती...गिरुजींनी लगेच पुढच्या आचमनाला सुरवात केली..

'स्टोरी आवडत असल्यास फॉलो करा '...

धन्यवाद...🙏🤗

"क्रमश "...