Ek Premkatha Ashihi - 3 in Marathi Love Stories by Adv Nikhil Deore books and stories PDF | एक प्रेमकथा अशीही.... - भाग 3

Featured Books
Categories
Share

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 3

एक प्रेम कथा अशीही.... भाग 3 


भाग 2 वरून पुढे. 


  बाहेर कसल्यातरी कर्कश्य आवाजाने अभिमन्यू भानावर आला. कॉफीचा कप तर केव्हाच थंड झाला होता. "छे ! साला हे जगही काही काळ एकांत भेटू देणार नाही वाटतं" अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. खिडकीच्या बाहेर असलेल्या जगाला तो न्याहाळत होता. 
" दुसऱ्याच्या जीवनात काय सुरु आहे.... ते कुठल्या टप्यावर येऊन पोहचलंय याच काही एक घेणं -देण नाही या जगाला. म्हणजे बघा ना रोजच सकाळी पुष्पे उमलणार, पेपर टाकणारा दूध टाकणारा रोजच येणार, तेच ते चित्रपट त्यांच त्या मालिका, तिच भेसूर वाटणारी दुपार.... काही वेळ झाल्यावर शांतपणे येणारी सायंकाळ आणि शेवटी या सगळ्याला संपवून निद्रिस्त करुण टाकणारी अंधारमय रात्र. काय साला जिंदगी हाय? " अभिमन्यू स्वतःशीच पुटपुटत होता. 
टी. व्ही. च रिमोट घेऊन तो भराभर चॅनल बदलू लागतो. अचानक कुठल्यातरी मराठी चॅनलवर येईन तो  थांबतो " प्रेम म्हणजे नक्की काय गं?  " टी. व्ही. वरील नायकाचा संवाद त्यांच्या कानी पडतो. त्याला काहीतरी जाणवतं आणि तो परत ज्या विचाररम्य दुनियेतुन  परतला होता तिथेच जाऊन पोहचतो. 

    Hi..... हा whatss app msg पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वलय निर्माण झालेले असतात. आता काय प्रतिउत्तर पाठवावे याचा तो विचार करत होता आणि मग सुरु होतो whatss app वरील संवाद. 
ती :- Hiii
तो :- Hiiiiii
ती  :- झोपला आहेस का? डिस्टर्ब तर नाही केलं ना? 
तो :- नाही.... नाही असाच झोपण्याचा प्रयत्न करत 
       होतो पण झोपच येत नव्हती. 
तो :- आपण उद्या बोलायचं का? 
ती :- चालेल 
तो :- Bye Good night 
ती :- Bye  Gn sd tc

  मुळात त्याला खूप बोलायचं होत पण नक्की काय बोलाव हे त्याला कळतंच नव्हतं म्हणून तो whatss App वरील संवादाला पूर्णविराम लावतो. 

    दुसऱ्या दिवशी ऋतुजा कॉलेजमध्ये प्रवेश करते. आज तिला खूप प्रसन्न वाटतं होत आणि  कालच्या whatss app  वरील संवादामुळे हृदयही धडधडत होत. कॉलेजमध्ये बराच पाऊस पडून गेल्यामुळे कॉलेज थोडंफार ओस वाटतं होत.बहुतेक  बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजला दांडी मारली असावी .  कॉलेज कॅम्पस गोलाकार असल्याने प्रवेश द्वाराच्या आत मूख्य बिल्डिंग तर उजवीकडे विज्ञान आणि डावीकडे कला विभाग होत. मधातच त्यांना जोडणार हिरवगार उद्यान ज्याला तारेचं कुंपण घातलं होत. ऋतुजा डावीकडून अर्थातच कला विभागाकडून विज्ञान विभागात जायला निघते. तारेच्या कुंपणातून आरपार तिला उजव्या बाजूला उभे असलेले अभिमन्यू आणि अवनी दिसतात. तिच्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली होती.त्यांच हसून ऐकमेकासोबत बोलणं.... ऐकमेकांना टाळ्या देण हे बघून ऋतुजाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. ऋतुजाच्या चेहऱ्यावरील तेज मावळले होते. मनाला कसलीतरी हुरहूर लागली होती. अतिशय शांतपणे ती विज्ञान विभागाजवळ आली. 
   "Hii ऋतुजा " मागून वरुणने तिला आवाज दिला होता.😊😊😊
" Hii वरूण " ती शांतपणे म्हणाली. 
" आपला ग्रुप कुठे आहे  नक्की  म्हणजे बघ ना कॉलेजमध्ये आल्यापासून अभिमन्यू, अनिकेत, अवनी कुणीही दिसत नाहीय? " 
" मला काय माहित " ऋतुजा अतिशय शांतपणे म्हणाली आणि वर्गात निघून गेली. खरंतर तिला खूप राग आला होता या प्रश्नाचा पण हा राग तीला वरुणला दिसू द्यायचा नव्हता म्हणून ती शांतपणे वर्गात निघून गेली. 

        आज लेक्टर एकामागून एक भराभर संपून जात होते . ऋतुजाच मन पूर्णपणे उदास झालं होत. तिला राहून राहून तेच दृश्य आठवत होत. त्या दोघांचं हसून बोलणं.. ऐकमेकांना टाळ्या देण त्यामुळं ती कमालीची शांत होती. आज रसायनशास्त्रच्या  लेक्टरला सुट्टी होती. अभिमन्यू आणि त्यांच्या ग्रुप नि आज कॅन्टीन मध्ये जाऊन थोडा टाइमपास करावा हे ठरलं होत. वर्गापासून कॅन्टीन थोड दूर असल्यामुळ सर्वजण चालतच कॅन्टीनकडे जाऊ लागतात. अभिमन्यू, अनिकेत आणि वरुण समोर होते तर ऋतुजा एकटीच मागून येत होती. ऋतुजाच काहीतरी बिघडलंय हे एकंदरीत तिच्या वागणुकीतून अभिमन्यूच्या लक्षात आलं होत. सर्वजण कॅन्टीन मध्ये जमले होते. अभिमन्यूने msg करून अवनीला कॅन्टीन मध्ये बोलावलं. 
" पाच कॉफी " अभिमन्यूने ऑर्डर दिली. 
" मी कॉफी नाही घेत माझ्यासाठी चहा सांग " ऋतुजा म्हणाली. 
" बरं ठीक आहे "
समोर चार कॉफीचे आणि एक चहाचा असे एकुण पाच वाफाळलेले कप ठेवले होते. ☕️☕️🍵
सर्वजण कॉफी आणि चहाचा आनंद घेत होते. समोरून अवनी कॅन्टीनमध्ये येत होती. 
" आता एक गंमत पाहा " वरुण सर्वांना म्हणाला. 
हातातील कॉफीचा कप त्याने टेबलावर ठेवला. अवनीही टेबलाजवळ येऊन थांबली होती. 
" अवनी तुझ्या गालाला काहीतरी लागलं आहे गं" 
" कुठे? " अवनीने गालावरून हात फिरवण्यास सुरवात केली. 
" थोडंसं बाजूला " वरुण म्हणाला.
अवनी परत गालाला पुसत होती. 
" अरे अच्छा क्युटनेस आहे तर " वरूणच ते वाक्य ऐकुन टेबलावरील सर्वजण हसू लागतात.  खरंतर अवनीला या विनोदाचा फार  राग आला होता. तिनेही रागाने " निघ.... पहिल्या फुरसतीतच निघ " म्हणून त्याला  प्रतिउत्तर दिल. तिचे ते  शब्द ऐकुन कॅन्टीनमधील सर्वजण फिदीफिदी हसू लागले होते. अनिकेत आणि ऋतुजाच तर हसणंच थांबत नव्हतं. अभिमन्यूला हा विनोद बिल्कुल आवडला नव्हता त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. ऋतुजाच्या चाणाक्ष नजरेनं हे हेरलं होत. सर्वजणांनी काही वेळ मनसोक्तपणे गप्पा गोष्टी केल्या.. चहा कॉफीचा आस्वाद घेतला. 

  रसायनशास्त्राचा तास संपला होता. सर्वजण समोरच्या म्हणजेच वनस्पतिशास्त्राच्या प्रात्यक्षिकेसाठी प्रयोगशाळेत जायला निघाले होते. अनिकेतला तर प्रॅक्टिकल ला दांडी मारायची होती म्हणून तो होस्टेलला जाऊ लागतो. त्याचेच पाहून वरूणही प्रॅक्टिकल ला दांडी मारतो आणि घरी जायला निघतो. अवनी अभ्यासात अतिशय नियमित आणि शिस्तबद्ध असल्यामुळे सर्वांच्या आधी ती प्रयोगशाळेत पोहचते. आता फक्त अभिमन्यू आणि ऋतुजा प्रयोगशाळेत जायला निघतात. अचानक आकाशात काळे नभ दाटून येते आणि रिमझिम पावसाच्या सरी बरसायला लागतात. त्यामुळे  कॉलेजमधले वातावरण बदलून जाते. सर्वीकडे धावपळ सुरु होते. कॉलेजमधले विद्यार्थी मिळेल त्या आडोश्याला उभे होते. अभिमन्यू समोर असलेल्या मुख्य बुल्डींगकडे धाव घेतो. ऋतुजा तशीच  पावसात उभी होती आणि मुक्तपणे भिजण्याचा आनंद घेत होती. अभिमन्यू धावत जाऊन तिला मुख्य बिल्डिंग मध्ये आश्रय घेण्यासाठी विनवू लागतो. ऋतुजा तर आपल्याच दुनियेत मग्न होऊन पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. अभिमन्यू तिचा हात पकडून ओढतच मुख्य बिल्डगच्या आश्रयाला नेण्याचा विचार करतो. तिच्या हाताला स्पर्श करताच ती त्याच्याकडे पाहते दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य खुलत. बाजूला गुलमोहराच्या आडोश्याला उभ्या असलेल्या एका विद्यार्थांच्या मोबाईलवरून एक सुमधुर गीत त्या दोघांच्याही कानी पडतं आणि त्यांचा नजरेतून संवाद सुरु होतो. त्या दोघांच्या मुक्या सवंदाला ते गीतही साजेसं होत. 
     💕💕💕 या रिमझिम झिलमिल 
                     पाऊसधारा तनमन 
                      फुलवून जाती 
                     
                    हो या रिमझिम 
                     झिलमिल पाऊसधारा 
                     तनमन फुलवून जाती 
                      सहवास तुझा 
                      मधूमास फुलांचा 
                        गंध सुखाचा हाती 
                       हा धुंद गार वारा 
                       हा कोवळा शहारा 
                       उजळून रंग आले 
                        स्वच्छंद प्रीतीचे 
                        चिंब भिजलेले 
                         रूप सजलेले 
                          बरसूनि आले 
                          रंग प्रीतीचे.... 💕💕💕
    
             काही वेळातच पाऊस थांबतो. ऋतुजा आणि अभिमन्यू दोघेही भिजल्यामुळे ते प्रॅक्टिकल न करता होस्टेलला जायला निघतात. ऋतुजाची गाडी बंद पडल्यामुळे काही वेळ ते पायीच चालत होते. दोघेही अबोला धरल्यासारखे शांतपणे चालत होते. अभिमन्यूची थोडी गंमत करावी असा ऋतुजाच्या मनात विचार येतो आणि ती थोडी अभिमन्यूची खोडी काढते. 
     " ऐ अभिमन्यू मला ना काहीतरी सांगायचं आहे तुला  " ऋतुजा म्हणाली. 
" काय? "
" खरं तर कसं सांगू हे कळतंच नाही आहे मला " 
" त्यात काय एवढं मोकळेपणाने सांग तुला जे ही सांगायचं आहे " 
" मला ना सांगायचं होत कि..... I....."
" I...काय?  " अभिमन्यू म्हणाला. 
त्यांच्या चेहऱ्यावर हजार सश्यांची उत्सुकता होती. तिचे ते शब्द ऐकण्यासाठी अभिमन्यूचे कान मोरप्रतीक्षा करीत होते. 
" I....like rain मला ना पाऊस खूप आवडतो आणि बघ ना माझ्यामुळे तू पण भिजला. खरं तर पावसाळा हा माझा आवडता ऋतु आहे. जेव्हा पाऊस येतो तेव्हा कुणीतरी आपलं येतंय असंच वाटतं. "

              अभिमन्यूच्या चेहऱ्यावरची उत्सुकता मावळली होती. स्वतःच्या विचारावरच त्याला हसू येत होत. काही वेळातच ऋतुजाची गाडी सुरु झाली आणि ती गाडीवरून होस्टेलला जायला निघाली. अभिमन्यूही त्याच्या वाटेवर लागला होता. 

           दिवसेंमागून दिवस निघून जात होते. आता कॉलेजला सुरु होऊन तीन सप्ताह झाले होते. दिवसांबरोबर त्यांची मैत्रीही आता अतिशय घट्ट झाली होती. कॉलेज कट्टा, लेक्टर, प्रॅक्टिकल ह्या सर्व गोष्टीही नियमितपणे होत होत्या. एक डोकेदुखी मात्र ऋतुजाची वाढली होती ती म्हणजे अभिमन्यू आणि अवनीच्या घट्ट मैत्रीमुळे...... त्यांच्या असलेल्या जवळीकपणे. अशातच एक सूचना वनस्पतीशास्त्राच्या तासाला झालि कि दुसऱ्या दिवशी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध प्रकारच्या वनस्पतीचे निरीक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या डोंगरावर सहल जाणार आहे.  ज्याला सर्वजण "बोटॅनिकल टूर "असे म्हणत. 

             रात्रीचे 11 वाजले होते. मुलीच्या हॉस्टेलमधील सर्व दिवे बंद होते. ऋतुजा तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याचा प्रयत्न करीत होती. पण छे ! तिला झोपच नव्हती येत. कितीतरी प्रयत्न करूनही तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.
" काय झालं ग ऋतुजा?  झोपलीस नाही अजून?  " वैष्णवी म्हणाली. 
वैष्णवी ही तिची रूम पार्टनर होती. दोघीही एकाच कॉलेजला होत्या फक्त त्यांची शाखा वेगवेगळी होती. वैष्णवी ही B.sc संगणक विज्ञानला होती. 
" काही नाहीं गं झोपच येत नाही आहे " ऋतुजा म्हणाली. 
" तू प्रेमात आहेस वाटते. तुझी दिवसेंदिवस वाढणारी बेचैनी सर्वकाही सांगून जात आहे ".
" काही काय बोलतेस गं तसं काही नाही ".
" अच्छा बरं ठीक आहे पण जर तसं असलही ना तरी तू पुढाकार घेऊन तुझ्या मनातलं सर्व काही सांगून टाकशील नाहीतर लोकांचं मन बदलायला फार वेळ नाही लागत. स्वतःच्या अनुभवावरून काही गोष्टी सांगत आहे  तुला जर योग्य संधी भेटली तर सांगून मुक्त होईन जा " वैष्णवी म्हणाली. 
" म्हणजे तू ही कुणावर तरी प्रेम केलंयस "
वैष्णविच्या शांततेन तिच्या प्रश्नाचं उत्तर दिल होत. 

वैष्णवीच्या गोष्टी ऐकुन ऋतुजा विचार करायला लागते. उद्या वनस्पतिशास्त्राची सहल आहे. आपल्या मनात असलेल्या प्रेमभावना अभिमन्यूला सांगाव्या का?  हीच ती योग्य संधी राहील का?  

to be continue..... 

ऋतुजा आपल्या मनात असलेल्या प्रेम भावना व्यक्त करेल का?  अवनी आणि अभिमन्यूच्या जवळीकच नक्की  सत्य तरी काय??  
वाचा पुढच्या भागात. 

आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा 🙏.