भूतकाळातील गडद सावल्या त्यांच्या आयुष्यावर किती खोल परिणाम करतील?
त्यांच्या नात्याला नवे वळण मिळेल? की कोणाचे तरी आयुष्य या वणव्यात भस्मसात होईल?
कधीकाळी तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा तो.
आणि त्याच्या भावनांची जराही कल्पना नसलेली स्वच्छंद फुलपाखरासारखी ती…
प्रेम, वेदना आणि भूतकाळाच्या सावल्यांत अडकलेली एक अनोखी कहाणी…
########
पूर्ण सभागृह अगदी ठसा ठस भरलं होतं.... पूर्ण सभागृहाच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या.... पण ती मात्र तिच्या विश्वात दंग होती..... चंद्रा ... नावातच तेवढ सौंदर्य होत..... पण नावापेक्षा जास्त ती सुंदर होती... तिच्या पायातले ते घुंगराचे चाळ.... अंगावरची रेशमी साडी... आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीवर थिरकणारी ती..... ती म्हणजे चंद्रा .... एक नर्तिका.... शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर नाचणारी... बोलायला अगदीच कसतरी वाटतंय... पण प्रत्येकाच्या बघण्याची नजर तर तीच होती... कारण तिच प्रोफेशन ते होतं...
आणि कार्यक्रम पण काही असा तसा नव्हता बरं का.... अगदी नावाजलेले राजकारणी... मोठमोठे बिजनेस मॅन... आणि आणखी सगळ्या कला क्षेत्रातले दिग्गज लोक तिथे बसलेले होते.... आणि तो कार्यक्रम होता त्यांच्या एंटरटेनमेंट साठी.....
पण तिच्यावर खीळणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा... आणि त्यात बऱ्यापैकी नजरांमध्ये असणारी वासना... ते बघून इकडे त्याच्या मात्र हाताच्या मुठी अगदी घट्ट आवळलेल्या.... कारण पण तर तसंच होतं... राग येन साहजिक होतं.... तिला कोणी असं बघन म्हणजे त्याच्या अगदी काळजाला ठेच लागत होती..... पण ती फेडत होती का तिच्या कर्माची फळे.... एकेकाळी लाडाकोडात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ती.... असं नक्की काय झालं तिच्या बाबतीत की आज तिचं नशीब तिला इथे घेऊन आल..... तिच्यावर असणाऱ्या त्या वटवटणाऱ्या नजरा... आणि तिला जणू काहीच फरक पडत नव्हता का ?.... मग हे सगळं तिच्या सवयीच होत?... की मग हे अंगवळणी पडलेल.... एक ना अनेक प्रश्न होते... पण त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नव्हती.....
आणि हे आजचं नव्हतं बर का... खूप दिवसांपासून याच कलेच्या जोरावर स्वतःचं पोट भरत होती ती... आणि सोबतच अनाथ आश्रमात भरती केलेल्या तिच्या छोट्या बहिणीची पण काळजी घेत होती..... कारण याशिवाय सध्या समोर कोणताच पर्याय नव्हता...
मग असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यात... त्यात तिची काही चुकी होती का.... की मग तिने स्वीकारलं होतं हे आयुष्य.....
कार्यक्रम संपला आणि ती पडद्याच्या मागे गेली.... हळूहळू सभागृहातली गर्दी कमी झाली... पण तो मात्र अजूनही तिथेच बसून होता.....
Boss.... It's time to leave now..... जॉन चा आवाज कानावर पडला आणि तो भानावर आला... पूर्ण सभागृहात तो एकटाच त्याचा खुर्चीवर बसलेला होता.... पण तो अजूनही तिथे होता म्हणून तिथले कार्यकारी मंडळी पण जागेवरच होते.... त्याच्याकडे प्रश्नार्थक बघत होते... पण त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती कोणाच्यात ........
काय झाल मिस्टर राठोड..... काही प्रॉब्लेम आहे का........ मिस्टर सदावर्ते यांनी अगदी नम्रपणे विचारल.... मुळातच मागच्या काही दिवसांपासून हा माणूस इकडे कसा काय येतोय हा प्रश्न त्यांनाही पडला होता.... पण त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हतीच त्यांच्यात..... कारण त्याच्या एका शब्दावर तो म्हणेल ते त्याच्यासमोर हजर होणार होत.
I want to meet her..... त्याची नजर अगदी स्थिर होती.... पण त्या नजरेतले भाव मात्र न टिपण्यासारखे..... खोल समुद्रासारखा होता तो.... त्याचा थांग लागण कोणाला शक्य नव्हतं.....
पण साहेब तिला भेटणं एवढं सोपं नाही.... माझ्या मते ती आता कोणाला भेटण्यासाठी होकारच देत नाही... मिस्टर सदावर्ते यांनी अगदी आदरपूर्वक शब्दात त्याला सांगितलं.....
How much amount..... त्याच एक वाक्य आणि इकडे सदावर्तेच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र झरझर बदलले..... पैशांसाठी तोंडाला लाळ पाडणारे असे लोक त्याच्यासाठी नवीन तर नव्हते.... आणि सदावर्ते काय माणूस आहे हे त्याला चांगलच माहीत होतं.....
जरा वेळ दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि मग जॉन ला नजरेनेच खुणावलं त्याने.....
चेकवर साइन करून त्याने तो चेक सदावर्ते च्या हातात दिला तसा तो माणूस तिथून आत मध्ये गेला....
तुम्हालाही माहित आहे ना मी कोणाला भेटत नाही म्हणून.... तिचा अगदी चिडलेला आवाज..... पण आवाज वाढवण्याची आणि ओरडून बोलण्याची परवानगी तरी होती का तिथे.....
ए जास्त शहाणपणा करू नको... पैसे घेऊन काम करतेस इथे एवढ लक्षात असू दे.... आणि राहिला प्रश्न कोणाला भेटण्याचा तर ज्या माणसाला तू भेटणार आहेस त्या माणसाला भेटण्यासाठी लोक वर्ष वर्ष अपॉइंटमेंट घेऊन असतात.... कोणी ऐरा गैरा माणूस नाही तो... आणि नाही आम्ही त्याला नकार देऊ शकतो...
पण मी.... ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं मत तिथे कोणालाच महत्त्वाच नव्हत...
उगाच बोलायला लावू नको चांदणे ..... नाहीतर अक्काला सांगून अनाथ आश्रमात असलेली तुझी बहीण पण इथे आणायला सांगेल एवढ लक्षात ठेव.....
त्यांच्या तोंडून स्वतःच्या बहिणीबद्दल ऐकून मात्र इकडे ती अगदीच शांत झाली..... तिचे वीक पॉईंट बरोबर माहित होते तिथल्या लोकांना....
पुढे जास्त काही बोलून फायदा नाही एवढ तर समजलं होतं तिला ....
ठीक आहे.... त्यांना बैठकीत बसवा ...आले मी.....
दोन मिनिट सुद्धा कोणासाठी वाट न बघणारा तो आज अर्धा तास त्या बैठकीत बसून होता......
तिचा पैंजणांची ऋण झुण कानावर पडली आणि इकडे त्याच्या चेहऱ्यावर तिरकस हसू उमटल......
मगाशी असणारा मेकअप तिने आता उतरवला होता.... अंगावर साधी कॉटनची साडी होती.... ज्याचा पदर सुद्धा पिन नव्हता केला तिने..... पण अगदी व्यवस्थित सावरून मात्र घेतलेला..... केस रिकामेच होते.... ओठांवर फिकट लिपबाम होतं फक्त.... पण मगाशी अगदी सजून धजून तिची कला सादर करणारी ती... आणि आता अशी एकदम साधी.... तिला बघून नजर हटवता नाही आली त्याला.... मगाशी तिच्यावर कितीतरी नजरा खीळल्या होत्या.... पण तिचं हे रूप फक्त त्याच्यासाठी होतं..... तिला बघण्याची परवानगी फक्त त्याला होती..... आणि तोच हक्क... तोच अधिकार त्याला मिळवायचा होता.... मग ते चांगल्या मार्गाने असो किंवा आणखी वेगळ्या कोणत्या.....
काय काम काढलं साहेब...... त्याचा समोर बसत तीने शांतपणे विचारलं..... पण नजरेला नजर मात्र अजिबात देत नव्हती....... तेवढी हिंमत तरी नव्हती तिच्यात... आणि मुळातच त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हतीच कोणाच्यात... कारण त्याचा करारीपणा अगदी समोरच्याला भिडवणारा होता....
तो निरीक्षण करत होता तिच...... दोन वर्षांपूर्वी बघितलेली ती आणि आजची ती यात अगदी जमीन आसमानाचा फरक वाटला त्याला.... वय जास्त नव्हतच मुळात तिच.... जेमतेम वीस एकवीस वर्ष.... पण त्यामध्येच खूप जास्त अनुभव घेतलेले तिने.... आणि त्यामुळेच असेल कदाचित पण मागच्या दोन वर्षात तिच्यात दिसणारा अल्लडपणा आणि बालिशपणा आज मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटला त्याला..... थोड्यावेळ वाईटही वाटलं पण.... पण तीच लायकी होती तिची.... कर्माची फळे होती... जी भोगल्या शिवाय सुटका तर नव्हती...
माझं काय काम असणार आहे तुझ्याकडे.... त्याने पण तेवढ्याच शांत आवाजात विचारल......
माझ्यासारख्या गरीब मुलीकडे तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाच काय काम असणार साहेब... पण ज्या कामासाठी तुम्ही थांबलाय ते माझ्याकडून तरी शक्य नाही होणार....... भीती तर वाटत होती तिला त्याची... पण स्पष्ट वक्तेपणा रक्तात होता तिच्या.... स्वतःसाठी स्टॅन्ड घेण्याची सवय अजूनही तशीच आहे बघून एक वेळ हसू आलं त्याला.....
कसलं काम..... त्याने अगदीच काही समजत नसल्यासारख विचारल......
पण त्यावर ती मात्र काहीच बोलली नाही...... पाच मिनिट बसून त्याने तिच निरीक्षण केल असेल.... आणि मग पटकन तिथून उठून बाहेर आला तो..... ती मात्र जाणाऱ्या त्याला बघतच राहिली......
आता प्रश्न पडले असतील की ती त्याला कशी ओळखते.... ती आहे तरी नक्की कोण.... आणि आणखी बरच काही... पण सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि पुढे जाणून घेण्यासाठी वाचत राहणं गरजेचं आहे......🤭🫣
Stay connected lovelies ♥️ 💞
Enjoy the reading ....
कथेचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी मला फॉलो करा.....
Love you all....♥️♥️♥️
All all rights are reserved ...no part of the story or publication maybe or can be reproduced , transferred in any other forms with digitally or in the form of print or anything without the permission of author , expect for the quotation in the book review...
copyright ©️ Shivanjali Kakade