प्रस्तावना:-
धैर्य हे पुस्तक जो कोणी हातात घेईल, त्याला असंच वाटेल की धैर्याबद्दल असेल हे पुस्तक किंवा एखाद्या धैर्यवान माणसाची गोष्ट असेल. हे खरंच आहे. पण धैर्याबद्दल काय सांगायचं? आजच्या इंटरनेट गुगलच्या जमान्यात कशाचीही माहिती एका मिनिटात इंटरनेटवर दिसून येते.अशाच काळात गुगलला विचारलं की धैर्य म्हणजे काय? तर लगेचच उत्तर मिळेल -एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला निर्धार आणि त्या कार्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे धैर्य.
मंग एवढ्याशा व्याख्येसाठी हे पुस्तक वाचायची काय गरज?
पण या पुस्तकात मी धैर्याबद्दल थोडीशी वेगळीच कल्पना केली आहे. माझ्या मते, धैर्य म्हणजे फक्त एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला निर्धार नाही तर एखाद्या कार्याचा शेवट होईपर्यंत स्वतःला त्यात टिकून ठेवणं, हे सर्वात मोठं धैर्याचं काम आहे! यात 'कोणतंही कार्य' म्हणजे अगदी कोणतेही! एखादं ध्येय ठेवून ते ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, आणि त्या ध्येयाच्या उद्दिष्टाने जगणं हे सर्वात मोठं धैर्याचं काम आहे.
जगातील सर्वात मोठे उदाहरण पाहायचं झालं, तर एक बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहत. त्या नऊ महिन्याच्या प्रवासात, त्या गर्भाला स्वतःमध्ये टिकून ठेवणं आणि त्या बाळानेही जन्माचा प्रवास पुर्ण होईपर्यंत तिथे टिकून राहणं...हे किती मोठं धैर्याचं काम आहे! हा नऊ महिन्याचा काळ म्हणजे धैर्याची सर्वात पहिली आणि सर्वोच्च परीक्षा असते.
या जगात प्रत्येक मनुष्याकडे ध्येय असते, पण त्या ध्येयासाठी लागणारे धैर्य हे प्रत्येक मनुष्यात नसते.
हे पुस्तक या कारणास्तव लिहिण्यात आलेला आहे... की या जगातील खूप लोकांनी आपल्या धैर्याने, निर्धारणे आणि विश्वासाने खूप काही मिळवल आहे. आणि त्यांच्याच धैर्याचं, धाडसाच उदाहरण घेऊन कित्येक लोक या जगात जगत आहेत. या आशेने की एक दिवस येईल आणि आम्ही सुद्धा त्या लोकांच्या बरोबरीने उभे असू. ज्यांच्या धैर्याने या देशातील गुलामगिरीचा पाया मोडला. ज्यांच्या निष्ठेने, निर्धाराने आणि कष्टाने या देशातील प्रत्येक मनुष्य समानतेने जगत शिक्षण घेतोय आणि काहीतरी ध्येय ठेवतो ते म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या जगात असे कित्येक महापुरुष होऊन गेलेत, ज्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहेत. ते कार्य आजही सर्वांच्या स्मृतीत आहेत. त्यांच्या धैर्याचं, निष्ठेच उदाहरण घेऊन कित्येक लोक त्यांच्यासारखं बनण्याच ध्येय ठेवतात आणि ते ध्येय तेव्हा धैर्य होते जेव्हा ते त्या ध्येयासाठी निपून प्रयत्न करतील, शेवटपर्यंत त्या कार्यात टिकून राहतील तेव्हां ते त्यांचे धैर्य म्हणण्यात येईल.
भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धैर्याने तब्बल सहा वर्ष विपश्यना करून, समाधी लावून, या विश्वाला सुख आणि शांतीचा महान संदेश दिला. त्यांच्या या विशाल धैर्याचं उदाहरण घेऊन कित्येक लोक त्यांच्या मार्गाने जाण्याच धैर्य ठेवतात.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताला जगातील विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन ठेवण्याचे भव्य स्वप्न पाहिले होते. हे त्यांचे ध्येय होते. आज कित्येक राष्ट्रपती होऊन गेले किंवा होणार ते सगळेच या ध्येयासाठी जगतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात. हेच त्यांचे ध्येय असते.पण हे ध्येय तेव्हाच धैर्य होईल, जेव्हा ते त्या कार्यासाठी अमाप प्रयत्न करतील.तसेच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास सुरू करून, त्यांनी आपल्या धैर्याने भारतीय क्षेपणास्त्र क्षेत्राचा पाया रचला. त्यांच्या याचं धैर्याचं उदाहरण घेऊन, आज जगातील कित्येक लोक त्यांच्यासारखं धैर्य ठेवून या जगत आहेत.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण 'शिक्षणाचे प्रतीक' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. त्यांचे शिक्षणाविषयीचे मत असे आहे. ते म्हणतात --"शिक्षण हे अथांग- महासागरासारखे आहे माणसाने आयुष्यभर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की गुडघाभर पाण्यात पोहोचेल एवढेच शिक्षण त्याने घेतले आहे". याप्रमाणेच माणसाने त्यांच्या धैर्याचे उदाहरण घेऊन, आपलं ध्येय मिळवण्यासाठी संकल्प केला पाहिजे कारण "संकल्प हा मानवापेक्षा खूप मोठा आहे".
एखाद्या माणसाने असा संकल्प केला, की तो समुद्रात बुडून समुद्राची खोली मोजेल, हे त्याच ध्येय आहे. हे त्याच ध्येय तेव्हाच धैर्य म्हणण्यात येईल, जेव्हा तो त्या कार्यात शेवटपर्यंत टिकून राहील, त्याच्यासाठी वाटेल तेवढा त्याग करील, वाटेल तेवढे कष्ट करील, तेव्हाच ते त्याचं धैर्य होईल. मी म्हणते एखाद कार्य करायला घेतलं, आणि त्या कार्यात आपण शेवटपर्यंत टिकून राहिलो, तर ते आपल धैर्य आहे. हे म्हणण्यात हरकत नाही. पण खरे धैर्य कोणात? जो मनुष्य काहीतरी कार्य करण्याचा फक्त विचार करतो, त्यात खरे धैर्य नाही. तर जो मनुष्य काहीतरी कार्य करण्याचा विचार करतो, तो विचार ते कार्य सत्यात उतरवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो, त्याग करतो, त्यात खरे धैर्य आहे. आणि तोच खरा धैर्यवान मनुष्य...!
×--------------------०---------------------×
तर ही गोष्ट आहे... अशाच एका धैर्यवानवाचकाची. वाचन सर्वांना प्रिय असले पाहिजे, कारण पुस्तक आपल्याला असं ज्ञान देतात जे कोणी देऊ शकत नाही ते आपल्याला अनुभव देतात.
"अनुभव हे जगातील सर्वात मोठी अमूल्य गोष्ट आहे". अनुभव सर्वांकडेच असतात.कोणाकडे चांगले, तर कोणाकडे वाईट, पण पुस्तकांकडे दोन्ही असतात. आणि तुम्ही विचारलं तेव्हा ते सांगतात,म्हणजे ते बोलत नाही किंवा स्वतः येऊन सांगत नाही. त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, वेळ काढून, त्याग करून,पुस्तक वाचन हे जगातील सर्वात मोठे धैर्याचं काम आहे. मग या जगात असे कित्येक पुस्तक आहेत. की जे आपल्याला अनुभव देतात, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, ते आपल्याला सांगतात की आपण किती मूर्ख आहोत. आपण आपल्याच दुःखांमध्ये जगत आहोत. पुस्तक आपल्याला आरसा दाखवतात, असा आरसा जो दुसरं आपल्याला कोणीच दाखवू शकणार नाही. पुस्तकांशी मैत्री हे जगातील सर्वात चांगली मैत्री आहे. म्हणूनच म्हणतात...
"पुस्तक प्रेमी मनुष्य नेहमी सुखी असतो"
अशाच एखाद्या धैर्यवान वाचकांची ही कथा आहे. त्याला वाटतं की आपण पुस्तकांच्या समुद्रामध्ये बुडून जाव हा त्याचा संकल्प आहे. पण हे त्याचं ध्येय तेव्हाच धैर्य म्हणण्यात येईल जेव्हा त्या कार्यात टिकून राहील, त्याच्यासाठी वाटेल तेवढा त्याग करेल, वाटेल तेवढे कष्ट करेल, त्या कार्याच्या शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच ते त्याचं धैर्य ठरेल.
तो वाचक म्हणतो,की जर तुम्हाला खूप दुःख झालेल आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे दुःख जगातील सर्वात मोठं दुःख आहे.तर तो सांगतो..
की कोई दर्द हो तो दर्द भरी किताब लेना, उसे पढ़कर दर्द भूल जाना।वो कहती है, कि यह तो बहुत छोटा सा दर्द है तेरा, मुझे पढ़ दर्द की दरिया में डूब जाएगी, उसे एक झटके में भूल जाएंगी। (त्या वाचकाला वाटतं पुस्तकांमध्ये जेवढे दुःख आहे. तेवढे या जगात कुठेच नाही, कारण पुस्तक अनुभव सांगतात... आणि अनुभव हे वाईट किंवा चांगले असतात.)
वाचक हा केव्हा वाचत असतो, जेव्हा तो त्या, पुस्तकांमध्ये बुडून पुस्तकाची भाषा बोलू लागतो. तेव्हा तो वाचक ठरतो. कारण त्याच्या बोलण्यामध्ये इतकं काही दडलेलं असतं, इतक्या खोलवर जाऊन तो बोलतो, त्याच्या बोलण्यात अनुभव असतो. तो अनुभव त्याला पुस्तकातून मिळालेला असतो. म्हणून पुस्तक वाचावी पुस्तक आपल्याला किती काहीतरी देत असतात. ते कळत नकळत इतकं ज्ञान देऊन जातात जे कधीच व्यर्थ जात नाही. पुस्तक वाचण्यात मग्न होऊन गेलेला मनुष्य सदैव म्हणतो, "पुस्तक बोलतात"ते आपल्याला खूप काही शिकवतात, वाचक म्हणतो की पुस्तकं बोलतात आणि म्हणतात...
किताबें केहती है की तू मेरी सून, मैने तुझे इस क़ाबिल बनाया की तू , मुझे समझा सके। लेकिन, आज तू मेरी सुन कल तुझे लोक सुनेंगे। (खरंच पुस्तक वाचल्याने एवढ ज्ञान तर येतच, की दुसऱ्याला सांगू शकाल आणि ते त्यांना पटेल सुद्धा कारण पुस्तक हे कधीच जगा देत नाही.)
म्हणूनच म्हणतात... "Today's reader tomorrow's leader".(तुम्हाला जर लीडर बनायचं असेल, तर पुस्तकांशिवाय दुसरा मार्गदर्शक कोणी असू शकत नाही.)
एखादा मनुष्य स्वार्थासाठी दुसऱ्याचा वाईट करू शकेल, पण पुस्तकं कधीच नाही. आपण शिक्षण घेतो, व त्या शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी बनण्याच धैर्य ठेवतो. ते धैर्य नव्हे तर ती इच्छा असते मग धैर्य म्हणजे काय? तर काहीतरी बनण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो, ते बनण्यासाठी शेवठपर्यंत टिकून राहलो, तर ते आपलं धैर्य होय. वाचक म्हटला, म्हणजे निरनिराळी पुस्तक वाचून काढणारा म्हणजे वाचक नव्हे, तर शिक्षणातील पुस्तक सुद्धा परीक्षेपूर्ती वाचायची म्हणून वाचत नाही. तर ते पण खूप काही शिकवतात, हे समजून त्या पुस्तकात बुडून जाऊन वाचतो. तो खरा वाचक! आणि तोच पुढे जातो, अशी वाचलेली पुस्तक परीक्षेतच नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात सदैव कामात पडतात. म्हणून तो वाचक परीक्षेत पहिला येतो. आणि बाकीचे येत नाही, कारण विचारलं तर तो सांगतो...
जब किताबें खोलकर देखना था। तब तू यादे बूनता था। Exam आते तब तू राते गनता था ।ऐसा नही होता,यह किताबें ही मेरी मोहब्बत है, इसे ठुकराया नहीं जाता। (खरंच जेव्हा वेळ असते ना तेव्हांच पुस्तक उघडून बघायला पाहिजेत, नाहीतर वेळ गेल्यावर पश्कचात्ताप करून काही फायदा नाही. तो म्हणतो, मला पुस्तकांशी प्रेम आहे. मी असं कधीच करत नाही)
तो म्हणतो, पुस्तकांशी प्रेम करून पहा हे जग खूप लहान वाटेल. हे पुस्तकांशी केलेल प्रेम कधीच वाया जाणार नाही. कारण पुस्तकं हे निस्वार्थी प्रेम करतात. आणि कोणताच व्यक्ती कोणावर निःस्वार्थ प्रेम करू शकत नाही, आईबाप पण आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करू शकत नाही, एखादी प्रेयसी सुद्धा प्रेयकाशी निस्वार्थ प्रेम करू शकत नाही.
असाच एक, प्रेयसीच्या प्रेमात पडलेला प्रियकर त्याच्या प्रेयसीला म्हणतो...
मां-बाप भी अपने बेटे से निसार्थ प्रेम नहीं कर सकते। वो भी उसे पालते हैं, ताकि बुढ़ापे मैं वो उनका सहारा बन सके। तू क्या ठुकराएगी मेरी मोहब्बत को, जा मैं ही तुझे ठुकराता हूं। तू कहती थी ना ,कि मैं तुमसे निस्वार्थ प्रेम करती हूं। तो कहां गया तेरा निस्वार्थ प्रेम, जब मैं सारी संपत्ति ठुकराकर तेरे पास आया हूं। (म्हणून म्हणते पुस्तकांशी प्रेम करा. दुःख पण मिळणार नाही, कष्ट पण भोगावे लागणार नाही, उलट दुःख दूर होईल व मोक्ष प्राप्त होईल.)
एखाद पुस्तक वाचणं व ते पूर्ण होईपर्यंत स्वतःला टिकून ठेवणं, आणि टाईमाचा त्याग करणं, हे सगळ्यात मोठं धैर्याचं काम आहे. हे जर तुम्हाला जमलं तर या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, की जी तुम्हाला जमणार नाही. एखाद्या मुलाने मुलीवर प्रेम केलं, किंवा एखाद्या मुलीने मुलावर प्रेम केलं, तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन व्यर्थ आहे. असं म्हणण्यासाठी खूप काही कारणे असतील,भांडण, राग भरणं चालू राहील, ज्या गोष्टीपासून आपल्याला किंवा कोणाला दुःख भेटत असेल, तर असे कार्य का करावे! यापेक्षा पुस्तकांवर प्रेम केलेलं बरं! जी मोहब्बत म्हणतात ना ती पुस्तकांच झाली पाहिजे. तर वाचक म्हणतो...
ऐ किताबों की मोहब्बत है। इसे पढ़ना पड़ता है।आजमाना नहीं, यह कोई लड़का नहीं ,की जो फेल हो जाए तो ढेर हो जाए। 'यह तो किताबें हैं ',इन्हें फेक दोगे तो ऐ गिरती नहीं, तुम्हें गिराकर ए खुद खड़ी होती है। 'यह किताबें हैं ', तुम नहीं तो कोई और सही, किसी के हाथ में जाकर इनकी खूबसूरती बढ़ती नहीं। ऐ तो वसे भी खूबसूरत है, किसी के हाथ की मोहताज नहीं। (खरंच पुस्तके कोणाच्या हाताची मोहताज नसतात. ते खरंच... इतकी सुंदर असतात की कोणाच्याही हातात गेली तर त्यांची सुंदरता अजून वाढून येईल.)
म्हणून पुस्तकांशी प्रेम करणारे, त्यांच्या पुस्तकांच्या अल्मारीला ते खजिना म्हणतात. "किताबों का खजिना" असा खजिना, ज्याच्या पुढे जगातील कितीही संपत्ती ठेवली तरी ती कमीच असेल. कारण पुस्तकांचा खजिना जगातील सर्वात अमूल्य खजिना आहे. पुस्तक वाचक, पुस्तकांवर इतकं प्रेम करतात,की त्यांची पुस्तक ते कोणाच्याही हातात देत नाही. त्यांना या जगाबद्दल काहीच पडलेल नसते. ते फक्त त्यांच्या पुस्तकात मग्न झलेले असतात. त्यांना कोणी त्यांच पुस्तक वाचायला मागितलं, तर ते बघा काय म्हणतात...
किताबें हमारी चाहत है। ना हम इसे किसी को देते है, ना किसी से लते हैं, खरीदते हैं और पढ़ते हैं। जुदाई की बातें नहीं करते हैं। (तो वाचक असं त्या पुस्तक मागणाऱ्याला म्हणतो. पण त्याला आठवतं की पुस्तकं शिकवतात की कुणाला दुःख देऊ नका. म्हणून वाचक पुढे म्हणतो...)
लेकिन कुछ देर बाद याद आया, की किताब ना देकर हमने किसी का दिल दुखाया है। यह पाप होता है, उसी किताब ने हमें बताया है। किताब देते वक्त कहां.. तेरी याद तो बहुत आएगी, लेकिन समझा देंगे हम इस दिल को, कि उसे भी तो पता चले, हमें क्यूं है , मोहब्बत इतनी किताबोंसे। पता तो चला लेकिन उसे भी मोहब्बत हो गई। यह मोहब्बत नहीं थी, लेकिन अपने पास रखने की चाहत हो गई। उसने रखी बात खरीदने की, तो हमसे बगावत हो गई। (किताबों ने हीं कहां है, किसी का बुरा ना किया करो, और बुरे का कभी साथ ना दिया करो।) वाचक पुढे म्हणतो... किताबें बेचीं नहीं जातीं, खरीदी जाती है। "नई किताब तो खरीदेंगे लेकिन उस किताब को कभी भूल नहीं पाएंगे"।
वाचक कधीच बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांना हे बाहेरचं सगळं काही निरर्थक वाटतं, त्यांना बाकीच्या सर्व गप्पागोष्टी व्यर्थ वाटतात, त्यांना फक्त आणि फक्त पुस्तकांसोबत राहण्याची इच्छा असते. ते म्हणतात एकदा एखाद्या पुस्तकांमध्ये मिसळून जा, दुसरी काहीच इच्छा राहणार नाही. हे जग विसरून जाल, इच्छा, आकांक्षा सर्व व्यर्थ होतील, तुम्ही स्वतःलाच विसरून जाल. पुस्तकांबरोबर जगू लागणार, पुस्तकांसारखेच वागू लागणार, जर तुम्ही पुस्तकांसोबत राहिले तर तुमचं चांगलं आणि फक्त चांगलंच होईल. जगात गुलाम व गुलामगिरी सर्वात वाईट गोष्ट आहे. पण पुस्तकांची गुलामी ही कधीही चांगली. जीवनात माणसाच्या गुलामी पेक्षा पुस्तकांची गुलामी कधीही चांगली. एखाद्या व्यक्तीने कोणावर प्रेम केलं आणि त्यात त्याला निराशा मिळाली, त्याचं प्रेम त्याला मिळालं नाही. तर तो त्या व्यक्तीला कधीच विसरू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या दुःखामध्ये जगत राहतो. तर तो वाचक म्हणतो, म्हणून म्हणतात... पुस्तकांशी प्रेम करा. कधीच निराशा मिळणार नाही आणि पुस्तकांमध्ये रमलेला मनुष्य स्वतःला विसरून जातो. तर एखादी व्यक्ती विसरणं त्याच्यासाठी काहीच नाही. जर तुम्ही तुमच्या प्रेमाला विसरू शकत नाही. तर वाचक म्हणतो...
मैं कहता हूं, तू बस एक बार किताबों की studio मैं जाकर बैठ। जो कीताब हात में आएं वो पढ़कर देख।उसे भुला सका तो मेरे पास मत आना लेकिन, कीताबों को शुक्रियादा कहें बिना कभी मत जाना। (खरंच पुस्तकांमध्ये एवढी ताकत असते की ते आपल्या या जगाला पूर्णपणे विसरायला लावतील मग एखादी व्यक्ती तर त्यांच्यासाठी काहीच नाही)
त्या वाचकाला कोणीतरी विचारतं, की तुम्हाल सुद्धा प्रेम झालं असेल कदाचित, म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला विसरण्यासाठी पुस्तक वाचायला लागले असणार. वाचकाला पुस्तकांशी खरंच इतकं प्रेम होतं, की तो चिडून त्या माणसाला म्हणाला...
मैं बता दूं आपको, हजार टका लाख टका, मुझे किसी और से मोहब्बत नहीं है। लेकिन, किसी एक से भी नहीं है। मुझे मोहब्बत है उन सारी किताबों से जो है और जो नहीं है।
वाचक जेव्हा त्याची बारावी झाली होती.त्याला बारावी मध्ये खूप कमी मार्क्स आले होते. म्हणून त्याला खूप जास्त घरच्यांचे व बाहेरच्या लोकांचे सुद्धा बोलणे ऐकावे लागले होते. कारण की तो पुस्तक वाचण्याचा खूप जास्त कंटाळा करत असे पण एक दिवस असा आला की त्याला पुस्तकांची किंमत कढली त्याला असं पुस्तक भेटलं की ते तो पुस्तक कधीच विसरू शकत नाही आणि विसरू शकणारही नाही. कारण ते पुस्तक होतं भारतरत्न, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चारित्र्यावर ते पुस्तक जेव्हा त्याने वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्याला ते पुस्तक सोडण्याचं मनच होत नव्हतं. त्याला वाटत होतं की या पुस्तकात पुढे काय असेल, पुढे काय घडेल, म्हणून तो पुस्तक वाचतच गेला आणि जेव्हा ते पुस्तक पुर्ण दाल तेव्हाचं तो थांबला. त्या पुस्तकापासून त्याला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. मग तो फक्त पुस्तकं वाचू लागला आणि आता तो खूप मोठा वाचक म्हणून ओळखला जातो. त्याच्या धैर्याचे हे उदाहरण आहे आपण जे काम हाती घेतलं ते मृत्यूपर्यंत कितीही संकट आली, तरी करत राहायचं. आता तो वाचक फक्त पुस्तकांची वाट बघत आहे. पुढे तो वाचक म्हणतो...
हमे कीताबों से मोहब्बत कितनी, ए बताना हम फिजूल समझते हैं। ना जाने कितना इंतजार किया हमने उनका, की कब वो रिलीज होती है, कब वो स्टुडियो में आती है, और कब हम उसे पढ़ते हैं। की कब हम उसकी एक झलक देख पाते हैं। कोई जाकर कहों उसके मालिक से की से जल्दी खत्म करें उसे, नहीं तो इंतजार करते-करते कहीं हम मर ना जाए।उस किताब का हमें रहेगा मर कर भी इंतजार। पूरी कर लेना तो भिजवाना जरूर, हम कफ़न से उठकर आयेंगे लेकिन पढ़ेंगे जरूर।
हेच तर खरं धैर्य आहे! माणसांत जर हे धैर्य असलं तर जगातील अशी कोणतीच गोष्ट नाही, जे त्याला जमणार नाही.
।।धन्यवाद।।
लेखक:- Sakshi wakode