Divas books and stories free download online pdf in Marathi

दिवस

दिवस

कोणता दिवस कसा उगवेल आणी कसा मावळेल हे कोणालाच माहीत नसते

आपण इथे काहीतरी ठरवीत असतो पण ईश्वराची काय योजना असते हे कधीच समजत नसते

कधी कधी अगदी उदास वाणा असा वाटणारा दिवस सुद्धा संपताना आनंदी होतो

तर कधी आनंदी उत्साही दिवस मावळताना अगदी ..उदासवाणा होवून जातो ..

असाच काहीसा अनुभव मागील आठवड्यात आला ..

मध्यंतरी माझ्या गावी गेले होते

जवळ जवळ पंधरा दिवसांनी जात होते तिकडे ..

खुप आनंदात होते .सुटी असल्याने चार दिवस मुक्काम पण होता .

गाडीत च प्लान चालू होते आमचे ..!

गावात ..पोचलो तर संध्याकाळ झाली होती

घरी कोणीच नसल्याने पोर्च ला लाईट पण नव्हती

मीच गाडीतून उतरून कुलूप काढून गेट उघडले .

पण एका कोपर्यात काही केल्या उघडेना ..अडून च बसले होते

मग सरळ कुलूप काढून आधी दार उघडले आणी पोर्च चा दिवा लावला

काय अडकले होते कोपर्यात म्हणुन पहिले तर ...धस्स झाले मनात ..!!!

आमची लाडकी छोटी काळी मांजर कोपर्यात मरून पडली होती ..

क्षणभर काय करावे समजेना ..मीच जाउन गाडीत बसलेल्या अहोना सांगितले

बघा हो काळी मरून पडलीय ..

मग हे उतरून आले गाडीतून .आणी पहिले तर तिचा मरून दगड झाला होता

कसेतरी उचलून बाहेर ठेवली ..जमिनीत पुरून टाकावे म्हणले तर हा धोधो पाऊस ..शक्यच नव्हते ..

मग घरात आलो पण भुकच गेली जेवण खाण..सुचेना

कसेतरी चार घास खाल्ले आणी पडलो

आमच्या गावी .पंधरा दिवसा पुर्वी आम्ही आलो होतो

तेव्हा चार दिवस रोज येत होती दुध प्यायला ..कसा काय तीला पत्ता लागायचा आम्ही आलेला कोण जाणे !!

काळी मनी म्हणजे आम्ही सांभाळलेली वगैरे नव्हती .

आमच्या मागच्या अंगणात मांजर लोकांचा वावर नेहेमी असे

कारण पुढील दारी आमचा कुत्रा जीमी असे ना ..त्यामुळे तिथे त्यांना नो एन्ट्री ..!!

अशीच एक मनी आमच्या घरी कायम येत असे ..

काही दिवसांनी तीला दोन काळी पिल्ले झाली ..

दोन्ही त्यांच्या आईबरोबर येवून माझ्याकडे एकत्र दुध पोळी खात असत .

माझ्या छोट्या भाचीला काळी मांजर खुप आवडते ..

तीला पण मी सांगितले होते अग आमच्या कडे दोन काळी माउ आहेत

तु एक घेवून जा ..इकडे येवून ..

अचानक दोन पिल्ला मधील एक कुणीतरी घेवून गेले

कुणी सांभाळायला नेले का कुत्र्याने पळवले हे नाही समजले

मग मात्र हीच एक काळी शिल्लक राहिली ..

ही मात्र पहिल्या पासुन खुपच आक्रमक होती .!!!

जरा सुद्धा तीला हात लावलेले चालत नसे ..लगेच बाईसाहेब बोचकारत असत

आई बरोबर दुध पोळी खायला आली तरी आधी ही खाणार ..मग आईला संधी .

आई पण बिचारी अशा वेळी लांब जावुन बसत असे ..

काळी ची एक खासियत म्हणजे तीला बसायला आमचा झोपाळा च पाहिजे असे

मला तर त्या वेळी खुप राग येई ..आम्हाला बसायला नाही वेळ मिळत आणी ही बया कशी निवांत बसलीये पहा

असे मी रागाने (खोट्या ) म्हणत असे ..!!!

आमच्या झोपाळ्या वर कायम मखमली उशा असत

जर झोपाळ्या वरच्या उशा काढून ठेवल्या तर तीला खुप राग येई

दारात येवून मोठ्या मोठ्या ने गुरगुरत असे

दुध पोळी खायला दिली तरी फक्त वर वर चे दुध पिउन पोळी टाकून देई ..

अशा वेळी मला खुप राग येई ..पण तिची सवय कधीच बदलली नाही

या आणी अशा अनेक आठवणी येऊ लागल्या मनीच्या ..रात्रभर झोप अशी लागलीच नाही !!

रात्र अशी वाईट गेली ..आता थोडे दिवस तरी मनीचा विषय डोक्यातून जाणांर नव्हता !

दुसऱ्या दिवशी दिवस भरात कावळे आणी इतर प्राण्यांनी तिचा फडशा पाडला

पार होत्याची नव्हती झाली काळी ,.,मनी !!

दुसरा दिवस असाच “नाखुश “उगवला होता

सकाळी फिरायला बाहेर पडलो .खुप दिवसांनी इथे फिरायला आलो

पुर्वी या रस्त्यावर नेहेमी एक मावशी त्यांच्या दारात उभ्या असत ..

नेहेमी किरकोळ गप्पा पण होत असत अशाच काही तरी इकडच्या तिकडच्या .

रोज फिरायला येणारी आणी” बोलकी” अशी त्यांना आमची जोडी खुप आवडत असे

मावशी पण खुप कर्तबगार आणी हुशार होत्या

घरात गिरणी चालवायच्या दोन मसाल्याचे डंख पण होते घरात

नवर्या बरोबर राबुन मुलांना चांगले शिकवले होते

मुलींची लग्ने पण करून दिली होती ..छान संसार होता त्यांचा

दोन मुले हसत मुख सुना आणी तीन चार नातवंडे ..खुप आनंदी असत त्या !!

हल्ली खुप दिवस गाठ नव्हती पडली

आणी त्या समोर दिसल्या

“काय म्हणता मावशी कशा आहात ..?

मावशी थांबल्या ..थोड्या कृश झाल्या होत्या ..पण नजरेत ली चमक तीच होती

लई दिवसांनी दिसलास ..जनु ..

आम्ही कुठे आहे वगैरे त्यांनी नाही विचारले बहुधा तो विषय त्यांच्या डोक्यात नव्हता

पटकन आम्हाला त्यानी त्यांच्या घरा पासून थोडे दुर नेल ..

मला समजेना असे का करीत असतील त्या .,

मग त्याच म्हणाल्या मालकास्नी लयी बर न्हायी बगा ..

काय झाले हो ?..मी विचारले

मेंदूचा रोग झालाय न्हव ..काय बी वळकत नायत आणी काय समजत बी नाय ...

डॉक्टर म्हणतात आता अशेच रहाणार ..जीत्ते हायेत तोवर

बोलताना काही क्षण मावशींच्या डोळ्यात पाणी आले

मग मीच म्हणाले आहात ना तुम्ही करणाऱ्या ..

होतील ते बरे थोडे दिवसात (उगाच फोल मावशीना दिलासा )

मावशी एकदम म्हणाल्या आता कुटले बरे व्हत्यात ..आता असच दिस मोजायच ..

मावशीनी काकांचे आजारपण आणी पुढील येणारा मृत्यू पण स्वीकारला होता

मनातल्या मनात मला मावशींच्या मनाच्या उभारीचे कौतुक वाटले !!

काय बोलाव सुचेना पुढे ...मग त्याच ,म्हणाल्या

तरी बर मुल सुना लयी चांगल्या हायती ..सुना तर लेकीवानी काळजी घ्येतात

मग असेच त्यांच्याशी काही समाधानकारक बोलुन पुढे गेलो

पण मावशी आणी त्यांचा माझ्या समोर झालेला जीवन प्रवास डोळ्या पुढून जाईना !!

त्या दिवशी संध्याकाळी एका डॉक्टर मित्रांना भेटायला गेलो

अगदी जवळचे मित्रत्वाचे ..संबंध त्यामुळे गावी गेलो की एखादी चक्कर होतच असे

मग इकडल्या तिकडल्या गप्पा, अनुभवांची देवाण घेवाण वगैरे

आम्हाला आणी त्यांना दोघांना ही एकमेकांना भेटले की खुप मस्त वाट्त असे

त्यांचे वय जास्त असले तरी राहाणीमान एकदम आधुनिक असे

केसांना व्यवस्थित डाय वगैरे ..कायम हसतमुख चेहेरा

नुसते पाहिले तरी पेशंट ना बरे वाटत असे .लोकप्रिय व्यक्तिमत्व होते ते !

त्या दिवशी दवाखान्यात गेलो त्यांना भेटायला ..

तर काय आश्चर्य दवाखान्यातअगदी सामसूम ..एरवी म्हणजे पाऊल ठेवायला जागा नसे

डॉक्टर स्वत कम्पाउंडर च्या खुर्ची वर बसुन.काही कागद चाळत होते

त्यांनी वर आमच्या कडे पाहिले ..प्रथम त्यांच्या “नजरेत “आम्ही आलोच नाही

मग मात्र ते म्हणाले या ना आत या बसा ..मी आलोच

आम्ही त्यांना पाहुन थक्कच झालो ..!!

हेच का ते नेहेमीचे डॉक्टर .?

चुरगाळलेले कपडे, ..चेहेरा एकदम ताणलेला, डोळे तारवटलेले

केसांना बरेच दिवस डाय नसावा ..त्यामुळे केस पांढरे ..पडलेले

कशातच लक्ष नसलेले हे कसे असतील आपले डॉक्टर ..?

मग आत गेलो त्यांनी आमची जुजबी विचारपुस कशी तरी केली .

आणी मग अचानक म्हणले मिसेस ना झटका आलाय हृदय विकाराचा खुप मोठा

आम्ही एकदम चकित झालो ..मनात आले तरीच ही अवस्था यांची

कीती दिवस झाले आम्ही विचारले .?

तसे पंधरा दिवस झाले अजुन् दवाखान्यात आहे

हळू हळु सुधारणा होईल म्हणतात डॉक्टर तीथले ..

हृदय विकारातले निष्णात असलेले डॉक्टर पत्नीच्या आजारा पुढे हतबल झाले होते !!!

तसे सगळे उत्तम उपाय चालु आहेत होईल काही तरी

असे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले .

त्यात घरी करायला कुणी नाही ना ..मग मुली च थांबल्या आहेत आपले घर संसार सोडून

मी तर असतो तिच्या जवळ .. दवाखान्यात.

मग पेशंट पण घरी पाठवले सारे

कोण पाहणार त्यांच्या कडे ?

दवाखान्यातील शांततेचे पण कारण आता समजले आम्हाला

मग आम्हीच काहीतरी (फोल )बोलून त्यांचे शांतवन केले

काळजी घ्या होतील लवकर त्या बऱ्या ..असे बोलून त्यांचा निरोप घेतला

तीस चाळीस वर्षाचा सुखी संसार असलेली जोडीदारीण .

कदाचित तिचा अंतकाळ जवळ आला असावा ..

किंवा बरी झाली चुकून माकुन तर अपंगत्व यायची पण शक्यता .

ही सारी माहिती तर असणारच डॉक्टर ना ..

इतर लोकांचे आजार बोलून बरे करणाऱ्या त्या माणसाला आपल्या पत्नीचे हे इतके

मोठे आजारपण झेपत नव्हते !!!

सहन होत नाही आणी सांगताही येत नाही असा प्रकार होता तो ..

आम्ही पण विषण्ण झालो .पण खरेच दैव गती पुढे इलाज नव्हता

त्या एक दीड दिवसात हे सारे पाहुन ..माझे पण मन सुन्न झाले