Swargachi sahal books and stories free download online pdf in Marathi

स्वर्गाची सहल

“स्वर्गाची सहल …

yes

दचकलात ना वाचून ..

हा कसला अविस्मरणीय प्रवास ..??

होय मित्रानो हा प्रवास आहे ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात अशा “काश्मीर “चा

असे म्हणतात की जीवनात येवून ज्याने काश्मीर नाही पहिले त्याचे जीवन व्यर्थ आहे ..

दोन वर्षा पूर्वी माझ्याही नशिबात हा योग आला !

आम्ही जेव्हा एक मोठी ट्रीप करायची ठरवली तेव्हा आमचा पहिली निवड “काश्मीर “होती

मग ठरवले “केसरी “बरोबर काश्मीर करायचे .दोन महिने आधी बुकिंग पण केले “

दोन एप्रिल ला आम्ही मुंबईत दाखल झालो श्रीनगर विमान प्रवासासाठी ..

आणी योगायोग म्हणजे त्या दिवशी आपली वर्ड कप फायनल क्रिकेट म्याच पाकिस्तान सोबत होती

आम्ही जिथे उतरलो होतो दादर ला तिथे रस्त्यावर मोठा स्क्रीन लावला होता

मस्त म्याच पाहिली आणी ती जिंकल्याचा “थरार “पण अनुभवला !!!

संपूर्ण दादर भागात तेव्हा ..भयंकर धमाल चालली होती ..

सुरवात अशी “हटके ..आणी छान झाली !!!

दुसऱ्या दिवशी सकाळी निघून ..अकरा वाजता श्रीनगर ला पोचलो

..........काश्मीर ला पोचल्यावर प्रथम गुलमर्ग पाहायला जाण्याचे ठरले

यात तीन टप्पे असतात पहिला टप्पा .. उंची .८५०० फुट ..तन्मर्ग

दुसरा टप्पा गुलमर्ग .उंची ..११५०० फुट . आणी शेवट खिलमर्ग उंची १३५०० फुट

हवामान ठीक नसेल तर दुसऱ्या टप्प्या पर्यंत च फक्त जाता येते ,,

जाण्यापूर्वी मोठे गम बुट व फरचा कोट भाड्याने घेवून घालावा लागतो

इथे जाण्यासाठी जी रोप वे केबल आहे तीला “गोन्डोला”राईड म्हणतात

त्यात बसून अक्षरश आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय हे अनुभवले !!

आमच्या सुदैवाने हवामान अनुकूल असल्याने आम्ही खिलमेर्ग पर्यंत जावू शकलो

तिथे बर्फ पण भरपूर असल्याने बर्फात खेळणे ,..बर्फातील स्केटिंग वगैरे मजा भरपूर घेतली

..बर्फात भरपूर लोळलो ..एकमेकांच्या अंगावर बर्फ टाकून खेळण्यात तर धम्माल आली !!

इतक्या उंचीवरून पुण्यात फोन करून घरच्या लोकांशी बोलणे पण एक वेगळे थ्रील होते !!

तेथे फक्त बिएसेनेल नेटवर्क .होते ...

परत येताना इतक्या उंचीवरून गोन्डोला राईड मधून बर्फाचे डोंगर पाहायला मस्त वाटत होते

वरून भरपूर फोटो ..मोबाईल मध्ये गाण्यांचे पण विदिओ शूट घेतले आम्ही ..

त्यानंतर दोन दिवस आमचा मुक्काम असणार होता हाउस “बोट “मध्ये

मग आमच्या स्वाऱ्या “दाल लेक कडे रवाना झाल्या ..

“दाल लेक “एक अप्रतिम सरोवर आहे ..असे म्हणतात पंडित नेहेरू रोज दाल लेक चे पाणी पीत असत

आम्ही गेलो तेव्हा भरपूर पाऊस चालू होता ..

शिकार्यातून ..हाउसबोटी कडे जाताना पण डोक्यावर प्लास्टिक पांघरावे लागले .

हाउस बोट ..एकदम देखणी सर्व सोयीनी युक्त होती

आतून पाहिल्यावर वाटणार पण नाही की ही पाण्यात आहे .आणी लाकडाची बांधली आहे ..

दोन दिवस तिथे रहाण्याचा अनुभव प्रचंड वेगळा होता .

बाहेर भरपूर पावूस् कडाक्याची थंडी .. बोटीखाली ..तळ्याचे पाणी ..

भरपूर कपड्यांचे थर अंगावर असून सुध्ध्दा ..दात कडकड वाजत होते ..

या थंडीत झोपण्याच्या बेड खाली पण हिटर होते ..

तरीही थंडी भागायचे नाव घेत नव्हती ..

बाहेरच्या खोलीत एक मोठी उंच शेकोटी होती ..

आम्ही आमचा बराचसा वेळ तिथेच ..घालवायचो .

येथे खास काश्मिरी पद्धतीच्या जेवणाची चव चाखायला मिळाली

शिवाय येथील खास पेय “कहवा “पण आम्हाला आग्रहाने प्यायला देण्यात आले

तेथे आम्ही चार चिनार ..फ्लोटिंग गार्डन ..फ्लोटिंग शोप्स पहिली .

शिकार्यात बसताना कश्मीर की कली मधील “तारीफ करू क्या उसकी “.

या गाण्याची हमखास आठवण होत होती ...!

यानंतर आम्ही दोन दिवस आम्ही तेथील निरनिराळ्या बागा पहिल्या

यातील “निशात बाग ..शालीमार बाग ..ट्युलिप गार्डन ..या बागां केवळ अप्रतिम !!

ट्युलिप गार्डन मध्ये फक्त” एप्रील” या एकाच महिन्यात फुले असतात

त्यामुळे आम्हाला त्याची मजा घेता आली .ही बाग पाहताना “सिलीसिला “सिनेमाची

आठवण झाल्या शिवाय राहत नाही .!

येथे एक पुरातन शंकराचार्य मंदिर आहे ..तेथे वरून पूर्ण श्रीनगर व झेलम नदी दाल लेक

पाहण्याची मजा येते .

यानंतर दोन दिवस पेहेलगाम येथे जायचे होते

ते भारताचे “स्वित्झर्लंड” म्हणून ओळखले जाते तेथे जाताना पाम्पोर येथे केशराचे मळे पाहिले

त्यानंतर “अवन्तिपूर “येथे विष्णुचे एक सुंदर मंदिर पाहायला मिळाले

येथे क्रिकेट ब्याट फ्याक्टरी आहे .भारतातील सर्व ब्याट येथेच तयार होतात कारण त्यासाठी

लागणारे लाकूड येथे तयार होते ..मात्र ब्याट ची मुठ मात्र आसाम मधून येते

“तेथून पुढे मात्र भरपूर बर्फवृष्टी सुरु झाली “लीडर “नदी काठी आमचे हॉटेल होते

चोहीकडे बर्फ ..बर्फ आणी फक्त बर्फ च होते ..!!!!

सर्व रस्ते बर्फामुळे बंद असल्याने फार फिरता आले नाही

मात्र बर्फाची खूप मजा घेतली ..काश्मिरी ड्रेस मध्ये “फोटो सेशन “केले

पेहेलगाम ..हाच अमरनाथ यात्रेचा बेस क्याम्प आहे

येथील नदीच्या काठावरीलअसलेल्या पोलीस स्टेशन मध्ये

एका बोर्ड वर लिहिलेलं एक वाक्य मनाला स्पर्शून गेले

WE DON’T SLEEP ..FOR YOUR “SLEEP !!!!

खरेच काश्मीरमध्ये आपण मुक्त पणे सौंदर्याचा आस्वाद घेवू शकतो

याचे कारण ..सदैव बरोबर असणारी भारतीय सेना

यासाठी येथील भारतीय लष्कराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत

.........याचा आलेला एक “अनुभव “म्हणजे आम्ही गुलमर्ग वरून जेव्हा

श्रीनगर ला परत येत होतो तेव्हा “लाल चौक “येथे जामा मशिदी जवळ

झालेला स्कुटर मधील बॉम्बस्फोट !

या बॉम्बस्फोट मध्ये अचानक कर्फ्यू लावायला लागला

तेव्हा मिलिटरी ने पर्यटक लोकांना अत्यंत सुरक्षित रित्या त्यांच्या

हॉटेल वर पोचवायची व्यवस्था केली व काळजी पण घेतली ..!

या ट्रीप चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला येथे

सर्व प्रकारचे सिझन एका वेळी अनुभवायला मिळले ..

एक म्हणजे ..आम्ही बर्फुले पाहिली ..हे ,म्हणजे बर्फ अक्षरश आकाशातून छोट्या

फुलांच्या रुपाने अंगावर पडते ..!!!

भरपूर पाऊस ,,व कडाक्याची थंडी अनुभवली ..!!

भरपूर बर्फाचा बेफाम पाऊस व त्यामुळे सर्व परिसर बर्फमय झालेला अनुभवला !!

शिवाय भरपूर उन ..ज्यामध्ये बर्फाच्छादीत शिखराचे अत्यंत मनमोहक दर्शन झाले !!

..............अशी ही काश्मीर सहल ..दोन वर्षे झाली तरी अजून त्याची “अनुभूती “कायम

आहे असे वाट्ते ..परत परत जावे आणी ..ही सहल करून यावी .!!!