Navi Sakal books and stories free download online pdf in Marathi

नवी सकाळ...

नवी सकाळ... Inspiring and Motivating story.

निशा च शिक्षण पूर्ण झाल. लगेच जॉब सुद्धा मिळाला.. पण तरी सुद्धा ती खूप खुश दिसत न्हवती.. ती एकटी एकटी रहायची.. कोणाशी जास्ती बोलायची देखील नाही! निशाच्या आईला वाटायचं कामात बिझी असेल म्हणून तीच वागण बदलल असेल पण निशा डिस्टर्ब झाली आहे हि गोष्ट निशाच्या आईच्या लक्षात आली नाही. निशा जास्तीत जास्त वेळ बाहेर रहायची... पण त्या दिवशी निशा शांतपणे बसलेल पाहिलं... आईनी निशाला निवांत बसलीये हे पाहिलं आणि ती निशाशी बोलायला लागली..

“निशा... तुझ मनासारखं शिक्षण पूर्ण झाल... हवा तसा जॉब देखील मिळाला... आता लग्नाला मुलं पाहायला लागू का? कि तू कोणी पहिला आहेस? असेल तर सांग.. तुला माहितीये,तुझे बाबा आणि मी तसे फॉरवर्ड विचारांचे आहोत.. आम्ही नकार देणार नाही!! आणि त्यात तू एकुलती एक आहेस.. आमची लाडाची लेक!!! तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही आम्ही!! तुझ एकदा मार्गी लागल कि आम्ही जग भर फिरायला मोकळे!! तुला एकटीला ठेऊन जावस वाटत नाही.. आणि तुझा जॉब आहे त्यामुळे तुलाही आमच्या बरोबर येत येणार नाही!! तू लग्न केलस कि आम्ही मोकळे! महत्वाची जबाबदारी असते... आणि नाही म्हणल तरी मुलीच्या लग्नाच टेन्शन असतच!!”

“आई...” आईच्या अंगावर ओरडत निशा बोलली, “काय सारख लग्न कर लग्न कर लावलय तू? लग्नाशिवाय आयुष्यात काही नाहीचे का? मुलीनी लग्न केल,तिला मुल झाली कि तिच आयुष्य पूर्ण होत अश्या विचारांची तू पण आहेस आई? आय अॅम शॉक्ड.. तू आणि बाबा इतके शिकलेले आहात.. तरी हे असेच विचार आहेत तुमचे?” निशा आईच बोलण ऐकून वैतागली आणि चिडून बोलायला लागली.. निशा एकदम इतकी का चिडली ते आईला समजल नाही पण तरी ती शांत राहत बोलली..

“मला वाटल आणि मी बोलून दाखवलं... तू इतकी का चिडती आहेस? आणि तुला लग्न करायच नाहीये? कधी सांगितल तू मला? ह्या आधी लग्नाबद्दल तू कधी बोलली न्हवतीस.. तू आधी सगळ सांगायचीस मोकळेपणानी... पण जर तू काही सांगितलं नाहीस तर कस कळणार आम्हाला? मला तरी कस कळणार तुझ्या मनात काय आहे?”

“सॉरी आई..” निशाला आपण उगाच चिडून बोललो आईशी हे जाणवलं आणि ती चूक मान्य करत बोलली “आधी माझाही लग्नाला नकार न्हवता.. पण माझ्या मैत्रिणींकडून लग्नानंतरचे किस्से ऐकले आणि माझी लग्न करायची इच्छाच गेली..” पण आईशी बोलतांना ती आईच्या डोळ्यात पाहून बोलत न्हवती...आई नी ते लगेच हेरल.. आणि ती लगेचच बोलायला लागली,

“काय सांगतात तुझ्या मैत्रिणी? तू आधी कधी तुझ्या मैत्रिणींबद्दल बोलली नाहीस मला.. मैत्रिणीनी काही सांगितलं त्यामुळे तुला लग्न करायचं नाहीये कि अजून काही झाल आहे जे तू आम्हाला सांगितलं नाहीयेस? आणि माझ्या डोळ्यात पाहून का बोलत नाहीयेस? तू काहीतरी लपवत आहेस का?”

आईनी निशा काहीतरी लपवती आहे हे ओळखल.. आणि आईच्या डायरेक्ट प्रश्न ऐकून निशा ला रडू फुटलं... ती काही बोलू शकली नाही!!

“काय झाल निशा? तू मनानी खूप खंबीर आहेस... तू खूप कमी वेळा रडतेस... आत्ता तू निवांत बसलेली दिसलीस म्हणून विषय काढला तुझ्या लग्नाचा... पण एकदम तू रडायला लागलीस? का रडती आहेस निशा? तू लग्नाचा विषय काढला आणि इतकी अस्वस्थ का झालीस?”

निशानी स्वताला सावरल.. ती जरा वेळ शांत बसून राहिली आणि ती बोलायला लागली..

“आई... मी सांगितलं न्हवत तुला किंवा बाबांना.. कॉलेज मध्ये माझ एका मुलावर प्रेम होत..”

निशाच बोलण ऐकत असतांनाच तिच्या आईनी तिला मधेच थांबवलं... आणि ती बोलायली लागली...

“काय..??... तू सांगितलं नाहीस मला .. तुला माहिती आहे आम्ही प्रेम करण्याबद्दल कधीच आक्षेप घेतला नसता... आम्ही तुला नाही म्हणलो नसतोच ना.. तरीही तू काहीच का नाही सांगितलस आम्हाला? आम्ही नकार नक्की देणार नाही! पण तुझ कोणावर तरी प्रेम आहे तरी तुझा लग्न करण्याबद्दल इतका राग का? काय झालाय? मला माहितीये, तुझ तुझ्या बाबांबरोबर जरा जास्तच जमत... माझ्याही पेक्षा जास्ती तू त्यांच्याशी मोकळेपणानी बोलतेस... तू बाबांना सगळ सांगतेस... पण त्यांना हि काही सांगितलं नाहीस..”

“नाही सांगितलं... म्हणजे मी विचार केला सांगू सांगू...आणि जेह्वा सांगाव म्हणल तेह्वा आमच्यातल सगळच संपल होत!! आता माझ्या सो कॉल्ड प्रेमाबद्दल सांगण्या सारख काहीच राहिलेलं नाहीये आमच्यात... आता मला त्याच नाव ऐकल तरी चीड येते.. तुला कळल नसेल कि मी डिस्टर्ब झालीये कारण जॉब लागल्यापासून आपल निवांत अस बोलण झाल नाहीये!! मी सकाळी जाते..आणि रात्री उशिरा येते.. शनिवार रविवार मी माझी काम करण्यासाठी बाहेरच जायचे... मी मुद्दामच बिझी राहती आहे. पण आज मी निवांत बसले.. खर सांगू का? मला तुम्हाला फेस करायचं न्हवत...त्यामुळे आपण निवांत समोरासमोर बसून बोललोच नाही ना... आणि मी माझ मन तुमच्या समोर मोकळ केल नाही!!”

“मला कधी जाणवलं नाही कि तू डिस्टर्ब आहेस! आम्हाला वाटत होत तुझा नवीन जॉब, नवीन मित्र मैत्रिणी त्यात तू बिझी असशील.. आणि तुझ्या आयुष्यात काही झाल असेल ह्याचा आम्हाला पत्ताच नाही लागला.. मला कधी काही जाणवलं पण नाही कि तुझ्या आयुष्यात काहीतरी झाल असेल... आणि मी माझ्या मुलीला समजून घेऊ शकले नाही?” आईच्या डोळ्यात पाणी आल.. “आम्हाला वाटत होत, तू प्रत्येक गोष्ट आमच्याशी शेअर करतेस पण तू तस करत न्हवतीस हे हि आम्हाला दोघांना जाणवलं नाही!!! आणि काय झालाय? आज सगळ मन मोकळ कर...निशा... प्लीज कोड्यात बोलून मला गोंधळात पाडू नकोस!! आणि मनात कुढत बसू नकोस!!”

“काय सांगू स्पष्ट? आमच्यात आता काहीच नाहीये...” निशा नी आईला सांगितलं... तीच बोलण ऐकून आईला धक्का बसला होता पण आईनी स्वताला सावरल.. आणि ती बोलायला लागली,

“काहीच कस नाही? काहीतरी झाल ना तुझ्या आयुष्यात? पहिल्यापासून सगळ नीट सांग... मला तुझ्या आयुष्यात काय काय झालाय हे कळल पाहिजे.. जरा सविस्तर सांग!!! मला सगळ माहिती असण गरजेच आहे.. आणि डोंट वरी! आता आम्ही आहोत तुझ्या बरोबर!! काय काय झालाय सांग नीट!”

“तुला ऐकायचं? मग ऐक..सांगते! पण प्लीज तुझ लेक्चर नकोय मला अजिबात... आधीच माझा मूड भयंकर खराब आहे आणि त्यात तुझ लेक्चर ऐकायची इच्छा नाहीये... किमान आता तरी नकोय... ठीके ना?”

“हो हो.. मी नाही देत लेक्चर... डोंट वरी!!” निशाच्या आईनी निशाच्या खांद्यावर हात ठेवत तिला खात्री दिली..

“ऐक...फार काही झाल नाहीये! बऱ्याच मुलींच्या आयुष्यात होत तेच झालय... मी प्रेमात फसवले गेले! मला पोस्ट ग्रॅजूएट करतांना कॉलेज मधला एक मुलगा आवडायला लागला.. तुला त्या मुलाच नाव हव आहे? हो म्हणू नकोस प्लीज!! मला त्याच नाव घेतलं किंवा त्याच्या बद्दल काही विचार केला कि संताप येतो आणि मी डिस्टर्ब होते..”

“नाव महत्वाच नाहीये... पुढे काय झाल सांग!!?”

“मी त्याला सांगितलं.. मला तो आवडतो! तो हि म्हणाला त्याला मी आवडते! आम्ही बरच हिंडलो..” आईनी निशाला मधेच थांबवलं... आणि विचारलं, “तुम्ही एकमेकांच्या जवळ आला होतात?”

“डोंट वरी आई! खूप जवळ आलो न्हवतो.. फक्त मी भावनिकदृष्ट्या खूप जवळ आले त्याच्या.. एक दिवस मी त्याला म्हणले.. घरी सांगून आपण लग्न करू.. आधी त्यानी तो विषय टाळला पण मी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली तेह्वा त्यानी मला सांगितलं तो लग्न करू शकत नाही कारण त्याच लग्न झालय.. त्याला हि गोष्ट सांगतांना काही वाटलही नाही!!! त्यानी माझा वापर केला फक्त एक टाइम पास म्हणून! त्याच लग्न झालेलं असूनही तो माझ्याबरोबर हिंडत राहिला... नुसत हिंडण्यासाठी त्यानी प्रेमाच नाटक केल... त्याला मनातून कधी लग्न करायचाच न्हवत! आणि मला त्याच्यात अडकवत गेला....म्हणजे त्यानी सरळ सरळ माझी फसवणूक केली!!! आणि मी काही विचार न करता त्याच्याबरोबर हिंडत राहिले आणि त्याच्यात अडकत गेले... मला तर कधी असा संशय सुद्धा आला न्हवता कि तो मला फसवत असेल..... तो मला फसवत गेला आणि मी फसत गेले... लग्न झालेलं असून त्यानी ती गोष्ट माझ्यापासून लपवली... पण काही झाल तरी चूक माझी सुद्धा होती... तेह्वापासून मला कोणावर विश्वास ठेवावा अस वाटतच नाही... आणि लग्न मला करायचं नाहीये!! मी खूप डिस्टर्ब झालीये.. मला कश्यातच रस वाटत नाही... पण वेळ जावा म्हणून जॉब ला जाते! जरा नवीन लोक भेटतात आणि मी बिझी राहिले कि मग तेच तेच विचार येत नाहीत! मी तुम्हाला सांगू असा विचार केला होता पण उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचं ह्या विचारांनी मी तुम्हाला काही सांगितलं नाही!! आणि तुम्हाला सांगितलं नाही ह्यामागच अजून कारण म्हणजे, मी विचार केला माझी चूक आहे ती माझी मलाच निस्तरायला पाहिजे. आणि यु नो,मला माझ्या चुकांचं खापर दुसऱ्या कोणाच्या माथी मारायला आवडत नाही.. मी केलेल्या चुकीची जबाबदारी घेतली. आणि मी तुम्हाला काही सांगितलं नाही!! आता कंटाळा आलाय ग सगळ्याचा.. काम झाल कि सारखे तेच तेच विचार.. माझ डोक फुटायची वेळ येते! मी इतकी मोठी चूक कशी केली असा विचार करून तर मी सुन्न होते..मला वाटलेलं मी आणि तो आम्ही सुखानी संसार करू.. मी त्याच्या बरोबर बऱ्याच गोष्टी शेअर केल्या होत्या..आणि तो म्हणाला त्याच लग्न झालाय... माझ्यावर आकाश कोसळल्या सारख वाटल... मी पूर्ण कोलमडून गेले!!” इतके दिवस मनात साचलेल तिनी बाहेर काढाल.. आणि नकळत तिच्या डोळे पाणावले..

आईनी सगळ ऐकून घेतलं... तिनी जरा वेळ विचार केला. आणि आई बोलायला लागली,

“तू अजिबात डोळ्यातून पाणी काढू नकोस... आपण शोधू मार्ग...मी आहे,बाबा आहेत! सो डोंट वरी! आपण पोलीस मध्ये कम्प्लेंट करायची का? मी बाबांच्या कानावर घालू का हे सगळ?”

“नको आई.. पोलीस मध्ये जायची गरज नाही! त्याची बायको आहे.. कोण जाणे त्याला मुलं पण असतील.. त्यांनी मला बऱ्याच वेळा साथ दिली... ठीके आमच नात्याचा पाया पक्का न्हवता! पण कशाला त्याच आयुष्य खराब करू? मला फक्त माझ्या आयुष्यातून त्याला बाहेर काढायचं ग... तू बाबांशी बोलून घे... माझ्यात नाही हिम्मत त्यांना काही सांगायची!”

“मला वाटतंय तुला डिप्रेशन आलय... आपण डॉक्टर कडे जायचं का? तू खूप डिस्टर्ब झाली असशील.. आणि तुला माझी गरज होती पण आम्हाला दोघांनाही कळल नाही कि तुला आमची गरज आहे.. आमच चुकलच!! मी तुझी आई आहे..तरी तू इतकी डिस्टर्ब झाली आहेस हे कळल देखील नाही!” आईला काळजी नी बोलली..

“हो ग आई... मला डिप्रेशन आल आहे! मला वाटलाही न्हवत मी कधी अशी फसवली जाइन! पण आता काय करू मी? चूक माझी होती... चूक मान्य करून आयुष्य जगायचं ठरवलंय! पण भूतकाळ सारखा डोक वर काढतो आणि मी अजूनच डिस्टर्ब होत राहते! हे काय होऊन बसल आयुष्यात? आणि डॉक्टर म्हणजे मानसोपचार तज्ञ ना? मी नाही येणार! मानसोपचार तज्ञाकडे गेल कि मी किती विक आहे ह्याची सतत जाणीव होत राहील. सो मला इच्छा नाहीये डॉक्टर कडे जायची.. खरच ग.. आणि उगाच वाच्यता नको.. कोणाला कळल कि ते वणव्यासारख पसरत..उगाच बदनामी.... दुसरा काही मार्ग नाहीये का? तू बाबांशी बोलून बघ... आई आता मला जरा एकांतात बसू दे.. थोडा वेळ! ठीक?”

“बर ठीके.. तू बैस आरामात! फक्त काही विचार करू नकोस!!! आपण ह्यावर लवकरच तोडगा काढू..”

इतक बोलून आई काम करायला निघून गेली.. पण तिला निशाची खूप काळजी वाटत होती.. तीच कामातही लक्ष लागत न्हवत!! आपल्याला हे सगळ कस कळल नाही ह्या विचारांनी आई स्वताला दोष देत बसून राहिली.. तितक्यात निशाचे बाबा बाहेरून आले... आणि ते रूम मध्ये गेले...निशाच्या आईनी बाबांना चहा केला आणि चहा घेऊन ती रूम मध्ये गेली...

“अहो... ऐका ना! शांतपणे ऐका...”

“बोल.. काय झाल? आज रूम मध्ये चहा आणून दिलास? आश्यर्य आहे.. नाहीतर तू स्वयपाक घरात या चहा घ्यायला अस ओरडत बसतेस..हाहा!” निशा चे बाबा निशाच्या आईची चेष्टा करत बोलले...

“अहो..आत्ता प्लीज चेष्टा नको! महत्वाच बोलायचय..” इतक बोलून निशाच्या आईनी रूम च दार लावून घेतलं.. “शांतपणे ऐका..”

“काही सिरिअस बोलायचं आहे?” निशाच्या बाबांनी आईचा सूर ओळखला...आणि ते बोलले...

“हो...निशा बद्दल आहे...”

“ओह निशा बद्दल.. काय झाल? जरा पटापट बोल... डायरेक्ट मुद्द्यावर ये...”

“होय हो.. निशाच्या कॉलेज मधला एक मुलगा तिला आवडत होता... तिनी त्याला हे सांगितलं आणि त्यानीही तिला तू आवडतेस अस सांगितलं आणि दोघ बरेच दिवस एकत्र हिंडले.. निशा सांगत होती, तिनी त्याच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या... अगदी ज्या आपल्याशीही शेअर करत नाही अश्या गोष्टी...” इतक बोलून निशाची आई थांबली... तिच्या डोळ्यात पाणी आल..

“तुझ्या डोळ्यात पाणी का आल? पुढे सांग काय झाल? आणि निशा कधी काही बोलली कशी नाही मला? ती माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची!! ह्यावेळी मात्र ती काहीच बोलली नाही..” निशाचे बाबा अस्वस्थ होऊन बोलले

“हो सांगते!! माझ्या मुलीच्या आयुष्यात इतक काहीतरी झाल आणि मला त्याची कल्पना सुद्धा आली नाही म्हनुं मला एकदम अपराधी वाटल आणि माझ्या डोळ्यात पाणी आल!! निशाच्या आयुष्यात इतक झाल आणि मला त्याचा पत्ताही न्हवता.. मला खूप वाईट वाटल... आणि डोळ्यात पाणी आल!!” पुढे आई बोलली, “दोघ बरेच हिडले.. एक दिवस निशानी त्याला लग्नाबद्दल विचारलं तेह्वा त्यानी निर्लज्यासारख सांगितलं कि त्याच लग्न झाल आहे... निशा नी ते ऐकल आणि ती कोलमडून गेली... मला आज सुद्धा हे कळल नसताच पण आज मी तिच्याकडे लग्नाचा विषय काढला तेह्वा तिनी सगळ सांगितलं मला.. तिला वाटतंय तिची चुक आहे आणि तिनीच ते भोगल पाहिजे! म्हणून तिनी आपल्याला काही सांगितलं नाही.. मला निशाची खूप काळजी वाटती आहे हो.. तिला आपली गरज होती पण तेह्वा आपल्याला वाटल ती बिझी आहे आणि आपण सगळ लाइटली घेतलं.... आणि जेह्वा तिला आपल्या आधाराची गरज होती तेह्वा तिला आधार देऊ शकलो नाही! सगळे आघात तिनी एकटीनी सहन केले.. आज तिच्या बोलण्यावरून मला कळल तिला झालेल्या प्रकारामुळे डिप्रेशन आलय.. तिनी पण ते मान्य केलय!”

“ओह माय गॉड!! पोलीस केस केली पाहिजे त्या मुलावर! आपल्या मुलीला फसवून तो आरामात बसू शकत नाही!... माझा एक मित्र आहे पोलीस मध्ये मी आत्ताच बोलतो त्याच्याशी.. मी असा सोडणार नाही त्या मुलाला.. आणि निशा नी का नाही सांगितलं आपल्याला? तिचा आपल्यावर विश्वास न्हवता का?” निशाचे बाबा एकदम भडकले आणि चिडून बोलले.. त्यांना त्या मुलाबद्दल भयंकर चीड आली पण त्यापेक्षा जास्ती त्यांना निशाची काळजी वाटायला लागली...

“मला खरच कळत नाहीये आता काय करायचं.. तो मुलगा जाऊ देत.. मला निशाची चिंता वाटती आहे! आता आपण काय करायचं? तिला तिचा भूतकाळ विसरायचा आहे.. त्यास्तही तिला मानसोपचार तज्ञ मदत करू शकतात. आत्ता तिला डॉक्टर कडे जायची गरज आहे...मी तिला म्हणल आपण डॉक्टर कडे जाऊ पण ती नाही म्हणली...”

निशाच्या बाबांनी जरा विचार केला आणि ते बोलायला लागले,

“लेट मी हॅंडल धिस!! तू काळजी नको करूस!! आपली निशा वाईट आठवणी विसरून जाईल!! आणि आयुष्य नव्या जोमानी जगायला लागेल बघ.. आपली निशा परत येईल!”

“काय करणारात तुम्ही?”

“सांगतो नंतर... आधी निशा शी बोलून येतो जरा!!”

“ठीके.. तुम्ही बोला आणि ती ह्या सगळ्यातून बाहेर आली पाहिजे लवकरात लवकर!!”

“हो हो... तू अजिबात काळजी करू नकोस!!”

इतक निशा चे बाबा निशाशी बोलायला तिच्या रूम मध्ये गेले..

“निशा....”

निशानी बाबांना पाहिलं आणि तिला तीच रडू आवरता आल नाही... तिला कळल बाबा तिच्याशी काय बोलणार आहेत!

“रडू नकोस निशा.. अजून आयुष्य संपलेलं नाहीये! अजूनही तू तुझ आयुष्य नव्या उमेदिनी जगायला चालू करू शकतेस! तू एक महत्वाची गोष्ट शिकली आहेस झालेल्या प्रकारातून कि कोणावरही आंधळेपणानी विश्वास ठेवायचा नाही..”

“हो बाबा... मला खूप मोठा धडा मिळालाय आता! पण जे झाल त्याचा खूप त्रास झालाय मला... मी सारखी डिस्टर्ब असते... कश्यातही लक्ष लागत नाही! अगदी कामात पण.. माझ ऑफिसच काम पण नीट होत नाहीये! थोडा वेळ कामात लक्ष लागत पण काहीतरी करून भूतकाळ आठवतोच! मला माहित नाही आता काय करू मी? माझी इच्छा नसतांना पण मी त्याचाच विचार करते सारखा!! आणि अजूनच डिस्टर्ब होत राहते! काय काय झाल ते तुम्हाला आईनी सगळ सांगितलं ना?”

“हो.. आईनी सगळ सांगितलं!! आणि तू काळजी करू नकोस! सगळ ठीक करू आपण.. तुला जॉब सोडायचा असेल तर आत्ता जॉब सोडून दे.. काही हरकत नाही! तसही तुला आवड आणि तू इतकी शिकली आहेस म्हणून मी तुला जॉब करण्यापासून अडवलं नाही... तसही तुला जॉब करायची काही गरज नाहीये! तू महत्वाच ऐक,झालेल्या गोष्टीचा विचार करण बंद कर...बाय द वे, तुला डॉक्टर कडे जायचं नाहीये?”

“नाही जायचं मला डॉक्टर कडे... मी मानसोपचार तज्ञाकडे जाते हे कोणाला कळल तर लोक काहीही बोलायला लागतील... उगाच बदनामी.. आजही मानसोपचार तज्ञाकडे जायचं म्हणजे वेद लागलाय ह्याच कल्पनेत असतात लोकं.. आधीच मला खूप त्रास झालाय.. आता अजून नाकौ! सो मला नाही जायचं मानसोपचार तज्ञाकडे...! बाबा, अजून काही उपाय नाहीये का?”

“तुला डॉक्टर कडे जायचं नसेल तर तुला बळजुबरी नाही.. पण मी सांगेन त्याला भेटाव लागेल...”

“कोणाला भेटू? मी कोणाला भेटून मी ह्या सगळ्यातून बाहेर येऊ शकेन? आणि तुमच्या मनात मी लग्न कर अस असेल तर लग्न मी करणार नाहीये! लग्न कर असा सल्ला देऊच नका बाबा.. मी आत्ता लग्नाचा विचारही करू शकत नाही.. झालेल्या प्रकरणी मी इतकी दुखावली गेली आहे कि लगेच कोणावरही विश्वास ठेऊ शकणार नाही!!”

“नो नो..निशा!! लग्न कर अस कधी म्हणलो.. माझ्या मित्राचा मुलगा आहे... त्याला फक्त भेट! तो तुला झालेल्या प्रकारातून बाहेर यायला मदत करेल.. माझा विश्वास आहे! तू खूप चांगला मुलगा आहे...”

“ओके बाबा... काय नाव आहे त्याच? आणि कधी भेटू? बाय द वे बाबा... मी जॉब सोडत नाही.. काही दिवस पार्ट टाइम करेन.. काम नसेल तर भूतकाळ सारखा सारखा डोळ्यासमोर येत राहील... काम असेल कि थोडा तरी वेळ बिझी जाईल...”

“ठीके... तुला योग्य वाटतंय ते कर... त्या मुलाच नाव गौतम आहे! तुम्ही ह्या रविवारी भेटा.... मी त्याच्याशी फोन करून बोलतो..आणि तुला भेटायला यायला सांगतो!! तुझा मोबाईल नंबर देऊन ठेवतो..म्हणजे तो तुला फोन करेल आणि पुढच तुम्ही ठरवा!!” बाबा खुश होऊन बोलले

“ठीके... बाबा मी ह्या सगळ्यातून बाहेर येईन ना?” निशा थोडी रडवेली होऊन बोलली..झालेल्या प्रकारामुळे ती खूप डिप्रेस झाली होती आणि गौतम काय करतो हेही तिनी विचारलं नाही!!! तिला फक्त झालेल्या प्रकारातून बाहेर यायचं होत...

“ए निशा.. अजिबात रडायचं नाही! यु नो,मला तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले आवडत नाहीत..”

“ओके बाबा.. नाही रडत! आणि आय अॅम वेरी सॉरी.. मी तुम्हाला सगळ खर सांगायला हव होत... पण मला तुम्हाला त्रास होऊन द्यायचा न्हवता म्हणून मी का नाही बोलले...”

“इट्स ओके निशा.. काही विचार करू नकोस! चुका माणसाकडून होतात...”

“तुम्ही गौतमशी फोन करून बोला... आणि आम्ही भेटायचं ठरवतो.. बाबा,तुमच्याशी बोलून फ्रेश वाटतंय.. होपफुली मी लवकरच सगळ्यातून बाहेर येईन.. पण विचार करायचा नाही अस ठरवलं तरी तेच विचार येतायत..”

“डोंट वरी निशा!! तू गौतम ला भेट.. आणि तुला झालेली कोणतीही गोष्ट आठवणारही नाही...” निशाच्या बाबांच्या बोलण्यानी निशाला आधार वाटला... आपण हे सगळ आधीच आई बाबांना संगयाला हव होत ह्याची जाणीव झाली आणि ह्यापुढे कोणतीही गोष्ट आई बाबांपासून लपवून ठेवायची नाही हे तिनी मनोमन ठरवलं.. बाबांनी निशाला गौतम ला भेट सांगितलं पण निशा इतकी डिप्रेस झाली होती कि ती हसण सुद्धा विसरली होती..

-------------------------------------------------------------------------------------------------------

निशाचे बाबा गौतम शी फोन बोलले आणि त्यांनी गौतम ला भेटून निशाच्या आयुष्यात काय काय झाल ते सविस्तर सांगितलं..गौतमनी निशाचा मोबाईल नंबर घेतला आणि निशाला फोन लावला...निशानी फोन उचलला आणि बोलायला चालू केल,

“हॅलो...कोण बोलतंय?”

“निशा ना? मी गौतम! तुझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा... त्यांच्याशी बोललो.. आणि त्यांनी तुझा नंबर दिला..”

“गौतम!! हाय! बाबा म्हणाले होते तुझ्याशी बोलतील!!”

“आपण कधी भेटायचं सांग!!”

“रविवारी भेटायचं?”

“मला काही प्रॉब्लेम नाही.. कुठे भेटायचं सांग!!”

“तू म्हणशील तिथे.. हॉटेल मध्ये नको! कारण तिथे निवांत बोलता येत नाही!”

“मग कुठे?”

“आमच्या घरी भेटू..”

“ठीके.. भेटू मग आपण!! बाय..”

निशा ला गौतम शी बोलून खूप बर वाटल... त्याच्या आवाजात खंबीरपणा होता! गौतम आपल्याला झालेल्या गोष्टीतून बाहेर यायला नक्की मदत करेल अशी खात्री वाटली. फोन वर बोलून झाल्यावर ती गौतम चा विचार करत बसली.. तिला तिच्या भूतकाळाचा थोडा वेळ तरी विसर पडला...

-----------------------------------------------------------------------------------------------

ठरल्याप्रमाणे गौतम निशाकडे आला... निशानी त्याला पाहिलं.. गौतम २८-३० वर्षाचा राजबिंडा तरुण होता! नीट नेटका पेहराव करून तो आला होता.. तो आल्या आल्या एक सुगंध पसरला... त्यानी अंगावर सुगंधी वासाच परफ्युम लावलं होत त्यानी! फोन वर बोलतांना सुद्धा तिनी त्याच्या आवाजातला खंबीरपणा हेरला होता.. तिला आपण झालेल्या प्रकारातून नक्की बाहेर येऊ अशी आशा वाटायला लागली..

“हाय...मी गौतम! आपण काल फोन वर बोललो होतो.. पण पहिल्यांदीच भेटतोय..!!”

“हाय.. काल तुझ्याशी बोलूनच फ्रेश वाटल होत...आणि आज तुला भेटून मी अजूनच चांगल फील करतीये!! झालेल्या प्रकारातून बाहेर यायला तू नक्की मदत करशील अशी खात्री वाटली मला! थॅंक्यू!!”

“डोंट बी फॉर्मल निशा!! आणि तू नक्की पाहिल्यासारखी होशील! आता तू सांग काय काय झाल तुझ्या आयुष्यात?”

“हो..” निशानी झालेला सगळा प्रकार गौतम ला सांगितला.. गौतम शी बोलतांना तिच्या डोळ्यात पाणी आल होत.. ते पाहून गौतम लगेच बोलला,

“ए निशा.. भूतकाळ आठवून डोळ्यात पाणी आणण आत्तापासून बंद करायला हवस तू.. स्वताला इतकीही विक बनून देऊ नकोस.. तू खूप खंबीर आहेस.. आणि सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीनी घ्यायला चालू कर आत्तापासून!!! मग बघ आयुष्य कस कलाटणी घेईल!!!”

“सकारात्मक पद्धतीनी घेऊ? हाहा!” निशा उपहासानी हसली, “मी इतकी दुखावेले गेले कि भूतकाळ आठवला कि माझ्या डोळ्यात पाणी येतच!! का पाणी येत ते नाही माहित! मी फसवले गेले म्हणून का तो माझ्या बरोबर नाहीये म्हणून... पण नाही थांबवू शकत मी डोळ्यातलं पाणी..”

“ओके.. पाणी कशानी येत हा प्रश्नच नाहीये कारण आपण भूतकाळ विसरून जायचा आहे... तुला भूतकाळ आठवला कि रडू येत ना? मग ऐक, आत्ता रडायचं असेल तर भरपूर रडून घे.. मनात जे काही साचलय ते बाहेर पडू दे.. रडू आल तर रडण थांबवू नकोस! भूतकाळातून तुला बाहेर पडायचय.. भूतकाळात अडकू नकोस अजिबात! तुला रडायला एकांत हवा असेल तर मी बाहेर जाऊ का?”

“नाही नाही... तू बाहेर जायची गरज नाही!!”

“म्हणजे तू माझ्यासमोर रडणार? हाहा...”

गौतम च बोलण ऐकून निशाला हसू आल...

“मी म्हणाले नाही नाही..आता रडत नाही!” निशा हसत बोललो..

“ओके गुड... तुला कधी रडावस वाटल तर एकांतात रडत जा.. एकांतात म्हणालो कारण तू एकटी असशील तेह्वा तू मोकळेपणानी रडू शकशील.. आणि बाकी कोणाला कळल नाही पाहिजे आपल सिक्रेट! हाहा.. रडण हा मेडीटेशन चा एक प्रकारच आहे... रडलं कि तुम्ही मोकळे होता! मनात साठलेला कचरा अश्रूच्या वाटे बाहेर पडतो!! कधी खूप रडायचं.. किंवा खूप हसायचं देखील.. मग मन एकदम साफ होत!!! मनावरची सगळी जळमटं निघून जातात... आत्ताचा क्षण एकदम टवटवीत वाटायला लागतो!!”

“आय अग्री! बर झाल बाबा म्हणले तुला भेट.. तुझ्याशी बोलून मी माझा भूतकाळ नक्की विसरून जाईन! आणि उगाच आई मानसोपचार तज्ञाकडे चल म्हणून मागे लागत होती पण आता ती कोणाकडे कडे चल म्हणून मागे लागणार नाही!!! थॅंक्स अ लॉट तू वेळ काढून मला भेटायला आलास...” निशा बोलली

निशाच बोलन ऐकून ऐकून गौतम ला हसू आल... आपल हसू लपवत तो बोलला,“तुला डॉक्टर कडे जायचं का नाहीये? मानसोपचार तज्ञ वाईट नसतात ग! ताप आला तर डॉक्टर कडे जातेसाच ना? मग मानसोपचार तज्ञ का नको? ते तुम्हाला मदतच करत असतात...”

“आय डोंट नो..पण नाही जायचय मला डॉक्टर कडे!!! मला माहितीये मानसोपचार तज्ञ मला मदतच करतील पण आपला समाज अजून मानसिक रुग्णांकडे सहनभूतिनी पाहत नाही... मानसोपचार तज्ञाकडे म्हणजे फक्त वेड्यांचे डॉक्टर इतकच माहिती असत लोकांना.. आणि मी मानसिक रुग्ण आहे हे मला सहनच होत नाहीये! म्हणूनच मला मानसोपचार तज्ञाकडे जातांना एक प्रकारची भीती वाटते.. मी डॉक्टर कडे न जायची बरीच कारण आहेत... सांगेन कधीतरी निवांत!”

“ओके.. तुझी इच्छा नाहीये ना मग नको जाऊस कोणत्याही डॉक्टर कडे... पण मला तर भेटशील कि नाही? आणि डोंट वरी! आता तुला डॉक्टर कडे जायची गरज लागणारच नाही!!! फक्त आपल्याला काही दिवस भेटाव लागेल.. ओके?”

“येस.. तुला भेटू शकते! तुला भेटायला काही प्रॉब्लेम नाही! पण डॉक्टर कडे जायचं नाहीये!”

“ग्रेट.. तू लवकरच मस्त होशील! आता ऐक, अजून एक महत्वाच म्हणजे.. निसर्गात थोडा वेळ तरी जात जा... सारखा कॉम्पुटर किंवा मोबाइल समोर नको बसट जाऊस...निसर्गात गेल कि आपले प्रॉब्लेम्स नाहीशे होतात.. साधी मुंगी पाहिलीस तरी तिची जिद्द पाहून तुला आयुष्य जगायची उर्जा देऊन जाईल! मुंगी हे फक्त उदाहरण आहे.. तू निसर्गात राहून बघ... आणि कस वाटतंय सांग! आय अॅम शुअर,हलक वाटेल एकदम! एकदम फ्रेश आणि नवीन उर्जा मिळत राहील तुला..आणि न चुकता ट्राय कर, तू आहे त्या क्षणातच राहती आहेस.. सकारात्मक आणि नकारात्मक या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत.. तुला जेह्वा जेह्वा तुला नको आहे तो भूतकाळ आठवतो तेह्वा आयुष्य नकारात्मक ह्वायला लागत... सारखे नकारात्मक विचार यायला लागतात. भूतकाळ आठवून दुखी होण्यापेक्षा तू आत्ताच्या क्षणात जगायला लाग...आणि बघ काय जादू होते... तू तुझ आयुष्य बदलतांना पाहशील! आणि काही दिवसांनी आपण कसे वागलो असा विचार करून तुलाच तुझ्यावर हसू यायला लागेल! तुझ आयुष्य सकारात्मक होईल!!”

“माय गॉड.. तू कसला बोलतोस... आणि तुझे विचार कसले आहेत! तु खूप पॉझीटीव आहेस! आणि तू बोललास ते पटलय..तुझ बरोबर आहे.. सारखा कॉम्पुटर आणि मोबाइल मुळे अस्वस्थता वाढते! आणि त्रास होतो... बाय द वे,तुझ बोलण ऐकून आय अॅम इगर टू नो, तू काय करतोस? तू खूप इंटरेस्टिंग आहेस... बाबांनी तुझ्याबद्दल सांगितलं तेह्वा मी माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये इतकी बुडालेले होते कि कोणाला भेटायला सांगताय हे विचारलच नाही बाबांना!”

निशाच बोलण ऐकून गौतम ला खूप हसू यायला लागल पण त्यानी ते हसू आवरल आणि तो बोलला,

“ह.. मी काय करतो! गुड क्वेशन! पण आत्ता ते महत्वाच नाहीये.. ते तुला नंतर सांगेन निवांत! तू सांग..तुला आता कस वाटत आहे?”

“नंतर सांगणार? का? आत्ता का नाही? मला तुझ्याशी बोलून खूप मस्त वाटतय म्हणून तू काय करतोस हे जाणून घ्यावस वाटतंय..... खरच!!! आणि बाबांनी तुला सांगितल्या सांगितल्या तू लगेच आलास मला भेटायला... तुझे आभार कसे मानू ते मला कळत नाहीये!!”

“आभार नंतर मानशील का.. मी काय सांगतो आहे ते तू लक्षपूर्वक ऐक..”

“ओके.. ए सॉरी! मी तुला चहा किंवा खायला विचारलं पण नाही!!”

“मी चहा पीत नाही अग... आणि घरून खाऊन आलोय!! सो डोंट वरी! आत्ता आपल काम आहे तुला झालेल्या गोष्टीतून बाहेर काढायचं.. ते झाल कि बघू खायचं काय...”

“ठीके... बोल तू!!”

“कोणाच्या जाण्यानी आयुष्यात त्रास होतो पण किती दिवस त्रास करू घेणार तू? तो माणूस तुझ्यासाठी योग्य न्हवता आणि तुला वेळेवर ते कळल ह्या गोष्टी साठी देवाचे आभार मान! आणि झालेल्या गोष्टी विसरण हि सुद्धा एक कला आहे.. जे जे नको ते विसरून जायचं आयुष्यात... आणि जे हवय त्यावरच लक्ष केंद्रित करायचं..मग फक्त जे हवय तेच होत!!.. जेह्वा नकारात्मक विचार यायला लागतील तेह्वा शांत बसून रहा.. विचार येतील येतील पण जर तू त्या विचारंवर लक्ष दिल नाहीस तर हळू हळू विचार येणारच नाहीत.. खूप शांत वाटेल तुला!”

“ओके...”

“नुसत ओके काय? करेन म्हण...”

“हो हो.. तसच करेन... १. जेह्वा वाटेल तेह्वा खूप रडेन.

२. जेह्वा वाटेल तेह्वा खूप हसेन..

३. निसर्गात रमेन.

४. आयुष्य सकारात्मक पद्धतीनी जगेन.

५. आत्ताच्या क्षणात जगेन.

६. ज्या आठवणी नको आहेत त्या आठवणी विसरून जाइन.

७. जे हवय त्यावरच लक्ष केंद्रित करीन...

८. विचार यायला लागतील तेह्वा शांत बसून राहीन

९. विचार येतील येतील पण जर तू त्या विचारंवर लक्ष देणार नाही..

तू सांगितलेलं मी सगळ लक्षपूर्वक ऐकल आहे आणि मुद्दे नोंद करून ठेवले आहेत! तू सांगितलं आहेस तसच वागणारे.. जेह्वा डिप्रेस होईन तेह्वा हे मुद्दे आठवेन! आणि मला खात्री आहे... आता सारखे भूतकाळाचे विचार येणार नाहीत.. मी पूर्वीसारखी मस्त होईन! तू सांगितलेलं खूप इफेक्टीव आहे. कमी वेळात तू मस्त समजावून सांगितल! मला तुझ बोलण ऐकूनच खूप फ्रेश वाटतंय... थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सो मच!!!!”

“वा वा!! तू सांगितलेले मुद्दे एकदम बरोबर!!! एकदम मुद्देसूद बोललीस.. फक्त लक्षपूर्वक आणि ठरवून तसाच वाग... आज साठी इतक बास! बाकीच पुढच्या वेळी बोलू!! आणि तुला फ्रेश वाटतंय ना? आय अॅम हॅपी.. पण आज साठी इतक पुरे! जास्ती डोस नको एकावेळी! हाहा! आपण परत भेटू.. आणि पुढच बोलू..ओके? आय थिंक,नेक्स्ट संडे ला भेटू शकतो आपण!”

“हो... परत भेटू! आय विश टू स्पेंड मोअर टाइम विथ यु! आता सांग तू काय करतोस?”

“हाहा... पुढच्या वेळी नक्की सांगतो.. परत भेटू तेह्वा... पण पुढच्या वेळी नेक्स्ट सिटींगसाठी घरी नको... कोणत्यातरी हॉटेल मध्ये भेटू.. तुला काय खायला आवडत? तिथे भेटू...ओके? आता मी जातो!! आणि मी हिंट दिलीये मी काय करतो त्याची!! आता तू विचार कर मी काय करत असेन... तुला काही कळल तर मला फोन कर... तुला कळल नाही तर पुढच्या वेळी नक्की सांगेन मी काय करतो! बाय फॉर नाऊ.. काळजी घे आणि मी जे सांगितलाय ते करण्याचा प्रयत्न कर!” गौतम हसला...

“ओके.. नेक्स्ट संडे ला भेटू हॉटेल मध्ये.. हॉटेल नंतर फोन वर बोलून ठरवू! बाय.. आणि थॅंक्यू!!”

गौतम तिच्याकडून गेला पण गौतम ला भेटल्यामुळे तिला आयुष्य सकारात्मकतेनी बघण्यासाठी एक योग्य दिशा मिळाली होती.. तिचे नकारात्मक विचार बाजूला गेले... आणि ती आता तीच आयुष्य सकारात्मकतेनी जगायला लागली... तिचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तिच्या आयुष्यात नवी सकाळ उजाडली.. निशाला फ्रेश वाटायला लागल... तिची हरवलेलं हसू तिला परत मिळाल.. निशानी जरा विचार केला पण तिला गौतम काय करत असेल ह्याचा पत्ता लागला नाही... पण विचार करता करता तिला एकदम गौतम नी म्हणलेल नेक्स्ट सिटींग आठवलं आणि तिला अंदाज आला, गौतम बहुधा मानसोपचार तज्ञ आहे.. आणि ती मनापासून हसायला लागली!!! तिच्या बाबांनी तिला न दुखावता तिची भेट एका चांगल्या मानसोपचार तज्ञाशी करवून आणली... गौतमही लगेच आला... गौतम ला भेटून तिचा विचार करण्याची पद्धत हळू हळू बदलायला चालू झाल होत.. ती लवकरच तिचा भूतकाळ पूर्णपणे विसरून तीच आयुष्य नव्या उमेदिनी जगायला चालू करणार होती.. तिनी मनोमन गौतम ला आणि बाबांना थॅंक्स दिले आणि तिनी गौतम ला फोन लावण्यासाठी मोबाईल उचलला..आणि आनंदी होऊन ती बोलली,

“हॅलो गौतम..” तिला उत्तर म्हणून समोरून फक्त हसण्याचा आवाज आला.. आणि निशा सुद्धा मनापासून हसायला लागली...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id-