metoo - 3 books and stories free download online pdf in Marathi

#मिटू (भाग -3)

अस्सलाम वालेकुम

अब्बा ,

कसे आहात तुम्ही ?

काय झालं ??

ओळखलं नाहीत .....

अहो मी तुमची मुलगी आलिया !

नाही आठवतं ?

काही वर्षांपूर्वी तुम्ही आपल्या हक्काच्या बायको आणि मुलीकडे चक्कर

मारत यायचे . त्या गरिबीच्या झोपडीत भेटायला .. 

माझ्यासाठी फुगे विकत घ्यायला वेळ नासायचा तुमच्याकडे म्हणून

हातात दोन पैसे टाकत बाप होण्याचं कर्तव्य निभावत निघून जायचे तुम्ही ....नाही ?

काय आठवतं ना तुम्हाला ??

नेहमी अम्मीला म्हणायचे हिचं नाव अफ्रिन चुकीचं ठेवलं तू हीच नाव तर

आलिया ठेवायचं होतं ... मग्रुरता पाहिलं का ह्या छटकीची ??

आणि शेजाऱ्या सोबत फटकरत मी इंग्लिश बोलायची तेव्हा माझी खोड काढत

तुम्ही चिडवायचे  I Walk in english , i talk in english , i laugh in

english because is a very funny language .... आणि प्रत्येक

वाक्याला मी जोरात हसायची .

का बरं हसायची मी ?? कारण , तुम्ही माझे हिरो होते ... हिरो !

काय आठवतं ना तुम्हालाही ?

कसं तलाख तलाख .... तलाख म्हणत हळूच ह्या बांधलेल्या नात्यातून तुम्ही

स्वतःची सुटका करून घेतली . आणि अम्मी तिने तर चक्क दुसरं लग्नच केले .

नवीन अब्बा .... खूप छान होते . मला रोज चॉकलेट देत होते .

अम्मीलाही खुश ठेवायचे .... हो हो खरचं ना !

पण मी भावनेच्या भरात व्हावत जड अंतकरणातून विव्हळत तुम्हालाच

आठवायची ... कोण जाणे का रक्ताचं नात होत ना जे तुमच्यासाठी संपलं असलं

तरी मी तुमचा अंश .

विश्वास होता मला स्वप्नात जरी मी तुम्हाला आठवलं तरी तुम्ही क्षणाचा विलंब

न करता माझ्या जवळ येणार पण नाही ..... नाही खोटं होतं हे !

म्हातारपणी बुद्धी कमजोर होते म्हणतात तसच तुम्ही खूप खचून गेले काळजीत

आणि चिंतेत व्हावत गेले .. 

सोडा ह्या जुन्या गोष्टी ....

पण आठवते का तुम्हाला ती रात्र ज्या रात्री अम्मी मला नव्या अब्बा जवळ

एकटीला टाकून लखनौला काही कामासाठी निघून गेली .

मी झोपलेली होती गाढ झोपलेली .... माझ्या रूममध्ये .... मच्छरदाणीच्या आत ...

तुम्हाला माहिती आहे ना मला मच्छराचं चावून जाणं सहन होतं नव्हतं ..

पण आठवत तुम्हाला मला घरी एकटीला बघून .... हळूच ... मच्छरदाणी दूर सारत ...

तो माझ्या अंथरुणात घुसून गेला ... अचानक काहीतरी जाणवलं मला ...

एक हात माझ्या कमरेवर होता ... दुसरा हात माझ्या केसात .... तो आपल्या

कापऱ्या ओठांनी माझ्या देहावर काहीतरी करतं होता ... नव्या शिकारीला

तो सुंगत होता .... जसं जंगली श्वापद मासाला सुंगतात ... त्यांची लांब लांब बोट

समोर सरकतच जागा करत होती त्या न उमललेल्या देहाकडे त्या जागेवर निसटून पण

आपल्या जखमेवर निशाणी सोडून जात होती ....

ओरे माझ्या बाळा$$$

मला वाटलं तुम्ही आहात .... माझ्या पायाजवळ .... माझे डोळे उघडले

आणि ते तुम्ही नव्हतेच नवे अब्बा होते .

ते हळू हळू माझी सलवार सरकवत माझ्या छाती जवळ येऊन आपली हनऊटी

टेकवत होते ...

मी झोपेतून तडक उठली ... आणि त्यांना धक्का दिला ! नाहीहीइहह

माझ्या तोंडातून चिख निघाली नाही अब्बा नाही नाही सोडा मला सोडा अब्बा ...

मी अम्मीला सांगीन अब्बा ..... जाऊद्या मला जाऊद्या हो .

अब्बा अब्बा .....

One मिनिटं one मिनिटं ..... असं का म्हटलं होतं मी

माझाच मेंदू मला चाटा देऊन माझ्याकडून म्हणूनवून घेत होता ....माझं हृदय

ओरडून ओरडून तुम्हाला आवाज देत होत .... अब्बा ! आणि क्षणभरातच

तुम्हाला मागे सारत अम्मा अम्मा .... काय आवाज आला होता तुम्हाला

माझ्या त्या ओरडण्याचा .... नाही करत आहात अब्बा तुम्ही हे नाही नाही नाही

I say no अब्बा no no ....

प्लिज paining प्लिज सोडा दुखतंय मला सोडा .... नका करू सोडा

मला अम्मा अम्मा ....

माझ्या उध्वस्त होण्याची चिख पोहचली होती का तुमच्या कानापर्यंत ....

एकाच रात्री मी अम्मीच नाव बदलवून अम्मा केलेलं ... कारण अब्बाच काम आता

माझ्याकडून होतं होते ...

लाथ मारून तिथून पळून गेली मी .... दुसऱ्या रूम मध्ये जाऊन स्वतःला बंद केलं

आणि आजही श्वास हरवून गेला तरी वाटत मी त्याच रूम मध्ये कैद आहे ..

कशाने तरी जन्म घेतला होता त्या आघात नंतर .. नवा जीव ....

नाही मुळीच नाही ... त्याही पेक्षा घातक ... जनावलं होतं का ?

नफरतीने हळूच संकेत दिले होते एक हृदय तुटण्याचे .... बेचिराख देह वासनेच्या

आगीत होरपळण्याचे काही भणक लागली होती का तुम्हाला ??

एक अकरा वर्षांची मुलगी उधवस्थ होण्याची बातमी तुमच्या पर्यंत

पोहचली होती का ??

ही बातमी जनता जनार्दन मीडिया पर्यंत पोहचली नव्हती .

कारण प्रत्येक मुली सोबत घडणाऱ्या ह्या घटना उघडकीत येतातच असं कधी

झालय का नाही नाही ना !

ती मुलगी त्याच खोलीत दोन दिवस जिवाच्या आकांताने रडत राहिली .

One second .... one second ... आवाज आला तरी कसा असता ??

ती मुलगी रडलीच नव्हती ... ती ना तेव्हा रडली ती ना आज रडली

ती नाही उद्या रडणार कारण ती मुलगी आलिया होती ...

तुमची आलिया ..

तुमची नाजायद औलाद ...

काही आठवले का ??

तुम्हाला ती आलिया आता आठवण तरी कशी ??

ती आलिया आता मेलेली आहे .... ती आता मेली आहे ...

जगणार कशी ती अश्या जगात नाही जगू शकत आणि जगू ही नसती

शकली त्या दिवसांनंतर त्या वेदनेने जगू नसते दिले ...

बातमी मिळाली तुमची तब्येत ठीक नाही अब्बा ... तरी तुम्हाला जगायचं आहे

विचार केला म्हणून पत्र लिहू ... पण हे पत्र लिहून कुठे अडकुन पडेल

तुमची काळजी घ्या अब्बा ....

खुदा हाफिज !