# मिटू

ब्रोकन हार्ट 

तीन वर्षांपूर्वी जेव्हा पॉलीटेकनिकच्या द्वितीय वर्षाला मी एका हॉस्टेलवर

राहायची .

आमची रूम म्हणजे थ्री शिटरची . दोन रूम पार्टनर दोघीही माझ्या पेक्षा सिनिअर

होत्या . 

अनुष्का ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या तर त्या रूम वरच राहायच्या .

रजनी ताईच लॉ च लास्ट इयर होतं त्या कॉलेज मध्ये जायच्या .

माझा ही नऊ वाजता पासूनचा पूर्ण वेळ चार पर्यंत कॉलेज मध्ये जायचा .

हॉस्टेल जॉईन करून जवळ जवळ सहा सात महिने झाले होते मला .

अनुष्का ताईला एकाच रूम मध्ये चार पाच वर्षे . काही दिवसांनी समजलं

की त्यांचे नातेवाईक आहेत पण त्यांना आई बाबा नाहीत ...

हे कळल्यावर खूप वाईट वाटलं मला .

संध्याळच्या वेळेला मी आणि रजनी ताई आम्ही दोघी fountain जवळ बाहेर

बसून होतो ..

मी रजनी ताईला म्हणत होती , " ताई , अनु ताईने लग्न करून घ्यायला

पाहिजे ... कसं होईल त्यांचं . "

एवढ्यात रजनी ताईला फोन येऊ लागला .... ताईला नवीन नंबर वरून

कॉल येत होता म्हणून आधीतर कट केला त्यांनी . पण परत परत फोन येत होता .

आमच्या अर्धवट झालेल्या संवादापेक्षा तो फोन कॉल इम्पोर्टन्ट होता . ताईने रिसिव्हर

कानाला लावला . तिकडून रडणाऱ्या मुलीचा आवाज ऐकायला येत होता .

ताईलाही कळत नव्हतं मला कॉल करून ही कोण आहे समोरची व्यक्ती रडून

राहिली .

रडतच ती बोलू लागली ....

" ताई मी संजना , ताई .....प्लिज हेल्प मी ..."

ताईने तिला काय झालं म्हणून विचारलं तेव्हा ती सांगू लागली ...

" ताई i am pregnant .... पोटात चार महिन्याचं बाळ आहे ग आणि

माझा नवरा रोज मला मारतो रोज छळतो मला .... त्यांचं बाहेरही लफडं सुरू

आहे घरी खूप उशीरा येतो आणि मला सांगतो ऑफिस मध्ये काम होतं ....

मी काही म्हटलं तर माझ्याच अंगावर धावून येतो . चार दिवस झालेत खूप

मारत आहे मला प्लिज मला इथून बाहेर काढ ताई ..."

ताईने तिला सांगितलं तू काळजी करू नको मी काहीतरी करते ...

फोन ही तिने शेजारच्या घरून केलेला ...

संजनाने एक वर्षाआधी घरच्यांचा विरुद्ध जाऊन लग्न केलं . लग्नाला शेवट पर्यंत

तिचा घरून नकारच होता .. अभि सोबत दोन वर्षा आधी बीई करत असताना ओळख

झाली .. आणि ती त्याच्या प्रेमात फसली .. लग्न झाल्यानंतर घरचीदार संजनासाठी

कायमचीच बंद झाली . लग्न करून ती अभिसोबत पुण्याला राहू लागली

किरायाच्या घरात .

लग्नानंतर अभीच तिच्यावर असलेलं प्रेम सर्व काही हरवून गेलं होतं .

शरीरसबंधासाठी रोज रात्री तिला जवळ करायचा नकार दिला की

लाथेने झोडायचा .

आता पोटात गर्भ वाढवणारी संजना रोजचा त्याच्या लाथाबुक्यांचा मार सहन करून

त्याच्या मनाप्रमाणे कसं वागणार होती ... अरे बाई आहे तिलाही मन असतं .

तिच्या भावनांचा विचार त्याला नव्हताच ...

संजना रजनी ताईच्या मावशीची मुलगी ... तिच्या घरची दार तिच्यासाठी बंद

झाल्यावर मावशी किंवा इतर नातेवाईक तिला कसं जवळ करणार ??

तिने तर घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केलं होतं न . तिला तिचा भविष्यकाळ

नव्हता माहिती आणि आपला भविष्यकाळ कुणालाच माहिती नसतो ...

माणूस चुकतो तेव्हाच शिकतो म्हणतात ... हेच संजनाच्या बाबतीत

घडत होतं ..

रजनीताईला माहिती होत मी घरी सांगितलं तर घरचे मला मदत करणार नाहीतच

उलट संजनालाही त्याच्या तावडीतून सुटू देणार नाही ..

आणि तिला त्याच्या छळापासून दूर करायचं आहे . 

माझा आणि अनुष्का ताईचा एकच सल्ला होता तिला तू जा आणि हॉस्टेलवर

घेऊन ये नंतर काय ते बघू ...

रजनी ताईने त्या रात्री कॉल केला तिला तेव्हा ती ताईला म्हणाली ,

" मी उद्याच्या दिवस तुझी वाट बघते ... नाहीतर मी नाही जगू शकणार मी संपवते

स्वतःला ...."

संजना रजनी ताईसाठी थांबलेली होती ....

बरोबर प्लॅन करून रजनी ताई तिला हॉस्टेलवर घेऊन आल्या ....

कॉलेज वरून मी होस्टेलवर येत रूमचा दार थोटवला तेव्हा रजनी ताईने

दार उघडला ..

एक अनोळखी व्यक्ती जिच्या बद्दल मी तीन दिवसांपासून रजनी ताईच्या

तोंडून ऐकत होती .. ती त्या बेडवर बसून अश्रू ढाळत होती .

तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून मनात प्रश्न आला ...

काय चुकलं हीच ?

हेच की तिने प्रेम केलं त्याच्यावर विश्वास ठेवून लग्न केलं ,

की ती एक स्त्री आहे ...

तिचा उपभोग घेऊन संपला की तिच्यातल पुरुषासाठीच स्त्री प्रेमही संपत ??? 

तुटलेल हृदय तिचं पुन्हा स्वतःला सावरण्यासाठी सज्ज झालं ते खरं असलं 

तरी तिच्या भुतकाळानेच तिला नवं जगणं दिलं ..

***

Rate & Review

Ganesh Dungahu 5 months ago

Jay Agarkar 6 months ago

Rajesh Kalaskar 6 months ago

Murlidhar Patil 6 months ago