लग्नानंतरचा तो खडतर प्रवास - 1

भाग:१  लग्ना आधीचा प्रवास 
‍‍‍‍‍‍‍‍‍सुरुवात कुठून करू समजत नाही पण प्रत्येक मुलीच्या  जीवनामध्ये एक अशी वेळ येते जिथे आपल्याला आपल्या  कुटुंब पासून वेगळ केलं जातं.. काही जण स्वतःहून वेगळे होतात तर काही जणांची मजबूरी असते.. तर काही मनाच्या विरोधात जाऊन वेगळं राहतात.. एक मुलगी.. खर तर तिने जीवना मध्ये जन्म घेतल्या पासून आई वडिलांची इच्छा पूर्ण केलेली असते..लहान पण पासून त्या आई वडिलांनी अतोनात कष्ट करून आपल्या मुलीला मोठं केलेलं असत..आणि आता वेळ असते त्या मुलीला निरोप द्यायची , खर तर आपल्या पोटचा गोळा कोणा अनोळखी व्यक्तीला द्यायचा म्हणजे खूप मोठं काळीज लागतं.. तो बाप असतो.. जो मुलींच्या जन्मा पासून ते तिच्या लग्न पर्यंत तिला जे काही पाहिजे ते सर्व करत असतो.. तिच्या क्षिक्षणाचा खर्च तिला कुठलीच गोष्ट कमी पडू नये या साठी दिवस रात्र एक करणारा तो बाप ,जेव्हा मुलीच लग्नाचं वय होत तेव्हा.. तोच बाप सगळी कडे सांगून ठेवतो की.. कुणी चांगलं मुलगा असेल तर सांगा.. आणि वेळ येते ती त्या मुलीच्या लग्नाची..लहानपणा पासून ज्या आई वडीलांनी तिला सभाळल .. त्यांच्या पासून वेगळं होण्याची .. खूप अवघड असतो हा निर्णय.. पण नाईलाज असतो त्या मुलीचा..जगाची रीतच आहे ती त्याला ती तरी काय करणार..कधी कधी आई वडिलांच्या खुशी साठी.. मुलगा आवडला नसेल तरी आपली आई आणि वडील खुश आहेत ना.. ह्या विचाराने.. ती मुलगी पुढचं पाऊल घेते.. कधी असं ही घडत की त्या मुलीच्या मनात दुसराच कोणी तरी असतो.. त्या मुलीचं प्रेम पण असत पण आई वडिलांची इज्जत गमवायची नाही, आणि मना मध्ये बसलेली ती भीती.. की काय बोलतील आई वडील असे असंख्य प्रश्न तिच्या मना मध्ये चालू असतात.. ती विचार ही करती की सांगून बघू पण ,घाबरत असते.. सांगू का नको... समजा नाही बोलले तर परत अडचणी वाढत जातील.. हो जरी बोलले पण ज्या व्यक्ती आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे.. तो नंतर नाही बोलला तर,त्याचे घरच्यांनी विरोध केला तर .....सगळी कडून अडकलेली ती.. आता एका वेगळ्याच विचारात गुंतलेली असते..कारण अस समजून घेणारं आणि समजून सांगणार अस कोणीच नसत..वडील तिच्या लग्नाच्या तयारीत असतात.. सगळ्यांना कडून कर्ज कडून आणि कष्ट करून थोडे थोडे बाजूला काढून  साठवलेला पैसा..  मुलीच्या लग्नासाठी खर्च करतो... त्या वडिलांची एकच अपेक्षा असते की माझी मुलगी... खुश आणि आनंदी राहावी.. पण त्यांना काय माहित असत की , त्यांची मुलगी किती दुःखात  आहे.. आणि वेळ येते ती लग्नाची..  सकाळ पासून ते लग्न होण्या पर्यंत .. त्या वडिलांची धावपळ चालूच असते.  आणि आता तिला निरोप द्याचा वेळ आलेला असतो... बाबुल की दुवाये लेती जा..हे गाणं चालू होत. आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत.. तो बाप आपले अश्रू लपवत असतो .. ती आई मात्र प्रत्येक क्षणाला रडत असते.. ज्या मुलीला लहानच मोठं केलं.. आज ती आपल्या पासून लांब जाणारे.. रोजच्या तिच्या आठवणी .. सगळं काही आठवत असेल त्या वेळेस त्या आई बापाला.. मुलगी नवऱ्याच्या घरी जाते.. प्रत्येक मुलीच्या मनामध्ये काय असतं काय नसतं तिच्या काय अपेक्षा असतात तिच्या काही इच्छा असतात हे फक्त तिलाच माहिती असते कारण की तिचं आयुष्य ही ती कधीच जगू शकत नाही कारण एक मुलगी असते ना समाजामध्ये मुलींनी कसं वागायचं कसं राहायचं हे सांगितलेला असतो त्यामुळे ती कधीच स्वतःसाठी जगत नाही लग्नाआधी ती तिच्या कुटुंबासाठी जगत असते आणि लग्नानंतर ती तिच्या नव-यासाठी आणि नवऱ्याच्या कुटुंबासाठी जगत असते.. खरंच इतकी वाईट परिस्थिती असते त्या मुलीवर जिला खरच समजत नसतं की काय करावे एकीकडे आपले आई-वडील ज्यांनी आपल्याला इतकी वर्षे प्रेम दिलं ज्यांनी लहानाचा मोठा केला त्यांच्यासोबत फक्त अर्धायुष्य जगायला भेटलं आणि राहिलेले आयुष्य एका अनोळखी व्यक्तीबरोबर एका अनोळख्या कुटुंबावर जगायचं असतं ...आणि सुरू होतो तिचा लग्न नंतरचा तो खडतर प्रवास..

***

Rate & Review

Meenu Soni 6 months ago

Archana 6 months ago

Kishor Gangarde 6 months ago

ganesh mohite 6 months ago

Nivedita Bhavekar 6 months ago