Aai - Aai mhanje kaay ? books and stories free download online pdf in Marathi

आई - आई म्हणजे काय?

आई फक्त दोन शब्द पण हे दोन शब्द आपल्या जीवनात नसेल ना तर खूप खूप एकट एकट वाटत म्हणजे अस शब्दात सांगू शकत नाही की आई असणं किती गरजेचं असत प्रत्येकाच्या जीवनात आई असते ती आई कशी का असेना पण तिची ती मुलानं मागची धावपळ तीच ते प्रेम तिची ती काळजी आपल्या मुलांसाठी काय चांगलं करता येइल ह्या मध्येच सतत धावपळ करणारी ती फक्त आईच अशी शकते रात्री घरी यायला उशीर झाला तर तो पर्यंत जेवण न करणाई आणि वाट बघत बसणारी ती आईच असू शकते कुठे लांब गेलो तर कायम काळजी करणारी की माझा मुलगा ठीक तर असेल ना मनात विचारांचा गोंधळ चालू असतो मनात खूप वाईट विचार चालू असतात त्या आईच्या की माझ बाळ ठीक तर असेल ना तो व्यवस्थित पोहचला असेल ना त्याला काही झालं तर नसेल ना अजून त्याचा फोन नाही आला  असे प्रचंड विचार आणि ती काळजी फक्त आईच करू शकते ती आई आहे ती फक्त  आपल्या मुलांसाठीच जगत असते आणि जशी माझी आई माझ्या साठी जगते तसाच मी पण फक्त माझ्या आईसाठी जगत आहे जगात खूप उदाहरण आहेत प्रेमाची पण आईच्या प्रेमाचं उदाहरण कोणीच देऊ नाही शकत कारण तिची काळजी तीच ते प्रेम तिची ती माया ते फक्त आईच करू शकते अस बोलायला काहीच हरकत नाही की माझं पाहिलं प्रेम हे हे माझी आईच आहे आणि माझं शेवटचं प्रेम ही आईच असेल... तुम्हाला वाटत असेल की लग्न झालं की मुलं  आपल्या आई वर च प्रेम कमी होत किव्वा पत्नी मुळे मुलाचं प्रेम  आई पेक्षा पत्नी  साठी जास्त असतं.. तर हा गैसमज आहे.. प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेळया प्रकारचा असतो .. आणि मी तर तसा नाहीये .. कारण मी जन्म घेण्याच्या आधी पासून ते आत्ता पर्यंत तिने मला कधीच दुःख नाही दिलं फक्त प्रेमच करत आलेली माझी आई .. कारण तिने खूप दुःख त्रास भोगला आहे आणि ती वेळ माझ्या मुलानं वरती येऊ नये .. त्या मुळे कायम खुश आणि आनंदी ठेवणारी माझी आई.... खर तर माझं नशीब खूप चांगलं आहे .. की मी तूझ्या पोटी जन्माला आलो .. आई तू कधी रडली ना तर की खूप वाईट वाटत ग सहन नाही होत मला तुझी प्रत्येक गोष्ट कळते समजते.. माज मन खूप हळवं आहे तूझ्या बाबतीत.. तुला कधीच दुखी नाही बघू शकत.. कारण मला सवय झालिये.. तुला हसताना बघायची..मनात किती ही दुःख असेल तरी सगळ्यांना खुश ठेवायची .. तुझी काळजी बघून मी रोज हाच विचार करतो की किती माझी आज काळजी करते सकाळी मी जॉब का जाताना तू नविसरता जित जा बाळा अस बोलतीस ना तेव्हा.मला खूप भरून येत की .. काय प्रेम आहे यार माझ्या आई च .. ती आजारी असू किव्वा कामात असू.. पण हे शब्द मी ऐकल्या शिवाय घटून बाहेर नाही पडत .. कधी आजारी पडलो तर डॉक्टर कडे नंबर लावणे .. तासन् तास एका जागे वर बसून नंबर आल्या नंतर सांगणे की बाळा ये नंबर आला आहे.. मी कधी हॉस्पिटल मध्ये असेल तर दिवस रात्र जागी राहून काढणारी ती आईच असू शकते ..आई मी दिसत जरी बाबानं सारखा असलो तरी स्वभाव मात्र तूझ्या सारखा आहे.  तुझ सगळ्यान बरोबर प्रेमानं वागणं खूप मदत करते सगळ्यानची .. खरं तर तुला तुझ्या आईच प्रेम नाही मिळालं .. पण तू तुझ्या आईला किती मिस करतेस ते एक मुलगा जणू शकतो..ते प्रेम तर नाही देऊ शकत मी.. पण मी इतकं प्रेम करेल ना आई की तुला कधी आठवण येऊन नाही देणार तुझ्या आईची .. आई तुला कधी काही झालं तर मला नाही वाटत मी तुझ्या शिवाय जगू शकेल .. कारण तू आहेस म्हणून मी आहे..२०१८ हे वर्ष  माझ्या साठी किती दुःखदायक आहे ते तुलाच ठाऊक आहे.. किती त्रास सहन केले मी तुला खर सांगायचं झालं तर मी आज जिवंत आहे तर फक्त तुझ्या मुळे.. जीवनात एक वेळ अशी आली होती की मी स्वतःला सावरू शकत नव्हतो.. मला झालेला त्रास तुला सहन नाही होत.. माहीत आहे मला.. खूप जीव आहे तुझा माझ्या वर .. पण तुला काही झालं तर संपून जाईल मी पण.. जगायची इच्छा होणार नाही माझी .. तू माझ्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे.. आई तू जितकी सुंदर दिसतेस ना..तितकी. सुंदर तू मनाने पण.. असा ही काळ आपण बघितला आहे.किंखुप बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आणि तू जे घर सांभाळत होतीस ना.. ते फक्त तूच करू शक्तीस.. आई माझ जेवढं प्रेम आहे ना तुझ्या वर तेवढं प्रेम मा कोणा वरच नाहीये.. खर तर स्वतः वर पण नाहीये.. तूझ्या साठी प्रेमवेडा आहे .. काही प्रेम वेडे हे त्यांच्या प्रीयेसी साठी असतात पण मी तूझ्या साठी आहे.. आई तू कधी काही मागत नाही, की मला हे पाहिजे ते पाहिजे कधी.. पैसे नाही मागत कधी कोणती वस्तू नाही मागत.. कधी काही खायची इच्छा झाली असेल तरी काही मागत नाही ..मला माहित आहे की तुला खरवस खूप आवडतं मला कुठे दिसला तर माझी गाडी बरोबर तिथे थांबते.तुला खरवस आवडतं ना म्हणून... आई मी तुझा आहे ना मग तुझा हक्क आहे ना माझ्या वर तेवढा .. तुझच बाळ आहे ना मी मग का विचार करतीस इतका ..तुला हवं ते मिळेल आई.. फक्त एकदा मागून बघ तुझ्या साठी हे तुझ बाळ काही पण करेल.. कधीच कसली अपेक्षा न ठेवता फक्तं प्रेम करणारी ती आईच असू शकते..मी कामाला ला जातो ८ तास काम करून घरी येतो पण माझी आई दिवस भर काम करत असते.. जीला कधीच सुट्टी नसते.. आई तुझ्या बद्दल बोलेल तितकं कमी आहे .. आणि तुझ हे बाळ तूझ्या वर असाच प्रेम करत राहील.. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.


सुमित भालेराव
८९८३२१३१३१