Aash - 2 books and stories free download online pdf in Marathi

आस (२)

नेमकाच उन्हाळा  सुरू झाला होता. बारावीच्या परीक्षाही संपलेल्या होत्या.विशाल बारावीच्या (विज्ञान)परीक्षा देऊन झाल्या नंतर आर्मी भरतीसाठी तयारी करत होता. आर्मी मध्ये जाॅइन होऊन देशाची सेवा करायचे हे त्याचे स्वप्न होते . एके दिवशी विशाल पहाटे ५.३० च्या सुमारास व्यायामासाठी घरुन निघाला .  व्यायाम करुन घराकडे परत येते वेळेस  वाटेत त्याला  पाठिमागुन कोणीतरी हाक मारत होता. ये विशल्या विशल्या थांब लेका. हाकेचा आवाज ऐकून विशालने मागे वळून पाहिले तर त्याचा मित्र डर्मी उफृ (प्रमोद) होता .शेतातुन वैरणीचा भारा खांद्यावर घेऊन येत होता. विशालच्या जवळ येताच  भारा खाली ठेवत म्हणाला .  आमच म्हातार ना फारच वैताग देत असतो.शेतातून वैरण आन, पाणी भर , शेतात बैलांना चरायला घेऊन जा.  सकाळपासून  ते संध्याकाळ पर्यंत पाठिमागे 
 कामाची कटकट लावत असतो. आणि एवढे काम करून सुद्धा वरून म्हणत आसतो काय काम करत असतोस रे तु दिवसभर   गावात वर तोंड करून फिरत असतास. तुकड्याला महाग हाईस तू.  विशाल म्हणाला मग काय झाले    लोकांच्या घरीतर काम करत नाही  ना तु .तु तुझ्या स्व:ताच्या घरी काम करत  आहेस? असे कुठपर्यंत  आपले माय बाप कष्ट करणार त्यांना  मदत करणे आपले कर्तव्य आहे. मध्ये च डर्मी बोलला ओ राहुद्या  साहेब तुमच संभाषण तुमच्याकडे 
. बर व्हय विशल्या तुला   माहिती हाय का गावात एक नवीन  माल आलाया.तुझ्या घरामागच त्या शिंदे मास्तर घर हाय का तिथ  आलाय बघ. जाम भारी हाय दिसाय. काल मी बैल घेऊन  गेलो होते  नदीवर बैलाला पाणी पाजवायला. तर शिंदे मास्तरची करी(करीना) आणि ते नवीन पाखरू  आले होते कपडे धुवायला. त्यांच्या सोबत करीचा(करीनाचा) लहान भाऊ अभ्या हि आला होता,त्या दोघींचा बाॅडीर्गाड म्हणुन नदिवर .करी कपडे धिवत होती आणि ते नविन पाखरू पाण्यात पाय सोडून दगडावर बसले होते. आणि अभि इकडे माश्यांचे पिल्ले हाताने पकडत होता . मग मी त्याला हाक मारून माझ्या  कडे बोलुन घेतले .व म्हणालो काय चाललंय अभी भाऊ माश्यापकडण्यासाठी मि करु लागु का मदत तुमची  . मग अभी हो म्हणाला . मी म्हणालो मदत करतो तुझी पण एका अटीवर .अभ्या म्हणाला कसली अट र तुझी काही नाही अभिभाऊ एक विचारायच होत.विचार कि भाऊ कश्याला लाजतोस ‌. म्या  काय म्हणतोय ते तुझ्या  घरी पाहूणी आलीया बघ कोण हाय र ती . फक्त एवढंच विचारायच होते.ते आमच्या मामाची मुलगी हाय.मुंबई वरुन  . उन्हाळ्याच्या सट्टयात आलीया. बरं अभी भाऊ शेवटचं विचारतो नाव काय हाय तिच . तुला काय करायचे र येवढी विचारपुस करतोय तसं नाही अभी हे बघ आपल्या गावात कोणी नविन पाहूना आला की त्याची सगळी माहिती पाहिजे जर कोणी विचारले अर डर्मी त्या शिंदे मास्तर च hi्या इथं कोण आली र पाहूनी  तर मग मला सांगता येत .खर हाय की नाही अभी भाऊ .बर‌ सांग नाव काय हाय.अभी म्हणाला सोनम वा छान नाव हाय र .बरं येऊ का ? अभी भाऊ ये डर्मि कुठं जातोया हिथ माश्या काय तुझा बा पकडु लागले का?ये अभ्या तोंड सांभाळून बोल प्रमोद नाव हाय मझ आणि कुठल्या माश्या कसल्या माश्या आपल्याला काही माहित नाही . आपण निघालो बैल घेऊन घरी.असे म्हणुन घराकडे चाललो तर ते अभ्या दगड घेऊन लागला पाठिमाग .मग विशाल हसत म्हणाला द्याच्याना माश्या पकडून त्याला विनाकारण खोटं बोलला तु दगड घेऊन मागे लागणार नाही तर काय तुझी आरती करेल काय.चला घराकडे विशल्या नाही तर  आमचं म्हातार सकाळी सकाळी सुरू होईल . दोघेही चालु लागले ,चालता चालता डर्मी बोलला विशल्या तु ये उदयाला मझ्या सोबत नदीवर तुला दाखवते त्या मुंबई वालीला . विशाल म्हणाला नको मला काही गरज नाही,तुच बघत बस‌ असा म्हणाला व त्याचे घर जवळ आले   असल्यामुळे विशाल घराकडे गेला.