Aash - 1 books and stories free download online pdf in Marathi

आस (१)

सकाळचे १०.०० वाजले आणि मोबाईलचा गजर जोर जोराने वाजुन लागला . विशाल झोपेतून जागे झाला व तसाच अंथरनात पडुन  राहिला  त्याचे आजही स्वप्न अपुरे राहिले होते त्यामुळे  तो तसाच अंथरनात पडुन जे   स्वप्न पडलेले होते ते, तो  आठवत होता.  तो स्वतः त्याच्या मनात पुटपुटला , किती सुंदर स्वप्न होते ते  ,  ति मला भेटण्यासाठी  बागेत येणार होती .मी मात्र अगोदरच बागेमध्ये येऊन एका बाकावर बसलो होतो. सुंदर असा बगीचा पुर्ण फुलांनी बहरलेला व रंगेबीरंगी  फुलपाखरे त्या फुलांचा  स्वाद घेत मग्न होऊन त्या फुलांनवर बसलेली .  आणी  ते हिरवेगार गवत.  मंद हवेच्या झुळूकानी त्या गवतांची 
पाते डुलत  असताना , असे वाटत होते की जनु काही   तिचे  स्वागत करण्यासाठी डुलत   आहेत. व आजुबाजुच्या झाडांवर बसलेल्या पक्ष्यांच्या थव्याचा किलबिलाट  ऐकून असे वाटत होते  की, आम्हा दोघांसाठी कोणतरी मंजुळसे  गित गात आहेत. मग ती आली आणि मि बाकावरुन उठुन‌‌ तिच्या जवळ गेलो व काही क्षण मी तिला पाहतच राहिलो . ते तिचे गोरवर्ण , चंद्रासारखा  मुखवटा .एखाद्या स्वप्नसुंदरी पेक्षा ही अधिक    सैंदर्य लाभलेले असा तिचा , सुंदर  चेहरा  प्रत्यकाला भुरळ   पाडणारे  तिचे ते रूप. मग मि रोमांनटीक मुड मध्ये,  तिचा हात माझ्या हातात घेऊन   तिला मी काही बोलणार मध्येच ह्या गजरने माझे स्वप्न भंग केले  .मग विशाल कामाला जाण्यासाठी तयार होऊन त्याच्या बाइक वर निघाला .तसं तर दरोरोज पेक्षा आज त्याला कामाला जाण्यासाठी उशीर  झाला होता .पण त्याच्या कामाची साईट रूम पासून ३ ते ४ कि.मी  असल्यामुळे.   त्याला कामावर लवकर  जाण्याची घाई   नव्हती पण  १०.३० वाजता नंतर ट्रॅफिक फार जास्त असते व  आणि तो आज जरा नेहमीपेक्षा  उशीराच उठला होता . त्यामुळे  लवकर कामाला निघावे लागले .खरतर विशाल हा पुण्यात एका नामांकित  कॉन्ट्रॅक्टशन कंपनीमध्ये टावर 
‌क्रेन आॅपरेटर म्हणुन दोन  वर्षे झाले कार्यरत
‌होता .तसा तो फार मयाळु व मन मोकळ्या स्वभावाचा  आहे. रंगाचा जरी काळ्या सावळ्या रंगाचा असला तरीही  दिसायला मात्र हॅंडसम होता. 


 . विशाल कामावर पोहोचला व पोहोचताच   ,पंचींग मशीन कडे जाऊन इन केले . आणि ऑफिस मध्ये जाऊन त्याच्या लाॅकरची चावी घेतली, आणि लाॅकर रूम मध्ये गेला व लाॅकर खोलुन त्यातुन‌,सेफ्टी बेल्ट , सेफ्टी शुज,व हेल्मेट काढले  आणि ते सर्व साहित्य शरीरावर परीधान करून  क्रेन वर जाण्यासाठी निघाला मग त्याला, वाटेतच   त्याच्या क्रेनचा सिग्नल मॅन यादव भेटला व  तंबाखू मळत म्हणाला good morning साहबजी.आणि  खिल्ली उडवत म्हणाला  साहेब आज बहोत   जल्दी
काम पर आ गये है . मग विशाल  त्याचा कडे बघून हसला व   क्रेनवर चढला  . जास्त काम असल्या मुळे सांयकाळचे ५ कधी वाजले समजलेच नाही मग तो क्रेनवरून खाली उतरून त्याचे सर्व स्फेटीचे साहित्य लाॅकर मध्ये ठेवले .व पंचींग करून रूमला निघाला रूम वर पोहोचल्यानंतर रूम लाॅक होती. अजुन त्याचा रूम पार्टनर प्रसाद आला नव्हता त्यामुळे रूम लाॅक होती .काय ह्या पोराचा कामाचा काही टाईमींगच नाही सकाळी लवकर जायचे आणि  रात्री बे रात्री  यायच काही नेमच नाही अस म्हणुन विशालने रुम उघडली मग फ्रेश होऊन, मेस लावली आसल्यामुळे जेवण्यासाठी मेसकडे गेला .जेवुन आल्यानंतर दिवस भर कामाच्या थकाव्या मुळे तो बेडवर पडला आणी बाजुलाच आसलेल्या बोर्डला मोबाईल चाजृ लावुन दिवस भरातील व्हाटस अप वरील मेसेज व व्हिडोव चेक करत बसला होता .मग  त्याला एका अनओळखी नंबर वरून दुपारी  मेसेज आलेले दिसले .त्या नंबर वर क्लिक करून त्याने मेसेज ओपण केले .मेसेज असा होता
  Hiiii
Vishal 
व दोन फोटो होते .  फोटो डाऊनलोड झाले नसल्यामुळे ते स्पष्टपणे दिसत नव्हते.मग त्याने ते डाऊनलोड केले तर त्या फोटो कोणाच्या तरी लग्न पत्रीकेचे होते. मग एक फोटो उघडला तर पत्रीकेवर वधू व वराचे नाव लिहिले होते ,तो फोटो पत्रीकेच्या लिफाफ्याचा  होता .वधू चे नाव सोनम तर वराचे नाव विशाल असे होते  . हे पाहून विशालला
  ,त्याला  स्वतावर विश्वास बसत नव्हता.त्याला काही वेळा साठी असे वाटले  की,त्याची प्रियसी सोनम आणि त्याचीच  लग्नपत्रिका आहे असे  समजून.तो फारच    आनंदी झाला . आणि  उत्साहात त्याने दुसरा लग्नपत्रीकेची  फोटो ओपन केला तो फोटो आतिल  लग्नपत्रीकेचा होता, मग लग्न पत्रिका पाहून त्याला धक्काच बसला.त्याचा उत्साह आता हाळु ,हाळु निराशे मध्ये बदलत चालला होता व तो आता फारच नाराज होऊन इच्छा नसुनही तो लग्न पत्रिका पाहत होता  .कारण लग्न हे त्याची प्रियशी सोनमचे होते मात्र विशाल नावाचा जो नवरदेव होता .तो दुसराच कोणीतरी आहे हे समजल्यानंतर एखाद्या सागरला ओटी यावे तसे त्याचे मन भरून आले व  दोन्ही डोळ्यातुन अश्रु वाहत होते त्या अश्रुंचे थेंबे मोबाईल पडत होते. मग  हे सर्व पाहून त्याला त्याच्या पुर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या.तो तसाच मोबाईल हातात पकडून डोळे  बंद करून सोनम सोबत राहिलेलं दिवस आठवत होते.