Naa kavle kadhi - 1-21 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 1 - Part 21

    आता आर्या थोडी stable झाली होती. तिथल्या स्टाफ मधील एक सिस्टर ने येऊन सांगितले आता तुम्ही त्यांना जेवायला द्या काहीतरी.आर्या च्या आई ने तिला जेवण्यासाठी वाढले आणि त्या घास भरवत होत्या. आर्या खाऊन घे पटकन मग गोळ्या घ्यायच्या आहेत. तिची आई म्हणाली. सिद्धांत हे सगळं बाजूला बसून पाहत होता. आई प्लीज माझी काहीही खाण्याची ईच्छा नाही आहे. अग अस म्हणून कस चालेल ईच्छा नाही म्हणून कस चालेल काही तरी तर खावच लागेल, त्याशिवाय बर कस वाटेल. खा पटकन. आई तुला एकदा नाही म्हंटलेलं कळत नाही का ग का इतका आग्रह करत आहे मला नाही ईच्छा तर नाही, मी प्रत्येक वेळेस तुमचंच का ऐकायचं.आर्या चिडूनच बोलली. सिद्धांत ला आश्चर्य च वाटलं ही हिच्या आईला अस का बोलत आहे. कोणाचा राग कोणावर काढत आहे.आर्या काय बोलत आहे तू, मी कुठल्या गोष्टी साठी आग्रह केला आहे का, नेहमी तुमच्याच मनासारखं केलं कधीही तुमच्या मनाविरुद्ध काही केलं नाही.हवं तसं वागू दिल, तुला माहिती आहे का जेव्हा डॉक्टर म्हणाले की कुठलं तरी टेन्शन आहे तिला मला काय वाटलं असेल मी कुठल्यातरी गोष्टीच टेन्शन दिल आहे का, तरिही मला हे ऐकावं लागलं. काय कमी केलंय आर्या आज पर्यंत तुला, कसलं टेन्शन दिल का? तरीही तू अस बोलतेय.किती कठीण असत एकटीने सांभाळायचं तुला नाही कळणार. माझं तुमच्या शिवाय कोणीही नाही. तुमच्याच साठी जगते मी तुला लागलं म्हंटल की माझं काय झालं असेल हा विचार केला का कधी? आई तू चिडू नको ना प्लीज शांत हो. तिला बर नाही आहे ती परत तुझ्या बोलण्याचं टेन्शन घेईल.आयुष म्हणाला. बरोबर आहे आपण विचार करायचा तिचा तिला टेन्शन येईल म्हणून बोलायचं नाही तिने नको का आपला विचार करायला, पटकन खाऊन घ्यावं गोळ्या औषधी घेतली तर तिलाच बर वाटेल ना! तिचाच त्रास कमी होईल. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आल. त्या लगेच बाहेर गेल्या.आयुष ही लगेच त्यांच्या मागे गेला. आर्याला खूप वाईट वाटलं. सिद्धांत आर्या जवळ आला, आर्या एकदम त्याच्या गळ्यात पडून रडायला च लागली, मला खरच आई ला दुखवायचं नव्हतं, मी नव्हतं बोलायला पाहिजे असं पण निघून गेल, का मला कुणीच समजून नाही घेत, माझ्या प्रत्येक वागण्याचा चुकीचाच अर्थ निघतो, मला कंटाळा आलाय हया सगळ्यांचा, आणि आज तर माझ्या मुळे आई ला किती त्रास झाला, मी कोणालाच आनंद देऊ शकत नाही आहे. त्याने तिला जवळ घेतल तिच्या डोक्यावरून हात फिरवला सगळं नीट होईल आर्या, फक्त वेळ जाऊ दे. तो फक्त इतकंच बोलला. काकू होतील नॉर्मल   त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे. त्यांना वेळ दे.आणि तुझ्या मुळे काहीही नाही झालं उगाचच स्वतःला दोष देत बसू नको. आणि तुला माहिती आहे का तू खुश असली ना की तुझ्या आजूबाजूचे ही खुश असतात. तुला अस दुःखात बघून कोणाला बर वाटल तूच सांग. तुला जर सगळ्यांना आनंदी ठेवायचं असेल तर आधी बर व्हावं लागेल आणि बर व्हायचं असेल तर काहीतरी खाऊन गोळ्या औषधी घ्यावी लागेल, बरोबर ना! चल आता पटकन जेवुन घे. आणि सिद्धांत ने तिला भरवायला सुरवात केली. तिला खर तर अजूनही खाण्याची ईच्छा नव्हती. पण सिद्धांत ने इतकं छान पद्धतीने समजून सांगितलं होत की तिला त्याला नाही म्हणताच आलं नाही.त्याने तिला गोळ्या दिल्या. सर प्लीज नको मला औषधी घ्यायला नाही आवडत.खूप घाण लागतात त्या, मी त्यांच्या वासानेच आणखी आजारी पडेल. हो का चालेल बघू किती आजारी पडते ते. मलाही बघायचंच आहे. असं म्हणून त्याने तिला जबरदस्तीने गोळ्या घ्यायला लावल्या. 'आर्या'काय सर, i am really very sorry चुकलं माझं, मी अस नव्हतं बोलायला पाहिजे तुला आणि तेही सगळ्यांसमोर तर मुळीच नाही. आणि हे जे काही झालं ना ते माझ्याच मुळे झालं, मी नसतो बोललो तर कदाचित तू आता तुझ्या घरी असतीस.माफ करशील मला. आर्या बोल ना? मला आता खूप झोप येत आहे मला आराम करायचा आहे ह्या विषयावर आता नको बोलायला आर्या ने त्याच्या कडे न पाहताच उत्तर दिले आणि डोळे मिटले. सिद्धांत ला बरच बोलायचं होत पण तो निघून गेला. आर्याला काहीही झोप आलेली नव्हती तिला सिद्धान्त गेल्याची चाहूल लागली आणि तिने डोळे उघडले. किती बोलला मला हा सकाळी, पण तरीही आई रागवल्यावर मला सिद्धांत जवळच का व्यक्त व्हाव वाटलं का त्याच्या एवढं जवळच दुसरं कोणीही नाही वाटत. का मी इतक्या हक्काने त्याच्या जवळच रडले. माझ्या कडे इतकी माणसं असताना मी त्यात फक्त सिद्धांत लाच शोधत असते. मान्य आहे तो चुकतो कधी कधी पण लगेच माफीही मागतो. पण नेहमी नेहमी त्याच चूका करायच्या.पण मी आज त्याचा राग आई वर काढला. पण माझा रागही तोच काढतो. मला न बोलता ही तो किती छान समजून घेतो. पण तो हे का करतो ह्याच उत्तर तर त्याच्या कडे नाही आहे.मग का? का मी इतका विचार करायचा, त्याच्या चिडण्याचा त्रास करून घ्यायचा.त्यापेक्षा नकोच ह्या काशामध्येही गुंतण नको .आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या वर होतो आणि indirectly घरच्यांवर. आणि आता मी त्यांना नाही दुखावणार आज जे झालं ते नव्हतं व्हायला पाहिजे. पण पुढे अस कधीही होणार नाही कधीही.तिने मानाशिच निश्चय केला.आणि ती ने डोळे मिटले.
            सिद्धांत बाहेर आला त्याने बाहेर पाहिलं. आयुष तिच्या आई ला समजावून सांगत होता. तो तिच्या आई जवळ गेला आणि बोलू लागला आर्याने जेवण केलं आहे आताच आणि गोळ्याही घेतल्या. तिला झोप लागली आहे आता. हेच मगाशी केलं असत तर मला इतकं बोलायचं कामच नसत पडलं ना? तिची आई  म्हणाली. काकू ती लहान आहे नसेल कळलं तिला, आणि ती आजारी आहे साहजिक आहे तिचं चिडचिड होणं. ती नेहमी अशी वागते का?नाही ना आज जर एखाद्या वेळेस झाली असेल तिची चिडचीड तर काय बिघडलं तिला आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार?सिद्धांत ने आर्याच्या आईला समजावून सांगितलं. खरचं माझं चुकलं रे मी उगाचच बोलले मी इतकं तिला, आर्यची आई म्हणाली. आता हा विचार अजिबात करू नका तिच्या जवळ जा आता तिला तुमचीच सगळ्यात जास्त गरज आहे. हो जाते पण तू पण आता घरी जा खुप उशीर झालाय. उद्या ऑफिस असेल ना?  हो ऑफिस तर आहे . पण इथे काही लागलं तर .आम्ही आहे ना आणि काही लागलं च तर कॉल करू आणि आता बर आहे तिला उद्या असही डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळे तू नको काळजी करु तू जा घरी आराम कर.नक्की ना म्हणजे काहीही मदत लागली तर लगेच कॉल करा. मी येईल, आणि काळजी घ्या. हो खूप मदत झाली तुझी. काय मदत काय मी फक्त कर्तव्य केलं माझं. आणि तुम्ही जर असच बोलत राहिलात तर मी पुन्हा येणार नाही हं! बर ठीक आहे नाही बोलणार. चला येतो मी. अस म्हणून सिद्धांत निघाला.आर्याची आई तिच्या रूम मध्ये आली. आर्या ला झोप लागली होती. त्यामूळे त्यांनी काही तिला उठवलं नाही.आर्याला शांत लागलेली झोप पाहून त्यांना समाधान वाटलं.