Love After Breakup - Part - 10 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 10

क्रमशः

तुझ्या आठवणींचा स्पर्श मला

पुन्हा होऊ दे ..

तुझ्या गुलाबी आठवणीत मला

पुन्हा रमू दे ..

काही वेळानी इकडे प्रीती तिच्या रूममध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत बसली असताना प्रीतीचे मोबाईलवर महाबळेश्वर मधील त्या हॉटेल व्यवस्थापकांचा फोन येतो. "तुम्हीच मगाशी रूम नं ५०२ चे बुकिंगसाठी फोन केला होता ना.. पण सॉरी मॅडम.. आम्ही तुमचे त्या रूम नं ५०२ चे बुकिंग नाही घेऊ शकत.. ती रूम अगोदरच आरक्षित आहे.. हवं तर दुसरी कोणती रूम बुक करू का तुमचेसाठी आम्ही.??" ते हॉटेल व्यवस्थापक प्रीतीला फोनवर सांगत असतात. यावर प्रीती "नाही होणार का त्या रूम नं ५०२ चे बुकिंग सर??.. नसेल तर मग ठीक आहे.. नको दुसरे कोणत्या रूमचे बुकिंग.. थँक्यू सर.." असे बोलून निराश मानानेच फोन कट करून आपला मोबाईल बाजूला ठेवून देते. प्रीती त्या रूमचे बुकिंग न मिळालेने खूप निराश होते कारण यावर्षी तिने आपल्या मनात खूप स्वप्न रंगवली होती. तिला त्या रूम नं ५०२ मधील आर्यन सोबतचे आठवणीत पुन्हा एकदा रमून जायचं असते. पण आपलेला त्या रूम नं ५०२ चे बुकिंगच न मिळालेने ती खचून जाते व त्या निराशेतच प्रीती तिचा तो २५ डिसेंबरला महाबळेश्वरला जाण्याचा बेतच रद्द करते.

संध्याकाळी ऑफिस मधून घरी आलेवर रात्रीचे जेवण करून आर्यन आपल्या रूममध्ये पेन हतात घेऊन त्याचे डायरीत काही तरी लिहीत बसलेला असतो. लिहिता लिहिताच अचानक त्याला आज दुपारी ऑफिसमध्ये असताना महाबळेश्वरचे हॉटेल मधून आलेल्या फोनची गोष्ट आठवते. रूम नं ५०२ चे बुकिंग बाबतची आणि त्याचे मनात अचानक एक विचार येतो. आपण त्या हॉटेलचे व्यवस्थापकांना आपले रूम नं ५०२ चे बुकिंग कन्फर्म करायला तर सांगितले पण.. जी महिला त्याच रूम नं ५०२ चे बुकिंग साठी इतकी आग्रही होती ती महिला म्हणजे.. आपली प्रीतीच असेल तर?.. नाही नाही आपण त्या हॉटेल व्यवस्थापकांना त्या रूम नं ५०२ चे बुकिंग त्या महिलेला द्यायला सांगायला हवं होते. मला उद्या सकाळीच त्या हॉटेलचे व्यवस्थापकांना फोन करून रूम नं ५०२ चे बुकिंग बाबत बोलायला हवं आणि माझेसाठी दुसरी एखादी रूम बुक करायला हवी..

दुसरे दिवशी महाबळेश्वरमधील त्या हॉटेलचे व्यवस्थापकांचा प्रीतीचे मोबाइलला फोन येतो "गुड मॉर्निंग.. नमस्कार मॅडम.. काल आपण फोन केला होतात ना बुकिंगसाठी.. तुम्हाला त्या रूम नं ५०२ चे बुकिंग हवे होते ना.. तर ती रूम नं ५०२ ज्यांनी बुक केली होती त्यांचा फोन आला होता आताच त्यांचे महाबळेश्वरचे येणे कॅन्सल झाले आहे.. त्यामुळे तुम्हाला फोन केला तुमचे बुकिंग करू का आम्ही कन्फर्म?.. तुम्हाला हवी असणारी रूमही आहे आता उपलब्ध आहे बुकिंगसाठी.." ते हॉटेलचे व्यवस्थापक प्रीतीला फोनवर सांगत असतात. प्रीतीला त्या हॉटेलचे व्यवस्थापकांचे बोलणे ऐकून खूप आनंद होतो आणि थोडं आश्चर्यही वाटते कारण काल पर्यंत आरक्षित असणारी रूम लगेच एका रात्रीत त्या रूमचे बुकिंग कॅन्सलही होते.. कदाचित ती रूम माझे अगोदर आर्यननेच बुक केली असेल तर??.. मागील वर्षीही आपण त्या रूमचे बुकिंग करताना ती रूम याच दिवसात आरक्षित होती आणि याही वर्षी ती रूम आरक्षितच होती.. याच साऱ्या विचारात मग ती त्या हॉटेलचे व्यवस्थापकांना फोनवर सांगते "हो सर.. हो आम्हाला बुकिंग तर करायचेच आहे रूम नं ५०२ चे.. पण सर मला एक गोष्ट समजू शकेल का तुमच्या कडून?.. त्या रूम नं ५०२ चे बुकिंग या आधी कोणी केले होते?.. आणि त्यांचे नाव समजू शकेल का मला सर??." यावर ते हॉटेलचे व्यवस्थापक प्रीतीला सांगतात "ठीक आहे.. आम्ही कन्फर्म करतो मग तुमचे रूम नं ५०२ चे बुकिंग २५ डिसेंबर आणि २६ डिसेंबरचे दोन दिवसांसाठी.. आणि सॉरी मॅडम आम्हाला आमच्या कोणत्याच ग्राहकांची वैयक्तिक माहिती अशी तुम्हाला देता नाही येणार कारण आमच्या हॉटेलचे काही रूल्स आहेत त्यामुळे सॉरी.. गुड डे.." प्रीती महाबळेश्वर मधील त्या रूमचे बुकिंग मिळालेने खूप खूष तर असतेच पण त्याहूनही तिचे मनाला एका गोष्टीची आतुरता लागली होती ती म्हणजे ती रूम कोणी बुक केली होती आपल्या आधी..

काही वेळानी इकडे आर्यनचे मोबाईलवर त्या महाबळेश्वरमधील हॉटेलचे व्यवस्थापकांचा फोन येतो "हा सर तुम्ही सांगितले प्रमाणे आम्ही तुमचे रूम नं ५०२ चे बुकिंग कॅन्सल करून तुमचेसाठी रूम नं ५०१ चे २४ डिसेंबर ते २७ डिसेंबरचे बुकिंग केले आहे आणि त्या मॅडमना त्या रूम नं ५०२ चे बुकिंग दिले आहे.. आणि हो त्या विचारात होत्या तुमचेबद्दल म्हणजे ही रूम कोणी बुक केली होती या विषयी.. पण तुम्ही अगोदरच सांगितले होते त्यानुसार आम्ही त्यांना तुमचेबद्दल काहीच नाही सांगितले आहे..गुड डे सर.." आर्यनचे मनाला पक्की खात्री वाटत असते की ती रूम नक्कीच प्रीतीने बुक केली असणार पण तिला आश्चर्याचा एक सुखद धक्का देण्यासाठी आर्यन आपली ओळख त्या हॉटेल व्यवस्थापकांना प्रीती पासून लपवायला सांगतो. आर्यनचे मनालाही उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे प्रीतीचे भेटीची. तो आता आतुरतेने वाट पहात असतो ती त्या २५ डिसेंबरची.

ठरल्याप्रमाणे आर्यन २४ डिसेंबरच्या संध्याकाळीच महाबळेश्वर मधील त्या हॉटेलवर येतो. त्याच्या मनाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते. तो हॉटेल मध्ये गेल्या गेल्या जाऊन पहिला तेथील हॉटेल व्यवस्थापकांना भेटतो आणि ज्या महिलेने त्यांचे हॉटेल मधील त्या रूम नं ५०२ चे बुकिंग केले आहे याची माहिती विचारतो. सुरवातीला ते हॉटेल व्यवस्थापक माहिती देण्यास नकारच देतात मग आर्यन जेव्हा त्यांना कळकळीने विनंती करतो आणि त्याच्या त्या हॉटेल मधील पहिल्या वहिल्या प्रेमाचे काही आठवणी त्यांना सांगतो तेव्हा कोठे ते व्यवस्थापक प्रीतीनेच त्या रूमचे बुकिंग केल्याचे आर्यनला सांगतात. प्रीतीचे नाव समजताच आर्यनला कधी एकदा उद्याचा दिवस उजाडेल असे झालेले असते.

तुझ्या नकळतच तुला

घट्ट बिलगू दे मला..

तुझ्या गुलाब कळीचा

गुलकंद चाखू दे मला..

मिठीत तुला सावरताना

पुन्हा प्रेमात पडू दे मला..

पुन्हा प्रेमात पडू दे मला..

- शब्दप्रेमी..

आणि अखेर तो २५ डिसेंबरचा दिवस उगवतो. आर्यन सकाळी लवकर उठून आवरून त्याचे रूम नं ५०१ समोरील बाल्कनीत सकाळचे कोवळ्या उन्हात सोनेरी किरणात आपले पहिलं वहिलं प्रेम "प्रीती" येण्याची वाट पाहत उभा रहातो आणि काही वेळातच समोर हॉटेलचे पार्किंगमध्ये एक गाडी येते.. आर्यनची नजर त्या गाडीचे बंद दरवजावर स्थिरावते.. त्या गाडीचा दरवजा उघडून गाडीमधून चुडीदार घातलेली लांब काळेभोर मोकळे केस सोडलेली एक तरुणी उतरते.. आर्यन फार उत्सुकतेने त्या तरुणीकडे एकटक पहात असतो.. आर्यनच्या मानाने तर तिचे त्या मागून दिसणारे शरीर यष्ठीवरूनच ती प्रीती असलेच ओळखलं होते.. पण तरीही त्याच्या नजरेला तिला समोरून डोळेभरून एकदा तृप्त पाहायचं होते.. ती तरुणी त्या गाडी मधून आपले साहित्य उतरवत होती आणि आर्यन ती कधी आपल्या बाजूला वळते याचे प्रतिक्षेत होता.. आर्यनला त्या तरुणीचे तो मागे वळण्याचा एक एक सेकंदही जणू एक एक तास असले सारखाच वाटू लागलेला असतो.. क्षणातच ती आपली गाडी मधील बॅग काढून बाहेर ठेवण्यासाठी मागे वळते आणि आर्यनची नजर इतकी वर्षे ज्या चेहऱ्याचे शोधात दिवस-रात्र जगात होती तो चेहरा अखेर त्या नजरे समोर येतो.. ती तरुणी आर्यनचे पहिलं प्रेम प्रीतीच असते.. आर्यनचे एक मन तर कधीच जाऊन प्रीतीच्या शरीराला घट्ट बिलगलेले होते.. त्याचे त्या मनाला प्रीतीच्या आलिंगनात घट्ट बिलगलेले पाहून दुसरे मन मात्र त्या सकाळचे गुलाबी थंडीत थोडं थोडं जळत होते.. आर्यनच्या मनातील खुशी तर आकाशातही मावेनाशी झाली होती.. पण ती आकाशात न मावणारी खुशी क्षणातच विरून जाते आणि प्रीतीला आश्च्यर्याचा सुखद धक्का देण्यासाठी आलेल्या आर्यनलाच त्याचे नजरेने पाहिलेलं दृश्य पाहून एक धक्का बसतो व आर्यन पुन्हा एका खोल दुःखाच्या दरीत कोसळून जातो..

क्रमशः भाग ११

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर