Raatrani - 12 books and stories free download online pdf in Marathi

रातराणी.... (भाग १२)

विनयला सुद्धा छान वाटले. संद्याकाळ पर्यंत ऑफिस मधले वातावरण सुद्धा बदलले. हे सगळे पुन्हा एकमेकांशी बोलायला लागले, हि बातमी एव्हाना सर्व ऑफिस भर पसरली. विनय निघतच होता घरी, आणि दिक्षाचा मॅसेज आला PC वर... " भेटूया का ऑफिस खाली.. " विनयला हसायला आलं. त्याने रिप्लाय केला. " मी घरी निघतो आहे.... तू सुद्धा निघत असशील तर तुला सोडतो घरी... वाटेत बोलू.. " तिचा लगेच रिप्लाय... " ठीक आहे... मीही निघते आहे.. पार्किंग मध्ये उभा राहा.. येते मी... " विनय १० मिनिटांनी खाली आला.


" हा बोल.. काही बोलायचे होते तुला... " विनय दिक्षा समोर उभा राहिला.
" इथेच बोलूया का... ".... दिक्षा...
" मग कुठे ... ? " ,
" कॉफी घेऊया का.. ",
" चालेल ना.. ते बघ ... पलीकडेच कॉफी शॉप आहे.. " दोघे गेले तिथे. विनयने त्याची नेहमीची जागा पकडली. " मी येतं असतो इथे... ते जाऊ दे... बोला मॅडम... आज एकदम कॉफी साठी विचारलं... क्या बात है.. " ,
" तुला थँक्स बोलायचे होते.... " दिक्षाच्या चेहऱ्यावर आनंद होता. विनयला कळलं ते...
" त्यात थँक्स काय.. मला वाटलं , तुम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र यावे... त्यात तुम्ही सर्वच छान आहात... म्हणून.. त्यात ... तू.... एखाद्या कवितेसारखी वाटतेस... " ,
" हेच... हेच आवडत नाही मला.. मी तुझी कविता नाही... मित्र आहेस ना... नॉर्मल बोललास तरी चालेल... आणि ते प्रेम ,विरह .. या गोष्टीवर तर अजिबात विश्वास नाही माझा .... आवडतं नाही तेच बोलतोस... " दिक्षा बोलून गेली पट्कन. नंतर तिलाच वाईट वाटलं..
" सॉरी.. पट्कन राग येतो मला.. पण या गोष्टी नाही आवडत मला.. मग असं कोणी वागलं कि राग येतो... " ,
" its ok ..." विनयने कॉफी संपवली.
" By the way , एक सांगायचे राहिले... तुला जेव्हा पहिल्यांदा निरखून पाहिलं ना... तेव्हाच एक कविता लिहिली होती तुझ्यावर... if you don't mind... ऐकवू का.. " ,
" चालेल ना ... " दिक्षा सावरून बसली.


" अलीकडे ना एकटच छान वाटत
चंद्राकडे पण एकटक बघावस वाटत
नसलं कुणी आसपास तरी हि छान वाटत
तुझ्याच आठवणीत रमावस वाटत
बोलताना तुझ्याकडेच बघावस वाटत
माझ्या प्रत्येक कवितेत तुझंच अस्तित्व असावं असं वाटत,
झोपेतही तुझच स्वप्न पडावं असं वाटतं
एकट्यामध्ये उगीचच हसावस वाटतं
मनं नको नको म्हणतानाही तुझ्याशी बोलावसं वाटत
फक्त तुझ्यासाठी आता सजावस वाटतं
फुलपाखरासारखं खुप खूप उडवसं वाटत
तुझ्या मिठीत येऊन आता कायमच निजावस वाटत !!!!! "


दिक्षा भारावून ऐकत होती.


"चल निघूया... सोडतोस का मला घरी.. " ,
" घरी ... तुला ?? " विनय चाट पडला.
" त्यात काय... आमच्या एरिया मध्ये तर सोडू शकतोस ना.. थेट घरात नाही बोलली... " ,
" नाही... सकाळी कोणीतरी बसत नव्हते माझ्या गाडीवर... " ,
" हो का ... बरा शहाणा आहेस तू... चल लवकर ... उशीर होईल नाहीतर... " विनयने हसतच त्याची बुलेट सुरु केली. निघाले दोघेही.


=================================================


आज विनयची आणखी एक टेस्ट होणार होती, त्यासाठी चंदन थांबला होता हॉस्पिटल मध्ये. अवि आणि हेमंत नवीन प्रोजेक्ट साठी मुंबईबाहेर होते आणि दिक्षा , अनुजा येऊ शकत नव्हत्या. म्हणून फक्त चंदन विनयजवळ होता. बसून बसून त्यालाही कंटाळा आलेला. तिथेच येरझाऱ्या घालू लागला. तिथे एक खिडकी होती. त्याजवळ आला आणि खाली बघू लागला. आज सकाळ पासूनच लगबग होती खाली. काही अंतरावरची बाजारपेठ दिसत होती. गर्दीच होती तिथे. वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे आकाशकंदील नजरेस पडत होते. रांगोळीचे रंग घेऊन काही लोकं बसली होती. अरे हो..... परवा दिवाळी ना..चंदनच्या लक्षात आलं. हल्ली काहीच लक्षात राहत नाही. विनयकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले असते. गेल्यावर्षी किती धमाल केली होती ऑफिसमध्ये.... ते फक्त विनयमुळेच शक्य झालं होते. चंदनला आठवली ती दिवाळी.


=====================================================


हे सर्व एकत्र आल्यानंतरचा पहिला सण.... " दिवाळी ". आधीच तयारी सुरु झालेली. त्यामुळे ऑफिस मध्ये गडबड होतीच. नव्या जोमाने तयारी करत होते सर्व. ५ जणांची टीम पुन्हा ऍक्टिव्ह झालेली. साऱ्यांनी आनंदाने कामे वाटून घेतली होती. विनय सुद्धा मदत करत होता. त्यात अजूनही दिक्षाचा पत्ता नव्हता. अनुजाला विचारलं त्याने.
" उशीर होणार बोललेली.. किती उशीर हे नाही बोलली. पण तुला कशाला पाहिजे आहे ती... " अजुनाने उलट विचारलं.
" नाही.... काल तिला पणत्या आणायला सांगतील होते. " ,
" पण २ दिवस आहेत ना अजून दिवाळीला... उद्याही आणता येतील.. " ,
"तसं नाही... ऐनवेळी गडबड नको म्हणून बोललो होतो ... आजच घेऊन ये... जर ती आणणार नसेल तर दुसऱ्या कोणाला सांगता येईल... " विनयने explain केले.


विनयला एक कॉल आला तसा तो खाली आला. १० मिनिट झाली असतील. समोरून गेटमधून दिक्षा येताना दिसली. पांढरा शुभ्र ड्रेस , त्यात केशरी रंगाचा पायजमा... दोन्ही कानात मोरपंखी असं काहीतरी... केस , एका वेगळ्या प्रकारे वर बांधलेले. त्यात तिला तो पांढरा रंग इतका उठून दिसतं होता कि क्या बात है... बघतच राहिला विनय, तरी स्वतःला सावरलं त्याने. दिक्षाने पाहिलं त्याला. तशी त्याच्या दिशेने आली.
" नमस्कार दिक्षा मॅडम... कुठे होता आपण ... " ,
" का... काय झालं... " ,
" तुला पणत्या सांगितल्या होत्या.. विसरलीस ना ... " ,
" त्याच आणायला गेले होते... हे घे ... " दिक्षाने पणतीची पिशवी त्याच्या हातात ठेवली.


"... थँक्स .... and By the way ... दिवाळी दोन दिवसानंतर आहे... पण तुला बघून वाटते ... आजच सुरु झाली दिवाळी.... निदान माझी तरी... " दिक्षाने त्याच्या पाठीवर चापट मारली.
" तुला काय .. सारखी मीच भेटते वाटते स्तुती करायला. आणि तू खाली काय करतो आहेस... आपले ऑफिस चौथ्या मजल्यावर आहे... कि कोणाला बघायला येतोस खाली सारखा... अनुजाला खूप लोकं येतात बघायला ते माहित आहे मला... तसाच तू येतोस का खाली कोणासाठी... " दिक्षा हसत होती.
" हो ... आहे कि ... फोटो पण आहे माझ्याकडे .... बघायचा आहे का .. " ,
" दाखव ... दाखव ... " विनयने मोबाईलचा front camera सुरु केला आणि दिक्षा समोर धरला.
" ह्या मुलीला बघायला येतो खाली... " दिक्षा स्वतःचा चेहरा बघून लाजली.
" चल ... मी जाते वरती.... तू फिरत राहा ... भुंग्या सारखा ... मिळेल कोणतेतरी फुलं ... " दिक्षा हसत निघाली , मागोमाग विनय. एकत्रच शिरले लिफ्ट मध्ये...... दोघेच. .... विनय दिक्षाकडेच बघत होता. दिक्षा लाजत होती. अचानक काही सुचलं त्याला..
" अक्षरांना सुद्धा आता तुझी सवय झालीये,
काही लिहावं म्हटलं तरी तुझंच नाव येत,
सुचतच नाही आता तुझ्याशिवाय काही,
फिरून माझं मन पुन्हा तुझ्याजवळच का येत ?? "


कसली भारी smile आली दिक्षाच्या चेहऱ्यावर ती कविता ऐकून. लिफ्टचा दरवाजा उघडला , दिक्षाने विनयच्या गालांचा गालगुच्चा घेतला आणि पळतच निघून गेली. चंदन लिफ्टच्या बाहेरच उभा. विनय लिफ्ट मधून बाहेर आला तसा त्यानेही विनयचा गालगुच्च्या घेतला.
" आता माझा घे गालगुच्च्या... " म्हणत चंदनने स्वतःचा गाल पुढे केला. तशी विनयने हलकेसे चापट मारली त्याच्या गालावर ....
" मला कळते रे सगळे ... माहित आहे ना ... माझी माणसं आहेत ऑफिस मध्ये... सगळे update असतात माझ्याकडे ... " चंदन विनयकडे पाहत म्हणाला.


-------------------------- क्रमश: ------------------