Aatmvishwas - 2 books and stories free download online pdf in Marathi

आत्मविश्वास - 2

आत्मविश्वास म्हणजे काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे .प्रथम आपणास
जे साध्य करावयाचेआहे त्याचे स्वरूप निश्चित
पाहिजे.म्हणजे आपले ध्येय निश्चित ठरविले पाहिजे. दुसरा मुद्दा आपली कार्यक्षमता याचाही
विचार केला पाहिजे.जेवढी कार्यक्षमता उत्कृष्ठ
उच्च दर्जाची असेल.त्यावर आपले यश अवलंबुन आहे.
तिसरा मुद्दा म्हणजे स्वावलंबन.आपण दुसऱ्या वर विसंबून न राहता,प्रत्येक गोष्ट स्वात: केली पाहिजे. चौथा मुद्दा विचार,आपले विचार नेहमी
सकारात्मक पाहिजे.म्हणजे कोणतेही काम मी करू
शकेन असा दृढ विश्वास पाहिजे.सकारात्मक
विचार करणारी माणस कुठल्याही समस्यांना पार करून
आपले इच्छित साध्य करतात. किंबहुना समस्या ही
सुद्धा संधी आहे असे समजतात. इतकेच नाही तर असे लोक चांगल्या प्रकारे विधायक कार्य
करू शकतात.नकारात्मक विचार करणारी माणसे जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत
नाहीत.इतकेच नव्हे तर स्वतः ची प्रगती सुद्धा
करू शकत नाही.म्हणून प्रथम आपल्या मनातल
नकारात्मक विचारांना थारा देऊ नका .जसे
विचार तशी कृती.
एक सामान्य मुलगा हॉटेल मध्ये नोकरी
करीत होता,,त्याच्या मनात विचार आला आपण
सुद्धा चांगल्या प्रकारे हॉटेल चालवू.कारण या
क्षेत्रातील बहुतेक गोष्टी मला चांगल्या अवगत आहेत.
त्याने एकदिवस मालकाला विचारले,मी हा व्ययसाय सुरू करतो आपण मला थोडी आर्थिक
मदत केली तर बरे होईल मालक चांगला असल्या
मुळे त्याला आर्थिक मदत केली. कालांतराने
तो मुलगा हॉटेलचा मालक झाला.कारण त्याला
त्याची क्षमता माहीत होती.दृढ इच्छा शक्ती व आत्मविश्वास होता.पुष्कळ वेळेस आपण पाहतो,आई वडील मजुरी करून मुलाला
शिकवत असतात.मुलगा विद्यार्थी दशेत असतांना
पाहतो की,आपले आपले आई वडील काबाड कष्ट करून आपल्याला शिकवतात आपण ही
परिस्थिती बदलली पाहिजे.चांगल शिकून
चांगल्या पदावर नोकरी केली पाहिजे.असे
विद्यार्थी जिद्दीने यु.पी.एस.सी.परीक्षेस बसून
जबाबदारीच्या पदावर काम करतात.आपल्या
आई वडीलांचे कष्ट त्यांनी पाहिलेले असतात
आणि विद्यार्थी दशेत असतांना हा विचार त्यांच्या
मनात दृढ झालेला असतो म्हणजे त्यांचं उद्दीष्ट,
ध्येय निश्चित झालेल असत.आणि त्या दृष्टीने
प्रयत्न करून आपल ध्येय साध्य करतात.
आधी आपण आपल्याला स्वतःला
ओळखलं पाहिजे.आपल्या मध्ये असणाऱ्या उणिवा दूर केल्या पाहिजेत.आपली कार्य क्षमता
वाढविली पाहिजे.मी जीवनात यशस्विच होईल
असा आत्मविश्वास ठेवा. आपण आपलं इच्छित
ध्येय साध्य करीत असतांना अनेक अडचणी अनेक समस्या येऊ शकतात.या अडचणींना
समस्यांना संधी समजून त्यावर मात करा.निराश
कधीच होऊ नका.ज्या लोकांनी परिश्रम करून
उत्कर्ष केला त्यांचे उदाहरण समोर ठेवा.जरी
तुमच्या कडून काही चुका झाल्या असतील तरी
त्या मुळे निराश होऊ नका किंवा कमी पणाची
भावना मनात निर्माण होऊ देऊ नका.काही जण
जरूर तुमच्यावर टीका करतील पण तिकडे लक्ष
देऊ नका.
" There is whole galaxy within you,waiting to be unleashed let the
universe want no more."
"Never let yourself down.Take hart no matter how awful the accusations against you.You are
Still a child of God" (J.Sariano)
आत्मविश्वास ही अध्यात्मिक शक्ती आहे.आपल्या जवळ काहीही नसले तरी आत्मविश्वास असेल तर कठीण परिस्थितीवर
विजय प्राप्त करू शकतो.प्रयत्ना बरोबर आत्मविश्वास जरूर पाहिजे. प्रत्येक व्यक्ती मध्ये
एक चांगला गुण सुप्तावस्थेत असतोच परंतु आत्मविश्वास नसल्या मुळे तो दाखवू शकत नाही.
द्रौपदी स्वयंवराचे वेळी एक पण ठेवला होता. एक फिरता मासा वर बांधला होता
व त्याचे प्रतिबिंब खाली पाण्यात पडले होते.
पाण्यात पाहून बरोबर त्या माशाच्या डोळ्यात
बाण मारायचा.अतिशय अवघड पण.अर्जुनाने
बरोबर बाण मारून तो पण जिंकला.कारण
या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार करा.पहिली
गोष्ट मनाची एकाग्रता दुसरी गोष्ट क्षमता व आत्मविश्वास.या दोनही गोष्टी अर्जुना जवळ होत्या.म्हणून त्याने तो पण जिंकला.आपले लक्ष्य
व आपले ध्येय प्राप्ती करिता नुसत्या प्रयत्नांनी
यश मिळत नाही तर आत्मविश्वास पाहिजे जो
आपल्या मध्येच असतो.
कधी कधी आपला आत्मविश्वास कमी होतो व आपण हे करू शकणार नाही,अशी भावना निर्माण होते.परंतु वस्तुस्थिती तशी नसते.
करण आपण आपल्याला ओळखलेले नसते.
आपल्या मध्ये जी शक्ती आहे तिला ओळखा
म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल.परामेश्वराने
प्रत्येकाला अनंत शक्ती दिली आहे फक्त ती शक्ती
ओळखा. त्या करिता आपले शरीर आणि मन नोरोगी ठेवा.मनात नेहमी सकारात्मक विचार येउद्या सकारात्मक विचार हे नेहमी सकारात्मकच कृती घडवतात.त्या मुळेच आपला
आत्मविश्वास वाढत जातो व मनुष्य आपले ध्येय
साध्य करू शकतो.