Aaji aajobachya goshti - sway la olkha books and stories free download online pdf in Marathi

आजी आजोबांच्या गोष्टी स्वतः ला ओळखा

आजी आजोबाच्या गोष्ट“स्वतः ला ओळखा”
एक होता धनगर तो रोज आपल्या मेंढ्या घेऊन
रानात चरावयास घेऊन जात असे.एक दिवस त्याला
जंगलात एक सिंहाचे पिलू सापडले ते घेऊन तो
घरी आला.ते सिंहाचे पिलू मेंढयांच्या कळपात वाढले.
त्यांच्याच सारखा आवाज काढू लागले.आहार सुद्धा
त्यांचाच सारखा.एक दिवस जंगलात चरत असताना
त्या पिलाला सिंहाने पाहिले आणि मनात विचार केला
हे हे पिल्लू मेंढ्यात कसे.याला मेंढाय घाबरत कशा
नाहीत.त्या सिंहाने त्याला बोलावून घेतले.त्याला विचारले
तू कोण आहेस ते पिलू म्हणाले मी मेंढी आहे.
सिंहाने त्याला सांगितले अरे तू या जंगलाचा राजा आहेस
तू सिंह आहेस.पण ते पिल्लू काही ऐकेना, ते सारखे म्हणत
असे अरे मी मेंढी आहे.शेवटी सिंहाने एक युक्ती
लढवली व त्याला एका ताळ्यावर घेऊन गेले.व सांगितले
की,या पाण्यात पहा,मग माझ्या कडे पहा.त्याने
पाण्यात स्वतः चे प्रतिबिंब पाहिले व सिंहाकडे
पाहिले व त्याच्या लक्षात आले की अरे आपण
या सिंहा सारखे दिसतो.सिंह म्हणाला आता तू
जोराने ओरड.सिंह म्हणाल शाब्बास.आता तू त्या
कळपात जाऊन असाच आवाज काढ.त्या पिल्लाने
तेथे जाऊन जोरात डरकाळी दिली त्या बरोबर सगळ्या
मेंढ्या घाबरून पाळाल्या. मग त्याला समजले अरे
मी तर जंगलाचा राजा सिंह आहे.मी हे विसरून गेलो
होतो.मुलांनो स्वतः ला कमी समजू नका,तुम्ही
मुळात श्रेष्ठ आहेत बुद्धिमान आहात.तरच तुमचा
उत्कर्ष व प्रगती होऊ शकते.
t २) ससा आणि जंगलाचा राजा
एक ससा होता फिरत फिरत,डोलत डोलत जंगलातून
फिरत होता.मध्येच ऐटीने थांबून रुबाबात कान टवकारून
मागे वळून पहात असे व परत पुढे चालू लागत असे.
काही अंतर गेल्यावर त्याला समोर जंगलाचा राजा सिंह
दिसला.पण तो घाबरला नाही.सिंहाने त्याला पाहिले व
लगेच म्हणाला,बरं तू मला भेटलास,मला खूप भूक
लागली आहे,तुला आता खाऊन टाकतो.ससा विचार
करीत होता आता काय करायचे? सशाला एक युक्ती
लक्षात आली,तो न घाबरता धीट पणे सिंहाला म्हणाला
तू मला खाऊ शकत नाहीस.सिंह म्हणाला का?सशाने
लगेच उत्तर दिले करण मी जंगलाचा राजा आहे.सिंह
म्हणाला,अरे जंगलाचा राजा मी आहे.ससा म्हणाला
मीच जंगलाचा राजा आहे.माझ्या बरोबर चल मी दाखवतो
सिंह म्हणाला,ठीक आहे,तू म्हणतो तर दाखव,मी तुझ्या
बरोबर येतो.बस!मग काय,ससा पुढे चालला व सिंह त्याच्या
मागे.जंगलातून चालले.समोर काही कोल्हे होते त्यांना पाहून
पळाले.नंतर एक हरणांचा कळप दिसला.तो ही त्यांना पाहून
पळाला.ससा सिंहाला लगेच म्हणाला,पहा मला पाहून कसे सगळे
पळाले.कारण मी जंगलाचा राजा आहे.समजलं का तुला.आता
तू मुकाट्याने इथून निघून जा.आणि खरोखर सिंह मुकाट्याने
निघून गेला.मुलांनो सिंह स्वतः जंगलाचा राजा असून,स्वतः ला
विसरला.सशाने युक्तीने आणि कुशाग्र बुद्धीने सिंहाला बुद्दु
बनवलं.तेव्हा तुम्ही स्वतःवर व स्वतः च्या बुध्दी मत्तेवर
विश्वास ठेवा.

"मुंगी आणि कबुतर"
एक मुंगी होती.ती फिरत फिरत एका रस्त्याच्या
कडेने चालली होती.दुपारची वेळ होती.तिला तहान लागली होती.रस्त्याच्या बाजूला तिला एक
नदी दिसली. पाणी पिण्याकरिता ती नदीवर गेली.
हळू हळू पाणी पीत असतांना ती वाऱ्यामुळे पाण्यात पडली.तिथे एक झाड होते.त्या झाडावर
एक कबुतर बसले होते.त्याने पाहिले की,मुंगी पाण्यात बुडत आहे.त्याने झाडाचे एक पान तोडून
मुंगीच्या समोर पाण्यात टाकले.मुंगी त्या पानावर चढून काठावर आली तिचे प्राण वाचले.तिला आनंद झाला.तिने झाडावर कबुतर पाहिले व त्याला म्हणाली,कबुतर दादा,कबुदर दादा,तू माझे
प्राण वाचवले मी तुझी आभारी आहे.मी तुझे उपकार ठेवणार ठेवणार नाही.एक दिवस मी पण
तुझ्या उपयोगी पडेल.कबुतर म्हणाले,मुंगी ताई
तू किती लहान आहेस तू माझ्या काय उपयोगी
पडणार!मुंगी म्हणाली ठीक आहे.असे म्हणून ती
तिच्या घरी गेली.काही दिवस गेले असेच एक दिवस त्याच रस्त्याने मुंगी चालली चालता चालता
तिचे लक्ष एका माणसा कडे गेले त्या माणसाच्या
हातात बंदूक होती व तो कोणाची तरी शिकार करीत होता. ती मुंगी थोडा वेळ तिथेच थांबली
व पाहू लागली कीं हा शिकारी कोणाची शिकार करीत आहे.त्याने झाडावर असलेल्या पक्षावर
नेम धरला होता.त्या मुंगीने सहज वर पाहिलं की
झाडावर कोणता पक्षी बसला आहे.तिच्या लक्षात आले की,ज्याने आपल्याला मदत केली तेच आहे
व शिकारी त्यालाच मारणार आहे.मुंगी धावत धावत त्या शिकणाऱ्यापाशी गेली.तो शिकारी
बंदुकीने गोळी मारणार तोच मुंगीने त्याचा पायाचा
चावा घेतला व शिकाऱ्याचा नेम चुकला व कबुतराचे प्राण वाचले.शिकारी निघून गेला.
मुंगी काबूतराला म्हणाली, कबुरदादा तू म्हणाला
होतास तू एवढीशी लहान आहेस मला काय मदत
करणार आहेस.कबुरदादा म्हणाला आता मला समजल लहान सुद्धा मोठ्याला मदत करू शकतात.