Pralay - 24 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - २४

Featured Books
Categories
Share

प्रलय - २४

प्रलय-२४

ज्यावेळी भगीरथ जलधि राज्याच्या सैनिक तळावरती पोहोचला त्यावेळी सर्वत्र शांतता होती . कौशिका कडे जात त्याने महाराज व मंत्रीगणाला बोलवण्याची विनंती केली . सारे जमल्यावरती तो बोलू लागल
" रक्षक राज्याच्या सैनिकांनी विक्रमाचा वध करून त्याला भिंतीपलीकडे फेकून दिले आहे . महाराज विश्वकर्माच्या नियंत्रणाखाली जलधि आणि रक्षक राज्याची सैना बाटी जमातीच्या टोळी मागे त्यांच्या जुन्या महालाकडे गेली आहे . तंत्रज्ञ मंदारचा मुलगा , शौनकचा या सार्‍यात फार मोठा वाटा आहे . त्यानेच उघड केले की विक्रम हा मारुतांच्या अंमलाखाली होता . आता भिंत तर पडणार नाही , त्यामुळे त्रिशुळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी आपल्याला बराच वेळ मिळेल ....
हे ऐकल्यावर ती जरा तणावपूर्ण असलेलं वातावरण मोकळे झाले....
त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी काळ्या भिंती पलीकडील असलेल्या काळ्या महालातील त्रिशूळ आणणं आवश्यक होतं . भिंत पडली असती तर ते शक्य नव्हतं . पण आता भिंत पडणार नव्हती , त्यामुळे राजकार राजकुमार देवव्रत या मोहिमेसाठी झटकन निघाला.....
आता केवळ महाराज कैरव , काही मंत्रीगण राजमहर्षी यांची बैठक जमली होती . भागिरथ बोलत होता ...
" तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार - प्रलय येणार हे तेव्हाच निश्चित झालेल्या वेळी महाराज सत्यवर्मांनी त्यांच्या राजकुमारासकट महाल पेटवून दिला . तो पुढे बोलला की ' प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . आत्म बलिदानाचा विधीही पूर्ण झालेला आहे . त्या विधीसाठी महाराणी शकुंतलेच्या तिसरा पुत्राचा बळी देण्यात आलेला आहे . प्रलयकारीकेला रोखण्यासाठी सुरूक ने वारसदारच्या सभेच्या प्रमुखाची निवड केली आहे . मात्र अजून त्याला यश आलेले नाही . प्रलयकारीकेला जर खरच थांबवायचं असेल तर जलधि मारुत आणि आग्नेय राजांना एकत्र यावे लागेल ...... "
एवढं बोलून भगिरथ थांबला . त्यानंतर राज महर्षी बोलू लागले....
" पहिल्या प्रलयाच्या वेळी जलधि अग्नेय आणि मारुत ही राज्ये वेगळी नव्हती , एकाच राज्याचे भाग होते . तरीही त्यांना एकत्रपणे लढता आले नाही . आता तरीही तीन राज्य आहेत . एकत्र लढायचे असेल तर काहीतरी समानता असायला हवी . शत्रू एक आहे म्हणून एकत्र येणे ऐवजी कोणत्या तरी चांगल्या करण्यासाठी एकत्र होणं केव्हाही चांगलं . त्यापैकी एक कारण म्हणजे जलधि मारुत आणि अग्नेय हे भाऊ भाऊ होते . एकमेकांचे सख्खे भाऊ होते . ....."
नंतर महाराज कैरवाकडे पाहत राजर्षी बोलले.... " महाराज आपण तिन्ही राज्यांची बैठक लवकरात लवकर बोलवायला हवी....."
त्याबरोबर महाराज कैरवांनी उडत्या बेटावरील आग्नेयांसाठी आणि लपून राहणार या मारुतांसाठी बैठकीचे निमंत्रण पाठवले...

उडत्या बेटावरती अग्नेय राज्यांचं राजांचं राज्य होतं . उडत्या बेटांना उडती बेटे हे नाव का पडलं कोणालाच माहित नव्हतं. फक्त ती समुद्रातील बेटे होती . फार छोटी नव्हती ना अती मोठी होती . आग्नेय राजांची सत्ता फक्त तिथेच होती . त्या बेटांचा बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नव्हता . त्या ठिकाणचे लोक बाहेर जायचे नाहीत . सारकाही त्यांना त्या ठिकाणीच उपलब्ध करून दिलं जात होतं . मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या बऱ्याच प्रमाणात होती . मात्र साऱ्यांनाच आत प्रवेश मिळेल अशातला भाग नव्हता . प्रवेशदार फारच वेगळं होतं . त्या ठिकाणी एकही सैनिक उपस्थित नसायचा . ते दार ओलांडून जाणे अशक्य होतं . लपूनछपून आत प्रवेश करणाऱ्याला जागीच मृत्यू दंड दिला जात असे . त्या ठिकाणी आत प्रवेश करण्यासाठी काही प्रश्न विचारले जायचे . खरी उत्तरे दिली तर ठरवलं जायचं की आत सोडायचं की बेटा बाहेर फेकून द्यायचं . खोटी उत्तरे दिली की आगीचा लोळ यायचा आणि त्या माणसाची जागेला राख व्हायची....

ज्यावेळी पहिला प्रलय आला त्यावेळी अग्नेय राजे सर्वांसोबत उभे राहिले . मात्र जलधि व मारूतांमध्ये असलेल्या भांडणामुळे प्रलयकारीकेला हरवणं अशक्य झाले . त्यामुळे प्रलयकारिकेपासून पासून दूर , बेटांवरती अग्नेय राजे त्यांच्या प्रजेसोबत स्थायिक झाले . उडत्या बैठण भोवती विशिष्ट प्रकारचं कवच होतं . प्रलयकारीकेला त्या ठिकाणी प्रवेश मिळणं सर्वथैव अशक्य होते . त्या ठिकाणी असलेली एक गोष्ट जर प्रलयकारिकेच्या हाती लागली तर प्रलय जागृत करण्यापासून कोणी थांबवु शकत नव्हतं . त्यासाठी अग्नेयांच्या पूर्वजांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन ते कवच निर्माण केलं होतं . आग्नेय बेटांवर वृद्ध अजिबातच नव्हते . ठराविक वयानंतर ते अग्नित सामील व्हायचे , आणि तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचा कवच होता . तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचे ज्ञान-विज्ञान युद्धनीती तज्ञ सारकाही होता . त्यां अग्नीकडून आग्नेय राजे सल्ला घ्यायचे . पूर्वजांचे ज्ञान त्यांच्या पाठीशी होतं . तोच अग्नि प्रश्न विचारायचा . तोच अग्नी ठरवायचा कुणाला प्रवेश द्यायचा व कोणाला नाही . न्यायनिवाडाही तोच अग्नि करायचा . कोणताही निर्णय अग्नीला न विचारता घेतला जायचा नाही.....
उडत्या बेटाच्या प्रवेशद्वारावर वरती सुरुकु सोबत आयुष्यमान तंत्रज्ञ मंदार म्हातारा आणि ते दोन बुटके उभे होते ...
" अरे तंत्रज्ञ मंदार नि म्हातारा मांत्रिक दोघेही एक साथ..... " असा आवाज आला आणि ते प्रवेश दार उघडलं गेलं . ते सारे आत निघाले त्याच वेळी आवाज आला....
" नसत्या करामती करू नका . जे करायला आला आहे ते करा व गुपचूप निघा .....
आणि ते दार बंद झाले

काळ्या महालातील शस्त्रागारात असणारा त्रिशूळ आणण्यासाठी देवव्रत निघाला . प्रवास खूप मोठा होता . काही दिवस पुरेल एवढेच अन्न पाणी त्याने घेतले होते . मात्र काही तासाच्या प्रवासानंतर त्याचा घोडा दमला . एक उत्तम प्रजातीचे जनावर कितीतरी दिवसाचा प्रवास न थकता करणारे , भिंतीच्या पलीकडे असल्याने काही तासाच्या प्रवासात फारच दमले . देवव्रत घोड्यावरून उतरला . त्याला तिथेच सोडला , आणि तो चालत पुढे निघाला . संपूर्ण जमीन उजाड होती . एकही हिरवे झुडूप नव्हते . उन्हाच्या झळा लागून त्यांची त्वचा जळत होती . काही तास चालल्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला . त्याची पावले जड झाली . डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली . आणि तो बेशुद्ध झाला....
गार वार्‍याने त्याला जाग आली . थंडगार पाण्याने भरलेल्या तळ्याकाठी गार लुसलुशीत गवतावरती मखमली कापडावरती तो विवस्त्र पडला होता . दुरून एक अतिसुंदर नारी येताना दिसत होती . तिला पाहताच राजकुमार देवव्रत मोहित झाला , पण अन्विची आठवण होताच त्याला अपराधीपणा वाटला . महाराज विश्वकर्माची मुलगी अन्वी व राजकुमार देवव्रत यांचं निस्सिंम प्रेम होतं . त्याने त्या सुंदर नारीकडे बघायचे टाळले . ती जवळ आली....
" देवव्रत माझ्याकडे बघणार देखील नाहीस का....
तो अन्वीचा आवाज होता . त्याने तिच्याकडे पाहिलं . ती अन्वीच होती . त्याला वाटलं हे स्वप्न असावं . त्याने तिला त्याच्या बाहुपाशात घेतले . ओठला ओठ स्पर्श होताच दोघांचेही शरीरे थरथरुन निघाली . त्याचे हात तिच्या शरीराभोवती मुक्तपणे फिरू लागले . ती सुखाची उसासे टाकत होती. श्वासोच्छवास वाढत गेले . एकमेकांची शरीरे कितीही अनुभवली तरी त्यांची मने तृप्त होतच नव्हती . बराच वेळ त्यांची प्रणयक्रिडा चालू राहिली. त्या कोवळ्या उन्हातही ते घामाने नाहून निघाले . शेवटी एकमेकांच्या बाहुपाशात तिथेच झोपी गेले.

उन्हाच्या झळ्याने त्याला जाग आली . देवव्रत जागा झाला . संपूर्ण शरीर घामाने भिजले होते . त्याच्या शरीराला अत्तराचा वास येत होता . बाजूला तो सोनेरी त्रिशूळ पडला होता . ज्या ठिकाणी त्याने घोडा सोडला होता तिथेच त्याला जाग आली होती . घोडा अजूनही तिथेच होता . काय झालं हे त्यालाही माहीत नव्हतं . पण ज्या त्रिशुळासाठी तो आला होता ते त्रिशूळ मात्र त्याला मिळालं होतं . त्रिशुळ घेऊन घोड्यावरती बसत तो जलधि राज्याच्या सैन्यतळाकडे निघाला....
क्रमःश.....